अंडा भुर्जी आवडली नाही, हे एखाद्याला कसे सांगावे?

Submitted by ऋन्मेऽऽष on 2 May, 2017 - 15:54

मी एक मध्यमवर्गीय माणूस आहे. थोडी काटकसर करतो. थोडी जीवाची चैन करतो. मध्यमवर्गीय असलो म्हणून काय झाले, थोडे पैसे खर्च करून सुख मिळवायचा अधिकार मलाही आहे.

तर मला मांसाहार करायला फार आवडते. त्यात सहज उपलब्ध होणारे चटकमटक अंडे तर माझ्या खास आवडीचे. नेहमी घरीच खाणे होते. पण बाहेरची भुर्जी पाव जरा जास्त आवडते. अर्थातच त्याला पैसे जास्त पडतात. तरी नाक्यावरच्या गाडीवर तुलनेत स्वस्त पडते म्हणून पंधरावीस दिवसांनी एक चक्कर असतेच.

तर नुकतेच आमच्या मोहल्ल्यात एक नवीन रापचिक हॉटेल उघडलेय. ही अशी डोळे दिपवणारी लायटींग आणि चकाचक प्लेटसमध्ये वाढले जाणारे, डोळ्यांना लुभावणारे अन्न! काही दिवस येता जाता ऊसासे सोडले. एक हात मनावर होता तर एक हात पाकिटावर.. दोन्ही हात आपापले काम चोख बजावत होते.

पण आज नेमके दारावर लटकवलेल्या पाटीवर नजर पडली ..
आमची स्पेशालिटी - अंडा भुर्जी पाव !

नक्कीच गाडीपेक्षा महाग असणार. दुपटीने की तिपटीने? हा प्रश्न होताच.
पण चवही असेल का तशी? हा देखील प्रश्न होता.

पण चव चाखल्याशिवाय कळणार कशी? गेलो मग आज हिंमत करून आत ..

पहिल्याच घासाला समजले, पैसे गंगेत न्हाले आहेत .. बाकी सारं ठिक होते, पण टोमेटो ईतका होता की वेचून वेचून काढला तरी त्याच्या गोडआंबट रसाने अंड्याचा जीव घेतला होता. पण करतो काय, गिळली मुकाट. एकवेळ अन्नाची नासाडी मी करू शकतो पण पैश्याची नाही..
पैसेही ना दुप्पट होते ना तिप्पट होते.. तर अडीचपट होते. पण चव मात्र अर्ध्यानेही नव्हती. माझाच दिड शहाणपणा मला नडला होता.

यापेक्षा आज घरीच अंडे उकडून खाल्ले असते तर परवडले असते, असे कैकदा वाटले. पण गेलेली वेळ पुन्हा येत नाही आणि फुटलेले अंडे पुन्हा जोडले जात नाही. पण आता हा फुटक्या नशीबाचा अनुभव कोणाशी तरी शेअर करायची प्रबळ ईच्छा होत आहे.

यामागे दोन सुप्त हेतू आहेत

1) तेवढेच चार लोकांना सांगितल्याने आपला त्रास कमी होईल. एक ते असते ना मानसिक समाधान..

2) जर ती भुर्जी मला का आवडली नाही आणि माझ्या आवडीचे त्यात काय नव्हते हे मी व्यवस्थितपणे आणि प्रामाणिकपणे शेअर केले तर त्या आवडीशी मिळती जुळती व्यक्ती सावध होईल आणि तिचा संभावित मनस्ताप टळेल.
बाकी माझ्यावर विश्वास ठेवून जावे न जावे हा निर्णय तिचाच राहील.

....

तर सांगावे का हे मी माझ्या जवळपासच्या, ओळखीच्या लोकांना फेसबूक, व्हॉटसप, मायबोली सारख्या सोशल साईटसवरून ?

काही अनुभव वाईट आहेत म्हणून ईथे सल्ला विचारत आहे.
साधारण अश्या प्रतिक्रिया येतात ज्यांची भिती वाटते..

........

1) स्वत:ला शहाणे समजायचे सोडा. तुम्हाला आवडते तीच भुर्जी चांगली आणि बाकीच्या फालतू का?

2) एवढ्या लोकांना आवडते. ते मुर्ख आहेत का?

3) आमच्या घरच्यांना तर आवडली. आईला तर आज्जी करत असलेल्या भुर्जीपावची आठवण झाली.

4) तुम्हाला कशी आवडणार? तुम्हाला त्या टोपीवाल्या मामू भाईजानच्या गाडीवरचीच आवडणार.

5) वरच्या पोस्टला एक व्हायसे वर्साही असतोच.

6) केवढी ही पोटदुखी आणि जळजळ? ईनो घ्या ..

7),निदान काहीतरी आवडले असेल. पाव, कांदा, लोणचं, पाणी. खूपच एकांगी मत बनवले आहे. जे आवडले ते देखील लिहायला हवे होते.

