एमराल्ड पॅराडाईझ केस

Submitted by हायझेनबर्ग on 5 June, 2017 - 18:17

'एमराल्ड पॅराडाईझ' ह्या सुपर लक्झ्युरियस तीन मजली बिल्डिंग मधल्या तिसर्‍या मजल्यावरच्या पेंट हाऊस नं ३०२ सोडून पाचही फ्लॅट मध्ये दि. ६ मे २०१६ च्या वादळी पावसाच्या रात्री नेहमीचा झगमगाट आणि वर्दळ नव्हती. कारणही तसेच होते 'सेबरलाईन' ह्या रेग्युलर कार्स कस्टमाईझ्ड करणार्‍या कंपनीचे मालक 'देवेन शहा' जे तिसर्‍या मजल्यावरच्या दोन पैकी एका पेंट हाऊस नं. ३०१ मध्ये रहात, त्यांच्या एकुलत्या एका मुलीचे 'मनालीचे' आज लग्न होते आणि सगळे पॅराडाईझ निवासी घरचेच लग्नं असल्यासारखे सकाळपासून त्याच कार्यक्रमात गेले होते. कोट्याधीशांचीच सोसायटी ती, सगळे एका चढ एक श्रीमंत बिझनेसमन तिथे रहात, अपवाद नं ३०२. एका मजल्यावर दोन असे सहा अति प्रशस्तं फ्लॅट्स असलेली 'एमराल्ड पॅराडईझ' शहरातल्या प्रत्येकासाठी जणू प्रतिस्वर्गच होता. टेरेस वरती स्विमिंग पूल, स्पा, स्टीम रूम, स्टेट ऑफ द आर्ट जिम, टेनिस कोर्ट, मिनी सिनेमा थिएटर, सेंट्रल एअर कंडिशनिंग, सन रूम, मोठी बाग, दोन लेवल अंडरग्राऊंड पार्किंग, चिल्ड्रेन्स एरिया अशी लग्झुरी तर होतीच पण सिक्युरीटीही तेवढीच कडक, सगळ्या लॉबीज आणि जिने अद्ययावत कॅमेरांनी ईक्विप्ड होते, चोवीस तास गेट्स वर दोन सिक्युरिटी गार्ड्स, ईंटरकॉम, केवळ फ्लॅट ओनरलाच ज्याची जागा माहित असेल आणि ऊघडता येईल असा सेफ्टीवॉल्ट, प्रत्येक मजल्यावर ईमर्जन्सी लाईन्स, जनरेटर बॅकअप, कधीही नादुरूस्त न होणारे एलिवेटर्स असे सगळे.

सहा महिन्यांपूर्वीपर्यंत पेंट हाऊस नं ३०२ मध्ये देवेन शहांचे जीवलग मित्रं 'कार्तिक मेहता' रहात होते. सहा महिन्यांपूर्वी कार्तिकशेठचे अचानक हार्ट अ‍ॅटॅक ने निधन झाले तेव्हा त्यांच्या अतिशय धार्मिक स्वभावाच्या पत्नी 'सारंगीबेन' ते घर आपल्या मुलाच्या नावाने करून, एक खूप मोठी रक्कम एका चॅरिटीला देवून वानप्रस्थाश्रम (त्यांच्या गुजरातमधल्या पवित्र धर्मस्थळी जाऊन सन्यस्तं जीवन जगणे) स्वीकारला. असे करण्याचे एक कारण असेही होते की आजवर घरापासून कायम दूरच राहिलेल्या आपल्या अट्टल बेवड्या, जुगारी आणि बाहेरचे सगळे नाद असलेल्या एकुलता एक मुलगा 'समीर' बरोबर रहाणे त्यांना मान्य नव्हते पण घरावरचा त्याचा वारसा हक्क ही त्यांना डावलायचा नव्हता. सारंगीबेनने घर सोडताच त्याचदिवशी समीर ने घराचा ताबा घेत आपला मुक्काम एमराल्ड पॅराडाईझमध्ये हलवला.

पण ही अरेंजमेंट एमराल्ड पॅराडाईझच्या सगळ्या कुटुंबवत्सल राहिवासींच्या जीवावरच ऊठली. कायम दारू पिऊन धिंगाणा करणारे तरूण, लाऊड पार्ट्या , सदोदित येणार्‍या एस्कॉर्टच्या गाड्या ह्यामुळे एमराल्ड पॅराडाईझ तिथल्या राहिवाश्यांना एकदम नरकासारखे वाटू न लागते तर नवलच. बरं हे सगळे राहिवासी 'काँटॅक्ट्स' वाले पावरफुल लोक असूनही 'समीर मेहता' ला ते शह देवू शकत नव्हते आणि ह्याला कारण होते समीरचा परममित्रं, त्याच्या सगळ्या सवयीतला त्याचा भागीदार 'केशव नाईक' जो रुलिंग राष्ट्रीय पार्टीच्या अतिशय पावरफूल अश्या नेत्याचा एकुलता एक मुलगा होता. बर्‍याच वेळा समीरशी, देवेन शहा सोडून ईतर पॅराडाईझ वासीयांचे खटके ही ऊडाले होते पण सदोदित समीरच्या बरोबरच असलेल्या केशवचा अतिशय खालच्या दर्जेच्या भाषेचा वापर आणि धमकीवजा प्रतिसाद मिळताच सगळ्यांची बोलती बंद झाली होती. मात्रं त्यांच्या मनात अपमान आणि रागाचा लाव्हा खदखदंत होता हे नक्की.

ह्या सगळ्या त्रासावर काहितरी ऊपाय करावा म्हणून एमराल्ड पॅराडाईझ च्या ईतर पाच फ्लॅट धारकांची मिटिंग जेव्हा भरली तेव्हा देवेन शहांनी एक बिनतोड ऊपाय मांडला. सारंगीबेनने समीरसाठी घर ठेवले असले तरी पैशाची तजवीज करून ठेवलेली नव्हती हे त्यांना माहित होते आणि ऊत्पन्नाचा कोणताही स्त्रोत नसल्याने समीर त्याच्या 'शोकीन' सवयीमुळे लवकरच पैशांच्या तंगीत येणार हे ते जाणून होते. मात्रं ही आतली बातमी मिटिंगमध्ये ऊघड न करता, बाजारभावाने १५ कोटी किंमत असलेल्या समीरच्या फ्लॅट्साठी समीरला १९ कोटीची ऑफर देण्याचा प्रस्ताव मांडला. पण ह्या प्रस्तावात गोम अशी होती की फ्लॅट त्यांच्या स्वतःच्या नावावर राहिल, तो त्यांच्याच मालकीचा असेल पण ते फक्तं १५ कोटी देतील आणि बाकीचे चार कोटी ऊरलेल्या चार प्लॅटधारकांनी ऊभे करायचे. त्या मिटिंगमध्ये ह्या त्रासाची एवढी मोठी किंमत द्यायला एकही जण तयार झाला नाही पण होकार देण्याशिवाय आपल्याकडे काही पर्याय नाही हेही त्यांना कळाले होते. आपल्या वयात येणार्‍या मुला मुलींना समीरच्या राजरोस चाललेल्या तमाशापासून लांब ठेवायचे असेल तर ही किंमत मोजावीच लागेल ह्याची कल्पना त्यांना आली होती. समीर ह्यापेक्षा कमी किंमतीत फ्लॅट विकणार नाही आणि शहा हा फार डोकेबाज आणि हिकमती माणूस आहे त्याचेही मोठे काँटॅक्ट्स आहेत आणि समीरला ते त्याच्या लहान पासून ओळखत असल्याने समीरच्या तोंडाला तोंड फक्तं तेच समर्थपणे देवू शकतात हेही ते सगळे ओळखून होते.

