दिनेशदांच्या पाककृती कुठे गेल्या ?

Submitted by धनि on 8 May, 2017 - 19:29

आजच चटनी वाले आलू करण्याकरता पाककृती शोधत होतो. दिनेशदांची एक आहे हे आठवले त्यामुळे शोधले तर पाककृती आली पण आतमध्ये नुसते क्ष क्ष क्ष दिसत होते. त्यामुळे मी त्यांच्या इतरही पाककृती पाहिल्या तर सगळीकडे क्ष क्ष क्ष दिसत आहे. त्या पाककृती कुठे गेल्या?

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

नक्की काय झाले हे कळायला काहीच मार्ग नाही. पण जे काही झाले असणार ते नक्कीच खुपच disgusting असणार.
नाहीतर दिनेशदा सारखा माणूस असे पाऊल उचलणार नाही.
मायबोलीवर सारखा सारखा यायला वेळ मिळत नाही, त्यामुळे अधेमधे काय होते ते कळतच नाही.
पण गेल्या काही वर्षात मायबोलीने बरेच चांगले लेखक गमावले आहेत, किंवा इथल्या वादांना कंटाळून चांगल्या लेखकांनी इथे लिहायचे थांबवले आहे. यातील काही लेखक ज्यांनी इथे येऊन आवर्जून लिहावे असे वाटते.
१) दिनेशदा : तुमच्या पाकृ, मायाळूपणे दिलेले सल्ले, मार्गदर्शन, निसर्गातल्या विविध झाडांची माहिती, जुन्या काळातल्या आठवणी
२) साती: अगदी सोप्या भाषेत लिहीलेले वैद्यकीय लेख. विशेषतः प्रजनन संस्थेवरील लेखमाला. बर्‍याच जणांना वैद्यकशास्त्राच्या मर्यादेत राहून दिलेले सल्ले, मार्गदर्शन
३) बेफिकीरः कथा, विनोदी लेख, लेख, विशेषतः व्यक्तिचित्रण
४) आशुचँपः तुम्ही सक्रियपणे लिहीत आहात, पण तुमचे पुण्याच्या गणेश विसर्जनाच्या फोटोंना मिस करतोय.
५) जिप्सी: यांची प्रकाशचित्रे, प्रकाशचित्रांसह यात्रावर्णन
६) नंदिनी: कथा, लेख
७)तुमचा अभिषेक : यांचे पण लेख मस्त असायचे. त्यांच्या मुलीच्या प्रत्येक महिन्यातल्या वाटचाली विषयी ३-४ ओळीच लिहायचे पण सुंदर लिहायचे. तो मिसळवाला एक लेख होता तो पण आवडला.

अजुन अनेक लेखक असतील ज्यांचे नाव मला आता कदाचित लिहीताना राहिले असेल, किंवा माझ्या माबोवरच्या अल्पकालावधीच्या भेटीमुळे वाचू शकलो नाही, त्या सर्वांनी मला क्षमा करावी.

खूप वाईट झालं हे.
दिनेशदा, त्या धाग्यावर तुमच्याबद्द्ल जे कुणी लिहिलं, ते कुणा एका व्यक्तीचे वैयक्तिक मत होते.
त्यावर कोणी विश्वास ठेवणं शक्य नाही.
त्या करिता तुम्ही असा निर्णय घ्यायला नको होता असे मला वाटते.
कृपया आपल्या पाकृ परत टाका!!

तुम्हा सर्वांना दुखावल्याबद्दल दिलगीर आहे.

मी अंगोला या देशात राहतो. इथे पाककृतींसाठी लागणारे बेसिक घटकही मिळवणे अवघड असते.
पण तरीही ते जमवून, पाककृती स्वतः करुन, त्यांचे फोटो काढून इथे पोस्ट करणे यामागे मेहनत
असतेच.
त्यांचे विडंबन होण्यासही माझी काही हरकत नव्हती, पण ते करताना तमाम भारतींय नागरीकांबद्दल
एक रेसिस्ट कमेंट करणे, आणि मी पाकिस्तानी मीठ वापरतो, असे सुचवणे हे अत्यंत अपमानास्पद होते.

