लेट नाईट online

Submitted by सेन्साय on 16 March, 2017 - 10:05

व्हाट्स अप असो किंवा फेसबुक ....
कुठल्याही सोशल मीडियावर जेवहा वापरकर्ता काही अपलोड करतो,
तेव्हा ते पोस्टच्या टायमिंगसहित इतरांना दिसत असते.
हम्म ! बरं मग ?
त्यात काय एवढे विशेष.

अगदी बरोबर.
हि फक्त तंत्रज्ञानाने केलेली सोय असते.

पण हाच मुद्दा प्रश्नचिन्ह बनतो जेव्हा एखादी स्त्री किंवा मुलगी लेट नाईट म्हणजे,
रात्री १२ नंतर Online राहत असेल तर..... आला कां प्रश्न !

ती एवढया रात्री online का राहते ?...........
मग हिला हिच्या घरातले कोणी काही म्हणत नाही का ?......
हिच्या घरामधे काही problem असेल का?......
तिचा नवरा तिला काही म्हणत नसेल का?......
की हिचं नवऱ्याशी जमतंच नसेल,
कि आणखी काही problem असतील.....
बस्स ... प्रश्न आणि प्रश्नच ...

एखादी स्त्री जर प्रेम कविता लिहित असेल तर .......
अरे बापरे ....
तिचं कोणावर प्रेम आहे का ? .......
तिला कोणी आवडतो का ? .......
किंवा तिचा कोणी प्रियकर आहे का?.....
असेल तर लग्नाआधीचा आहे कि लग्नानंतरचा ?......
पुन्हा एकदा फक्त प्रश्न आणि प्रश्नच !!

एखादी स्त्री जर फेसबुकवर आपले विविध फोटो टाकत असेल तर ........
ही असे स्वतःचे फोट टाकत का असते ?
हिला काय दाखवायचं असतं ?......
हिचं हे वय आहे का ?.....
ही अशी का वागते ?......

वगैरे वगैरे ....
प्रश्नांची न संपणारी मालिकाच जणू.

पण ह्या अश्या बऱ्याच लोकांकडून एक विचार का नाही केला जात ?
जरी ती एक स्त्री असली तरी ती सुद्धा माणूसच आहे.....
तिला तिच्या मर्जी प्रमाणे जगण्याचा संपुर्ण अधिकार आहे......
तिला ज्या ज्या गोष्टी करण्यात आनंद मिळतो त्या त्या गोष्टी ती करते .........
आणि तिच्या अश्या वागण्यामागे काही कारण असतचं असं नाही ........

लास्ट सीन लपवण्याचे मार्ग तर निश्चितच आहेत व्हाटस अपसाठी ...
पण नक्की कसल्या भीतीने ह्याची गरज लागते.
काय मग ? आला का पुन्हा प्रश्न ?

--------------------------------------

वरील लिखाण फेसबुकवर वाचनात आले आणि हे असे प्रश्न का बरे उमटतात अजूनही आजच्या समाजात म्हणून खरेच खुप वाईटसुद्धा वाटले. आणि जर हे प्रश्न खरोखर जास्त जणांच्या मनात येत असतील तर आपण नक्की कुठल्या दिशेने प्रगती केली !
कारण माझ्या मते ही वैचारिक अधोगतीच झाली की...
तुमच्या सर्वांचे ह्या अनुषंगाने मत विचारावेसे वाटले
.

.
WhatsApp-Last-Seen-Settings.jpg

Group content visibility: 
Public - accessible to all site users

तुम्ही कोण एक्स्प्लेनेशन मागणारे ?

मा प्रशासक
सदर व्यक्तीने प्रोफाईलमधे वापरलेला फोटो हा योगेश जोशी या ब्लॉगरचा आहे. तेच हे आहेत किंवा कसे कल्पना नाही. इथे चिकटवलेला मजकूर त्यांचा स्वतःचा नाही. त्याबद्दल विचारले तर उडवाउडवीची उत्तरे देत आहेत. हा मजकूर फेसबुक वर अन्य नावाने पोस्ट केला आहे. त्या प्रोफाईलचे नाव योगेश जोशी नक्कीच नाही.

हा काय प्रकार आहे ? आणि अशी संशयास्पद व्यक्ती इतरांना वाटेल त्या आयडीशी का जोडतेय ? मायबोलीच्या वावरासंबंधीच्या नियमात हे बसते किंवा नाही याची कल्पना नाही. आपण घ्याल तो निर्णय योग्यच असेल.

मजकूर फेसबुक वर अन्य नावाने पोस्ट केला आहे.>>>> काहीतरी नवीन बोला की हरिनामे.

मी हे आधीच लिहिलय आणि त्या विषयी चर्चा करायला हां धागा काढला तर मायबोलीच्या नियमात तो बसत नाही का ? मार्गदर्शन करावे

आणि फोटो लावण्यासम्बंधी काही प्रोटोकॉल आहे का ?
अजुन एक प्रश्न मनात आला की हरिनामे ह्यांना नक्की कसला राग आलाय .. का तेच चव्हाण साहेब आहेत ? मग असे लेडीज प्रोफाइल च्या नावाने जे काही जेंट्स id ईथे वावारत आहेत त्यांना आपण फेक प्रोफाइल म्हणून घोषित करू शकतो का ?

अंबज्ञ तुम्ही आधी ते सिद्ध करा. चोर ते चोर वर शिरजोर असा प्रकार आहे तुमच्या बाबतीत. आणि तुम्हाला घोषणाच करायच्या असतील तर खुषाल करा.
तुम्हाला एकदम भलत्याच आयडीच्या नावे उल्लेख करण्याची गरज का पडली ? कि चोरी उघडकीला आली म्हणून ? तुम्हाला काय करायचे ते करा. अ‍ॅडमिन समर्थ आहेत.

