दिनेशदांच्या पाककृती कुठे गेल्या ?

Submitted by धनि on 8 May, 2017 - 19:29

आजच चटनी वाले आलू करण्याकरता पाककृती शोधत होतो. दिनेशदांची एक आहे हे आठवले त्यामुळे शोधले तर पाककृती आली पण आतमध्ये नुसते क्ष क्ष क्ष दिसत होते. त्यामुळे मी त्यांच्या इतरही पाककृती पाहिल्या तर सगळीकडे क्ष क्ष क्ष दिसत आहे. त्या पाककृती कुठे गेल्या?

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

वाईट वाटलं हे पाहुन, पण मीही ह्या फेजमधुन गेल्याने दिनेशदा यांची मनस्थिती समजु शकतो.

दिनेशदा, तुमचाच एक प्रतिसाद इथे पोस्टतोय.
जिप्स्या, तूझ्याच हिशेबाने तू नेमक्या (अल्पसंख्यांक ) त्याच प्रतिक्रियांना काय प्रतिसाद देत बसला आहेस. एवढ्या महत्वाच्या वाटतात तूला त्या ? तूझ्यापेक्षा दुप्पट काळ मायबोलीवर काढलाय मी. आपले कोण ? हे अजून ओळखले नाहीस ? Happy

असाच प्रकार मागे "जिप्सी" यांच्याबरोबर झाला होता. एकदा प्रश्न विचारल्यावर समोरच्याने व्यवस्थित उत्तर दिले तर समाधान मानावे. परंतू पुन्हा पुन्हा तोच उचकेगिरीचा प्रकार जिप्सीच्या धाग्यावर केल्यामुळे जिप्सी वैतागले होते. >>>>>गजोधर, तो प्रकार जर माझ्या धाग्यावर झाला असता तर काही प्रॉब्लेम नसता पण टिपापाच्या काहि सदस्यांनी टिपापा धाग्यावर (मी पुन्हा लिहितोय "काही" सदस्यांनी) वैयक्तिक टिप्पणी / शेरेबाजी सुरू केल्याने आणि मायबोली प्रशासनाकडुनही त्या आयडींना काहीच समज न दिली गेल्याने मी माझे धागे डिलीट करायला सुरुवात केलेली.

असो, दिनेशदा मलातरी वाटतंय कि तुम्ही पुन्हा रेसिपी लिहा Happy

चार एक वर्षांपूर्वी कधीतरी मी मायबोलीवरील माझे सगळे प्रकाशित लेखन अप्रकाशित केले होते. (तेव्हा २०१४ चा मे उजाडलेलाही नव्हता). तसे करण्याचे खरे कारण हे होते की काहीही लिहिले तरी विशिष्ट सदस्यांकडून सातत्याने जहरी टीका होणे व एक, दोन वाहत्या पानांवरही कुचाळक्या होत राहणे! आता हे पुढचे मी येथे लिहिणे योग्य आहे की नाही माहीत नाही, पण प्रशासनाने मला लेखन अप्रकाशित करण्याचे कारण विचारले होते. तेव्हा मी उत्तर दिले होते की बहुतेक लेखन सगळ्यांचे वाचून झाले आहे म्हणून मी ते काढले. मी प्रशासनाला खरे कारण सांगितले नाही. पण नंतर माझ्या मनात असा विचार आला की ज्या मायबोली ह्या संकेतस्थळाने मला पहिल्या दिवसापासून सांभाळून घेतले, ढिगाने वाचकवर्ग दिला, वाचकांनी जे भरभरून प्रेम दिले त्या सगळ्यांचे मी खरे तर ऋण मानायला हवेत. त्या ऐवजी मी कृतघ्नपणे लेखन अप्रकाशित करत आहे. एका अर्थाने हे लेखन ही ह्या स्थळाचीही मालमत्ता आहे. भले ती दर्जेदार नसो किंवा दिनेश ह्यांच्या लेखनाइतकी त्याची उपयुक्तता आणि लोकप्रियता नसो. म्हणून मग मी ते पुनर्प्रकाशित केले. दिनेश ह्यांच्याप्रमाणे संतुलित वगैरे राहणे मला जमले नाही. ते एक वेगळेच!

