विरह वेदना !!!

Submitted by प्रकाशसाळवी on 22 June, 2017 - 12:08

विरह वेदना !!
-----------
आता नको तू पुन्हा दू:खात लोटू
सुकली आसवे ही, नको पुन्हा भेटू
**
शिशिरात पानगळ, वसंतात पालवी
पुन्हा प्रीतीची आस, नको लाळ घोटू
**
तुझे हासणे, तुझे बहाणे, तुझे ते लाडावणे
त्या हरित आठवांनी, नको रक्त आटू
**
जीवन म्हणजे खेळ उन - पावसाचा
जगणे आहे मजेचे, नको स्वत्व घोटू
**
हार कुणाची, जीत कुणाची खेळात आपल्या
जिंकण्याचे भान ठेव, नको श्रेय लाटू
**
झाले जरी माझ्या, जीवनाचे वाळवंट
खाईत वेदनांच्या आता नको दूर लोटू
**
प्रकाश साळवी
०४-०५-२०१७
०९१५८२५६०५४

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users