या दोन्हीचा मी निषेधच नाही तर धिक्कार करतोय. ( हा धिक्कार या संस्थळाकडुन व्हावा हि अपेक्षा
होती, पण ती गैर होती, हे लक्षात आलेय. )

आणि हे गेली १२ वर्षे सुरु आहे. या सर्वाचा लेखाजोखा नक्कीच मांडेन कधीतरी.

तूम्हा सर्वांना माझ्या हाताने रांधून खाऊ घालावे, ही माझी मनापासून इच्छा आहे.
कधीही संधी मिळाली तर मी ते करेनच. तोपर्यंत माझी कुठलीही रेसेपी हवी असेल,
तर किंवा इतर कुठलीही मदत हवी असेल तर मी उपलब्ध असेनच.

दिनेशदा, काय झालेय मला माहित नाही.

तुमच्यासारख्या शांत, संयमी व्यक्तिचा पण संयम संपला, त्याअर्थी ते तितकेच सिरीयस असणार.
पण तुमचे लिखाण मिस करतेय. Sad

ओह!!

Sad
काय केलत हे दा? माझ्यासारख्यांनी माबोवरची तुमची रेस्पी शोधायची आणि डोळे झाकून करायची असं छान चाललं होतं. Sad Sad

तर किंवा इतर कुठलीही मदत हवी असेल तर मी उपलब्ध असेनच.>>>> ये हुई ना बात. Happy विपु पहा.
पण तुम्ही सगल्या पाकृ परत टाकल्या,ठेवल्या तर माझ्यासारखे कितीतरी आभारी राहतील.

दिनेशदा,
तुमच्या पाकृ पाहूनच तोंडाला पाणी सुटायचे, या सर्वाला आता मुकावे लागणार. Sad
तुम्हाला विनंती आहे की या पाकृ ब्लॉगवर लिहा. या नुसत्या पाकृ नाहीत तर साहित्यातला ठेवा आहे आणि तो असाच नष्ट होणे बरे नाही.
जर तुम्ही यु ट्युब चॅनेल काढले तर खरेच उत्तम!

या नुसत्या पाकृ नाहीत तर साहित्यातला ठेवा आहे आणि तो असाच नष्ट होणे बरे नाही.
+१

दिनेशदा, ज्या चारदोन नावांमुळे मायबोलीवर यावे वाटते त्यातले तुम्ही एक आहात. तुमच्या निर्णयामुळे वाईट वाटले पण आदरही दुणावला.

दिनेशदा तुमच्या पाकक्रुती मिस करीन. पण तुमचे ईतर लिखाण चालु राहिल याची अपेक्षा आहे.

I repect your descision.

दिनेशदा, ज्या चारदोन नावांमुळे मायबोलीवर यावे वाटते त्यातले तुम्ही एक आहात. तुमच्या निर्णयामुळे वाईट वाटले पण आदरही दुणावला. >>++११११

दिनेशदा, रुचिरा इतकाच तुमचा वावर होता आम्च्या स्वैपाकघरात.
++१

दिनेशदा, तुमच्या पाकृ तसेच इतर अनेक बाबींमधले मार्गदर्शन मिस करेन. तुम्ही ब्लॉग सुरु करा प्लीज

तुम्हाला विनंती आहे की या पाकृ ब्लॉगवर लिहा. या नुसत्या पाकृ नाहीत तर साहित्यातला ठेवा आहे आणि तो असाच नष्ट होणे बरे नाही.>>>+१११

तो आयडी आता ब्लॉक झालाय... तुम्ही पाककृती जनतेसाठी ओपन करा प्लीज...
निदान ब्लॉग तरी बनवा.. आम्ही visit करत राहू..

लोकांना टेकन फॉर ग्रंटेड घेणारे बोलत राहतात.. आपण इग्नोर करत राहायचे... ९९ % लोक तुम्हाला मिस करतायत, फक्त १ % साठी तुम्ही असे नाही केले पाहिजे हे मला as अ फॅन वाटते...

