लोगन - एक्स मॅन

Submitted by दीपस्त on 28 March, 2017 - 04:25

एक्स - मॅन या सुपर हिरोंचे फॅन असणार्‍यांना "लोगन" चित्रपटाची फार उत्सुकता होती. ह्युज जॅकमॅन याचा "वोल्वरीन" या सुपरहिरोवर स्वतंत्र श्रेणीतील ३रा चित्रपट आहे. प्रेक्षकांना अगदी सुरुवाती पासून म्हणजे एक्स मॅन वर आधारीत पहिल्या चित्रपटापासून "वोल्वरिन" या कॅरेक्टरवर प्रेम बसलेले. दर चित्रपटासोबत ते वाढत गेले. हे प्रेम पाहून निर्मात्यांनी त्याच्यावर स्वतंत्र चित्रपट बनवण्याचे ठरवले २००९ साली X-Men Origins: Wolverine या नावाने तो रिलिज झाला. पुर्ण एक्स मॅन श्रेणीतील सर्व सुपरहिरोंमधून फक्त त्याच्यावरच चित्रपट बनला यावरून त्या कॅरेक्टरची लोकप्रियता दिसून येते. काही वर्षांनी The Wolverine हा त्या स्वतंत्र श्रेणीतील २रा भाग म्हणून समोर आला. त्यानंतर आता "लोगन" ३रा आणि शेवटचा भाग म्हणून आला आहे.

वोल्वरिन हे कॅरेक्टरच फार विचित्र होते. जखमा न होणारा, हातातून सुर्‍यासारखी पाती बाहेर येणारा, ऑलमोस्ट अमर असणारा, कुणाच्याही ताब्यात न येणारा, स्वतःच्या मर्जीचा मालक, कुठे ही कुणासमोर ही हार न पत्करणारा अशा विविध विशेषणे या "वोल्वरिन" कॅरेक्टरची होती. दाढी वाढलेला बिन मिशांचा चेहरा, केस दोन्ही बाजूंनी उभे असलेले. गबाळ अवतार, टापटीप नावाचा शब्दच डोक्याच्या डिक्शनरीत नसलेला असा हा "लोगन" "ह्युज जॅकमॅन" ने अक्षरश: जिवंत केलेला. इतका की जसे आपल्याकडे लोक "जय संतोषी माता" नामक चित्रपटातील अभिनेत्रीच्या पाया प्रत्यक्षात पडत होते तसे ह्युज ला बघितल्यावर लोक त्याचे हात बघत होते. कधी जगप्रसिध्द लखलखती धारदार पाती बाहेर येतील याची आशा घेऊन त्याच्या बोटांकडे लक्ष देत. पडद्यावर तो कुणाला भिडला म्हणजे समोरच्याची शामत आली हे डोक्यात फिट्ट बसले. मग त्याच्या समोर कोणी कितीही बलिष्ठ खलनायक का येईना. आपला "लोगन" पुरुन उरतोच. फक्त मॅग्निटो समोर बिचार्‍याचे काही चालत नव्हते. पण X-Men: Days of Future Past मधे लोगन भुतकाळात गेला होता तिथे त्याच्या अंगात लोखंड नव्हते. तेव्हा तरुण मॅग्निटो ला भारी पडलेला. एक सच्चा वॉल्वरिन प्रेमी म्हणून ते बघायला मजा आलेली.

चित्रपटाची सुरुवातीला स्पष्ट होते की लोगन आता उतारवयात आला आहे. वाढत्या वयासोबत त्याचे शरीर अशक्त होऊ लागले आहे.
सरकार सगळ्या म्युटन्ट लोकांना एक तर मारून टाकत आहे नाहीतर त्यांच्यात औषधे देऊन त्यांची शक्ती संपवत आहे. स्पेशल फोर्स अशा लोकांच्या मागे सतत लागली आहे. त्यांच्या लिस्टवर "प्रोफेसर" एक नंबरवर आहे. लोगन त्यांना घेऊन शहरांपासून लांब एका गावात साथीदाराच्या मदतीने लपवून ठेवले आहे. प्रोफेसर आता फार म्हातारे झाले. त्यांना त्याच्या मानसिक शक्ती ताब्यात ठेवता येत नाही. स्वतःच्या वृध्द वडिलांची जशी सेवा केली जाते त्या प्रकारे लोगन आपले कार्य करत आहे. एक दिवस एक बाई त्याच्या जवळ मदत मागायला येते.तिच्या मते स्पेशल फोर्सेस ने म्युटनचे जेनेटेक्स काही मुलांमधे वापरून त्यांना प्रशिक्षित केले आहे. परंतू ती मुलं हाताबाहेर जाऊ लागल्याने त्यांना मारण्याचा प्लॅन करतात. ती बाई त्यातील काही मुलांना सोडवते आणि एका गुप्त ठिकाणी सुरक्षित पाठवते तिच्या जवळ लौरा नामक एक मुलगी असते जीची शक्ती हुबेहूब लोगन सारखी आहे. तिला त्या ठिकाणी पोहचवण्याची जवाबदारी लोगन पैशाच्या मोबदल्यात घेतो. लौराच्या मागे स्पेशल फोर्स लागलेली असते. लौरा आणि स्पेशल फोर्स यांच्यामधे लोगन उभा राहतो. तो त्या मुलीला त्या इच्छित जागी पोहचवतो का? तिच्यात लोगन सारखी शक्ती कशी आली? प्रोफेसर यांना सांभाळून लोगन कसे हे काम करतो.? इ. साठी चित्रपट पहायला हवा.