तर असे म्हणावेसे वाटते की दिनेश ह्यांना मायबोलीने व मायबोलीकरांनी जे अद्भुत प्रेम दिले आहे त्याचा योग्य तो सन्मान ठेवून त्यांनी आपले लेखन प्रकाशित करावे अशी विनंती! ती एका अर्थाने मायबोली ह्या स्थळाचीही मालमत्ता आहेच.

दिनेश ह्यांनी कोणत्या मनस्थितीत हा निर्णय घेतला असेल ह्याचा बहुधा अंदाज आहे.

Befiji , I salute you. Thanks for restoring your writing so that new members like me could read it. You rock!

मलाही हे लेखन काढणे फारसे पटत नाही.

कुठल्या मनस्थितीत हे घडते त्याची मला पूर्ण कल्पना आहे. ज्याच्या बाबतीत कुचाळक्या, टोमणे, वैयक्तिक टीका हे सगळे घडते त्याला त्या वाचताना खूप मनस्ताप होत असणार हे मला माहित आहे. बीने लिहिलेले की इथल्या त्याच्याबद्दलच्या कमेंट्स वाचताना कोणी त्याच्यावर बलात्कार करतेय असे त्याला वाटत होते. नेमके तसेच इथल्या प्रत्येक टार्गेटला वाटत असणार. हे सगळे फार भयानक आहे, ज्याच्या बाबतीत घडते त्यालाच ते कळते.

पण लेखन काढणे ही गोष्ट खूप वेगळी आहे. तुम्ही लेखन माबोवर प्रसिद्ध केले की त्यावर जसा तुमचा हक्क आहे तसाच माबोचाही हक्क आहे. इंटरनेट वर कोणी कोणाला एकच लेख 10 ठिकाणी प्रकाशित करण्यापासून थांबवू शकत नाही. छापील जगात प्रकाशकालाही काही हक्क असतात, नेटवर तसे अजून तरी नाही/नसावे. तरी ज्या साईटने आपल्याला लिखाणाचा प्लेटफॉर्म दिला त्याचे ऋण म्हणून आपण एकदा इथे लिहिलेले साहित्य नंतर दुसऱ्या कारणास्तव काढू नये हेमावैम.

>>>>. सॉरी, धिस पोस्ट वॉज वर्थलेस, आय रियलाईज्ड इट टू लेटर Uhoh <<<<
हे वाक्य आहे नोव्हेंबर २००९ मधिल, माझेच लिखाण वैतागुन मीच उडवुन लावले त्या प्रत्येक पोस्टीच्या जागी हे चिकटवले होते, लिंबीच्या शेताच्या धाग्यावरुन...
पण लौकरच लक्षात आले, की हा माझा पळपुटेपणा आहेच, शिवाय असे करुन मी मायबोलीला तिच्या रोमात असलेल्या सभासदांना, माझ्या लिखाणाच्या चाहत्यांना (हो हो, असे खुप नसले तरी थोडेफार तरी आहेतच Wink ) कमसर लेखतोय, चार जणांनी विरोधी/कुचाळक्या/गॉसिप करणार्‍या पोस्टींनी गदारोळ माजवला, तरी ते सर्वांचे मत असु शकतेच असे नाही. शिवाय गॉसिपिंग हा मानवी स्थायी स्वभाव आहे, एरवी तो तोंडी बोलण्यातुन होत असल्याने पाठीमागे कोण काय बोलते ते पाठीला कान नसल्याने कळतही नाही, पण इथे ते "लिखित' स्वरुपात होणेच शक्य असल्याने, पाठीमागे म्हणजे "वेगळ्या धाग्यावर होत असले" तर ते डोळ्यावर येतय.... तर करुद्यात की गॉसिपिंग... मला काय फरक पडतो? मी माझे काम करीत राहिले पाहिजे... हे असे विचार आल्यावर जवळपास दोनअडीच वर्षांच्या माबोसन्यासानंतर मी पुन्हा इकडे लिहिता झालो.
मान्य की मी स्वतःचे फारसे धागे कधीच काढले नाहीत, तितका वेळ्/व्यासंग/बुद्धिमत्ता/लिखाणाचे कौशल्य मजपाशी नाही.
तर सांगायचा मुद्दा असा की, दिनेशभौ, शक्य असल्यास तुमचे लिखाण पुन्हा मांडा.... !