शहांनी हा प्रस्ताव मांडला तेव्हा त्यांच्या डोक्यात एका दगडाने दोन पक्षी मारायचा प्लान तयार होता. झाले असे होते की त्यांच्या मनाविरूद्धं जाऊन 'मनाली' एका कॅथलिक मुलाशी 'असीम' शी लग्न करत होती ज्याच्याशी तिची एका बिझनेस कॉन्फरन्समध्ये ओळख झाली होती आणि ती त्याच्या व्यक्तीमत्वाने प्रभावित होऊन त्याच्यावर पूर्णपणे भाळली होती. गोव्याकडचे एक घर सोडल्यास ह्या मुलाकडे काहीही नाही आणि हा मुलगा अतिशय धूर्त आणि कावेबाज असून दिसतो तेवढा प्रेमळ आजिबात नाही हे देवेन शहांनी ओळखले होते. मनालीवर त्यांचा फार जीव होता आणि असीम तिच्या एकुलत्याएक असण्याचा फायदा घेत आहे हेही त्यांना स्प्ष्टं कळून येत होते. पण त्यांच्या नात्याला विरोध करून आपल्या हाती काहीच लागणार नाही आणि 'मनाने अतिशय भावनाप्रधान पण प्रेमात आंधळ्या झालेल्या' मनालीला आपण कायमचे आपला शत्रू बनवून घेवू हे त्यांच्या पांढर्‍या केसांना आणि काळ्या चष्म्याला चांगले ठावूक होते. म्हणूनच लग्नानंतर मनाली आपल्या डोळ्यांसमोर रहावी ह्या हेतूने त्यांनी हा फ्लॅट चा प्लॅन बनवला होता आणो तो मनाली आणि असीम कडून मान्यही करून घेतला होता. 'अजून एक प्रॉपर्टी' आपल्या बायकोच्या नावावर होत आहे हे कळल्यावर असीम ह्या प्लान ला आजिबात नाही म्हणणार नाही आणि सुरूवातीला 'तळ्यात मळ्यात' असलेल्या मनालीला ही तो नक्की तयार करेल हा त्यांचा होरा चूक निघाला नसता तर नवलच झाले असते.

शनिवारच्या ६ मे चा लग्नं समारंभ आटोपल्यानंतर ७ मेची पॅराडाईझ वासियांची सकाळंच मुळी पोलिस आणि अ‍ॅंब्युलन्स च्या आवाजाने ऊजाडली. समीर मेहताचे त्याच्या राहत्या घरात निष्प्राण शरीर सापडले होते आणि केशव नाईकने प्रचंड आरडाओरड व गोंधळ मांडला होता. रोज सकाळी सातालाच येणार्‍या समीरच्या हाऊसक्लीनरने घरातला नेहमीचा कचरा सिगरेटी/ दारूच्या बाटल्या/ काँडोमची पाकिटे/ विचित्रं औषधांच्या गोळ्यांची पाकिटे/ अस्ताव्यस्तं पडलेले कपडे/ अर्धवट सोडलेले बाहेरून मागवलेले खाणे ई. आवरून झोपमोड होवू नये म्हणून नेहमीच बंदच असलेल्या समीरच्या आज ऊघड्या राहिलेल्या बेडरूममध्ये डोकावले तेव्हा त्याला बेडवर भूत बघितले असल्यासारखा चेहरा करून पडलेला समीर दिसला आणि त्याने लगोलग केशव नाईक ला फोन केला.

हाय प्रोफाईल केस आणि राष्ट्रीय स्तरावरच्या नेत्याकडून थेट कमिशनर साहेबांकडेच विचारणा करण्यात आल्याने केसचा तपास सुरूवातीलाच क्राईम ब्रँच कडे सोपवला गेला. फोरेन्सिक आणि क्राईम सीन ईन्वेस्टिगेशन टीम्सना बोलावून प्रार्थमिक तपास आणि बिल्डिंग मधल्यांची चौकशी लगोलग सुरू केली पण समीरचा मृत्यू नेमका कश्याने झाला ह्याचा कुठलाही अंदाज आजिबातच येत नसल्याने केस ज्यांच्या समर्थ आणि अतिशय अनुभवी खांद्यांवर सोपवली होती त्या १९९८ च्या बॅचच्या अखिलेश ठाकुरांच्या चढत्या भुवया बरेच काही सांगत होत्या. ठाकुरांनी कठीणात कठीण अश्या चाचण्यांनंतर ज्या दोन ऑफिसर्स ची निवड त्यांच्या टीममध्ये केली होती त्या ऑफिसर निलेश वर्तक आणि शमा मलिक दोघांनीही खडतर प्रशिक्षणातून तावून सुलाखून निघाल्यानंतर चार वर्षे ठाकुरांच्या करड्या नजरेखाली शिकलेल्या सगळ्या युक्ती प्रयुक्ती वापरूनही फाऊल प्ले चे काहीच धागेदोरे हाती लागत नसल्याने 'ही मेडिकल केसच आहे' असाच प्रार्थमिक होरा केला होता. पण तो किती चुकीचा आहे हे त्यांना ठाकुरांच्या चेहर्‍याकडे बघतांच कळाले होते.
आठवडाभरात दोन डझन वेळा क्राईम सीन ला भेट देवून मिळवलेली माहिती, एक्स्पर्ट टीम्सच्या नोंदी, पोस्टमॉर्टेम रिपोर्ट आणि त्यांचे तर्कशास्त्रं ह्यावरून वर्तक आणि मलिक ह्यांच्या डायरीतल्या नोंदी.

* दोन्ही दिवसांच्या टाईमलाईन ऊलट्या क्रमाने वाचाव्यात.

टाईमलाईन ७ मे
सकाळी ९:२८ पोलिस एमराल्ड पॅराडाईझ मध्ये दाखल
सकाळी ९:१२ केशव नाईकचा पोलिस हेल्प लाईन वर फोन
सकाळी ८:५८ शशिकांत नाईक ह्यांचे वकील अ‍ॅड अशोक कटियार ह्यांचा केशव नाईकला फोन
सकाळी ८:४१ केशव नाईकचा वडील शशिकांत नाई़क ना फोन (शशिकांत नाईक - पर्यावरण मंत्री)
सकाळी ८:२९ केशव नाईकचे फॅमिली डॉक्टर निनाद पाध्येंची एमराल्ड पॅराडाईझमध्ये एंट्री.
सकाळी ८:११ केशव नाईकची (वय २४) एमराल्ड पॅराडाईझ मध्ये एंट्री
सकाळी ७:३७ गणेश शिंदेचा केशव नाईकला फोन
सकाळी ७:०४ हाऊसक्लीनर गणेश शिंदेची (वय १८) एमराल्ड पॅराडाईझमध्ये एंट्री (गणेश शिंदेची आई केशव नाईकच्या घरी हाऊसमेड आहे)

टाईमलाईन ६ मे
(त्यानंतर ७ मे सकाळी ७:०४ पर्यंत कुठलीही एंट्री वा एग्झिट नाही)
रात्री ११:५६ एमराल्ड पॅराडाईझ मधील देवेन शहांच्या दोन गाड्यांची एमराल्ड पॅराडाईझ मध्ये एंट्री
रात्री ११:१३ ते ११:२० दरम्यान एमराल्ड पॅराडाईझ मधील ईतर चार कुटुंबांची एकूण चार गाड्यांची एंट्री (गाडी मालकांचे डिटेल्स ऊपलब्धं)
रात्री ११:११ केशव नाईक ची एमराल्ड पॅराडाईझ मधून एग्झिट
रात्री ११:०४ डिलिशिअस डाईन ह्या फुड डिलिवरी सर्विसची समीर मेहताच्या घरात डिलिवरी.
रात्री ११:०१ ला दोन एस्कॉर्टस सर्विसच्या मुलींची एमराल्ड पॅराडाईझ मधून एग्झिट
रात्री ९:४० केशव नाईक सहित दोन मुलींची एमराल्ड पॅराडाईझ मध्ये एंट्री
रात्री ९:१० समीर मेहताची एमराल्ड पॅराडाईझ मध्ये एंट्री

