जल............ नीर, तोय, उदक...........जीवन

Submitted by सेन्साय on 21 April, 2017 - 01:11

पाणी हेच जीवन .... ही गोष्ट आपण शाळेत शिकलेली व पुढे आयुष्यात पदोपदी अनुभवलेली आहे. निसर्गाने प्रत्येक सजीवास जीवन जगण्यासाठी उचित प्रमाणात अन्न पाणी नेहमीच उपलब्ध ठेवलेले आहे. नैसर्गिक अन्न साखळीतील मानवी हस्तक्षेपाने आज आपल्याला पाणी टंचाई जाणवते.

पाणी वाचवा .. ह्याविषयी अनेक मते जाहीर व्यक्तव्यातून किंवा लिखित संदेशातून मांडून जनजागरण करायचे प्रयत्न चालू झाले. त्यात महत्वाचे व समान मुद्दे म्हणजे पाण्याचा वापर जपून करा - पाणी अडवा पाणी जिरवा - वृक्ष संवर्धन करा ... हेच दिसून येतात. सुजाण नागरिक निश्चितच पाणी फुकट घालवायचे ह्या उद्देशाने ते फुकट घालवत नाहीत तरी वापर करण्याच्या चुकीच्या पद्धतीमुळे ते काही प्रमाणात फुकट जातेच. हे झाले व्यक्तिगत पातळीवर, तर आता सामाजीक पातळीवरील प्रयत्न पहिले कि कित्येक संघटना दरवर्षी पावसाळ्यात वृक्षारोपणाचे कार्यक्रम हिरीरीने राबवताना दिसून येतात. काही जणांचे हे कार्य फोटोसेशनपुरताच मर्यादित राहत असले तरी बहुतांशी संस्था खरोखरच तळमळीने हे कार्य करत असतात. तरीही ह्या प्रयत्नांतील झाडांचे जगण्याचे प्रमाण अनेक कारणांमुळे फारच कमी असते.

पण म्हणून काय आपण परिस्थितीपुढे हार मानायची का ?
नक्कीच नाही ... काळ आणि वेगाचे भान राखून उचित दिशेने प्रयास केले कि मार्ग निघतोच. त्यापैकी एक उदाहरण म्हणजे - वारका वॉटर तंत्रज्ञान
.
WARKA-WATER.jpg
.

इटालियन आर्किटेक असणारे अरतुरो विट्टोरी यांनी वारका वॉटर या संकल्पनेचा शोध लावला आहे. हवेतून पिण्याचे योग्य पाणी संकलित करण्याचे हे तंत्र आहे. चित्रात दर्शविल्याप्रमाणे वारका वॉटर टॉवर उभे करण्यात येतात. हे टॉवर पर्यावरण दृष्टय़ा टिकाऊ आणि जैविक विघटन होणारे आहे. वारका वॉटर ही एक उभी संरचना असते. त्याच्या आतल्या बाजूस विशिष्ट प्रकारचा कपडा लावण्यात आलेला असतो. जो हवेतून पिण्यायोग्य पाणी संकलित करतो. वारका वॉटर टॉवर उभं करणे अतिशय सोपे असून ते गावकरी स्वत: स्थानिक पातळीवर मिळणा-या साधनांपासून बनवू शकतात. विशेष म्हणजे त्याची निर्मिती आणि देखभाल करायला पैसे लागत नाहीत. या तंत्रांमुळे दररोज ५० ते १०० लिटर पिण्याचे पाणी संकलित होते, असा दावा करण्यात आला आहे

हे झाले पिण्याच्या पाण्यासाठी वापरू शकणारे तंत्रज्ञान, पण मग शेतीचे काय ? ह्यासाठी सुद्धा उपयोगात येते अतिशय कमी पाण्यावर चालणारी शेती पद्धती म्हणजेच हायड्रोपोनिक्स.
.
14084120403_3893004191_b.jpg

