लेट नाईट online

Submitted by सेन्साय on 16 March, 2017 - 10:05

व्हाट्स अप असो किंवा फेसबुक ....
कुठल्याही सोशल मीडियावर जेवहा वापरकर्ता काही अपलोड करतो,
तेव्हा ते पोस्टच्या टायमिंगसहित इतरांना दिसत असते.
हम्म ! बरं मग ?
त्यात काय एवढे विशेष.

अगदी बरोबर.
हि फक्त तंत्रज्ञानाने केलेली सोय असते.

पण हाच मुद्दा प्रश्नचिन्ह बनतो जेव्हा एखादी स्त्री किंवा मुलगी लेट नाईट म्हणजे,
रात्री १२ नंतर Online राहत असेल तर..... आला कां प्रश्न !

ती एवढया रात्री online का राहते ?...........
मग हिला हिच्या घरातले कोणी काही म्हणत नाही का ?......
हिच्या घरामधे काही problem असेल का?......
तिचा नवरा तिला काही म्हणत नसेल का?......
की हिचं नवऱ्याशी जमतंच नसेल,
कि आणखी काही problem असतील.....
बस्स ... प्रश्न आणि प्रश्नच ...

एखादी स्त्री जर प्रेम कविता लिहित असेल तर .......
अरे बापरे ....
तिचं कोणावर प्रेम आहे का ? .......
तिला कोणी आवडतो का ? .......
किंवा तिचा कोणी प्रियकर आहे का?.....
असेल तर लग्नाआधीचा आहे कि लग्नानंतरचा ?......
पुन्हा एकदा फक्त प्रश्न आणि प्रश्नच !!

एखादी स्त्री जर फेसबुकवर आपले विविध फोटो टाकत असेल तर ........
ही असे स्वतःचे फोट टाकत का असते ?
हिला काय दाखवायचं असतं ?......
हिचं हे वय आहे का ?.....
ही अशी का वागते ?......

वगैरे वगैरे ....
प्रश्नांची न संपणारी मालिकाच जणू.

पण ह्या अश्या बऱ्याच लोकांकडून एक विचार का नाही केला जात ?
जरी ती एक स्त्री असली तरी ती सुद्धा माणूसच आहे.....
तिला तिच्या मर्जी प्रमाणे जगण्याचा संपुर्ण अधिकार आहे......
तिला ज्या ज्या गोष्टी करण्यात आनंद मिळतो त्या त्या गोष्टी ती करते .........
आणि तिच्या अश्या वागण्यामागे काही कारण असतचं असं नाही ........

लास्ट सीन लपवण्याचे मार्ग तर निश्चितच आहेत व्हाटस अपसाठी ...
पण नक्की कसल्या भीतीने ह्याची गरज लागते.
काय मग ? आला का पुन्हा प्रश्न ?

--------------------------------------

वरील लिखाण फेसबुकवर वाचनात आले आणि हे असे प्रश्न का बरे उमटतात अजूनही आजच्या समाजात म्हणून खरेच खुप वाईटसुद्धा वाटले. आणि जर हे प्रश्न खरोखर जास्त जणांच्या मनात येत असतील तर आपण नक्की कुठल्या दिशेने प्रगती केली !
कारण माझ्या मते ही वैचारिक अधोगतीच झाली की...
तुमच्या सर्वांचे ह्या अनुषंगाने मत विचारावेसे वाटले
.

.
WhatsApp-Last-Seen-Settings.jpg

Group content visibility: 
Public - accessible to all site users

रात्रीच्या अंधारात कृष्णकृत्येच केली जातात या समजातून आपला समाज अजून बाहेर यायचा आहे >>>> कै च्या कै !

एकाच्या वागण्याने घराची शिस्त बिघडत असेल तर कृष्णकृत्ये काय, समज काय, कलंक काय. काही संबंध आहे का या गोष्टींचा ? या धाग्याचा विषय लेट नाईट आहे त्यामुळे तुमच्या त्या कवितेतले दोन पॅरा उडवून टाका. इथे रात्र म्हणजे रात्र. आपल्या भागातलीच रात्र. व्यक्तीस्वातंत्र्याच्या नावाखाली मुलं वर्षभर अभ्यासच करणार नसतील तर आपण देऊ का ते ?
नवरा जर बिनकामाचं जागरण करायला लागला तर त्याला टोकलेच पाहीजे. त्याचं कसलं आलंय व्यक्तीस्वातंत्र्य ? उद्या त्यातून काही उद्भवले तर ? एव्हढे सांगूनही स्वारी रात्रीचे उअशीरपर्यंत रोजचे रोज रहात असेल तर मग काय प्रकरण आहे हे पहायलाच पाहीजे.