असो.
जे सद्गुरुंनी करायला शिकवले ते भक्त करणारच. मी कोण रोखणार त्यांना ?

खरे पहायचे तर श्री ऋन्मेश ह्यांनी सपना हरिनामे ह्यांच्या प्रश्नाला एक वेगळा धागा काढून त्याचे उत्तर देण्याचे घोषित केले तेथे पुनः पुनः आपले म्हणणे वेगवेगळ्या शब्दात सतत मांडत राहून हरिनामे नक्की काय साधत आहेत ?

माझ्या मते तर हां धागा तिथे संपला आणि ऑलरेडी सर्वांच्या विविध मतप्रदर्शनानुसार बऱ्यापैकी चर्चा सुद्धा झालीय. (माझ्यासारख्या नवोदिताला हाफ सेंचुरी म्हणजे खुप झाली की Happy )आणि ह्यांनी सुरुवातीला आरोप केलेत की तुम्हीच ऋ का म्हणून ?
काही न काही कारण काढून एकतर सपना हरिनामे उगीच चर्चित राहु इच्छितात किंवा माझ्या सारख्या नवीन माबो च्या सदस्याना त्यांच्या धाग्यावर टोमणे मारुन इरिटेट करण्याचा सतत प्रयास करतोय हे त्यांच्या उडी मारताय का इत्यादी भाषा वापरण्यावरुन लक्षात येते

पण त्यांचा खरा उद्देश् आता स्पष्ट झालाय की कोणी जर अमुक असा ठराविक सदगुरू भक्तांचा प्रोफाइल दिसला की मुद्दाम चिथवणुकखोर वागणूक करून वाद होईल असे प्रसंग निर्माण करायचे

पण मला खेदाने बोलवेसे वाटते की त्यांचा हां प्रयत्न निदान इकडे माझ्याबाबत तरी अपयशी होईल कारण मी एकच गोष्ट मानतो
"तुटे वाद संवाद तो हितकारी"
आणि ह्याप्रमाणेच माझे आतापर्यंतचे माबो वरील सर्वत्र वागणे आहे आणि यापुढेही ते तसे राहील ह्याबाबत निश्चिन्त आहे मी कारण आम्ही सर्व तुमच्या साठीच ख़ास येवू घातलेल्या नवीन धाग्याच्या प्रतीक्षेत आहोत आणि ह्या इकडच्या धाग्यावर पुरेशी चर्चा झाल्याने उगीच अनावश्यक कॉमेंटनी सेंचुरी गाठण्यात काय अर्थ आहे

कमालच झाली. आता जर सद्गुरुंनी शिकवल्याप्रमाणे भक्त वागत असतील तर त्यात चुकीचे काय आहे ?
भक्तांचे वर्तन , गुरूस भूषण
यात चिथावणीखोर काय आहे ?तुमचे वर्तन सत असेल , चिथावणीखोर नसेल तर खेद वाटण्याचे कारण काय ?
जर भक्तांच्या वर्तनाने गुरूस बट्टा लागत असेल तर मग भक्ताचे मन खात राहणार.

जो प्रतिसाद तुम्हाला उद्देशून दिलेला नव्हता तिथे येऊन तुम्ही जो प्रतिसाद दिलेला आहे त्यामागे कठोर तपश्चर्या आणि गुरूची शिकवण असणार यात नवल ते काय ? नाही का ?

बाकि तुमचा जो कांगावा चालू आहे त्याची शिकक्ण कुठून मिळाली असे आता विचारत नाही. नाही तर पुन्हा तुम्हाला राग येईल.
धागा चोरीचा, मायबोलीच्या धोरणात न बसणारा. तरीही तुम्हाला सांभाळून घेतलेच आहे कि इथे सर्वांनी. तरी देखील छान भाषा वापरताय.
कृपा आहे बाकी तुमच्यावर खरोखर

अंबज्ञजी
ढोंगी बाबा, महाराज , साधू याबद्दल पण एक मोहीम घ्या ना हाती. अशांना ढोंगी घोषित करा. मी वाट पाहीन तुमच्या अशा धाग्याची.

आता वैज्ञनिकच म्हणत आहेत की, आरोग्य चांगलं राहावं असं वाटत असेल तर, हे जैविक घड्याळ बिघडू द्यायचं नाही. त्यासाठी एकच करायचं. ते म्हणजे, संध्याकाळीच - किंवा रात्री लवकर-जेवायचं, रात्री अंधार झालेला असेल तेव्हा सरळ अंथरुणात शिरायचं, आणि गुडूप झोपी जायचं. बाहेर उजाडतं, तेव्हा मस्तपैकी उठायचं (आळोखे-पिळोखे देत म्हणा हवं तर!) आणि दिवसभरातल्या जेवणा -खाण्याच्या वेळा चुकवायच्या नाहीत. झोपायच्या कमीतकमी एक तास आधी प्रखर प्रकाश म्हणजे टी. व्हि, संगणक, मोबाईल इत्यादी गोष्टी पूर्णपणे टाळायच्या. हल्लीच्या ‘आधुनिक युगात’ हे जरी अवघड वाटलं, तरी अशक्य नाही. http://www.maayboli.com/node/62105

हो खुप छान
मानसाने विचार बदलले पाहिजेत
हि आता काऴाची गरज आहे

Pages