.
देशात अनेक ठिकाणी दुष्काळ आणि पूर, वादळांसारख्या नैसर्गिक आपत्तींमागे हवामानाची अनियमितता हे कारण असल्याने, ही संकटे रोखणे शक्य नसले, तरी त्याचा मुकाबला करणे मात्र शक्य असते. चाऱ्याविना पशुधन वाचवायचे कसे, हा प्रश्‍न सर्वत्र विचारला जात असताना काही शेतकरी मात्र नवीन वाट चोखाळत आहेत व आधुनिक तंत्रज्ञानाच्या सहाय्याने त्यास पुरेपूर यशसुद्धा मिळत आहे. या प्रकारात दोन किलो धान्या पासून १५/२० किलो हिरवा चारा निर्मिती होते. जो एका जनावरास एका दिवसासाठी पुरेसा असतो. यात जमीन अत्यल्प आणि पाणीही कमी लागते. उन्हाळ्यात कमी पाणी,कमी जमीन असलेले जे शेतकरी आहेत त्यांना सुद्धा आता दुधाळ जनावरे जोपासणे सोपे होऊ शकते.

खरे तर चीन, जपानसारख्या देशांत 1970 पासून हे तंत्रज्ञान वापरात आहे. हायड्रोपोनिक चारायंत्र (हायड्रोपोनिक फॉडर मशिन) म्हणून परिचित असलेले हे परदेशी बनावटीचे महागडे यंत्र विकत घेणे आपल्या इथल्या शेतकऱ्यांना मात्र परवडणारे नाही. ते भारतीय बनावटीनुसार उपलब्ध झाल्यास फायदेशीर होऊ शकते, असा विचार करून गेल्या काही वर्षापासून अनेक कृषी संस्था वेगवेगळे प्रयोग करीत आहेत ज्याचे फलित म्हणजे ही हायड्रोपोनिक चारा पद्धत.

हायड्रोपोनिक्‍स चाऱ्याचे फायदे -
1. चारा टंचाई परिस्थितीत हिरवा चारा निर्मितीचा चांगला पर्याय.
2. कमी जागेत, कमी पाण्यात, कमी कालावधीत, स्वस्तात हिरवा पौष्टिक चारानिर्मिती.
3. जनावरांना 90 टक्के चारा पचतो.
4. पशुखाद्याचा खर्च 40 टक्के कमी.
5. जनावरांच्या रोगप्रतिकारक शक्तीत वाढ.
6. दुधाच्या फॅटमध्ये वाढ. किमान अर्धा लिटरने दुधात वाढ.
7. जनावरांची प्रजनन क्षमता सक्षम होते.
8. जनावरांच्या शरीरात प्रथिने, खनिजे, जीवनसत्त्वाच्या उपलब्धतेत वाढ.
9. जमिनीवर चारा उत्पादन घेण्याच्या तुलनेत 5 ते 10 टक्के पाण्याची आवश्‍यकता आहे.
10. प्रथिने, जीवनसत्त्वे, अँटीऑक्‍सिडंट्‌स, फॉलिक ऍसिड, ओमेगा-3, स्निग्ध पदार्थ हरितद्रव्य मोठ्या प्रमाणात असतात

ह्याच पद्धतीद्वारे अनेक भाज्या फळे ह्यांचे सुद्धा भरघोस उत्पादन व्यावसायिक पातळीवर घेतले जाते.

.
hydroponics.jpg
.

वरील दोन्ही गोष्टी बहुतांशी ग्रामीण परिस्थितीमध्ये वापरली जाऊ शकणारी असल्याने शहरी वातावरणात चुकीच्या सवयीने जे पाणी फुकट जाते त्याचे काय ? ... ह्याला सुद्धा विज्ञानाने उत्तर शोधलेले आहेच. गेली अनेक वर्षे प्रचलित असलेले नाव म्हणजे rain water harvesting.
.
2641196cdb3c2188b4d12e8bba9c23bb.jpg