लोगन याचे कॅरेक्टर या चित्रपटात नेहमी पेक्षा वेगळे आहे. एक थकलेला, खचलेला वयस्कर माणूस जो सतत आश्रयासाठी भटकत असतो. त्याचे आणि प्रोफेसरला लागणार्‍या औषधांसाठी पैसे मिळवणे हा एकमेव उद्देश लोगनचा राहिल आहे. त्याच्या जवळची माणसे मरण पावली आहे. एक प्रोफेसर आहे म्हणून लोगन आहे. प्रतिकार करण्याची इच्छा आहे पण तितकी शक्ती आता अंगात राहिली नाही. जखम लवकर भरत नाही त्यात इन्फेक्शन होत आहे. त्यामुळे स्वभाव फार चिडचिडा झाला आहे. शरीर लवकर थकल्याने अगदी लहान मुल पण काहीवेळेस भारी पडतात. खलनायक म्हणून जे आहे त्यांच्या समोर तर अगदीच नाईलाज होतो. पण प्रतिकार मात्र शेवट पर्यंत सोडत नाही. असा लोगन पडद्यावर बघणे फार त्रासदायक आहे. कोणे एकेकाळी लोगनच्या नुसत्या ओरडण्याने समोरचा थरथर कापत होता. आता मात्र तसे काही घडत नाही. त्याला पडद्यावर मार खाताना बघवत नाही. आपण ऑटोमॅटिक तो मार खात असताना इकडे तिकडे बघू लागतो. ह्युजने वयस्कर माणसाचा अभिनय फार समरसतेने केला आहे. असे वाटते की त्याने स्वतः त्याच्या भविष्यातील ह्युज कसा असेल याचा अचूक अंदाज घेतला आहे.

बाकी चित्रपटात असणारे लोकांवर जास्त फोकस नाही आहे. लौरा साकारणारी Dafne Keen हिचा हा पहिला चित्रपट असुन देखील भुमिका चांगली केली आहे. भविष्यातील एक्स मॅन चित्रपटात वॉल्वरिन आता पुरुषाकडून स्त्रीकडे स्थलांतरीत केले जाईल असे वाटते.
लोगन आणि प्रोफेसर एक्स यांचा प्रवास इथे संपला. आता पुढे कुठल्याही चित्रपटात ह्युज हा वॉल्वरिन म्हणून दिसणार नाही याची चुटपूट कायम राहणार.

LONG LIVE WOLVERINE..!!

शब्दखुणा: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

छान लिहिलंय !
असे अमानवी शक्ती असलेले पात्र, हतबल झालेले मला बघवत नाही. अर्थात ही माझी आवड !

हुज जॅकमनची दाढी आपल्याला लै आवडते,त्यात मिश्या छाटून ठेवलेली शार्प दाढी त्याला सुट होते.मी ही सध्या दाढी ठेवलेली आहे ,मिश्या कापुन अलग लुक द्यायचा होता .पण माझा अखलाख करतील असे वातावरण दद्दाच्या कृपेने आहे.म्हणून विचार झटकला.असो परिक्षण आवडले दिपस्त.

