पावसाच्या आठवणी - १

Submitted by सेन्साय on 17 July, 2017 - 22:55

.
dance-in-the-rain-couple.jpg

.

.
अवखळ मोती जलबिंदुंचे
मनमोरावर विसावले
गंधीत स्पर्शाने त्या
अवघे भावविश्व मोहरले

क्षणिक अस्तित्व त्या थेंबाना
चातक भुकेने सर्वचि वेचले
विसावून तुझ्या धुंद पाशात
जीवनी विश्वासाचे प्रेम बहरले

अवघे अस्तित्व माझ्याच स्वप्नांचे
तू येताच भान हरवते
सार्थकतेने रेशिम गाठित
स्व-बंधीत होणे सार जीवनाचे

- अंबज्ञ

Group content visibility: 
Public - accessible to all site users

धन्स च्रप्स Happy
ह्यासुद्धा कॉलेज जीवनातील आठवणींपैकी एक आहे म्हणून भाग १

छान!

धन्यवाद मानवजी Happy
काल कट्टया वरच्या गप्पांमुळे जुन्या आठवणीना नव्याने बहर आला