जल............ नीर, तोय, उदक...........जीवन

Submitted by सेन्साय on 21 April, 2017 - 01:11

पाणी हेच जीवन .... ही गोष्ट आपण शाळेत शिकलेली व पुढे आयुष्यात पदोपदी अनुभवलेली आहे. निसर्गाने प्रत्येक सजीवास जीवन जगण्यासाठी उचित प्रमाणात अन्न पाणी नेहमीच उपलब्ध ठेवलेले आहे. नैसर्गिक अन्न साखळीतील मानवी हस्तक्षेपाने आज आपल्याला पाणी टंचाई जाणवते.

पाणी वाचवा .. ह्याविषयी अनेक मते जाहीर व्यक्तव्यातून किंवा लिखित संदेशातून मांडून जनजागरण करायचे प्रयत्न चालू झाले. त्यात महत्वाचे व समान मुद्दे म्हणजे पाण्याचा वापर जपून करा - पाणी अडवा पाणी जिरवा - वृक्ष संवर्धन करा ... हेच दिसून येतात. सुजाण नागरिक निश्चितच पाणी फुकट घालवायचे ह्या उद्देशाने ते फुकट घालवत नाहीत तरी वापर करण्याच्या चुकीच्या पद्धतीमुळे ते काही प्रमाणात फुकट जातेच. हे झाले व्यक्तिगत पातळीवर, तर आता सामाजीक पातळीवरील प्रयत्न पहिले कि कित्येक संघटना दरवर्षी पावसाळ्यात वृक्षारोपणाचे कार्यक्रम हिरीरीने राबवताना दिसून येतात. काही जणांचे हे कार्य फोटोसेशनपुरताच मर्यादित राहत असले तरी बहुतांशी संस्था खरोखरच तळमळीने हे कार्य करत असतात. तरीही ह्या प्रयत्नांतील झाडांचे जगण्याचे प्रमाण अनेक कारणांमुळे फारच कमी असते.

पण म्हणून काय आपण परिस्थितीपुढे हार मानायची का ?
नक्कीच नाही ... काळ आणि वेगाचे भान राखून उचित दिशेने प्रयास केले कि मार्ग निघतोच. त्यापैकी एक उदाहरण म्हणजे - वारका वॉटर तंत्रज्ञान
.
WARKA-WATER.jpg
.

इटालियन आर्किटेक असणारे अरतुरो विट्टोरी यांनी वारका वॉटर या संकल्पनेचा शोध लावला आहे. हवेतून पिण्याचे योग्य पाणी संकलित करण्याचे हे तंत्र आहे. चित्रात दर्शविल्याप्रमाणे वारका वॉटर टॉवर उभे करण्यात येतात. हे टॉवर पर्यावरण दृष्टय़ा टिकाऊ आणि जैविक विघटन होणारे आहे. वारका वॉटर ही एक उभी संरचना असते. त्याच्या आतल्या बाजूस विशिष्ट प्रकारचा कपडा लावण्यात आलेला असतो. जो हवेतून पिण्यायोग्य पाणी संकलित करतो. वारका वॉटर टॉवर उभं करणे अतिशय सोपे असून ते गावकरी स्वत: स्थानिक पातळीवर मिळणा-या साधनांपासून बनवू शकतात. विशेष म्हणजे त्याची निर्मिती आणि देखभाल करायला पैसे लागत नाहीत. या तंत्रांमुळे दररोज ५० ते १०० लिटर पिण्याचे पाणी संकलित होते, असा दावा करण्यात आला आहे

हे झाले पिण्याच्या पाण्यासाठी वापरू शकणारे तंत्रज्ञान, पण मग शेतीचे काय ? ह्यासाठी सुद्धा उपयोगात येते अतिशय कमी पाण्यावर चालणारी शेती पद्धती म्हणजेच हायड्रोपोनिक्स.
.
14084120403_3893004191_b.jpg

.
देशात अनेक ठिकाणी दुष्काळ आणि पूर, वादळांसारख्या नैसर्गिक आपत्तींमागे हवामानाची अनियमितता हे कारण असल्याने, ही संकटे रोखणे शक्य नसले, तरी त्याचा मुकाबला करणे मात्र शक्य असते. चाऱ्याविना पशुधन वाचवायचे कसे, हा प्रश्‍न सर्वत्र विचारला जात असताना काही शेतकरी मात्र नवीन वाट चोखाळत आहेत व आधुनिक तंत्रज्ञानाच्या सहाय्याने त्यास पुरेपूर यशसुद्धा मिळत आहे. या प्रकारात दोन किलो धान्या पासून १५/२० किलो हिरवा चारा निर्मिती होते. जो एका जनावरास एका दिवसासाठी पुरेसा असतो. यात जमीन अत्यल्प आणि पाणीही कमी लागते. उन्हाळ्यात कमी पाणी,कमी जमीन असलेले जे शेतकरी आहेत त्यांना सुद्धा आता दुधाळ जनावरे जोपासणे सोपे होऊ शकते.