* महत्वाच्या व्यक्तीं सबंधित नोंदी
- समीर ला जिवंत पाहणारी केशव नाईक शेवटची व्यक्ती.
- डिलिवरी बॉयच्या जबाबानुसार फुड डिलिवरी केशव ने घेतली आणि त्याने त्यावेळी समीर ला पाहिले नाही, नेहमी समीर डिलिवरी घेतो आणि टीपही देतो पण केशव ने टीप दिली नाही.
- एस्कॉर्टस च्या जबानीनुसार ते निघतांना समीर जिवंत होता पण ठरलेले ३० हजार देण्यावरून समीर आणि केशव मध्ये थोडी बाचाबाची झाली.
- केशव नाईक प्रमुख संशयित पण मोटिव काहीच दिसत नाही.
- फ्लॅट नं. २०२ मधील मनीष अवस्थी ह्यांचे ७२ वर्षीय वडील 'भास्कर अवस्थी' तब्येतीच्या कारणाने शहांच्या लग्नाला न जाता घरीच होते. वयाच्या मानाने आश्चर्यकारक फिट आणि करारी, तत्ववादी व्यक्तीमत्व. अनेक प्रश्नांना भास्कर अवस्थी ह्यांनी रागीट टोनमध्ये ऊडवा ऊडवीची ऊत्तरे दिली. भास्कर अवस्थी ह्यांचा देशविदेशातील औषधी वनस्पती गोळा करून श्रीमंत क्लायंटसना त्वचारोगावर होममेड औषधी विकण्याचा बिझनेस होता जो मनीष अवस्थी ह्यांनी एका सौंदर्यप्रसाधने बनवणार्‍या यशस्वी 'ब्यूटीकॉन फार्मा' कंपनी मध्ये विकसित केला आहे. भास्कर अवस्थी केवळ परंपरागत ज्ञानावर ते औषध बनवत आणि मोठ्ठमोठ्या डॉक्टरांनी हात टेकलेल्या केसेस मध्ये त्यांच्या औषधांचा गूण आल्याचे काही श्रीमंत लोक अतिशय विश्वासाने सांगतात. पण सध्या त्यांचा हा ऊद्योग कैक वर्षांपासून बंद आहे.
- सिक्यूरिटी गार्डच्या जबाबानुसार आपल्या १६ वर्षांच्या जुळ्या नातींची छेड काढणार्‍या समीरच्या दोन मित्रांना भास्कर ह्यांनी एका महिन्यापूर्वी मारहाण केली होती आणि त्यानंतर त्यांची समीरशीही जंगी वादावादी झाली होती पण मनीष ह्यांनी वडिलांना आवर घातला. भास्कर बिल्डिंगमध्ये कुणाशीही आणि त्यांच्या तापट स्वभावामुळे त्यांच्याशीही कोणी जास्तं बोलत नाही. ते न चुकता सकाळी सहा आणि संध्याकाळी सहाला तासाभराच्या वॉक ला जातात आणि गार्डनमध्ये तासभर योगा करतात. पण ६ मेला संध्याकाळी आणि ७ मेला सकाळी ते गेले नाही.
- फ्लॅट नं. २०१ मधील संपत जैन ह्यांचा १८ वर्षांचा मुलगा 'सार्थक जैन' परीक्षेचा अभ्यास असल्याच्या कारणाने लग्नाला न जाता घरीच होता.
सार्थक बीकॉमच्या पहिल्या वर्षाला आहे पण कॉलेज ऊपस्थिती आणि अभ्यासात यथातथाच आहे. कॉलेजात अशी कुठलीही परीक्षा नसतांना अभ्यासाचे कारण पटण्यासारखे नाही. सार्थक लहानपणापासून हौशी मार्शल आर्ट्स स्पर्धामध्येही बर्‍यापैकी सक्रीय असतो.
- सिक्यूरिटी गार्डच्या जबाबानुसार त्यांना, सार्थकची आई ऊज्वला जैन ह्यांनी सार्थक समीरशी बोलतांना किंवा बरोबर जाता येता दिसल्यास कळवण्यास संगितले होते. गेल्या तीन महिन्यात चढत्या वारंवारतेने सार्थकची समीरशी वाढणारी जवळीक गार्ड्सनी त्याच्या आईला कळवली होती आणि मागच्याच आठवड्यात त्याची समीरशी झालेली वादावादीही ज्यावेळी समीरने सार्थकला त्याच्या गर्लफ्रेंड समोर दोन श्रीमुखात लगावल्या होत्या. हे सत्यं सार्थकच्या गर्लफ्रेंडनेही कबूल केले तिला त्यामागचे कारण काही तरी ऊधार असलेल्या पैशांबद्दल असावे असे वाटते.
-फ्लॅट नं १०२ मधील साधूराम गिडवानी ह्यांच्याकडे दिल्लीहून त्यांचा भाचा 'अमित धुप्पर' हा आठवड्याभरापासून त्याचे शहरात काही काम होते म्हणून पाहूणा म्हणून आला होता. ६ मे च्या रात्री तो ही घरीच होता. दिल्लीमध्ये अमित चा ऑफिस सिक्युरिटी सिस्टीम ईनस्टॉल करण्याचा बिझनेस आहे आणि त्याच्या नावावर मारामारी/ धाक दाखवणे वगैरे छोटे मोठे गुन्हे रजिस्ट्र्र्ड आहेत. एकदा नशेत भरधाव गाडी चालवतांनाही त्याला पकडले होते तेव्हा त्याच्याकडे दुर्मिळ अशी नशा येणारी औषधे सापडली होती.
- सिक्युरिटी गार्डच्या जबाबानुसार त्यांना अमित अतिशय चांगला तरूण वाटला होता. त्यांच्यामते सिक्युरिटी सिस्टीम बद्दल त्याचे ज्ञान फार अ‍ॅडवान्स्ड होते. तो त्यांच्याशी बर्‍याच गप्पा मारत असे आणि एक दोनदा अडून अडून त्याने समीर बद्दल जास्तं माहिती काढून घेण्याचा प्रयत्न केला होता असे त्यांना आता वाटते आहे.
- अमितची चौकशी करतांना तो बोलण्यात अतिशय पटाईत माणूस वाटतो. त्याचा समीर मेहताशी वरवर काहीही सबंध दिसून येत नाही पण त्याचे एकंदर बॅकग्राऊंड आणि वागणे संशयास्पद वाटते.
- फ्लॅट नं १०१ मधील ६० वर्षीय दिनेश कोठारी आपल्या दुसर्‍या पत्नी नलिनी (४० वर्षे) सोबत राहतात ज्यांच्याशी त्यांनी सहा महिन्यांपूर्वी कोर्ट मॅरेज केले आहे. त्यांच्या पहिल्या पत्नीचा कॅन्सरने चार वर्षांपूर्वी मृत्यू झाला होता आणि त्यांचा एकुलता एक मुलगा 'नवीन' सध्या यूएस मध्ये मेडिकल फील्ड मध्ये पीएचडी करत आहे.
- फ्लॅट नंबर ३०१ मधील देवेन शहा हाय सर्कल मध्ये ऊठबस असलेला माणूस आहे. स्वभावाने शांत, धीरगंभीर पण विचारी व अगदी मोजून मापून बोलणारा अतिशय व्यवहारी माणूस वाटला. शहांनी बाजारभावाने समीर मेहताकडून त्याचे घर १५ कोटी रुपयांना मागच्याच आठवड्यात विकत घेतले होते आणि १५ मेपर्यंत घर खाली करून ताब्यात देण्याचे हमीपत्रं समीरने त्यांना दिले होते ज्यावर दोन्ही पार्टीच्या वकिलांच्या सह्या होत्या आणि हा व्यवहार पूर्णपणे कायदेशीर मार्गाने झाला होता.
- शहांच्या पत्नी देविका शहा पुर्वाश्रमीच्या देविका अय्यर ह्या कोचीच्या प्रसिद्धं गायनॉकोलॉजिस्ट श्रीनिवास आणि जोस्त्ना अय्यर ह्यांच्या कन्या ज्या स्वतः एक यशस्वी गायनॅक होत्या पण मनालीच्या जन्मानंतर त्यांनी प्रॅक्टिस सोडली आणि शास्त्रीय संगीताचे धडे गिरवायला सुरूवात केली.
- मनाली शहा एका मल्टिनॅशनल ऑटोमोबाईल कंपनीत मध्ये मार्केटिंग मॅनेजर. यु एस मधून एम बी ए आणि येत्या काही वर्षात वडिलांच्या 'सेबरलाईन ऑटो' ची धुरा सांभाळेल अशी अपेक्षा. आव आणल्यासारखं रोखठोक बोलणं पण ईमोशनली बायस्ड, चौकशी दरम्यान बायपोलर डिसऑर्डरसाठीची मेडिकेशन्स घरात दिसली.
- असीम पारकर एका बुटीक ईन्वेस्टमेंट फर्ममध्ये रिसर्च मॅनेजर. माचो पण फिशी कॅरॅक्टर. शहा फॅमिली सोडून ह्याचा समीर मेहता प्रकरणाशी काही संबंध वाटत नाही. एका सप्लाय चेन कंपनीत मॅनेजर असतांना वेंडर मॅनेजमेंटमधील फ्रॉड केस मध्ये ह्याचे नाव आले होते पण कंपनीने बोभाटा नको म्हणून केस न करता केवळ कामावरून कमी केले. त्या नंतरच्या कंपनीत सेक्शुअल हॅरेसमेंट चाही आरोप ठेवण्यात आला पण गैरसमजातून झालेला प्रकार म्हणत कंपनीने प्रकरण मिटवले आणि पुन्हा कामावरून काढून टाकले. सध्याच्या कंपनीत 'एथिकल क्लायंट प्रॅक्टिसेस' वायोलेशन म्हणून एनक्वायरी चालू आहे. सध्या नॉन क्रिटिकल असाईनमेंट हॅंडल करतो आहे.
- मनाली आणि असीमच्या लग्नाला शहा सारख्या हुशार माणसाने असीम पारकर ची माहिती न काढता सहजी परवानगी दिली असेल असे वाटत नाही.
- शहांनी वरतून प्रेशर आणून मनाली-असीम दांपत्याला त्यांच्या तीन आठवड्यांच्या प्लॅन्ड हनीमूनला जाऊ देण्याची परवानगी मिळवली व गरज पडल्यास त्यांना दोन दिवसात हजर करण्याची हमी दिली आहे.