(एक ठिकाणि मात्र माझाही नाईलाज झाला, माझ्या ज्योतिष धाग्यावर तर किती किती "हल्लाबोल" झाले, तिथे मात्र शेवटी वैतागुन कानाला खडा लावला की हे गुढ शास्त्र गूढच राहुदे, याविषयाबाबत वरवरचे लिहिण्याव्यतिरिक्त सखोल ज्ञानाचा एक कणही लिहायचा नाही. कुणाला हवेच असल्यास बाजारात ढीगाने पुस्तके उपलब्ध आहेत त्या विषयावर. या ठिकाणी मात्र मला "झुंडशाहीपुढे/बार्किंगस्क्वाड पुढे" नमते घ्यावेच लागले , पण त्याचे दु:ख नाही, कारण ज्योतिष/अध्यात्म हे विषय यशस्वीपणे हाताळायला मजपेक्षा कित्येक पटीन्नी ज्येष्ठ/श्रेष्ठ अशी धुरंदर व्यक्तिमत्वे आहेत, व येत राहातील, त्याबाबत मी फारसे काही केले नाही तरी फरक पडत नाही. Happy असो )

खरं आहे दिनेश, तुम्ही रेसिपी माबो वरचं परत आणा. तुम्हाला काय त्रास झाला, कोणी काय लिहिले काहीचं कल्पना नाही, पण जगात बोलणारे लोक असतातचं. त्यांना किती महत्व द्यायचं, द्यायचं का मुळात हे आपणचं ठरवायला हवं.

ऐसी अक्षरे वरील राजेश घासकडवी यांचा प्लीज डु नॉट फीड द ट्रोल्स.. या लेख जरुर वाचावा. ट्रोलिंग ही खुमखुमी असते.
एव्हाना प्रत्येक जण स्वतःकडे आपल्यात काही ट्रोलत्वाचे गुणधर्म आहेत की काय अशा आत्मपरिक्षणाने पहात असेल. आपल्याकडे इतरांचे लक्ष वेधावे यासाठी आपले उपयुक्तता मुल्यापेक्षा उपद्रवमुल्य अधिक सोयीस्कर मानणारे ट्रोल्स असणारच आहे. काही जण इतरांच्यात लावालावी करुन स्वतः नामानिराळे राहतात. सौ चुहे खाके बिल्ली हाज को चली. काही जण सरळ कबुल करतात की आम्ही काय साधुसंत नाही त्यामुळे उचकावणे किंवा उचकणे हा आमचा गुणधर्म आहेच. जेव्हा तुमच्याकडे उपयुक्तता मुल्य नाही व उपद्रवमुल्यही नाही तेव्हा तुमची किंमत शुन्य. तुम्ही अदखलपात्र झालात.
बौद्धिक उन्माद करणारे (सोप्या शब्दात माज करणारे)अनेक विद्वान जेव्हा इतरांकडे तुच्छतेने पाहतात त्यावेळी ते आपला विजय साजरा करत असतात. अधिकार, ताकद आली कि उन्माद हा सोबत येतोच. रस्त्यावरील कुत्र्यांचे अधिकार वा प्रभाव क्षेत्र ठरलेले असते. त्यांचे आपापसात अलिखित संकेत असतात. त्यांच्या कंपुत कधि सामंजस्य तर कधी भांडण असतात. एकदा आमच्याजवळच्या गल्लीत एक नवीन कुत्री आपल्या पिल्लासह आली. गल्लीतील प्रस्थापित कुत्र्यांनी गदारोळ केला. तिला हाकलून देण्याचा प्रयत्न केला पण ही कुत्री अपत्यप्रेमापोटी सगळ्यांना पुरुन उरली. शेवटी इतर कुत्र्यांनी पण तिचे सहअस्तित्व मान्य केल . ती त्यांच्या कंपुत समाविष्ट झाली नाही पण सहअस्तित्वाचा मात्र भाग बनली. आंतरजालावर काही आयडी अशाच स्थिरावतात.