९९ % लोक तुम्हाला मिस करतायत, फक्त १ % साठी तुम्ही असे नाही केले पाहिजे हे मला as अ फॅन वाटते. > +infinite

प्रतिसादाबद्दल धन्यवाद दिनेशदा Happy तुम्ही पुढे कुठेही पाककृती टाकल्या की आम्हाला नक्की सांगा. तुमच्या बर्‍याच पाककृती आवडलेल्या आहेत. आणि करूनही पाहिलेल्या आहेत.

तुम्ही पाकृ ज्या तर्‍हेने लिहिल्या होत्या त्या करुन पहाण्याआधी मी त्या लिखाणाची फॅन होते. पण काहीजणांमुळे ,तुम्ही हे पाऊल उचललंत त्याबद्दल वाईट वाटले.मनापासून वाटले की त्यांच्याकडे लक्ष द्यायला नको होते.पण शेवटी निर्णय तुमचा होता.(वर्च्या काही प्रतिसादांवरून काय घडले असावे याची अंधुक कल्पना आली.)मात्र बाकीच्या बाबतीत असे होऊ नये ही इच्छा!

दिनेशदा, लोकांच्या एवढ्या आग्रहानंतरही तुम्ही भाव खात आहात, अशी आणखी एक टिका करायची संधी त्या लोकांना देऊ नका Happy

वर बेफिकीर यांचे नाव आलेय, त्यांचे गद्य लिखाण हल्ली दिसतच नाहीये आणि त्याची कमतरता जाणवत होती. पण त्यामागेही दुखावले जाण्याचे कारण आहे का?

किंबहुना ईतरही नावे वर आली आहेत, पण त्या सर्वांमागे खरेच असे काही कारण आहे की बस्स निघाला विषय काढली आठवण असे झालेय?

मी बरेच दिवसात मायबोली बघितलं नाही . त्यामुळे काय घडलं ते कळलं नाही . पण आज हे बघुन वाईट मात्र वाटलं . दिनेशदा आम्हा सर्वांना तुमचं लिखाण आवडत .त्यामुळे हत्ती चलता अपनी चाल - - - - या न्यायानेच तुम्ही वागा . व पूर्ववत लिखाण चालू ठेवा . आम्ही सर्व तुमच्या सोबत आहोत .

बेफ़िकीर ह्यांचे लिखाण वाचत मी खरे तर मायबोलीचा नियमित वाचक कधी बनलो ते माझे मलाच कळले नाही. त्यांच्या पोस्ट वर काही ठराविक जण खुप आकसबुद्धीने प्रतिसाद नमूद करताना पाहिलय. कदाचित त्यानंतर लिखाण / कादंबरी व कथा कमी झाल्यात. एकंदरीत काय तर कुणी चांगले फॅन फॉलोइंग गोळा करत असेल तर त्याच्या नावाने खड़े फोड करा ही मानसिकता दिसते ... Sad
शेवटी मानभावी नसले तरी कलाकारास सुद्धा मन असते आणि ते आपल्या पेक्षा नक्कीच अधिक संवेदनाक्षील असते म्हणून त्यांचे साहित्य अमर असले तरी अश्या प्रतिसादांचे जहरी शरसंधान झाल्यामुळे भीष्मासारखे शर शय्येवर पडलेले आढळते.

वाईट वाटले. दिनेशदा, तुमच्या पाकृचे फोटो म्हणजेसुद्धा एकेक कलाकृती असतात. लवकरच यातून सावरून पुन्हा लिहायला लागाल असे समजते.

एकूणच इंटरनेटवर पिंका टाकणे आणि लोकांना उचकवणे हे फार सोपे आहे. आपली खरी ओळख सहज लपवता येते त्यामुळे लोक आपली फ्रस्ट्रेशन्स, सगळ्या वाईट भावनांचा निचरा इंटरनेटवर कोणाला तरी टार्गेट करून करतात असे हल्ली वारंवार दिसते आहे. ट्रोल्सकडे दुर्लक्ष करा हे सांगणे सोपे आहे. त्याचा किती त्रास होतो हे एखादा तसा त्रास सहन केलेलाच सांगू शकेल. त्यातही मवाळ स्वभावाचे किंवा असभ्य उत्तरे न देणारे लोक अपप्रकारांना जास्त बळी पडतात. ट्रोलांना सवाई ट्रोल भेटले की ते पळ काढतात. पण त्यांना पुरे पडणे हे सोपे काम नाही.