8) नका खाऊ. आम्हाला काय. तसेही आम्ही भुर्जीच खात नाही.
(फक्त तिच्यावर होणारया चर्चा तेवढ्या चवीने वाचतो)

9) गाढवाला गुळाची चव काय?

10) तुला खायची अक्कल नाही रे. त्यात लिंबू पिळून खाऊन बघ एकदा आणि मग मला सांग.

11) अगदी अगदी.. मलाही आवडली नव्हती. एकदम थर्डक्लास. लोकांना स्वत:ची अक्कल नसते. सगळ्यांना आवडली मग आपल्यालाही आवडलीच पाहिजे. मेंढरं नुसती..
(ही पोस्ट वरवर जरी आपल्या समर्थनार्थ वाटली तरी त्या धाग्यावरचे आपले विरोधक वाढवणारी असते. देव असे हितचिंतक अहितचिंतकांनाही न देओ)

11) ह्ममम.. बर्र.. चान चान .. ईत्यादी ईत्यादी..

........

हे असे असताना एखाद्याने आपले प्रामाणिक नकारात्मक मत व्यक्त करायचे तरी कसे ?

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

एखाद्यालाच कशाला, सगळ्या जगाला सांगु शकशील - येल्प किंवा झमेटोवर निगेटिव रिव्यु टाकुन त्या रेस्टराँचा बँड वाजव...

साधारण अश्या प्रतिक्रिया येतात ज्यांची भिती वाटते..>>>आता माहिती आहे ना कश्या प्रतिक्रिया येणार आहेत ते तर मग कशाला घाबरायचे.
तुला ती नाहीच आवडली ना मग ते तुझे प्रामाणिक मत झाले. आधी वाटले कि ज्याने/जीने भुर्जी केली त्यालाच/तिलाच सांगायचे आहे... पण मग हॉटेलच्या रिव्हू मधे सांगू शकतोस, अगदिच बेकार होती असे नको लिहूस पण त्यात काय कमी, काय जास्त वाटले ते लिही. किमतीच्या मानाने क्वालिटी आणि क्वांटिटी कशी वाटली ते ही सांग.

पण आता हा फुटक्या नशीबाचा अनुभव कोणाशी तरी शेअर करायची प्रबळ ईच्छा होत आहे.>>>ईथे सांगितले कि Happy

हे असे असताना एखाद्याने आपले प्रामाणिक नकारात्मक मत व्यक्त करायचे तरी कसे ? >> हे खालील ऊपाय करून बघ.

१)ज्यांना ही भूर्जी आवडणार नाही किंवा आवडू नये असे तुला वाटते त्या सर्वांसाठी एक भूर्जी पार्सल पाठवून त्याबरोबर 'ही जगातली सर्वात बकवास भूर्जी का आहे' अशी वर्णनात्मक नोट (ह्या लेखाची लिंक ही चालेल) पाठव म्हणजे तू भूर्जीचा दर्जा अनबायस्ड रित्या(प्र्रमाणिकपणे) सप्रमाण सिद्धं केला असे होईल आणि तुझा प्रामाणिकपणा आणि नकारात्मक मत दोन्ही आमच्याप्र्यंत पोचेल.
कधी पाठवतो आहेस? मायबोलीकर वाट बघत आहेत तुझ्या पार्सलची. Wink

२) तू टोपीवाल्या मामू भाईजानची भूर्जी नेऊन दे हॉटेलवाल्यांना आणि अशी बनवा सांग.

३) ईथे हाताची वाफ दवडण्यापेक्षा वेटर किंवा हॉटेल मॅनेजेमेंट समोर तोंडाची वाट दवडली असतीस वर मी तुमच्या हॉटेलबद्दल माबो वर लिहिणार आहे असे सांगितले असते तर आम्हाला 'चिनीकम' सारखा 'टोमॅटो कम' सिनेमा नाहीतर अजून एक माबो लेख वाचायला मिळाला असता.

सहज उपलब्ध होणारे चटकमटक अंडे>>>
अंडं काय सहजच उपलब्ध होत असतं? कोंबडीला किती मेहनत करावी लागते. तुझ्या जिभेचे क्षणिक चोचले पुरवायला जिने आपल्या मुलाचा बळी दिला तिच्या त्यागाची थोडी तरी चाड ठेव!!!

तो भुर्जीबद्दल बोलत नाहीये.... Wink

/--------//

ऋ, निगेटिव्ह कमेंट्स आल्यातर तुला त्रास का होतो?