काय प्रकरण असणार?
कुठल्यातरी पक्षाच्या आय टी सेलने दत्तक घेतले असणार!
Wink

माझ्या मुलीला सबमिशन आणि होमवर्क करता करता उशीर होतो. तिची झोपायची वेळ रात्रीचे साडेनऊ आहे. तीन दिवस जागरण झाले कि तिला मायग्रेन, लो बीपीचा त्रास होतो. मला खरंच कळत नाही कि लोक का जिवावर उदार होऊन रोजच्या रोज जागरणं करत असतील ?
माझा एक फेसबुक मित्र आहे. सकाळी त्याच्या पोस्ट्स , कमेण्ट्स दिसतात. रात्री साडेतीन, पहाटे पाच. इतका वेळ तो जागलेला असतो. शेवटी काविळीने गेला.

कुठल्यातरी पक्षाच्या आय टी सेलने दत्तक घेतले असणार! >>>> Lol

पण मग ते विनाकारण कसे सातीताई ? पैसे मिळत असतील ना त्याचे ? पन तरी मी सांगेन त्याला कि अशाच पक्षाचे काम कर ज्याचे विचार तुझ्या विचारांशी जुळत असतील. नाहीतर सोशल मीडीयावर मारे रॅशनल रहायचं, व्यक्तीस्वातंत्र्याच्या बाता मारायच्या आणि लोकांच्या घरात घुसून फ्रीज चेक करणा-या पक्षाला मत द्यायचे किंवा त्याचे काम करायचे. हे मी नाही होऊ देणार. मी म्हणेन की एक तर तुझे विचार बदल किंवा पक्ष बदल.

दुसर्‍याच्या आयुष्यात ढवळाढवळ करायची काय गरज आहे??? नसता भोचकपणा :रागः
कोणाचे टाईमटेबल कसे असेल ते आपल्याला काय माहित!!
बरे हे सर्व स्त्रीलाच लागू का??? पुरुषप्रधान संस्कृती कधी बदलणार???

नेटचा वापर गरजेपुरताच करावा हे ठिक आहे पण ऑनलाईन आहे म्हणजे टाईमपासच करत असणार हे म्हणणे चूक आहे.

मी रात्री उशीरापर्यंत जागून काम करते. सकाळी लवकर उठणं काय वाटेल ते केलं तरी जमत नाही. (त्यामुळे मी स्वतःच मला घुबड म्हणवते). मला जे लोक ओळखतात, त्यांना हे माहीत आहे, त्यामुळे ते मला असे प्रश्न विचारत नाहीत. जे लोक मला जुजबी ओळखतात ते मला असे प्रश्न विचारण्याचं धाडस करत नाहीत (केलं तर काय उत्तर मिळेल याची जाणीव त्यांना जुजबी ओळखीतूनच होत असावी बहुधा Lol ).

त्यामुळे मी स्वतःच मला घुबड म्हणवते>>बॅग्झ Proud Lol मीपन आली लाईनीत तुझ्या...मलापन सकाळी लवकर उठणे कधी जमले नाही.. आणि घुबड हे विद्येच प्रतिक हय बरं सो गर्व से कहो हम घुबड हय...

हा धागा बघुन मला मी कुठल्या जमान्यात राहते असं वाटायला लागलं...ज्या अर्थाने लेखनात प्रश्न विचारण्यात आला आहे त्या अर्थाने अजुनपर्यंत तरी कुणी मला प्रश्न विचारलेला नाहीए..कधीच नाही..आणि इतक्या कोत्या मनोवृत्तीचे लोक पन असतात जगात आणि ते मला अजुन भेटले ना।ई म्हणुन काळजी करावी कि सेलिब्रेशन या विवंचनेत फसलीए मी Wink

मला आवडते रात्री जागायला, बर्याचदा मी रात्री दोन वाजेपर्यंत टाईमपास करते, हा पण सकाळी ६ वाजता आपसुकच जाग येते.
तेव्हा जर का ऊठुन परत झोपली तर मात्र काही खरे नाही. खा शिव्या मम्मीच्या रात्री जागरण केले म्हणुन.
मजा म्हणजे काही काम किंवा अभ्यास करायचा असेल तर ९ , ९.३० लाच पेंगायला लागते

फ्रुस्ट्रेशन, दुसरे काय ? किंवा समदु:खी कोणी भेट तय का ते पाहणे . किंवा स्थिरतेमुळे निर्माण झालेली पोकळि भरून काढण्याच प्रयत्न.

अहो अंबज्ञ, तुम्ही फेसबुकावर पण आहात का? नाही, आत्ता दुपारीच मी तुमचे लिखाण धुमाकुळ की टाईमपास कट्टा इथे वाचले. सेम लिखाण होते, मग त्यांनी तुमचे लिखाण चोरले की तुम्हीच इथे ते कॉपी करुन पेस्ट केले देव जाणे!

कोण ठरवते ही घराची शिस्त?
आणि कोण कोणावर लादू शकते? >>>

शिस्त लादलेली असते का ? मला एव्हढं काही कलत नाही. आपल्या मार्गदर्शनाच्या प्रतिक्षेत...