खुपच सुंदर चित्रपट. शेवटी सुपर हिरो असले म्हणून काय झाले, त्यांनाही मानवी भावभावना आणि दु:ख आहेतच हे अगदी चांगल्या रितीने दाखवले आहे. त्यांचेही प्रॉब्लेम्स असू शकतात, त्यांनाही नेहमीसारखे नाही पण कुटुंब असू शकते, त्यांनाही काही वेळेस हा संघर्ष कशाला चालू आहे - सोडून द्यावे सगळे असे वाटू शकते हे संयतपणे दाखवतो हा चित्रपट. नेहमी सारखे नुसते अमानवीय मारामारी, चित्रविचित्र पोषाख वगैरे न दाखवता या जगातील सुपरहिरो खरोखर कसे असतील ते दाखवणारा वेगळा चित्रपट आहे. अर्थात तुम्ही अ‍ॅव्हेंजर्स वगैरे गल्लाभरू चित्रपटांची अपेक्षा घेऊन जाणार असाल तर नक्कीच आवडणार नाही, पण तुम्हाला ड्रामा कॅटेगोरी मधले चित्रपट आवडत असतील तर नक्कीच आवडेल.

एक्स मेन आहे.

माझा प्रतिसाद दुसर्‍या चित्रपटाच्या धाग्यावरून

लोगन सॉलिड आवडला. स्टोरी मध्ये काही नाविन्यं नाही मागच्या 'अंडरवर्ल्ड' च्या स्टोरी सारखीच आहे साधारणतः , पण जॅकमन ला बघून पूर्ण सिनेमा फार मस्तं वाटत रहाते. अ‍ॅक्शन पेक्षा ईमोशन्स एनकॅश करणारा पहिलाच एक्स मेन सिरिज चा सिनेमा म्हणावा लागेल. आताश्या एका हाताचे तीन पैकी एक ब्लेड बाहेर येत नाही आणि तो ते ओढून काढतो ते पाहून खरंच फार भरून आले.
पण खूप मुलं न दाखवता एकाच मुली भोवती सिनेमा ठेवला असता तर अजून चांगला वाटला असता.

नेहमी सारखे नुसते अमानवीय मारामारी, चित्रविचित्र पोषाख वगैरे न दाखवता या जगातील सुपरहिरो खरोखर कसे असतील ते दाखवणारा वेगळा चित्रपट आहे. अर्थात तुम्ही अ‍ॅव्हेंजर्स वगैरे गल्लाभरू चित्रपटांची अपेक्षा घेऊन जाणार असाल तर नक्कीच आवडणार नाही, पण तुम्हाला ड्रामा कॅटेगोरी मधले चित्रपट आवडत असतील तर नक्कीच आवडेल. >>> धनि तोच तर मार्वल आणि डीसी च्या सुपरहीरो ट्रीटमेंट मधला बेसिक फरक आहे. रिप्स/डेम्स सारखी अमेरिका ह्या दोन कॉमिक्स मध्ये विभागली नसली तरे दोघांचा आपापला मोठा फॅन बेस आहे. डीसीच्या च्या सुपरहीरोंचा ईक्यु जरा हाय आहे आणि शेड्स अगदीच ब्लॅक अँड व्हाईट नसतात त्यांच्या (शेड्स वाले मि ग्रे. जरा वेगळ्या पावरवाले सुपरहीरो आहेत ह्याची नोंद घावी Wink ) . मध्येच मार्वलचा एखादा हल्क (एरिक बाना) किंवा लोगन (नवा) येतो ज्याला डीसी सारखी ट्रीटमेंट असते. नाही तर मार्वल आपला अ‍ॅवेंजर्स, स्पायडर मॅन , आयर्न मॅन, ई. ई. फँटसी टाईप च असतो. नोलन सारख्यांनी डीसीच्या सुपर हीरोज ना नवे लाईफ दिले हे नक्की.

बर्ग >> शेड्स वाले मि ग्रे >> Lol

पण डिसी आणि मार्वल मधला फरक बरोबर आहे. मला स्वतःला तरी ते जेनेरीक सुपर्हिरो पिक्चर आता बोर झाले. पण तरिही मस्त व्हिज्युअल्स आणि वियर्ड सेटींग्स मुळे गार्डियन्स खुप आवडलेला आणि आता दुसर्‍याचीही उत्सुकता आहे. स्पाईडी परत येतोय पण तो परत जेनेरिक असेल असे वाटते आहे. मला वाटतं सॅम राईमी ने टॉबी मॅग्वायर बरोबर स्पाईडीला थोडा इमोशनल करण्याचा प्रयत्न केला होता पण स्पाईडी ३ नंतर तो बंदच झाला.