.
ह्याचा अनेक शहरात वापर सुरु झालेला असला तरी म्हणावा तसा देशभरात अजून सर्वत्र प्रचार न झाल्याने समाजाचा मुलभूत घटक म्हणून हा प्रकल्प घरोघरी राबवला जात नाही असेच चित्र सध्या दिसते , अर्थात हे चित्र लवकरात लवकर बदलणे हेच आपल्या हिताचे असेल. हा उपक्रम फक्त पावसाळ्यापुरताच मर्यादित असल्याने अजून एका शोधाचा इथे उल्लेख करावासा वाटतो ज्याचा वापर केल्यास फुकट जाणारे पाणी नक्कीच वाचवू शकतो. ही गोष्ट म्हणजे अनेक जणांना पर्वणीच आहे कारण स्वत:च्या मनाला समजत असूनही काहीवेळा अनवधानाने आपल्या हातून घरातील नळ उघडा राहून पाणी फुकट जाते त्याला आता नक्कीच आळा असू शकतो. Kitchen & Washbasin Tap Water Saving Aerator/Filter ह्या अनुषंगाने शोधले तर कित्येक मॉडेल आपल्याला उपलब्ध होतील. उदाहरणार्थ -
.
81TcOpOlfqL._SY355_.jpg

.
स्प्रिंकलर /फॉगर सारखे अतिशय सोपे तंत्र वापरून फक्त ओलाव्यापुरता आवश्यक पाणी वापरून बाजूने ओघळून जाणारे नळाचे पाणी वाचवत इथे पाण्याची अनेक पटीत बचत केली जाणे शक्य आहे हे दिसून येतेय. ह्या सारखी अजून काही उदाहरणे आपल्यास माहिती असतील तर प्रतिसादांमधून जाणून घायला सर्वांनाच आवडतील आणि त्याचा नक्कीच सर्व वाचकांना लाभ होईल.

ह्या सर्व प्रकारात सध्याच्या घडीस झोपडपट्टी किंवा कारखान्यांची पाणी चोरी वगैरे माध्यमातून होत असणारी पाण्याची नासाडी तूर्तास वगळली आहे कारण वरील उदाहरणांसारखे विज्ञाननिष्ठ उपकरण किंवा तंत्रज्ञान सध्यातरी माझ्या माहितीत ह्या प्रकारास आळा घालू शकेल असे नाही. ह्यासाठी फक्त समाज प्रबोधन हाच मार्ग आजतरी डोळ्यासमोर दिसतोय, पुढील काळात नक्कीच काहीतरी मार्ग निघेल अशी अपेक्षा धरायला हरकत नाही.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

दोन पातळ्यावर सरोवरे होती आणि तिथे
वरच्या पातळीवरुन खाली पाणी सोडून वीज तयार केली जात होती. पण वीजेची
मागणी जास्त असली कि, खालच्या पातळीवरचे पाणी परत पंपाने वर नेत आणि
परत वीज निर्माण करत, आणि ती वीज मात्र चढ्या भावाने विकत असत.
(जेणेकरून तो पाणी वर चढवण्याचा खर्च भरुन येईल. )

जेव्हा वीजेची मागणी कमी असते तेव्हा अतिरिक्त वीज पाणी वर खेचण्यासाठी वापरली जाते व वरील सरोवरातील कमी झालेली पाण्याची पातळी काही प्रमाणात भरुन काढली जाते. वाढीव वीजेची मागणी पुर्ण करण्यासाठी ऐनवेळी पाणी पंप करुन वीजनिर्मीती करताना उर्जेचा र्‍हास होतो (अद्याप perpetual generator चा शोध लागलेला नाही), त्यामुळे पाणी पंप करण्यापेक्षा लागणारी वीज थेट वापरणे स्वस्त पडते.

धन्यवाद मार्मिक
------------------

अजून एक छान जुगाड पाहण्यात आला फेसबुकवर
https://www.facebook.com/sarika.garg1/posts/983349185052181

आपले water purifier आणि त्यानुशांगाने होणारी पाण्याची प्रचंड नासाडी टाळण्याचा सोपा उपाय दिलाय ह्यात

मला हे आरो वैयक्तिक रोट्या पटत नाहीत.. 80 टक्के पाणी वाट जाते तेही ट्रीटमेंट केलेलं, आमच्या घरात आम्ही कधीच आरो लावले नाही, प्युरिफायर सुद्धा नाही, पावसाळ्यात उकळून तुरटी फिरवून घेतो तेवढेच... पाण्याची नासाडी थांबवा म्हणणाऱ्या लोकांनी आरो फिल्टर वापरणे थांबवले पाहिजे. तो एक युजलेस प्रकार आहे, ग्राहकांच्या भीतीवर विकला जाणारा... काही सुशिक्षित लोक तर आरो चे पाणीही उकळून गाळून मुलांना देतात तेव्हा हसावे कि रडावे कळत नाही...