* खबरींकडून समजलेली माहिती
- केशव, समीर आणि नवीन कोठारी एकाच ज्युनिअर कॉलेज मध्ये असतांना त्यांनी नवीनला (जो 'गे' आहे) त्याच्या जेंडर आयडेंटिटी वरून खूप बुली केले होते जेणेकरुन नवीनने एका अयशस्वी आत्महत्येच्या प्रयत्नानंतर भारतातून निघून जाण्याचा निर्णय घेतला. मनात नसतांना कोठारींना एकुलत्या एक मुलाला अमेरिकेला पाठवावे लागले आणि त्याची मानसिक ओढाताण होवू नये म्हणून आईचा आजार ही त्याच्यापासून बरीच वर्षे लपवून ठेवावा लागला. ह्या कारणाने कार्तिक मेहता आणि दिनेश कोठारींचेही आपापसातले संबंध अनेक वर्षे ताणले गेले होते. पण समीर ही मेहतांच्याही हाताबाहेरची केस आहे हे जसे समजत गेले तसे आणि अमेरिकेत जाऊन ऊलट आपल्या मुलाचे सुरळीतच चालू आहे हे ऊमगून कोठारींनी मेहतांशी सबंध सुधारण्यासाठी मागच्या वर्षभरात पुढाकार घेतला होता. पण समीर वर त्यांचा प्रचंड राग होताच.
- शहांची मुलगी मनाली आणि समीर मेहता हायस्कूलमध्ये एकाच वर्गात होते आणि एकमेकांचे चांगले मित्रं होते. शहा आणि मेहता फॅमिली वर्षातून दोनदा विदेशात फॅमिली टूरवर फिरायला जात असंत. पण कॉलेजच्या पहिल्या वर्षात अचानक काहीतरी बिनसलं आणि मेहतांनी समीरला घरी न ठेवता हॉस्टेलवर रहायला पाठवलं, मनालीही त्यावर्षी फार काही कुणाला दिसली नाही.

* काही प्रासंगिक माहिती
- वरच्या नोंदीतले बिल्डिंगमध्ये हजर असलेले (भास्कर अवस्थी, सार्थक जैन, अमित धुप्पर) आणि नसलेले (नवीन कोठारी) सोडून ईतर सर्व पॅराडाईझ बिल्डिंग निवासी लग्नाच्या विडिओ कॅसेट मध्ये बर्‍याच वेळा दिसत आहेत.
- कुठल्याही मजल्यावर एलेवेटरने आल्यास एक फ्लॅट डावीकडे आणि एक ऊजवीकडे आहे आणि एलेवेटर समोरच्या भिंतीवरचा कॅमेरा एलेवेटर मधून बाहेर आलेला माणूस कुठल्या दिशेने गेला हे दाखवतो. त्या कॅमेराला चुकवणे शक्य नाही.
- मात्रं एका मजल्यावरच्या एका फ्लॅट मधून दुसर्‍यामध्ये कॅमेरा लावलेल्या भिंतीला लगटून कॅमेराच्या खालून गेल्यास तो अँगल कॅमेरा कॅप्चर करू शकत नाही
- जिन्यांमध्ये लावलेल्या सगळ्या कॅमेरांमध्ये एक अँगल असा आहे ज्याची आधी माहिती असल्यास जिन्यातूनही कॅमेरामध्ये न दिसता एका मजल्यावरून दुसर्‍यावर जाता येते पण त्यासाठी हा अँगल वापणारा माणूस प्रचंड अ‍ॅथलेटिक असायला हवा .
- बिल्डिंगला डाव्या आणि ऊजव्या दोन्ही साईडला जिने असून ते प्रत्येक मजल्यावर प्रत्येक फ्लॅटच्या दरवाजाच्या बरोबर समोर आहेत.
- वरती टेरेसवरच्या स्विमिंग पूल, सनरूम वगैरे फॅसिलिटी आणि खाली दोन मजल्यांचे पार्किंगही ही जिन्याने अ‍ॅक्सेस करता येते.
- पण कोणताही माणूस दोन्ही जिन्यांच्या दोन्ही पार्किंग लेवलवरच्या वा टेरेसच्या दरवाजातून आत वा बाहेर आल्यास तो बाहेर लावलेला कॅमरा चुकवू शकणार नाही.
- थोडक्यात कॅमेरा अ‍ॅंगलची जाण असलेला आणि ऑलरेडी बिल्डिंगमध्ये असलेला अ‍ॅथलेटिक माणूस जिने आणि प्रत्येक मजल्याच्या कॉरिडोअर मधून कॅमेरात न दिसता सहज जा ये करू शकतो पण तो टेरेस वा पार्किंग मध्ये आल्यास कॅमेरामध्ये हमखास कैद होणारंच.
- सहा मे च्या रात्री तिसर्‍या मजल्यावरच्या लिफ्टसमोरच्या कॅमेरामध्ये ११:५६ ते ७:०४ मध्ये कोणीही कॅप्चर झालेले दिसले नाही पण त्याआधी ९:३० ला लिफ्टच्या दरवाज्यावर एक सावली सरकतांना आणि पुन्हा ९:३७ ला तशीच सावली सरकतांना पुसटशी दिसत आहे. हा केवळ कॉरिडोअरच्या खिडकीतून कडाडणार्‍या विजांच्या प्रकाशाचा खेळ आहे की कोणी भिंतीला लगटून कॅमेरा खालून सरकत गेले हे सांगणे अवघड आहे.
- बिल्डिंग कंपाऊंडची भिंत ओलांडून वा गार्ड्सना चुकवून येणे सेन्सर्स मुळे केवळ अशक्य आहे.
- प्रत्येक फ्लॅटला ऑटोमेटेड लॉक्स आहेत जे चावीने वा वन टाईम नंबर कीपॅड वर टाकून वापरता येतात. चावी नसल्यास घराचे ऑथोराईझ्ड मालक वा कुटुंबीय त्यांच्या फोनमधले सॉफ्टवेअर वापरून हा वन टाईम नंबर जनरेट करू शकतात. एका फ्लॅटच्या मालकाने त्याच्या फोनवरून जनरेट केलेला वन टाईम नंबर फक्तं आणि फक्तं त्याच्या घराच्या लॉकवर चालतो.
- चुकीची चावी वापरल्यास वा दोनदा चुकीचा नंबर की-ईन केल्यास त्या फ्लोअरवरचा अलार्म वाजू लागतो आणि खाली सिक्युरिटी गार्डसनाही अ‍ॅलर्ट जातो.

