दिनेशदांच्या पाककृती कुठे गेल्या ?

Submitted by धनि on 8 May, 2017 - 19:29

आजच चटनी वाले आलू करण्याकरता पाककृती शोधत होतो. दिनेशदांची एक आहे हे आठवले त्यामुळे शोधले तर पाककृती आली पण आतमध्ये नुसते क्ष क्ष क्ष दिसत होते. त्यामुळे मी त्यांच्या इतरही पाककृती पाहिल्या तर सगळीकडे क्ष क्ष क्ष दिसत आहे. त्या पाककृती कुठे गेल्या?

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

काय चाललंय Uhoh
दिनेशदा, तुम्ही पाकृ काढायला नको होत्या. जोवर तुमचे लेखन मायबोलीच्या धोरणांत बसत आहे तोवर दुसऱ्या कोणामुळे/कोणत्याही परिस्थितीत ते काढून टाकावेसे वाटू नये. If I were you, I wouldn't do such a thing.
अर्थात काहीतरी विचार केला असेल तुम्ही! दुसरीकडे कुठे स्वतंत्र ब्लॉग वर हलवल्या आहेत का? त्याची लिंक तुमच्या प्रोफाईल मधे जरुर द्या.
मी लहान आहे तुमच्यापेक्षा पण रहावत नाही म्हणून. As a writer, if you don't stand by your work nobody will. Maybe Maayboli isn't living up to your expectations but then find some other more deserved place for your recipes and post them there. Do not abandon them at any cost.

का???? Sad Uhoh

सायबर बुलिंगने माणसं दुखवली जातातच, पण त्याच बरोबर त्यांना येत असणार्‍या ताणाबद्दल/ संतापाबद्दल बेफिकीरी दाखवल्यामुळे त्यांना अजुनच त्रास होत असावा. त्या व्यक्तीला होणार्‍या त्रासाकडे दुर्लक्ष करुन वर तुम्ही उगाच मनाला लावून घेता, तुमच्या लक्षात ठेवायला, स्क्रीन्शॉट घ्यायला वेळ कसा मिळतो अशा अर्थाचे बोलल्यामुळे त्यांची अपेक्षाच संपली असेल.
ज्याच जळतं त्यालाच कळतं हेच खरं. Sad

असो. पण साती, दिनेश आणि असे इतर आयडी नसल्यामुळे माझ्यासारख्या वाचकांचं नुकसान होणार. Sad

जिज्ञासा >>>> अगदी अगदी, दिनेशदा, तो धागा मी ही वाचलाय पण खरचं का घेतलेत तुम्ही ते प्रकरण एवढ सिरीअसली.... असो, जिज्ञासा म्हणतेय त्या प्रमाणे एखादा ब्लॉग बनवा त्यात टाका त्या सगळ्या रेसिपी अन त्याचे लिंक द्या.

मी सुद्धा लहानच आहे तशी अजुन वयाने अन अनुभवाने सुद्धा पण मी माझ्या आयुष्यात एक तत्व बनविलेय स्वःतासाठी ते म्हणजे... मला दुखवनारी फक्त मीच असु शकते दुसर्या कुणाला तो अधिकार नाही किंबहुना मी तो देणार नाही. आपण एखाद्याला अवाजवी म्हत्त्व देतो तेव्हाच ते आपल्याला दुखवु शकतात मग का आपण त्रास करुन घ्यायचा ना कोणाचा.

आवडल नसेल तर माफ करा, पण अगदी रहावल नाही म्हणुन लिहील

I respect his decision >> +1

दिनेशदा, तो धागा मी ही वाचलाय पण खरचं का घेतलेत तुम्ही ते प्रकरण एवढ सिरीअसली....>> which thread?

अरेरे! खरंच, काय चाललंय ? माझे रोज येणे होत नाही इथे त्यामुळे दिनेशदांच्या कुठल्या बाफवर काही वाद / टीका झाल्या असल्यास त्याची कल्पना नाही. त्यांच्या मताचा आदर आहेच. पण त्यांनी सगळ्या पाकॄ काढून टाकल्या हे फार वाईट झाले.

ओह खूप वाईट झालं
काय होतेय रोजच्या रोज मायबोलीवर. ढवळून निघतेय. सर्वांनाच संयमाची आणि काही दिवसांच्या ब्रेकने पुन्हा विचार करायची गरज आहे.

ऋन्मेऽऽष >>> पहिल्यांदाच तुझे काहीतरी पटले.... खरचं ईथे सध्या जे काही चाललेय ते पाहुन असेच वाटतेय की आता यांनी खरचं एक ब्रेक घ्यावा

जो माणूस कुणाच्याही अध्यात मध्यात नसतो किंवा कुणाविषयी कधीही प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष कुत्सितपणे बोलत नाही अशा व्यक्तीची स्वतःच्या मनोरंजनासाठी खिल्ली उडवत राहणे हे निषेधार्ह आहे.

तरीही दिनेश ह्यांनी "हाथी चले बाजार........" हे धोरण ठेवायला हवे होते असे वैयक्तिक मत.