सर्व मार्केटिंग हे भितीवरच चालते Happy
दुसरे म्हणजे - इकडे RO मधून मिनरल्स वाया घालवायचे नैसर्गिक पाण्यातले आणि मग डॉक्टरने सांगितलेली मिनरल मिक्स घेत बसायचे. RO चा वापर घरात करण्या ऐवजी पाण्याच्या पुनर्वापर आणि शुद्धीकरण क्रियेत फक्त आवश्यक वाटतो पण ती स्थिती अजून इकडे यायला ( MIDC उद्योगातील नि:सारीत पाणी पुन्हा घरात वापरायला ) खूप मानसिक बदलाची आवश्यकता आहे. अनेक प्रोजेक्ट कल्पनेत आणि कागदावरच राहतात निव्वळ ह्या मानसिकतेमुळे.

हो, बऱ्याच लोकांना पाण्याचा टीडीएस जो 100-300 च्या रेंजमध्ये असलेला आरोग्यासाठी योग्य आहे तो 'मुतखडा होईल' या कारणासाठी 30 ह्या घातक रेंजपर्यंत आणलेला बघितला आहे. हे आरो म्हणजे जनतेला स्वतःच्या आरोग्याशी खेळण्याचे उघड परवाने दिल्यासारखं झालं आहे.

धन्यवाद mi_anu
हा पेपरात दिला आहे का? >>> हो दिलाय मी
आणि हायड्रो पोनिक्स बद्दल सुद्धा एक डिटेल लेख आहे माझा जो ऑलरेडी छापून आलाय.

आपले water purifier आणि त्यानुशांगाने होणारी पाण्याची प्रचंड नासाडी टाळण्याचा सोपा उपाय दिलाय ह्यात
कपडे धुण्यासाठी हे पाणी वापरावे असा त्यात चुकिचा सल्ला दिलाय. ह्या पाण्यात अधिक क्षार असल्यामुळे पाण्याला फेस येत नाही, त्यामुळे हे पाणी कपडे धुण्यासाठी अजिबात वापरू नये.
RO purifier ने पाण्याची प्रचंड नासाडी होते हे अर्धसत्य आहे. गरज नसताना RO purifier वापरू नये. पाण्याचा TDS न तपासता तर अजिबात वापरू नये. जितका RO purifierचा TDS जास्त ठेवाल तितके पाणी कमी वाया जाईल.

माहितीपूर्ण लेख . षोष खड्ड्याच्या माध्यमातून जमा केलेल्या पाण्याने काही खेड्यात ऐन उन्हाळ्यात पाणी पातळी वाढली.

नाही होणार असे वाटते. माझ्या मते वारका हे बाष्पापासून पाणी बनवत नाही. जे पाण्याचे सू़क्ष्म कण आहे हवेत ते गोळा करुन एकत्र करते,

तसेच वारका हे झाडासारखे हवा थंड ठेवण्याचे काम करत असेल तर पावसाला मदतच होइल....

(माझा प्रतिसाद फारतर इमॅजिनेशन वर आधारित आहे, अभ्यासावर नाही याची नोंद घेणे)

विहिरींचे रिचार्जिंग सारखेच शोष खडडा काम करतात.
http://www.maayboli.com/node/61762

वारका सिस्टिम जिथे पावूस पडतच नाही किंवा अगदी तुरळक पडतो अन पिण्याच्या पाण्याची वानवा असते अश्या ठिकाणी वापरले जाते जे हवेतील बाष्प शोषुन पाणी मिळवते त्यामुळे पावसावर ह्याचा विपरीत परिणाम संभवत नाही.

Pages