खरे तर चीन, जपानसारख्या देशांत 1970 पासून हे तंत्रज्ञान वापरात आहे. हायड्रोपोनिक चारायंत्र (हायड्रोपोनिक फॉडर मशिन) म्हणून परिचित असलेले हे परदेशी बनावटीचे महागडे यंत्र विकत घेणे आपल्या इथल्या शेतकऱ्यांना मात्र परवडणारे नाही. ते भारतीय बनावटीनुसार उपलब्ध झाल्यास फायदेशीर होऊ शकते, असा विचार करून गेल्या काही वर्षापासून अनेक कृषी संस्था वेगवेगळे प्रयोग करीत आहेत ज्याचे फलित म्हणजे ही हायड्रोपोनिक चारा पद्धत.

हायड्रोपोनिक्‍स चाऱ्याचे फायदे -
1. चारा टंचाई परिस्थितीत हिरवा चारा निर्मितीचा चांगला पर्याय.
2. कमी जागेत, कमी पाण्यात, कमी कालावधीत, स्वस्तात हिरवा पौष्टिक चारानिर्मिती.
3. जनावरांना 90 टक्के चारा पचतो.
4. पशुखाद्याचा खर्च 40 टक्के कमी.
5. जनावरांच्या रोगप्रतिकारक शक्तीत वाढ.
6. दुधाच्या फॅटमध्ये वाढ. किमान अर्धा लिटरने दुधात वाढ.
7. जनावरांची प्रजनन क्षमता सक्षम होते.
8. जनावरांच्या शरीरात प्रथिने, खनिजे, जीवनसत्त्वाच्या उपलब्धतेत वाढ.
9. जमिनीवर चारा उत्पादन घेण्याच्या तुलनेत 5 ते 10 टक्के पाण्याची आवश्‍यकता आहे.
10. प्रथिने, जीवनसत्त्वे, अँटीऑक्‍सिडंट्‌स, फॉलिक ऍसिड, ओमेगा-3, स्निग्ध पदार्थ हरितद्रव्य मोठ्या प्रमाणात असतात

ह्याच पद्धतीद्वारे अनेक भाज्या फळे ह्यांचे सुद्धा भरघोस उत्पादन व्यावसायिक पातळीवर घेतले जाते.

.
hydroponics.jpg
.

वरील दोन्ही गोष्टी बहुतांशी ग्रामीण परिस्थितीमध्ये वापरली जाऊ शकणारी असल्याने शहरी वातावरणात चुकीच्या सवयीने जे पाणी फुकट जाते त्याचे काय ? ... ह्याला सुद्धा विज्ञानाने उत्तर शोधलेले आहेच. गेली अनेक वर्षे प्रचलित असलेले नाव म्हणजे rain water harvesting.
.
2641196cdb3c2188b4d12e8bba9c23bb.jpg

.
ह्याचा अनेक शहरात वापर सुरु झालेला असला तरी म्हणावा तसा देशभरात अजून सर्वत्र प्रचार न झाल्याने समाजाचा मुलभूत घटक म्हणून हा प्रकल्प घरोघरी राबवला जात नाही असेच चित्र सध्या दिसते , अर्थात हे चित्र लवकरात लवकर बदलणे हेच आपल्या हिताचे असेल. हा उपक्रम फक्त पावसाळ्यापुरताच मर्यादित असल्याने अजून एका शोधाचा इथे उल्लेख करावासा वाटतो ज्याचा वापर केल्यास फुकट जाणारे पाणी नक्कीच वाचवू शकतो. ही गोष्ट म्हणजे अनेक जणांना पर्वणीच आहे कारण स्वत:च्या मनाला समजत असूनही काहीवेळा अनवधानाने आपल्या हातून घरातील नळ उघडा राहून पाणी फुकट जाते त्याला आता नक्कीच आळा असू शकतो. Kitchen & Washbasin Tap Water Saving Aerator/Filter ह्या अनुषंगाने शोधले तर कित्येक मॉडेल आपल्याला उपलब्ध होतील. उदाहरणार्थ -
.
81TcOpOlfqL._SY355_.jpg

.
स्प्रिंकलर /फॉगर सारखे अतिशय सोपे तंत्र वापरून फक्त ओलाव्यापुरता आवश्यक पाणी वापरून बाजूने ओघळून जाणारे नळाचे पाणी वाचवत इथे पाण्याची अनेक पटीत बचत केली जाणे शक्य आहे हे दिसून येतेय. ह्या सारखी अजून काही उदाहरणे आपल्यास माहिती असतील तर प्रतिसादांमधून जाणून घायला सर्वांनाच आवडतील आणि त्याचा नक्कीच सर्व वाचकांना लाभ होईल.