बिपिन कार्यकर्तेंनी आपल्या एका अत्यंत वाचनीय लेखात शिव्यांविषयी लिहिलं आहे. त्यात त्यांनी म्हटलं आहे, सर्वात जहाल शिवी कुठची? तर ती म्हणजे 'दुर्लक्ष'. हा सर्वात उत्तम उपाय आहे.

http://maazedonpaise.blogspot.in/2010/02/blog-post_25.html इथे बिपिनचा लेख आहे

दिनेशदा, मला काय झालं त्याची कल्पना नाही. बाहेर राहायला लागल्यापासून तुमच्या रेसिपीज बघून स्वयंपाक करायला शिकले. खाली प्रतिसादात एखादा घटक नसल्यास त्याला substitute काय, दुसऱ्या पद्धती कुठच्या हे इतक्या सोप्या भाषेत समजवायचात. मी माझ्या आईकडून शिकले त्यापेक्षा जास्त नुसतं तुमचं लिखाण वाचून शिकले. माझ्यासारख्या अनेक प्रतिसाद न देणाऱ्या लोकांचं कदाचित चुकलं हे, की आम्ही फक्त तुमच्या रेसिपीज वापरल्या, पण त्याची पोचपावती दिली नाही. त्यामुळे त्रास देणाऱ्यांचं पारडं जड झालं. हा धडा माझ्यासारख्यांना आहे. कुणी मेहनत करून काही करतं तेव्हा कृतज्ञता व्यक्त केली पाहिजे, हा.

किचनमध्ये पाऊल टाकायचापण कंटाळा करणाऱ्या मला तुम्ही कधीही न भेटता स्वयंपाकाची आवड लावलीत. त्याबद्दल धन्यवाद. तुमचा ब्लॉग सुरू झाल्यास एक मोठी संख्या तुमची फॉलोअर असेल, त्यात मी निश्चित असेन.

>>>>> माझ्यासारख्या अनेक प्रतिसाद न देणाऱ्या लोकांचं कदाचित चुकलं हे, की आम्ही फक्त तुमच्या रेसिपीज वापरल्या, पण त्याची पोचपावती दिली नाही. त्यामुळे त्रास देणाऱ्यांचं पारडं जड झालं. <<<<
यू सेड इट.... परफेक्ट अ‍ॅसेसमेंट ऑफ सिच्युएशन. Happy

मायबोली प्रशासनाकडुनही त्या आयडींना काहीच समज न दिली गेल्याने मी माझे धागे डिलीट करायला सुरुवात केलेली. >> जिप्सी आपले बरोबर आहे. तो प्रकार वेळीच हस्तक्षेप करून त्या आयडींना समज दिली असती तर पुढचे रामायण घडले नसते. उचकवार्‍यांना वेळीच योग्य ती समज दिली जावी अन्यथा उचकवणार्‍या आय्डीला प्रशासनाचे समर्थन आहे असा गैरसमज इतरांना आणि ट्रोलिंग करणार्‍या आयडीला होतो. त्यातुन तो अजुन जास्त विक्षिप्त लिहितो. ज्याचा त्रास नंतर सगळ्यांनाच होऊ लागतो.

दिनेश दादा,

मी तुमच्या निर्णयाशी रिलेट होऊ शकतो, कारण हल्लीच मी अतिशय हिंस्त्र अश्या वादातून गेलोय, पण ते इतरत्र तिथले डिटेल्स इथे नको ते बरोबर नसेल.