Dinesh, Apologies. Intention of "vidamban" is not to hurt the person.

झालं ते चुकीचं झालं , एखाद्याची टिंगल टवाळी करताना मस्करीची कुस्करी होत नाही ह्याकडे लक्ष देणही तेवढच महत्वाचं आहे . होप यापुढे मायबोलीवर असे प्रकार परत होणार नाहीत .
पाककृती ठेवणे / काढून टाकने सर्वस्वी तुमचा निर्णय असेल ,पण तुमच्या जागी मी असतो तर काढल्या नसत्या .

जी गोष्ट निव्वळ लिखाण न राहता आपल्या जीवनाचा भाग बनते त्यात लेखक निव्वळ लिहिण्यापेक्षा ते सर्व प्रत्यक्ष जगतच असतो आणि अश्या प्रमाणिकपणाची कोणी टर उडवली तर साहजिकच मानसिक उद्वेग होणे रास्त आहे. त्यामुळे दिनेशदा ह्यांच्या निर्णायास सैल्यूट.

अहंकार असणे वाईट पण स्वाभिमान असणे नेहमीच गौरवशील परंपरा .... this act resembles a efficacy of Johar आणि सर्वाना योग्य तो मेसेज नक्कीच मिळाला असेल निदान आतातरी हीच माफक अपेक्षा !

@नताशा
Your intention was to hurt the person. You yourself has written you don;t like Dinesh and other such words. When you write parody with targeting a single person over and over again you are not making the parody of writing but trying to hurt that person somehow.
Your id was removed earlier. Unfortunately because a technical issue during maintenance, you were able to login. But your ID was NOT removed by your request. It was already removed.

दिनेशदा जुने मायबोलीकर होते. ते व इतर काही जुने मायबोलीकर यांच्यात काही जुने इश्यू असावेत ज्याची बॅकग्राउंड मला माहीत नाही. पण आतापर्यंत त्यांनी कधी असं react केलं नव्हतं. यावेळी मात्र तिसर्याच एका ग्रुपकडून त्यांना प्रचंड उचकावण्यात आलं. या ग्रुपची ट्रोलिंग व सायबर बुलिंगची परम्परा पाहता त्यांना दुसर्याकडे बोट दाखवण्याचा नैतिक अधिकार शून्य होता. दिनेशदांचा वापर करून घेतला गेला असं मला वाटतं. या ग्रुपचं अभिनन्दन.

ओह! हे काय झालं?
दिनेश्दा, मला काय झालं हे माहित नाहीये खरं तर. वेमांच्या प्रतिसादावरुन अंदाज आलाय. पण तुम्हीच तुमच्या नेहमीच्या संयमाने घ्यायला हवं होतत.

नक्की काय आणि कुठे झालं याची कल्पना नाही पण अंदाज आलाय...
दिनेशदा, तुम्ही असा टोकाचा निर्णय घ्यायला नको होता. तुमचा इथे बराच मोठा फॅन क्लब आहे. माझ्यासारखे बरेच जण तुमच्या पाकृ बघुन पदार्थ करत असतात. त्यांचा तरी विचार तुम्ही काही टवाळ लोकांच्या कंमेंट्स पेक्षा करायला हवा होता.
वेमांनी संबंधीत कंपूला योग्य ते सुनावले आहेच. त्यामुळे तुम्ही प्लीज परत या.

I respect his decision. शक्यतो controversies होतील अशा धाग्यानवर प्रतिसाद देणे टाळतेच पण आता राहवत नाही. He was/is strong asset for माबो. त्यांच्यासारख्या सोर्टेड, कुणाला न दुखावणाऱ्या व्यक्तिला निघून जावेसे वाटणे हे अत्यंत खेदजनक आहे. मी आतापर्यंत त्यांना कुणालाही वाईट म्हणताना, दुखवताना पाहीलेले नाही. उलट वेळात वेळ काढून इतराना मदत करतानाच पाहीलेले आहे. त्यांनी माझ्या आणि इथल्या अनेकांच्या अनुभवांमधे मोलाची भर घातली आहे. त्यांच्याशी सतत संपर्कात राहिलेही तरी त्यांची आठवण इथे सतत येणारच.

पीनी आणि अंबज्ञ यांना अनुमोदन.