ज्याची त्याची आवड आणि पैसा. तू लोकांना खड्ड्यात पडू नका सांगू शकतो, पण हि डिश खाऊ नका असे सांगू शकत नाही, तुला आवडलं का नाही, का नाही आवडलं एवढं फक्त सांग, लोक मेजॉरिटी कुठे आहे हे बघून ठरवतील त्यांचे ते... कदाचित तू ज्या दिवशी गेला, नेमक्या त्याचवेळी बॉस शेफवर भडकला असेल... किंवा त्याचवेळी इतर दहा टेबलवर उत्तम भुर्जी असेल, किंवा इतर दहा लोकांना तीच बेस्ट वाटली असेल. इतरांच्या वतीने तू कसा निर्णय घेऊ शकतोस? लेट देम ट्राय ... जास्त लोड घेऊ नये. Wink

लब्बाड,
बाहुबली च्या धाग्यावरचे प्रतिसाद वाचून या धाग्याची प्रेरणा मिळाली ना?
अंडबुर्जी किंवा बाहुबली आवडला नाही तर "आवडला नाही " म्हणावे
उगाच कसे सांगू वगैरे म्हणून आढेवेढे घेऊ नयेत.
Happy

बाकी बाहुबली ला अंडाबुर्जी काय म्हणतोस रे... चांगली चिकन बिर्याणी वगैरे म्हणायचे सोडून...
तुला आवडली कि नाही तो भाग वेगळा....

येल्प किंवा झमेटोवर निगेटिव रिव्यु टाकुन त्या रेस्टराँचा बँड वाजव...
>>>>>
कोणाचा बॅन्ड वाजवायचा हेतू नाहीये ओ..

@ हायझेनबर्ग, जी भुर्जी मला आवडली नाही ती कोणाला पार्सल पाठवणे हे उपहार नैतिकतेला साजेसे कृत्य नाहीये. मी तसे कदापि करणार नाही.

अंडं काय सहजच उपलब्ध होत असतं? कोंबडीला किती मेहनत करावी लागते.
>>>>>
ईथेही स्त्री पुरुष असमानता?
मेहनत काय कोंबडीच करते? कोंबड्याच्या मेहनतीचे काय?

ज्याची त्याची आवड आणि पैसा. तू लोकांना खड्ड्यात पडू नका सांगू शकतो, पण हि डिश खाऊ नका असे सांगू शकत नाही, तुला आवडलं का नाही, का नाही आवडलं एवढं फक्त सांग, लोक मेजॉरिटी कुठे आहे हे बघून ठरवतील त्यांचे ते... 
>>>>>>
नानाकळा हे मी वर लेखातही लिहिलेय.

""बाकी माझ्यावर विश्वास ठेवून जावे न जावे हा निर्णय त्या व्यक्तीचाच राहील.""

बाकी लोकं मेजॉरटी कुठे आहे हे बघून ठरवत असतील तर अवघड आहे लोकांच Happy

अवांतर - भुर्जी की बुर्जी? योग्य शब्दोच्चार काय आहे?

भुर्जी मलाही आवडते. शक्यतो मी चपातीसोबत खातो. हैद्राबादेत तंदुरी रोटी सोबतपण.
पण कधी गाडीवर अेका पावासोबत सुद्धा खातो. पाव कमी भूर्जी जास्त.

खूप टोमॅटो टाकलेली भूर्जी मलाही आवडत नाही. तर तुला न आवडलेल्या भूर्जीच्या हॉटेलचे नाव आणि पत्ता सांग. कधी दक्षीण मुंबइत आलो अन् नेमके ते हॉटेल दिसले आणि खायला गेलो तर कुठले हॉटेल टाळावे हे माहिती हवे. नाहीतर कुठलेही लायटिंग आणि चकाचक प्लेट्स असणारे हॉटेल दिसले तर हेच के ऋवाले हॉटेल तर नाही मा अशी शंका येत राहील.

इकडे आम्हाला सांगत बसण्यापेक्षा, त्या आधी रेस्टॉरंटवाल्याला का सांगितले नाही?
सांगण्याचे कष्ट होत असस्तील, तर गळ्यात तशा मजकुराची पाटी अडकवुन रेस्टॉरंटच्या दाराबाहेर उभे राहुन पिकेटिंग करीत रेस्टॉरंटमध्ये येणार्‍या गिर्‍हाईकांना का नाही सांगितले? निदान त्यांचे पैसे अन मनःस्ताप तरी वाचतील, नै का?

>>>> अंडा भुर्जी आवडली नाही, हे एखाद्याला कसे सांगावे? <<<<
मुळात एखादा (ए - खादा?) म्हणजे कोण?
अन एखाद्यालाच का सांगावे? सगळ्यांना सांगितले तर काय बिघडले?
किंवा कुणालाच काहीही सांगायची गरजच काय?
जर आवडली असती तर कसे सांगितले असते? कुणाकुणाला सांगितले असते?
जर आवडली असती तर तीच अंडाभुर्जी मित्रमैत्रिणींमधे कितिजणांना खिलवली असती?