* समीरशी निगडीत काही बाबी
- समीरच्या फोनमध्ये काही वाह्यात फोटोज, विडिओज आणि त्याच्या केशव व त्याच्यासारख्याच ईतर मित्रांच्या आणि एस्कॉर्ट कंपन्यांच्या कॉंटॅक्ट्स शिवाय फार काही मिळाले नाही.
- एमराल्ड पॅराडाईज मधल्या देवेन शहा आणि सार्थक जैन शिवाय ईतर कुणाचे काँटॅक्ट डीटेल्स त्याच्या फोन मध्ये मिळाले नाहीत.
- तीन दिवसांपूर्वी गुजरातच्या एका दुर्गम खेड्यातून समीरच्या नावाने आलेले एक पाकीट तेवढे घरात 'आक्षेपार्ह' वाटेल असे मिळाले ज्यात एक 'अंगारा/ऊदी' सदृष्य राखेसारखा पदार्थ मिळाला. गुजरातला त्या खेड्यात गेलेल्या टीमने तो अंगारा समीरच्या आईने त्याच्या वागण्यात सुधार व्हावा ह्या मायेच्या आणि धार्मिक हेतूने पाठवल्याचे मान्य केले आहे आणि त्या धार्मिक स्थळावर तो अंगारा मुबलक प्रमाणात ऊपलब्धं आहे.
- ६ मे रात्री ९:०२ वाजता समीर मेहताच्या फोनवरून देवेन शहांच्या फोन वर एक कॉल झाला जो २ मिनिटे सदतीस सेकंद चालला.
शहांना ह्या बद्दल विचारले असता त्यांनी समीर ने लग्नाच्या शुभेच्छा देण्यासाठी आणि ऊपस्थित राहू न शकल्याबद्दल दिलगिरी व्यक्तं करण्यासाठी फोन केल्याचे सांगितले.
- गणेश शिंदेने सकाळी जमा केलेला कचरा लगोलग गारबेज श्यूट मधून टाकून दिल्याने ग्राऊंड फ्लोअरवरच्या मोठ्या गारबेज कलेक्टर मध्ये जिथे बिल्डिंगचा आठवड्याभराचा कचरा जमा झाला होता त्या कचर्‍याचे वर्गीकरण करून त्याचे अ‍ॅनालिसिस करतांना फार कष्टं पडले. समीर मेहताच्या घरातला नेमका कचरा वेगळा काढता न आल्याने ह्या अ‍ॅनालिसिस मधून फार काही महत्वाचे हाती लागले नाही.

* पोस्टमॉर्टेम/ मेडिकल रिपोर्ट
मृत्यूचे कारण - शरीरातील वायटल सिस्टिम्स आणि ऑर्गन्स एका मागोमाग एक बंद पडत गेले. जणू मेंदूतूनच असे करण्यास आज्ञावली दिली गेली होती.
- विष वा तत्सम प्रकाराचा कुठलाही ट्रेस सापडला नाही. बॉडीवर कुठलेही बाहेरून केले गेलेले वार वा टोचण नाही.
- सबजेक्ट काही काळ कोमात गेला असल्याने मृत्यूची पिन पॉईंट वेळ सांगणे कठीण पण साधारणत: रात्री २ ते सकाळी ६ दरम्यान हे झाले असावे.
- पोटात न पचलेले अन्न, अल्कोहोल आणि काही दुर्मिळ नशा आणणार्‍या औषधांचे ट्रेसेस मिळाले आहेत पण त्यातले काहीही लीथल नव्हते. - एखादी अन आयडेंटीफाईड मेडिकल कंडिशन ट्रिगर झाली असण्याचा संबंध असू शकतो.
- नैसर्गिक मरण की आत्महत्या किंवा खून काहीही खात्रीलायक रित्या सांगता येणे अवघड आहे पण हा अगदी दुर्मिळाती दुर्मिळ प्रकारचा नैसर्गिक मृत्यू असावा असे सगळे केस फॅक्टस तपासल्या नंतर हा क्षेत्रातल्या सगळ्या तज्ञांचा होरा आहे.
- अंगारा/ऊदी सदृष्य पदार्थामध्ये काही भयानक विषारी केमिकल्स मिळाले आहेत पण सबजेक्टने ते घेतले असावेत असे वाटत नाही कारण त्या केमिकल्सचे परिणाम जीवघेणे पण मेडिकल जगतांस माहित असलेले आहेत. ह्या अंगार्‍याचा सो-कॉल्ड 'धार्मिक' सोर्स ताबडतोब बंद करावा.

कुठेतरी काहीतरी पाणी मुरत आहे पण नक्की काहीच प्रुव करता येत नाहीये हे कळून ठाकुर, वर्तक आणि मलिक ह्यांच्या टीमने एकही संशयित ठोस पुराव्या अभावी ताब्यात न घेता 'मेडिकल कंडिशन' म्हणत 'समीर मेहता' केसचा अहवाल वरती पाठवला आणि कमिशनर साहेबही मंत्री साहेबांना 'एवढा आकांड तांडव करायची गरज नव्हती' म्हणत ऊत्तर देवून मोकळे झाले.

केवळ आठच महिन्यानंतर म्हणजे १३ जानेवारी २०१७ च्या सकाळी समीर मेहता ज्या बेडरूममध्ये भूत बघितल्यासारखा चेहरा करून मरून पडला होता त्याच बेडरूममध्ये असीम पारकरचे निष्प्राण शरीर भूत बघितल्यासारखे पडलेले शहा फॅमिलीची हाऊसमेड अलका प्रसाद ने सकाळी सात वाजता पाहिले . शहा फॅमिली एक आठवड्यापूर्वीच यु एस मध्ये कॅलिफोर्नियातल्या मनालीच्या मावशीच्या मुलीच्या लग्नाला गेली होती आणि ठाकुर, वर्तक आणि मलिक पुन्हा त्याच बिल्डिंगमध्ये त्याच मजल्यावरच्या त्याच रूममध्ये तश्याच एका वादळी रात्रीनंतर एखादा भयानक नॉस्टेल्जिआचा अ‍ॅटॅक आल्यासारखे ऊभे होते.

******************************************************************************************

समीर मेहताच्या केसमध्ये नक्की काय झाले असावे आणि ठाकुर, वर्तक व मलिक ह्यांच्या टीमने असीम पारकरची केस कशी बघावी आणि त्यांना काय मिळू शकते ह्याची ऊत्तरं हवी आहेत.
तुमच्या मते दोन्ही केस एकंच आहेत की वेगळ्या तेही सांगा. दिलेले केस फॅक्ट्स वापरून आपापली थिअरी मांडा, प्रश्नोत्तरांची गरज नाही.
थोडक्यात समीर मेहताचा खून झाला असे वाटत असल्यास तो कोणी कसा व का केला त्याचे एक प्लॉजिबल एक्स्प्लनेशन हवे आहे आणि त्यावरून असीम पारकरच्या केस कडे बघण्याची दृष्टी सुद्धा.
एखादी थिअरी पटल्यास त्याला प्लस एक (+१) नक्की करा, आपल्या थिअरी पेक्षा दुसर्‍याची चांगली वाटल्यास मोठ्या मनाने त्याला प्लस वन द्याल अशी अपेक्षा.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

कार्तिक मेहता आहेत की तुला हवे असल्यास >> मी असा विचार केला होता कि कार्तिक मेहता ला आलेला अ‍ॅटॅकाचे कारण समीरने केलेला काहितरी जबरदस्त प्रकार (किंवा समीरने त्यांचा खून करणे हे होते - खून केशवच्या मदतीने पचवला). त्यांमूळे कार्तिक मेहता चे सोंग घेऊन कोणी तरी (जो मूळ खूनामधे सामील होता) त्याने समीरला घाबरवून मारले. पण मग असीम का मरेल त्याच प्रकाराने इधर सब घोडा पेंड खा गया.