ह्या संबंधी मला अंबज्ञ ह्यांची छोटीशीच पण नेमकी प्रतिक्रिया प्रचंड जास्त आवडली. आपण एक विशिष्ठ प्रकारचं आयुष्य जगत असतो, ते जगायला तिथे पोचायला आपली एक खास लय आपण पकडलेली असते, त्या मूलभूत अस्तित्वालाच कोणी खोडसाळपणे चॅलेंज केले की उद्वेग येतो, तुमचं नशीब थोर तुमच्याकडे लेखन काढून टाकायची ताकद आहे, त्याबद्दल माझ्यासोबत तुम्हीही माबो प्रशासनाचे आभारी असालच अशी अपेक्षा आहे माझी. पण दादा विथ ग्रेट पॉवर कम्स ग्रेट रिस्पॉन्सीबिलिटी. म्हणजे बघा आपण लेखन स्वसंपादित करू शकण्याचा हक्क, तो आपल्या सगळ्यांनाच आहे पण मग आपण तो वापरायलाच हवा का? तर नकोय, चार दोन चिलटं त्रास देतात म्हणून कोणी हाताने तयार केलेलं खळं पेटवू नये, अहो मला तर माझे लेखन काढून टाकायची ताकदच नाही जिथे मला त्रास झाला, तरी माबो वर तो हक्क असतानाही मी तो कधीच वापरणार नाही दुर्दैवाने मला माबोवर पण तसलेच अनुभव आले तर मी सरळ लेखन बंद करेल पण आधी लिहलेलं कधीच काढणार नाही

दिनेशदा, निर्णयाचा फेरविचार कराच ही नम्र विनंती, वरती आमची पिशी ताय बोलली तश्या किती सुगरणी तुम्ही व्रतस्थ राहून घडवत असाल घडवल्या असाल ह्याला मोजदाद नसावी, ह्या अचिव्हमेंट करता तरी तुम्ही पाकृ परत टाकायला हव्यात अशी मी पुन्हा विनंती करतो Happy

दिनेशदा, निर्णयाचा फेरविचार कराच .
किचनमध्ये पाऊल टाकायचापण कंटाळा करणाऱ्या मला तुम्ही कधीही न भेटता स्वयंपाकाची आवड लावलीत. > हे माझ्या बाबतीत १०१ ट्क्के खरे आहे, तुमच्यामुळे आणि जागुमुळे मी बाजारात जाउन वेगवेगळ्या भाज्या आणि मासे आणायला शिकले. पदार्थ करण्यात गोडी निर्माण झाली. त्यामुळे आमच्या सारख्यां साठी तरी परत तुमच्या रेसिपीज लिहा. आता महत्व कुणाला द्यावे हे तुम्हीच ठरवा.
बेफीकिर, नंदिनी यांनी ही त्यांच्या निर्णयाचा फेरविचार करावा. त्यांचे असंख्य चाहते माबो वर आहेत. काही ठरावीक आयडी ज्यांचे मायबोलिवर काहीच contribution नाही अशांचे पारडे जड होवू देवु नका.

तुम्हा सर्वांचे प्रेम बघून, मला खुप अपराधी वाटतेय हे खरे आहे.
वरचे सर्व मुद्दे मला मान्य आहेत.
पण मी ज्या सगळ्या मनस्तापातून गेलोय ते देखील तूम्हा सर्वाना एकदा सांगायचे आहे.
१२ वर्षे हि कदाचित माझ्या सहनशक्तीची मर्यादा असेल.

मुद्दा, त्रास देण्याचा नव्ह्ता तर त्यासंबंधी काहीही कार्यवाही न करण्याचा होता.
मुळात, अशी संधी उपलब्ध करुन देणे, यालाच माझा आक्षेप आहे आणि राहीलच.
असा भेदभाव का केला जावा ? याचे कुठलेहि पटण्याजोगे कारण मला आजवर
समजलेले नाही.

