सांज शृंगार

Submitted by पुरंदरे शशांक on 24 April, 2017 - 02:14

रंग चितारी अाभाळावर जाताना दिनकर
लाजलाजुनी नवथर संध्या मोहरली तिथवर

काजळ किंचित भिरभिरले अन् पापणीत थरथर
ओष्ठद्वय रंगता उमलले गुलाब गालांवर

पदर जांभळा उचलून पाही हळूचकन् प्रियवर
दारातून ती पहात असता गेला कि झरझर

कृष्णवस्त्र हिरमुसून ओढी पुरते अंगावर
लुकलुकणारी एक चांदणी उमटे क्षितिजावर......

Group content visibility: 
Public - accessible to all site users

मस्त!

सुंदर कविता....
बालभारती, कुमार भारतीचे दिवस आठवले...

वाह !

"कृष्णवस्त्र हिरमुसून ओढी पुरते अंगावर
लुकलुकणारी एक चांदणी उमटे क्षितिजावर......" छान.

मस्त आहे कविता.

व्वा ! चित्रमय कविता आहे अगदी!
(पाय सोडुनी जळांत बसला असला औदुंबर- ही कविता आठवली वृत्तसाधर्म्यामुळे)

व्वा! अप्रतिम!!!!!!!!!!!!!!!

(पाय सोडुनी जळांत बसला असला औदुंबर- ही कविता आठवली वृत्तसाधर्म्यामुळे)>>>>>>>>>>+१