तुझे मूळ पोस्ट मी इतक्या वेळा वाचलेय कि हे समीर, केशव, मनाली, मेहता, शाह, असीम वगैरे सगळे माझ्या भोवती गरागरा फिरताहेत असा भास मला होतोय. ह्या प्रकाराने मी घाबरून मेलो तर उद्या तुला नवे कोडे टाकता येईल Lol

भारी ... इंटरेस्टिंग..
श्रद्धाच ॲनॅलिसिस पण मस्त आहे..
मोटिव बघितला तर सरळ दिसणाऱ्या क्लुज नुसार मनाली आणि फॅमिली च दोन्ही व्यक्तींमधे इन्वोल्व आहे.
असिमचा मृत्यू अपघात नसेल तर मनाली वा कुटुंबिय च दोषी वाटतात.

तुझे मूळ पोस्ट मी इतक्या वेळा वाचलेय कि हे समीर, केशव, मनाली, मेहता, शाह, असीम वगैरे सगळे माझ्या भोवती गरागरा फिरताहेत असा भास मला होतोय. >> असामी Lol प्लांचेट करून बघ कोणी काय सांगतंय का?
वर्तक आणि मलिक ह्यांच्या ईन्वेस्टिगेशनमधल्या त्रुटी शोधू गेले तरी काही तरी हाती लागेल.

कारण इतर मजल्यावरचे लोक तिथले फुटेज कसून तपासले जाईल ही शक्यता असताना कॉरिडॉर क्रॉस करण्याची मेजर रिस्क त्या मजल्यावर घेणार नाहीत.
>>
हे असेही बघू शकतो की आपल्या मजल्यावर ही रिस्क घेतली तर संशय आपल्यावर जाईल.

@ हायझेनबर्ग,
कसले जबरदस्त कोडे आहे. एक कि अनेक कथाच आहेत. कोणीतरी लिहून काढा सर्व एकेक शक्यतांसह. मला हे डिटेक्टिव कथा वगैरे वाचायला बोर होतात पण कोडे बगैरे होते आणि एकेकाचे प्रतिसाद वाचायला मजा येईल म्हणून एवढे वाचले.. लगे रहो.. श्रद्धा जबरदस्त ! तुमच्या पोस्ट वाचून पिक्चरमध्ये दाखवतात तसे रात्रीच्यावेळी चष्मा लाऊन डिटेक्टिव पुस्तके वाचायची आवड असलेली हिरोईन डोळ्यासमोर आली Happy

तो फोन OTP समजून घेण्यासाठी केला असू शकेल,
खुन्याने काय तो कारभार केला, फोन करून 301 चा otp समजून त्या घरात जाऊन बसला (काय मोटिव्ह हे माहित नाही)

पण हे सगळे टाइम लाईन मध्ये बसत नाही,
9 वाजता समीर चा शहा ला फोन
9-10 ला तो बिल्डिंग मध्ये येतो
930 ला सावली त्याच्या घराकडे जाते आणि 937 ला प्ररत जाते (तेव्हा तो घरीच आहे)
940 ला भास्कर येतो तेव्हा समीर जिवंत आहे( जर 2 मुली आणि भास्कर खरे बोलत असतील तर)
1111 ला भास्कर निघून गेला , त्याच्या सांगण्या नुसार समीर जिवंत होता
रात्री 2 च्या पुढे कधीतरी तो मेला

सो हे जे काही विष आहे ते स्लो अक्टिंग असले पाहिजे,
किंवा खुनी 9 ते 2 समीरच्या घरातच असला पाहिजे
या टाइम लाईन प्रमाणे otp चा तर्क चुकीचा वाटतो

अमानवीय उत्तर:
मेहतांनी घेण्यापूर्वी फ्लॅट मिस्टर जैन ह्याचा होता.. मिसेस जैन ह्यांचा अपघाती मृत्यू झाल्यानंतर त्यांना भलतेसलते भास होऊ लागले होते. सत्य हे होतं की मिसेस जैन ह्यांचा खून झाला होता आणि आता त्यांचा आत्मा घरात भटकत होता.. फ्लॅट वर रहाणाऱ्या एकट्या पुरुषांना मारणं आणि सूड उगवणे हे तिच्या भूतावताराचे एकमेव उद्दिष्ट.
कार्तिक मेहता तिचा पहिला बळी. मृत्यूचे कारण हार्ट ॲटॅक.
समीर मेहता - दुसरा.
असीम - तिसरा.
आतातरी शहांनी शहाणं व्हावं आणि ह्या फ्लॅट मधे स्वत: एकटं जाऊ नये!

सिम्बा >> बिंगो ची सेकंड रो ऑलमोस्ट घेतलीच तुम्ही. (भास्कर ऐवजी तुम्हाला केशव म्ह्णायचे आहे हे गृहीत धरतो)

नानबा Lol लेट मिसेस जैनचं भूत समीरला आपल्या मुलाला दिलेल्या त्रासाबद्दल मारेल हे शक्य आहे पण मग असीम ऊगीचच का?
आता मला हॅरी पॉटर आणि चंएबर ऑफ सीक्रेटसचा बॅसिलिस्क एमराल्ड पॅराडाईझ च्या सेंट्रल एसी सिस्टीममधून फिरतो असे वाटायला लागले ज्याचे डोळे बघताच समीर आणि असीम पेट्रीफाईड झाले Wink

दुर्मिळ अशी नशा येणारी औषधे सापडली होती.>> हे आणि
पोटात न पचलेले अन्न, अल्कोहोल आणि काही दुर्मिळ नशा आणणार्‍या औषधांचे ट्रेसेस मिळाले आहेत >> यांचा प प सं आहे की रेड हेरिंग ?

सेंट्रल एअर कंडिशनिंग, >> अशी सुविधा असेल तर पुर्ण बिल्डिंगचे सोर्स आणि रीटर्न व्हेंट कनेक्टेड असणार. जर व्हेण्टमधून काही विषारी पदार्थ पसरवण्याचा प्रयत्न असता इतर घरातील व्यक्तींना काहीतरी त्रास झाला असता

तुझे मूळ पोस्ट मी इतक्या वेळा वाचलेय कि हे समीर, केशव, मनाली, मेहता, शाह, असीम वगैरे सगळे माझ्या भोवती गरागरा फिरताहेत असा भास मला होतोय. ह्या प्रकाराने मी घाबरून मेलो तर उद्या तुला नवे कोडे टाकता येईल >>> Lol खरच वाचताना झिणझिण्या येतात.

दुर्मिळ अशी नशा येणारी औषधे सापडली होती.>> हे आणि
पोटात न पचलेले अन्न, अल्कोहोल आणि काही दुर्मिळ नशा आणणार्‍या औषधांचे ट्रेसेस मिळाले आहेत >> यांचा प प सं आहे की रेड हेरिंग ? >> ह्याचा थेट संबंध अमित धुप्परशी लागतो. नशा आणणारी दुर्मिळ औषधे त्याच्या पझेशनमध्ये दिल्लीमध्ये आधी सापडली होती. सिक्युरिटी गार्डकडे तो समीरची चौकशी करतांना आपल्या औषधांसाठी क्लायंट म्हणून बघत होता की त्याचे मामा 'साधूराम गिडवानीं' च्या सांगण्यावरून त्या औषधातून समीरला काही दगा फटका करण्याचा त्याचा प्लान होता हे ओपन टू ईंटरप्रिटेशन आहे.

सेंट्रल एअर कंडिशनिंग, >> अशी सुविधा असेल तर पुर्ण बिल्डिंगचे सोर्स आणि रीटर्न व्हेंट कनेक्टेड असणार. जर व्हेण्टमधून काही विषारी पदार्थ पसरवण्याचा प्रयत्न असता इतर घरातील व्यक्तींना काहीतरी त्रास झाला असता >>> बरोबर मेधा!