मार्वल ने लोगन सारखे अजून प्रयोग केले तर ते पुढे टिकतील नाही तर प्रेक्षकांना काही वेळाने त्याच त्याच चमचमाटीचा ही कंटाळा येऊ शकतो.

मार्वल ने लोगन सारखे अजून प्रयोग केले तर ते पुढे टिकतील नाही तर प्रेक्षकांना काही वेळाने त्याच त्याच चमचमाटीचा ही कंटाळा येऊ शकतो. >> वंडर वुमन आणि जस्टीस लीगच्या ट्रेलर वरून वाटते की डीसी सुपर हीरोच मार्वलच्या वाटेने निघाले आहेत... आता बोल Lol

आवडला मला तरी हा पिच्चर...
ते ह्युज नाही ह्यु आहे...माझापन पहिले घोळ व्हायचा..
तेवढ लौराचं लॉरा कराल का ?

मलातरी डिसीपेक्षा मार्व्हल जास्त आवडतात..असो..

वॉल्वरिन हे कॅरेक्टर अगदी व्यवस्थित संपविले आहे पण आता ते चाप्टर संपवलेलच छान राहिल...त्याच्या जागी प्लास्टीक सर्जरी करुन दुसरा चेहरा समोर आलेला मलातरी बघवणार नाही ... आफ्टरऑल ह्यु = लोगन हे फिक्स्ड इक्वेशन आहे..

लोगन आणि प्रोफेसर एक्स यांचा प्रवास इथे संपला. आता पुढे कुठल्याही चित्रपटात ह्युज हा वॉल्वरिन म्हणून दिसणार नाही याची चुटपूट कायम राहणार.>>>>> ह्यासाठीच मला हा चित्रपट पाहयाचा आहे पण आनि नाही पण Sad
ह्युज जॅकमन ने साकारलेला हा वॉल्वरिन पुन्हा कोनीही करु शकणार नाही.काय डेटीकेशन आहे त्याचे ह्या रोलसाठी.

धन्यवाद..
मुळात भावनाप्रधान कॉमिक चित्रपट कमी आहे. संपुर्ण जीवनाचे सार दुख एक दोन प्रसंगात सांगून टाकण्याची पद्धत हॉलिवूड मधे आहे. नाही तर बॉलिवूड मधे संपुर्ण प्रसंग बरोबर एक दोन गाणी सुध्दा घुसडतात.

छान परीक्षण.

धनि, हायझेनबर्ग ची कॉमेंटही मस्त.

भविष्यातील एक्स मॅन चित्रपटात वॉल्वरिन आता पुरुषाकडून स्त्रीकडे स्थलांतरीत केले जाईल असे वाटते. >> छान !

मार्वल ने लोगन सारखे अजून प्रयोग केले तर ते पुढे टिकतील नाही तर प्रेक्षकांना काही वेळाने त्याच त्याच चमचमाटीचा ही कंटाळा येऊ शकतो. >> वंडर वुमन आणि जस्टीस लीगच्या ट्रेलर वरून वाटते की डीसी सुपर हीरोच मार्वलच्या वाटेने निघाले आहेत... आता बोल

हायझेनबर्ग , डीसी कॉमिक्स (चित्रपटांमध्येतरी, त्यांची कॉमिक्स चांगली असतात) पूर्णपणे फसणार आहे कारण ते फक्त मार्व्हलला तोड देण्याच्या उद्देशानेच चित्रपट बनवत आहे आणि त्यांना प्रोमोशन ही करता येत नाही, चित्रपट येण्याच्या एक वर्षाआधीच पूर्ण ट्रेलर देतात, सगळी कथा कळून जाते, त्यांच्या चित्रपट काढण्यामध्ये घाई खुप दिसते. तुम्ही जर त्यांचे फिल्म शेड्युल पहिले तर तुम्हाला कळेल कि त्यांचे एकापाठोपाठ एक असे डिरेक्टर्स फ्लॅश, बॅटमॅन चित्रपट सोडून जात आहेत.
मार्व्हलचे वेगळे आहे, त्यांनी पहिल्यापासूनच विचार करून कॉम्पिटेशन साठी नाही तर प्रेक्षकांसाठीच MCU चित्रपटांची निर्मिती केली, त्याच चित्रपटांशी संबंधित जगात दाखवण्यासाठी नेटफ्लिक्स वरून डेयरडेव्हील, लूक केज, जेसिका जोन्स, आयर्न फिस्ट आणि abc चॅनेल वरून एजन्ट्स ऑफ शिल्ड ही प्रदर्शित केले. आता बोला. Happy