आणि बेफिकीर, जिप्सी तूम्ही इथे अजून आहात, पण ज्या सभासदांनी
मुकाटपणे इथून जाणे स्वीकारले, त्यांचा कधी विचार झाला का ?

माझ्यासारख्या अनेक प्रतिसाद न देणाऱ्या लोकांचं कदाचित चुकलं हे, की आम्ही फक्त तुमच्या रेसिपीज वापरल्या, पण त्याची पोचपावती दिली नाही. त्यामुळे त्रास देणाऱ्यांचं पारडं जड झालं. हा धडा माझ्यासारख्यांना आहे. कुणी मेहनत करून काही करतं तेव्हा कृतज्ञता व्यक्त केली पाहिजे, हा - ह्याला मम

असा भेदभाव का केला जावा ? याचे कुठलेहि पटण्याजोगे कारण मला आजवर
समजलेले नाही.>>>>>>>>हम्म.पण थर्डक्लास लोकांकडे आपण लक्ष का द्यावे? मी फक्त ३० वर्षाचा असुन व माबोवर तुमच्यापेक्षा लहानच आहे.I changed, why don't you?we need your warm and elegant presence again.

माझ्यासारख्या अनेक प्रतिसाद न देणाऱ्या लोकांचं कदाचित चुकलं हे, की आम्ही फक्त तुमच्या रेसिपीज वापरल्या, पण त्याची पोचपावती दिली नाही>>> हे खरं आहे. पण हल्ली हल्लीच ह्यात बदल करायला सुरवात केली होती. Sad पण हे अगदी पटलं.

राया आणी जिप्सी यांचे प्रतीसाद पटले. दिनेशजींवर झालेले असे विडंबन आताच्याच मायबोलीवर घडले आहे असे नाही, तर पूर्वी जून्या मायबोलीवर पण होत होते. माझी एक मैत्रिण असल्याच कारणाने माबो सोडुन गेली व जातांना मला बजावुन गेली की कधी कुठल्याच वादात पडु नकोस आणी आपले मत पण व्यक्त करु नकोस. पण मी आहे पुणेरी, मग आपला बाणा का सोडणार?

पण एखाद्याची एकदा चेष्टा केली तर समजण्यासारखे आहे, पण वारंवार टोचा मारुन कुणाला कितपत विव्हळ करायचे हे समजायला नको का? की करमणूकीला दुसरा विषय मिळत नव्हता? आताच्या पुण्यातले पुणेकर या बाफावर जी मंडळी आहेत, ते सर्व आधी एस जी रोडच्या गप्पांमध्ये असायचे आणी पुण्यातले पुणेकर या बाफावर चाफा, कलंदर, उपास वगैरे मंडळी असायची. या तिघा तरुणांनी गंमती जमती केल्या पण ते खालच्या थराला कधी गेले नाहीत, उलट स्त्री आय डीज च जास्त दुसर्‍यांची सतत उडवत रहायच्या. पण त्यांना कोणी टोकले की त्या जाम चवताळायच्या. आणी आताही मी तेच बघीतले आहे. आम्ही एन आर आय आणी ते ही अमेरीकन आहोत याचा यांना फार दुराभिमान आहे. विद्या विनयेन शोभते याचा यांना विसर पडलेला दिसतोय.

आताच्या पुणेकर बाफावरची मंडळी मात्र सुविचारी आहेत याचेच बरे वाटते. आणी मन साफ ठेवुन नेटवरचे संबंध कसे जपावेत हे पण त्यांनी जाणले आहे.

जाऊ दे. दिनेशजी तुम्ही आमच्या करता तरी परत ते प्रकाशीत करा किंवा मग एखादा ब्लॉग काढुन लिंक तरी द्या. जेणे करुन तुमचे लिखाण पुढील पिढ्यांना मर्गदर्शक ठरत राहील. मध्ये एका सदस्याने म्हणले होते यांचे कसले योगदान? जरा त्या सदस्याने जुनी व नवीन मायबोली पूर्ण चाळुन वाचावी म्हणजे काहीतरी ज्ञान कण तिच्या हाती लागतील.