पोटात न पचलेले अन्न, अल्कोहोल आणि काही दुर्मिळ नशा आणणार्‍या औषधांचे ट्रेसेस मिळाले आहेत >> ह्याचा नि भूताचे सोंग वठवून घाबरवण्याचा संबंध सहज जोडता येईल. बहुधा बर्ग खुनाचे अवजार शोधा म्हणूनच म्हणाला असावा.

मस्त कोडं.
श्रद्धा मस्त analysis.
थिअरी नाही अजून, पण डीस्क्रीपन्सीज: शहांनी घर १९ कोटीला विकत घ्यायला ४ कोटी इतर लोकांकडून घेतले मात्र शेवटी ते घर समीर कडून १५ कोटीलाच विकत घेतले. समीर बाजारभावाला घर काढायला तयार का झाला?
समीरच्या घराची किल्ली हाउसकीपर सोडून इतर कोणाकडे असण्याची शक्यता नाही. त्याचा फोन ती पूर्ण रात्र त्याच्याकडेच होता का? कदाचित एस्कोर्ट सर्विसच्या मुलींनी त्याचा फोन बाहेर नेला असेल. तसेच त्याच्या फोन वरून फूड डिलिव्हरीला फोन गेल्याचं वरच्या तपासात नाही. त्यामुळे फोन आधीच हरवला असण्याची शक्यता आहे.
अजून विचार करतोय.

असामी भितीने मेलेल्या माणसाची मेडिकल कंडिशन काय असू शकेल? मेंदू वा हृदयावर अतिरिक्तं ताण जे ब्रेन हॅमरेज (हे भितीने होते का मला नक्की कल्पना नाही) वा हार्ट फेल्युअर मध्ये परावर्तित होईल आणि दोन्हीही मेडिकल कंडिशन्स डिटेक्टेबल आहेत.

शहांनी बाजारभावाने समीर मेहताकडून त्याचे घर १५ कोटी रुपयांना मागच्याच आठवड्यात विकत घेतले होते आणि १५ मेपर्यंत घर खाली करून ताब्यात देण्याचे हमीपत्रं समीरने त्यांना दिले होते ज्यावर दोन्ही पार्टीच्या वकिलांच्या सह्या होत्या आणि हा व्यवहार पूर्णपणे कायदेशीर मार्गाने झाला होता. >> मग एकोणीस हजार कोटींचं काय झालं ?

त्यांच्या पांढर्‍या केसांना आणि काळ्या चष्म्याला चांगले ठावूक होते. <<<<
Kala chashma? Red herring or mr shah was blind? The poison must be in his cane then. Did sameer die off dhatura flower poison?

खरेदी व्यवहार पूर्ण झाला आहे, सो त्यादिवशी समीरकडे १५ कोटी रुपये आहेत. मनी ह्या मोटीव्ह वर अजून विचार झालेला नाही. पोलिसांच्या तपासात ही यावर काहीच भाष्य नाही हे खटकतंय. त्याची आई वानप्रस्थाला निघून गेली आहे, समीरच्या पश्च्यात हे पैसे कुणाला मिळतील?
समीरच्या घरी कुठल्या गारबेज bags वापरल्या गेल्या त्या वेगळ्या का काढता आल्या नाहीत?
पाचही लोक सेम गार्बेज पिशव्या वापरत होते हे कठीण आहे.

मेहतांनी आयदर समीरला १५ कोटींमध्येच पटवलं आणि ईतर चार पॅराडाईझ वासियांचे चार कोटी वरचेवर लाटले ऑर समीर गेल्या नंतर ते ४ कोटी लागले नाहीत म्हणून परत देणार होते किंवा फ्लॅट चा पूर्ण ताबा दिल्यावरच ऊरलेले ४ कोटी ते समीरला देणार होते किंवा हे चार कोटी म्हणजे समीरला दिलेली एका प्रकारची रॅनसम होती. पुन्हा ओपन टू ईंटरप्रिटेशन
थोडक्यात वरच्या कुठल्याही शक्यतेत ते ४ कोटी अजून शहांकडेच होते हे बरोबर.

त्यांच्या पांढर्‍या केसांना आणि काळ्या चष्म्याला चांगले ठावूक होते. <<<<
Kala chashma? Red herring or mr shah was blind? The poison must be in his cane then. Did sameer die off dhatura flower poison? >> नाही नाही असे काही नाही.. पांढरे केस आणि काळा चष्मा जस्ट त्यांच्या सॉर्टेड आणि सीझन्ड पर्सनॅलिटी असल्याचे सिंबॉलिक आहे.

समीरच्या घरी कुठल्या गारबेज bags वापरल्या गेल्या त्या वेगळ्या का काढता आल्या नाहीत?
पाचही लोक सेम गार्बेज पिशव्या वापरत होते हे कठीण आहे. >> गणेश शिंदे ने तो कचरा गोळा करून डायरेक्ट गारबेज शूट मधून टाकून दिला आणि तो ईतर कचर्‍यात मिक्स झाला... गार्बेज बॅग्ज चा संबंध नाही.

आईने सन्यांस घेतल्याने समीरला कोणीही 'नेक्स्ट टू किन' नाही.

शहांनी हा प्रस्ताव मांडला तेव्हा त्यांच्या डोक्यात एका दगडाने दोन पक्षी मारायचा प्लान तयार होता >> एक पक्षी म्हणजे समीरला त्या इमारतीतून घालवून लावणे. दुसरा पक्षी कुठला? मला वाटतं असीमचा खून.
समीरला मारायचा हा मुळात प्लॅन न्हवताच. ज्या युक्तीने असीमला मारायचं ती युक्ती समीरवर लागू झाली इतकच. तसंही सर्वांनी समीरला घालावायला १ कोटी जास्त दिलेच होते. आता ते मारतील कशाला? यावर अजुन विचर करतोय.

म्हणजे आपण इमारतीत उपस्थित नसताना त्या फ्लॅटमधील व्यक्तीला, काहीही क्लू न सोडता, पोलिसांची दिशाभूल करून संपवता येते का याची ट्रायल शहांनी समीरवर घेतली आणि नंतर तीच मेथड वापरून असीमला संपवले.

सध्याच्या कंपनीत 'एथिकल क्लायंट प्रॅक्टिसेस' वायोलेशन म्हणून एनक्वायरी चालू आहे.<<<<<<
या प्रकरणात मि शाह गुंतले आहेत का? हे त्यांचे सिक्रेट असीमलाच माहीत असल्याने त्याने तोंड बंद ठेवण्याच्या बदल्यात मनालीशी लग्नाचा आग्रह धरला आणि म्हणूनही त्याला मारणे शहांना आवश्यक झाले?

म्हणजे आपण इमारतीत उपस्थित नसताना त्या फ्लॅटमधील व्यक्तीला, काहीही क्लू न सोडता, पोलिसांची दिशाभूल करून संपवता येते का याची ट्रायल शहांनी समीरवर घेतली आणि नंतर तीच मेथड वापरून असीमला संपवले. >> 'ओपन टू ईंटरप्रिटेशन' म्हणायची ईच्छा आहे पण मी ऑलरेडी एवढे ताणले असल्याने फॉर ग्रेटर गूड पहिल्या खुनामागे एक्झाक्टली हाच अँगल आहे असे म्हणून टाकतो. Happy
एक छोटेसे वेरिएशन आहे पण तेही लवकरच तुमच्या ध्यानात येईलच.

काही प्रश्न
१. फुड डिलिव्हर झाल्यावर केशव लगेच निघाला? त्याने समीर बरोबर जेवण केले नाही? डिलिव्हरी बॉयची येण्याजाण्याची नोंद नाही आहे का?
२. समीर ९:१० ला घरी आला होता. सरकती सावली ९:३७ आणि ९;४० ला दिसली, ती व्यक्ती ३०१ मधून समीरच्या घरी आली असावी असं धरलं पण समीर घरी होता त्यावेळी. आणि मृत्युची वेळ २ नंतर आहे.
३. केशव त्यानंतर लगेच ९.४० ला समीरकडे आला तेव्हा समीर जिवंत होता.
somehow, हा ताळमेळ जुळत नाहिये किंवा या वेळा मुद्दामूनच इतक्या जवळ जवळ आहेत असं वाटतय.