डाॅ.साती,बेफिकीर,दिनेश ह्या चांगल्या आणि वाचकप्रिय लेखकाना
काही कारणाने.
१) अापल्या लेखनाला प्रसिद्धि मिऴत नसल्यामुऴे वायफऴ टुकार लोकाच्या प्रतिसादानी व्यथित होउन लिखाण थांबवणे
२) मायबोलीची लोकप्रियता कमी करण्यासाठी काम चालू असल्यास, वायफऴ टुकार प्रतिसाद दात्याना थांबवण्या ऐवजी
वाचकप्रिय फिरु नयेत असे वातावरण का चालू आहे (अॅडमिन ला ह्या सगऴ्या प्रकाराची जाणिव असावी)

असाच प्रकार मागे "जिप्सी" यांच्याबरोबर झाला होता. एकदा प्रश्न विचारल्यावर समोरच्याने व्यवस्थित उत्तर दिले तर समाधान मानावे. परंतू पुन्हा पुन्हा तोच उचकेगिरीचा प्रकार जिप्सीच्या धाग्यावर केल्यामुळे जिप्सी वैतागले होते. आनि त्यांनी स्वतःचे सगळे फोटो डिलीट करण्यास सुरुवात केली. अ‍ॅडमिन यांनी तो प्रकार वेळीच रोखला आणि इतर मायबोलीकरांनी जिप्सी यांना समजावले त्यामुळे जिप्सी पुन्हा मायबोलीवर आले होते.
परंतू उचकेगिरीचा मुद्दा तो तसाच राहिला होता. जो दिनेशदांपुढे पुन्हा आला.

Sad

वेबमास्टर,
तुम्ही "नताशा" ह्या आयडीला स्पष्ट पणे त्य्यांचा मूळ हेतु काय असायचा सांगून त्यांचा बुरखा फाडलाय. अभिनंदन! हे होण्याची गरज होतीच.

ह्या आयडीच्या बर्‍याच पोस्टी कुठल्या हेतूने दिनेश ह्या आयडीला टारगेट करायचा ते वाचालेय बर्‍याचदा.
ह्या आयडीच्या जोडीला तसा आणखी एक आयडी अगदी नित्य नेमाने टिपापा सारख्या बाफवर दिनेश ह्या आयडीला वा तत्सम कोणा एका आयडीला ( जी आयडी त्यांना पसंत नाही किंवा उगाच आकस म्हणून) पकडून टींगल टवाळी करत असतो. त्याचे अस्तित्व टिकून आहे. का बरं?

हे घाणेरड्या पातळीचे सायबर बुलींग कधी थांबणार?

सायबर बुलींग मुळे काहींचे मानसिक संतुलन ढळून आत्महत्या केलेली पाहिलीय.
देव न करो, पण हि अशी जी लोकं किंवा आयडी दुसर्‍यांच असे बुलींग अथवा टवाळी करून करमणूक करतात, त्यांच्या वाटेला किंवा त्यांच्या जवळच्या लोकांना/त्यांच्या मुलांना भोगायाला लागेल तर कळेल का हा प्रश्ण पडतोच....

सगळ्या पाकृ काढायला नको होत्या. Sad फिलींग बॅड.
हे सगळ खुपच खालच्या थराला जात आहे.आपन सगळे मायबोली वर आहोत ह्याचा अर्थ सगळे सुशिक्षीत असणार.
मात्र मागच्या ४-५ दिवसापासुन जे चालु आहे त्यामुळे सुशिक्षितपणा आनि सुसंस्कृत पणा ह्याचा काही संबंध नसतो ह्यावर परत ठाम मत झाल आहे.काहीधागे तर निव्वळ स्कोर सेंटीग साठी काढलेले वाटतात.
सगळ वातावरण गढुळ होत जातय.
साती,व दिनेशदा (माबो सोडली असल्यास )परत याव.

दिनेश अहो काय हे. काढू नका पाककृती. किंवा मग नवे यूट्यूब चॅनेल चालू करा. मी कधी पासून तुम्हाला म्हणते आहे. टेक केअर.

हे कधी घडले? : अरेरे:
He was/is strong asset for माबो. त्यांच्यासारख्या सोर्टेड, कुणाला न दुखावणाऱ्या व्यक्तिला निघून जावेसे वाटणे हे अत्यंत खेदजनक आहे. मी आतापर्यंत त्यांना कुणालाही वाईट म्हणताना, दुखवताना पाहीलेले नाही. उलट वेळात वेळ काढून इतराना मदत करतानाच पाहीलेले आहे. त्यांनी माझ्या आणि इथल्या अनेकांच्या अनुभवांमधे मोलाची भर घातली आहे. +1111
दिनेशदा, साती, बेफि we miss u : अरेरे:

खुप दिवसांनी मायबोली वर आल्यामुळे मधे काय झाले याची कल्पना नाही. पण काही का असेना दिनेश दा तुम्हाला त्रास देणार्या व्यक्तीं ना एवढे सिरियस्ली घेण्यापेक्शा तुम्हाला फॉलो करणार्या माझ्या सारख्या अनेक जणांचा विचार करायला हवा होतात. प्लिज असे करु नका.
ज्या कुणाच्या कमेंट्स मुळे हा निर्णय घेतला गेला आहे तो आयडी एवढ्या लायकिचा आहे का कि तुम्हाला तुमचे लिखाण डिलिट करावेसे वाटले?

दिनेशदा, तुमच्या पाककृती आवडतात. इथे परत टाकल्यात तर छानच. नाहीतर दुसरीकडे कुठे वाचता येतील का ?ब्लॉग किंवा इतरत्र कुठे . असेल तर लिन्क द्या प्लीज.

Pages