तर मला मांसाहार करायला फार आवडते. त्यात सहज उपलब्ध होणारे चटकमटक अंडे तर माझ्या खास आवडीचे.

अंडे मांसाहार मध्ये मोडत नाही...

कशी झाली/झाला............
मला नाही आवडली/ला. च

काय चांगला झालाय ना?
चांगला आहे पण मला नाही आवडला. अहो गाढवाला गुळाची चव काय असणार?

काही नविन घाग्यांसाठी विषय
१) खाज उठली तर कोणत्या हाताने आणि नेमक्या कुठल्या बोटाने खाजवणे योग्य?
२) गर्ल्फ्रेंड चा खर्च परवडत नसेल तर ती अधे मधे भाड्याने द्यावी का?
३) मुर्खपणाचे विचार मनातुन काढुन टाकण्यासाठी काय करावे?
४) लग्ना नंतर मी काय करु? (१० (वी) नंतर काय या प्रमाणे)
५) मी स्वप्निल जोशीचा प्रचार करतोय हे त्याला समजल्यावर त्याने नवग्रह शांती का करुन घेतली?
६) लग्नासाठी मुलगी बघु की मुलगा?
७) लग्नासाठी मुलगी बघायला जाताना जिन्स घालावी की साडी नेसावी?
८) गर्ल्फ्रेंड जमिनीत पुरली तर गर्ल्फ्रेंड चं झाड उगवेल का?
९)' ते' पाहिजे असेल तर केमिस्ट ला कसे सान्गावे (यात 'ते' म्हणजे तुमच्या बुद्धी कौशल्याने कोणतीही वस्तु लिहु शकता)
१०) या वर्षीचा मुर्खपणाचा पहिल्या क्रमांकाचा बक्षीस मला मिळालं, पण आई बाबांंना माझं कौतुक का नाही?

हे प्रश्न कधी ना कधी पडतीलच म्हणुन रेडीमेड विषय आधीच देऊन ठेवतोय Proud

Submitted by vaibhavayare12345 on 3 May, 2017 - 10:53
>>
Rofl

एकवेळ अन्नाची नासाडी मी करू शकतो पण पैश्याची नाही..
या वाक्याचा तीव्र निषेध
>>>>
धन्यवाद Happy
लोकांनी निषेध करावा यासाठीच ते वाक्य पेरले होते.
जसे ब्लॅक कॉमेडी असते तशी ही माझी ब्लॅक फिलॉसॉफी मांडायची स्टाईल आहे Happy

वैभव, फार छान धागे सुचवलेत. चार पाच टिपून ठेवलेत. प्रतिभा प्रतिभेला जागवते
.

>>>> प्रतिभा प्रतिभेला जागवते <<<< Lol
अन अशा प्रतिभेने जागवलेली प्रतिभा तुमच्या प्रतिमेला उजळवु शकते, तसेच मलिनही करु शकते... Proud

असं हे कोणतं रापचिक रेस्टॉरंट आहे जिथे अंडा भुर्जी पाव मिळतो? मी तर नेहमी गाडीवरच विकताना पाहिलंय.
>>>>>

चकाचक प्लेटस आणि त्यात अंडाभुर्जी ...
हा फोटो उधार राहिला..
या आठवड्यात ताण्त्रिक कारणाने टाकू शकत नाही .. पुढच्या आठवड्याला याच धाग्यावर नक्की !

@ आरारा ...
अहो संस्थळ नाही चुकलेय तर एकूणच जगभरातील सर्व मराठी संस्थळांचा लसावि मसावि काढून ते प्रतिसद लेखात लिहिलेत.

पण तेच जर मी मुलगी असतो (अर्थात मग सुंदरच असतो) आणि अशी बकवास भुर्जीची पोस्ट फेसबूकवर टाकली असती तर मात्र त्याखालच्या कॉमेंट वेगळ्याच असत्या.

म्हणजे रु , तू फोटो घेण्यासाठी परत त्याच रेस्तराँ मध्ये जाऊन अंडा भुर्जी घेणार?

नाही. रा. रा. माननीय ऋन्मेऽऽषजी शेठ साहेब (हो! नाहीतर आयडी उडायचा :फिदी:) घरी भरमसाठ टमेटो घालुन फर्जी भुर्जी करणार आणि तो फोटो टाकणार. मग तोच फोटो त्यांच्या तयार असलेल्या शे़कडो आयड्यातील मुलीच्या नावाच्या आयडीने फेसबुकावर पण टाकणार. आलेल्या प्रतिक्रिया डेव्ह नलला... (म्हणजे वाचणारही नाही). आणि अ‍ॅनॅलिसिस केल्याच्या थाटात जनरल बायासेस, स्टिरिओटाईप आधीच मनात धरुन २-४ लेख पाडत सुटणार.
तयार रहा.

Pages