१. फुड डिलिव्हर झाल्यावर केशव लगेच निघाला? त्याने समीर बरोबर जेवण केले नाही? डिलिव्हरी बॉयची येण्याजाण्याची नोंद नाही आहे का?
>>> जेवणात काही असते तर मेडिकल रिपोर्ट मध्ये आले असते त्यामुळे केशव जेवला ना जेवला काही फरक पडत नाही.
कॉम्प्लिकेशन नको म्हणून टाकले नाही पण डिलिवरी बॉय एका मिनिटात डिलिवरी करून गेला असे समजा.

२. समीर ९:१० ला घरी आला होता. सरकती सावली ९:३७ आणि ९;४० ला दिसली, ती व्यक्ती ३०१ मधून समीरच्या घरी आली असावी असं धरलं पण समीर घरी होता त्यावेळी. आणि मृत्युची वेळ २ नंतर आहे.
३. केशव त्यानंतर लगेच ९.४० ला समीरकडे आला तेव्हा समीर जिवंत होता.
somehow, हा ताळमेळ जुळत नाहिये किंवा या वेळा मुद्दामूनच इतक्या जवळ जवळ आहेत असं वाटतय. >> हे सोडवले की फायलीवर केस सॉल्व्ड चा शिक्का मारून टाकू.. हाय काय नि नाय काय. Happy

मला वाटतं केशव आला तेव्हाच समीर अलमोस्ट गेलेला/कोमात गेलेला होता. केशवने केवळ तो जिवंत आहे असा आभास निर्माण केला, फूड वगैरे ऑर्डर केले, पण डिलिव्हरी त्याला घ्यायला लागली. एस्कॉर्टना त्याने समीर नशेत आहे, त्याला डिस्टर्ब करू नका वगैरे सांगितले असेल. तो शहांना पैशासाठी सामील असावा व ते चार कोटी त्याला गेले असावेत. ते 30000 चे भांडण केवळ दिखाव्यापुरते सादर केले गेले असावे म्हणजे नुसते आत समीरच्या खोलीत जाऊन मोठमोठ्याने बोलणे वगैरे..

मला वाटतं केशव आला तेव्हाच समीर अलमोस्ट गेलेला/कोमात गेलेला होता. >>> कश्याने ? केशव तेव्हाच डॉक्टरला बोलावू शकला असता.
तू म्हणतेस तसं झाले असल्यास मग केशवच्या सकाळच्या कुठल्याच वागण्याचा ताळमेळ लागत नाही त्याने धावतपळत येवून डॉक्टर वगैरे बोलावून समीरला वाचवण्याचा प्रयत्न करणे वडिलांकडून/वकिलांकडून सल्ला /मदत मागणे ई.

पण मग तेव्हा केशवला समीरकडे जायचंही काही कारण नव्हतं जर काम ऑलरेडी फत्ते झालं होतं तर, unless काम पूर्ण फत्ते करण्यासाठी त्याची समीरच्या घरात उपस्थिती जरूरीची होती.

इतरांना दाखवण्यापुरते नाटक असू शकेल का? >> का करेल तो असं? समीर त्याचा चांगला मित्रं होता आणि समीरसाठी तो ईतरांशी पंगेही घेत होता. त्या मुलींसमोर झालेली बाचाबाची टु वे ट्राफिक आहे असे अपेक्षित होते आणि असेच ग्रूहीत धरून चालू अन्यथा जसे डिलिवरी बॉय ने सांंगितले तसे त्या मुलींनीही आम्ही समीरला बघितले नाही म्हणून सांगितले असते,

एक कयास

समीरने ९ ला शहांना फोन केला. शहांनी समीरला संपवण्याचं आधीच ठरवलं होतं. समीरने राहिलेल्या पैशाची मागणी केली. शहांनी त्याला पैसे आपल्या घरातील सेफ्टी वोल्टमधून घ्यायला सांगितले, घराचा कोड दिला पण आत्ताच लग्न झालं आहे, पैसे गेल्याचे कळले तर घरचे भडकतील असे सांगून security camera ना चुकवून घरात जायला सांगितले. केशवने येण्याची वेळ कळवली होती त्यामुळे समीर त्याच्याआधी शहांच्या घरी जाऊन पैसे घेऊन आला. सावली त्याची होती.

इथे पैसे किंवा अजून काही वस्तू (अमली पदार्थ ) असू शकते जी समीरला हवी होती आणि ती गुपचूपपणे देण्याचे शहांनी मान्य केलं होतं.

मला ते असीम च्या खुनाची रंगीत तालीम म्हणून समीर चा खून हे लॉजिक नाही पटले. इतकी मोठी रिस्क का घ्यावी? ट्रायल घ्यायची तर खुनी कुणा लो प्रोफाइल माणसावर नाही का घेणार ?! शिवाय एकदा अधी विचित्र केस झाली तर संशयाचा फायदा देऊन 'अननोन मेडिकल कंडीशन ' म्हणून पोलिस केस बंद करतीलही. पण पुन्हा तसेच झाले तर पोलिस उलट दोन्ही केसेस च्या मागे लागतील हे खुन्याला कळणारच की.

चिकू, हे बरोबर वाटतेय. शहांनी स्वतःच्याच सेफ्टी व्हॉल्ट मध्ये ती गोष्ट ठेवली असावी.
नोटांना काही विष वगैरे लावून ठेवले असावे का? जे तोंडात बोट ओले करून नोटा मोजताना समीरने कन्झ्युम केले. सेम तर्हेने पैसे असीमला पण दिले त्यांनी

जिओ चीकू जिओ!!
ती सावली समीरचीच होती.. आता फक्तं तो कसा मेला ते हुडकून काढा आणि आयडी माबोचा_शेरलॉक म्हणून चेंज करून घ्या.

नोटांना काही विष वगैरे लावून ठेवले असावे का? >> ते पोस्ट मार्टेम मधे येईलच ना पण.

जणू मेंदूतूनच असे करण्यास आज्ञावली दिली गेली होती. >> समीरला हिप्नोटाईझ केलेले होते का ?

बरोबर मुद्दा आहे मैत्रेयी पण किलर असा विचार करत नाहीत. एकदा चाललेले वेपन ते परत वापरू पाहतात आणि पुन्हा सगळेच त्यांच्या प्लान नुसार घडून येते असेही नाही.

भूत बघितल्यासारखा चेहरा हा समीर आणि असीममधला कॉमन दुवा आहे. म्हणजे विस्फारलेले डोळे, चेहर्याचे स्नायू आकुंचित असणे हे विषारी औषधाचं लक्षण असू शकतं. समीरच्या पोटात नशेचे ड्र्ग्ज होते. नशेचा ड्रग आणि अल्कोहोल हे combination fatal ठरू शकतं. असा ड्रग शहांनी समीर ला दिला असणार जो नुसता निरुपद्रवी असणार पण अल्कोहोल च्या साथीत muscles वर विपरीत परिणाम करू शकतो असा असणार. त्यामुळे अवयव बंद पडत गेले. लगेच इफेक्ट आला नाही कारण दोन्ही पोटात जाऊन एकत्र मिसळायला २-३ तास लागणार.

बरोबर लाईनवर आहात पण ईमॅजिनेशन चे वारू थोडे अजून दौडवा. फॉरेन पदार्थाचा वा लीथल रिअ‍ॅक्शनचा ट्रेस सापडला नाहीये.
अजून दोन प्रतिसाद ऋन्मेषच्या फंड्या नुसार १०० पास झाले की सांगून टाकतो. Happy

गुगल केले . अल्कोहोल आणि ड्रग्ज हे काँबिनेशन मल्टिपल ऑर्गन फेल्युअर ला कारण ठरू शकते असे दिसते. इतर कुठल्या फॉरेन पदार्थाची गरज नाही. पण मग ते ऑटोप्सी मधे समजेल. कारण ड्रग्ज आणि अल्कोहोल सापडलेच होते पोटात.

Pages