ह्या सर्व प्रकारात सध्याच्या घडीस झोपडपट्टी किंवा कारखान्यांची पाणी चोरी वगैरे माध्यमातून होत असणारी पाण्याची नासाडी तूर्तास वगळली आहे कारण वरील उदाहरणांसारखे विज्ञाननिष्ठ उपकरण किंवा तंत्रज्ञान सध्यातरी माझ्या माहितीत ह्या प्रकारास आळा घालू शकेल असे नाही. ह्यासाठी फक्त समाज प्रबोधन हाच मार्ग आजतरी डोळ्यासमोर दिसतोय, पुढील काळात नक्कीच काहीतरी मार्ग निघेल अशी अपेक्षा धरायला हरकत नाही.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

फार सुंदर लेख.

तूम्ही वारका तंत्राबद्दल लिहिलेय त्याचे एक साधे स्वरुप दक्षिण अमेरिकेत वापरलेले ( एका माहितीपटात )
बघितले होते.
समुद्रालगत असणार्‍या एका कड्यावर मोठे गोणपाटासारखे एक कापड आडवे लावले होते. समुद्रावरुन
येणारे बाष्पयुक्त वारे या कापडातून जाताना त्यातले बाष्प मात्र या कापडात शोषले जाते, आणि
मग ते खालच्या बाजूला लावलेल्या पन्हळीतून गोळा केले जाते, अर्थात त्यासाठी तिथली थंड
हवा, मदत करत असणार.

सायकल सारखे एक साधे उपकरण वापरून, सांडपाणी स्वच्छ करण्याचे उपकरणही एका माहितीपटात
बघितले होते. अशी साधी, सोप्या तंत्रावर चालणारी उपकरणे हि काळाची गरज आहे.

कालच चिनी चॅनेलवर आणखी एक तंत्र दाखवल त्यात कमी जमीनीवर जास्त शेती करता येणे शक्य होते.
मला कितपत वर्णन करता येतेय ते बघतो.
आपल्याकडे पुर्वी जत्रेत लाकडी पाळणे असायचे तसे पण यातले पाळणे लांबट वाफ्याच्या स्वरुपात.
एका साध्या तंत्राने हे पाळणे आपल्या जत्रेतल्या पाळण्याप्रमाणेच गोल फिरवले जातात पण अत्यंत कमी
वेगाने. असे केल्याने प्रत्येक वाफ्याला उन मिळते ( आणि बहुदा जास्त वेळ उन्हात राहिल्याने होणारे
बाष्पीभवन वाचते ) माझ्या अंदाजाप्रमाणे पाचपट क्षेत्रफळ जास्तीचे मिळते या तंत्राने.

कुमारजी आणि दिनेशजी प्रतिसादाबद्दल धन्यवाद Happy

चीनी तंत्रज्ञानाची माहीती दिल्याबद्दल खुप खुप आभारी आहे. बहुतेक त्याला पर्माकल्चर म्हणतात. ही लिंक पाहुन तुम्ही कन्फर्म करू शकाल http://permaculturenews.org/2014/07/25/vertical-farming-singapores-solut...

वरती एक हायड्रोपोनिक्स चाऱ्यासंबधी फोटो दिलाय न पोस्ट मध्ये त्या ट्रे सिस्टिमला वर्टिकल फार्मिंग असेही म्हणतात आणि पर्मा कल्चर त्यातील अधिक प्रगत तंत्रज्ञान झाले.

हो, हो हेच ते.
पण ते खर्चिक असणार ना ? तसा काहिसा सूर होता त्या कार्यक्रमात.
या चॅनेलवर फार सुंदर कार्यक्रम दाखवतात. कलिंगडाचे वेलही असे उभे वाढवले होते.
प्रत्येक फळाला, जाळीचा आधार दिला होता. आणि ती वेगळी जात होती.
ओंजळभर आकार आणि त्यातही पांढरा भाग अगदीच कमी.
निवेदिकेने ते फळ हातानेच उकलले, कापायची गरज नव्हती.