वेबमास्टरबद्दलही खूप सहानुभूती नक्कीच आहे. कारण अनेकदा लिमिटमधे राहून, धोरणाच्या चौकटीत राहून सॉफ्ट टार्गेटला त्रास दिला जातो. अशा वेळी एखाद्याला त्रास दिला जातोय हे दिसत असूनही एखादी वॉर्निंग देण्यापलिकडे अ‍ॅडमिन्स फारसे काही करू शकत नाही.

एकूण सगळा प्रकार फार दुर्दैवी आहे. एखाद्या आक्रस्ताळ्या व्यक्तीने अशी टोकाची पायरी घेणे वेगळे आणि दिनेशदांसारख्याला असे करावेसे वाटणे वेगळे. ट्रोलिंग होत आहे असे दिसताच बाकी जागरुक वाचकांनीही तिथल्या तिथे त्याचा समाचार घेता येतो. पण त्यातून जालीय वाद आणि भांडणे सुरू होतात. नुसते दुर्लक्ष करावे तरी पंचाईत. एकूण परिस्थिती अवघड आहे. सौम्य स्वभावाच्या लोकांचे इंटरनेटवर वावरणे दिवसेंदिवस कठीण होत चालले आहे.

वेमांनी वॉर्निंग दिनेशदांनी रेसिपिज काढल्यावर दिली आहे. जेव्हा रेसिपिज वर विडंबन होत होते, कुचकट कमेंट्स दिल्या जात होत्या तेव्हा वॉर्निंग दिलेली मी तरी पाहिले नाही. खरवसाच्या धाग्यावर किती हैदोस घातला होता काही आयडिज नी तेव्हा वेमांनी प्रतिसाद उडवले पण समज दिलेली काही आठवत नाही. निरिक्षण चुकत असल्यास निदर्शनास आणुन द्यावे.

दिनेशदा काही संत, महात्मा नाहीत की त्यांनी वारंवार ह्या सगळ्याकडे दुर्लक्ष करावे. जरा ते काही प्रतिवाद करु लागले की हे लोक म्हणणार, बघा खरा चेहरा बघा वगैरे. का म्हणुन त्यांनी दुर्लक्ष करावे? माबो वर दुर्लक्ष केल्यास त्रास देणारे आणखीनच चेकाळतात. वेमांनी कोणताही पाठिंबा न दिल्याने एखाद्या आयडीला त्याचे लिखाण काढावेसे वाटले हे पटते आहे. अनेक आयडिज कुठल्याही धाग्यावर प्रतिक्रिया द्यायला कचरतात. याला कारण म्हणजे माबोवर फक्त काही ठराविक लोकांनाच वाटेल ते लिहिण्याची मुभा आहे. आणि कितीही प्रयत्न केला तरी काही समजुतदार, सुसंस्क्रुत आयडिज त्या पातळीवर उतरुन प्रतिवाद करु शकत नाहीत. अशा वेळी माबो प्रशासनाने आश्वासक आणि अनबायस्ड वावर ठेवणे गरजेचे आहे पण काही कारणाने ते होत नसल्याचे दिसत आहे.

असो, दिनेशदा शक्य असल्यास पाकक्रुती टाकणे चालु ठेवावे ही विनंती.

राया +१

त्या ठराविक पानावरच्या लोकांमुळे मायबोलीला किती आयडी गमवावे लागणार आहेत? साती,दिनेशदा यांचे आयडी जाणे/लिखाण थांबवणे मायबोलीला भुषावह नाही.बरं ,त्या ठराविक पानावरच्या आयडींचे मायबोलीला फारसे योगदानही नसताना कशासाठी अश्या लोकांना इम्युनीटी दिली आहे हे समजायला मार्ग नाही.तो पाकीस्तानचं मीठ हा उल्लेख तर कुणालाही चीड आणणारा होता.

राया,
प्रतिसाद "आवडला गेलेला" आहे.

Pages