बेफिकीर, तुमचा प्रतीसाद अतीशय उत्तम व योग्य आहे.

खुप दिवसांनी इथे आले. हे वाचून अत्यंत वाइट वाटले. दिनेश सारख्या इतक्या शांत आणि संतुलित व्यक्तीला आपले लेखन काढावे लागले. किती मानसिक त्रास झाला असेल त्यांना याची मी कल्पनाही करू शकत नाही. माझ्या काही ओळखीचे लोक जे माबो चे सदस्यही नाहीत अशा व्यक्ती फक्त आणि फक्त दिनेश यांच्या पाककृतींसाठी माबो वाचत असतात.
त्यापैकी एका व्यक्तीचा कळकळीचा निरोप आहे दिनेश तुमच्यासाठी, की तुमच्या पाककृती आता इथे नसणे त्यांच्यासारख्या असंख्य लोकांसाठी खूप दु:खदायी आहे Sad
ब्लॉग आहे का तुमचा? तिथे तरी टाका पाककृती तुमच्या?

बाप रे दिनेशदा काय हे.. मी फार काही माबोवर लिहित नाही पण इथे येते ह्याचे सर्वस्वी कारण तुमच्या मस्त मस्त रेसेपी हेच असते. सायबर बुलिंग आणि मानसिक त्रास हे समीकरण मी नक्की समजु शकते. तुमच्या रेसेपीज म्हणजे एक खजिना आहे. तो प्लीज आम्हांला परत द्या.
====================================================================
माझ्या मैत्रिणीने हा मेसेज फेसबुकवर तुमच्यासाठी दिला आहे :

माबोवर कोणाचे सदस्यत्व आहे का? माझे नाहीये. (म्हणजे का कोण जाणे ते मिळालंच नाहीये अजुन..) मी तिथे केवळ दिनेशदांच्या पाककृती वाचायला जाते. अक्षरशः त्यांच्या पाकृ विभागात जाऊन दिनेशदांची कोणती नवी पाकृ आली आहे का ते पहाते. बास! बाकी वावर तुरळकच.

त्यांचे लिखाण त्यांनी तिथुन काढले आहे असे दिसते. नक्की काय झाले कळत नाही. मी सदस्य नसल्याने मला प्रतिक्रियांमधुन काही वाद झाले असतील तर कल्पना नाही.

त्यांना कुणी माझा निरोप देईल का? त्यांना म्हणावं की असे माझ्या सारखे असंख्य असतील जे माबोवर तुमच्या पाकृंचे चाहते आहेत. तुमचं लिखाण ही काही केवळ एका पदार्थाची पाककृती नसते. तो एक दुवा आहे, आमच्या पिढीला मागच्या असंख्य.. अनाम.. विस्मरणात गेलेल्या गोष्टींशी जोडणारा. तुमच्या आईचे उल्लेख, त्यांच्या सुगरणपणाचे तुम्हाला वाटणारे आणि शब्दाशब्दातून ओसंडुन वहाणारे कौतुक, काळाच्या ओघात मागे पडलेले पदार्थच नव्हे तर मराठीतले स्वयंपाकाशी जोडलेले गेलेले पण अजिबात माहिती नसणारे शब्द..वस्तु..संदर्भ... आणि ह्या सगळ्यांवर फोडणी टाकणारा, काळजात अगदी रुतुन वगैरे बसेल असा फोटो... हे सगळं कोणत्याही वादापेक्षा फार फार महत्वाचं आहे. आणि आता ते लिखाण तिथुन काढणं हा आमच्यावरही अन्याय आहे. तेव्हा विनंती नाही.. अगदी आग्रहच आहे की त्या पाकृ परत टाकाच.

(शिवाय एखादा ब्लॉगच केलात तर सदस्य नसलेल्यांना फार फार सोयीचं पडेल! )

कुणी तरी माझा हा निरोप त्यांना पोहचवावा ही विनंती.

Pages