खरे पाहता नैसर्गिक ऊर्जा स्त्रोत सोडून इतर कुठलीही पद्धत वापरायची ठरवली तर ती नेहमीच खर्चिक ठरते. एक गोष्ट मिळवत असताना माणूस दूसरे काहीतरी नेहमी गमावतो. म्हणून सायन्स कितीही प्रगत झाले तरी पंचमहाभूते नाही बनवु शकत. त्याला सबस्टिट्यूट शोधत सूर्यप्रकाशाऐवजी फारतर LED लाईट वापरून भाज्या पिकवतो.

कलिंगड़बद्दल खुप छान प्रयोग जपानमध्ये झाले आहेत ते म्हणजे त्याचा आकार चौकोनी ठेवण्याबाबत.एक एक कलिंगड़ 100 डॉलरला विकले जाते असे हां वीडियो सांगतो
http://www.youtube.com/watch?v=2JNSpMhJLvg&feature=youtube_gdata_player

छान माहितीपूर्ण लेख!
जगाचा सत्तर टक्के भाग पाण्याने व्यापलेला असला तरी पिण्यायोग्य आणि वापरायोग्य पाण्याचा तुटवडा वाढत्या लोकसंख्येसोबत वाढतच जाणार.. येत्या काळात हे उपाय फार मोठ्या प्रमाणावर राबवावे लागणार आहेत

खूप छान लेख . वाचायच्या आधी तेच ते नेहमीचे दात कोरून पोट भरण्याचे म्हणजे पाणी कंजूष पणे वापरण्याचे उपाय असतील असं वाटलं होतं पण खूप छान, नवीन , वेगळा विचार देणारी आणि उपयुक्त अशी माहिती मिळाली .

धन्यवाद ऋन्मेऽऽष Happy

{{ वाचायच्या आधी तेच ते नेहमीचे दात कोरून पोट भरण्याचे म्हणजे पाणी कंजूष पणे वापरण्याचे उपाय असतील असं वाटलं होतं..... }} - Lol धन्यवाद मनीमोहोर , शिर्षक एकदम घिसा पिटा होते हे लक्षात आणून दिल्याबद्दल Happy कुछ हटके ठेवायचा प्रयास करत जुने - पाणी हेच जीवन - हे बदलून आता नवीन ठेवलंय.

अरे हे शीर्षकबदलाचे नवीन फ्याड काय आले आहे माबोवर Happy
पाणी संबर्धनाचे ... आधुनिक / इनोवेटीव / अनकन्वेन्शल / हटके / अप्रचलित / नवनवीन ... वगैरे उपाय असे काहीसे आतला मजकूर समजेल आणि पुढे मागे शोधायला सोपे जाईल असे शीर्षक हवे ना या प्रकारच्या माहितीपर लेखांना...

समुद्रातील शेती.. ( मासे नव्हेत ) या क्षेत्रात काही नवीन होतेय का आपल्याकडे ?
भारतात तरी आपल्या आहारात नाहीत या वनस्पति.

सहज संदर्भ आठवला..
बायबल मधला जो प्रवास आहे ( आजच्या इथिओपिया पासून आजच्या जॉर्डन पर्यंत ) त्या ४० दिवसात,
त्या लोकांना अन्न पुरवण्यासाठी "देवा"ने एक उपकरण दिले होते. त्यातून "मायना" ( बहुतेक हेच नाव )
मिळवून त्या लोकांनी तो प्रवास पार पाडला. काय असावे ते उपकरण ?

मी बघितलेल्या एका माहितीपटानुसार ते शैवालच असावे.

सी वीडस (समुद्री शैवाल ) अनेक बाबतीत उपयुक्त आहे - आहारात , खते म्हणून तसेच फार्मा कंपनी साठी, वगैरे तर हे वापरले जातेच पण शेती मध्येही पाणी संवर्धनासाठी विशेष उपयोगी पडते. ह्याचा जाड थर मल्चिंग म्हणून कार्य करतो आणि इतर तण वाढू देत नाही. ट्रेस एलिमेंट , मिनरल्स भरपूर प्रमाणात असल्याने पिकांची वाढ छान होते. समुद्र जवळ असलेल्या मायबोलीकरांनी आपल्या बाल्कनी गार्डन / कुंड्यांमध्येही ह्याचा वापर करून बघायला हरकत नाही. https://www.facebook.com/ambadnyaYogesh.Joshi/posts/751618348310514

वारका तंत्रज्ञानाबद्दल मागे शोधले होते, तेव्हा ती केवळ एक संकल्पना आहे असे कळले, प्रत्यक्षात असे पाणी मिळवू शकणारे स्ट्रक्चर तयार झालेले नाही. याबाबतीत काही नवीन घडले असल्यास कळवावे.

सोबतच. पाणी साठवण्याचे एक नवीन तंत्र म्हणून super absorbent polymer for agriculture हे आले आहे. यात पॉलिमरचे छोटे बॉल्स पाणी शोषून घेतात व हे पाणी बराच काळ, सुमारे ८ वर्ष सांभाळून ठेवता येते. शेतीच्या पेरणीच्या वेळी बियांसोबत हे बॉल्स खतांसारखे सोडल्यास रुजण्यासाठीच्या पाण्याची गरज भरुन निघते. भरपूर पाऊस असतांना हे बॉल्स भिजवायचे, व नंतर दुष्काळात वापरायचे असा एक उपाय आहे.

14 मार्च 2015 मध्ये IIT पवईला ह्यबद्दल एक सेमीनार झाला. प्रत्यक्ष प्रोजेक्ट आफ्रिकन देशात यशस्वी रित्या राबवला जातोय. लिंक पहा.. https://googleweblight.com/i?u=https://africageographic.com/blog/warka-w...

वारका तंत्रज्ञान खरेच पाणी देत असेल तर लगोलग उभारणी करुन दुष्काळी भागात आताच छावण्या उभारता येतील काय? त्याबद्दल व्यवस्थित माहिती, खर्चापासून सामानापर्यंत सर्व माहिती कुठे मिळेल? भारतात कोणी याबद्दल काम केले आहे काय?

सुंदर लेख !
दिनेशदा आणि नानाकळा, तुमचे प्रतिसाद पण आवडले. वारकाची अधिकृत वेबसाईट फारच माहितीपूर्ण आहे.

खूप छान आणि माहितीपूर्ण लेख.

घरगुती नित्य वापरात सुद्धा छोटे छोटे बदल आपल्या सवयीत केले तर पाणी वाचवण्याच्या कामात खूप मोठा हातभार लागतो. आमच्याकडे सकाळी कुकर लावताना तांदूळ धुतल्यावर येणारे पाणी फेकून न देता तसेच दुसऱ्या एका पातेल्यात ठेवतो आणि नंतर ते बाल्कनीतील कुंड्यांना वापरतो. हीच गोष्ट डाळी कडधान्ये धुताना आम्ही करतो. डाळी शिजवलेले पाणी तर सत्वयुक्त असतेच मग असे आधीचे पाणी का बरे फुकट घालावा नं !

छान लिन्क्स आल्यात या ओघात.
नानाकळा, आजकाल बाजारात शोभेच्या झाडांसाठी पारदर्शक बॉल्स विकायला असतात. पाण्यात भिजले
कि त्यांचा आकार वाढतो. तेच का हे ?

NeoTop’s TopUp Ball System provides a cover that “recycles” water in white spheres that keep it in the reservoir instead of evaporating to the heavens. The balls, open on one side, float on the surface of a reservoir, half-filled with water, with the other half floating above the water’s surface. Since the balls are white — which absorbs light — water that enters the spheres evaporates inside the balls, but condenses immediately and drops back down into the reservoir. Holes on the side cause a cooling effect, keeping the lower part of the sphere, where the water is, cooler than the top part. http://www.timesofisrael.com/an-israeli-white-ball-solution-to-water-str... नैसर्गिक स्त्रोतांचे बाष्पीभवनाने पाणी आटू नये म्हणून इस्रायेल देशात सध्या हे तंत्र विकसित केलेय.

नानाकळा ह्याबाबत बोलले असावेत. http://www.socochem.com/super-absorbent-polymer-for-plants.html
Super-Absorbent-Polymer-For-Plants.png

आभार नानाकळा. .. आपल्याकडे खर्चिक होईल ना हे ! भारतात हा
पैश्याचा विचार कायम करायलाच लागणार ना !

स्वित्झर्लंड मधे मी एक बघितले होते, दोन पातळ्यावर सरोवरे होती आणि तिथे
वरच्या पातळीवरुन खाली पाणी सोडून वीज तयार केली जात होती. पण वीजेची
मागणी जास्त असली कि, खालच्या पातळीवरचे पाणी परत पंपाने वर नेत आणि
परत वीज निर्माण करत, आणि ती वीज मात्र चढ्या भावाने विकत असत.
(जेणेकरून तो पाणी वर चढवण्याचा खर्च भरुन येईल. )

तिथे नदीच्या पात्रातील वाहत्या पाण्याचा उपयोग करून पूर्वापार कापड गिरण्या
चालवल्या जातात. आता तो उद्योगच तिथे संपला आहे तरी त्या गिरण्या अजून आहेत.

Pages