मला एक कळत नाही. रात्री जर फेबु/व्हॉअ‍ॅप सोडुन वाचन केले/टीपी केले तर कुणाला ऑनलाइन दिसण्याचा प्रश्नच काय येतो. आणि आपण ऑन्लाइन दिसल्यावर कुणी काय तर्क लावावेत हे त्यांचे स्वातंत्र्य नाही का? आणि हे तुम्हाला आलेले फॉर्वर्‍ड आहे तर ते भोंदु फॉर्वर्ड्स या धाग्यावर चिकटवाचे. नवीन धागा काढुन स्वतःचेच लेखन आहे असे भासवायची काय गरज?

मला एव्हढं काही कलत नाही. आपल्या मार्गदर्शनाच्या प्रतिक्षेत...
>>>>

त्यासाठी मला वेगळा धागा काढावा लागेल.
आपल्या परवानगीच्या प्रतीक्षेत Happy

कुठलाही धागा काढायला माझी परवानगी नाही. तर मग आता धागे काढणार नाही असे समजू का ?
बरं ते जाऊ दे पाचकळपणा.
घरावर शिस्त लादण्यात येते याबद्दल मला खरंच मार्गदर्शन हवं आहे. इथेच उत्तर हवं आहे...

काही ताण्त्रिक कारणाने मी मोठ्या पोस्ट लिहू शकत नाही, त्यामुळे याचे उत्तर उधार राहिले. लवकरच देईन. पोस्ट आटोक्यात असेल तर ईथेच अन्यथा स्वतण्त्र धागा...

हो किंवा नाही मध्ये मार्गदर्शन?
असो, आपल्याला उत्तर द्यायला म्हणून असे नाही पण एकूणच आजच्या समाजाची स्थिती पाहता असा एखादा धागा काढणे गरजेचे आहे म्हणून कधीतरी नक्की काढेन. आपल्यामुळे हा विषय सुचला याचे श्रेय आपल्यालाच. धन्यवाद Happy

परवानगी दिली असती तर मला प्रोत्साहन द्यायचे श्रेयही आपल्याला द्यायला आवडले असते. पण आता नाईलाजाने त्याचे श्रेय आपल्याला देता येणार नाही. विषय सुचवल्याचे श्रेय मात्र आपलेच आहे Happy

थांबूया आता ईथेच...
त्या धाग्यावरच भेटू Happy

ऋन्मेऽऽष ला मायाबोली चा 'केलीअ‍ॅन कॉनवे ' हा मानाचा शिरपेच किताब मी या ठिकाणी प्रदान करत आहे.

थोडेसे अवांतर असेल कदचीत... पण समाजाची मानसिकता लक्षात येइल........
मा़झा एक मित्र ज्यच्या घरात गेलि १२ वर्शे pc आहे, तो घरुन त्यावर कामे करुन देतो नेट वर.....

तो सांगतो.. कि त्घरात pc आहे आनी हा सतत त्यवर काम करत अस्तो, त्यामुले लोकान्ना वतते कि हा दिवस रत्र फक्त पोर्न बघत असतो..... आता लोकेषन पश्चिम महाराश्त्रातिल जिल्हा लेवल वर असले तरि पुर्वि तर तालुका लेवल वर राहात होता...
बरेच जन त्याच्या घरि pc चालु असला कि बाजुलाच येऊन बसतात.. आनी जनु काय एक तरी पोर्न क्लिप दाखव त्याशिवाय जानारच नाहि असा भव दोळ्यात असतो... बरे या मित्राला पोर्न चा नाद अजिबात नाहि, सतत pc वर नामजप चलुअच असतो तसेच घरि pc हौल मध्य्रे थेवला आहे, घरचे सदस्य हि तिथेच असतात, तरिहि लोकांना वातते कि हा सत्तत पोर्न बघतो म्हनुन... बाकि काहि नाहि समाज अजुनकि गलिछ आनि घानेरड्या विचारातच अडकला आहे, फक्त आर्थीक सुबत्ता आलि आनि चांगले कपडे घतले कि सगळे सभ्य होतातच असे नाहि,.. असो कोनि दुखावले गेले असल्यास क्शमस्व...

मी हे
लेट नाईट online कुणाशी तरी बोलायचे आहे असावं असे वाटले

ज्यांची नाईट शिफ्ट आहे, ज्यांना रात्री कामे करावी लागतात ते विनाकारण कसे काय होऊ शकेल ? जर आपण कारणाशिवाय जागत नाही तर दुस-याला कशाला द्यायचे स्प्ष्टीकरण ? जागे रहावे कि नाही या स्वातंत्र्याचा मुद्दा हा वेगळा मुद्दा आहे. त्यावर मी काही बोलत नाही. फक्त विनाकारण रात्रीचे जागणे पुढे जीवघेणे ठरू नये एव्हढंच. तसेच लोकांनी काय विचार करावा हा सुद्धा आपल्या हातात नसलेला इश्यू आहे. त्यांना त्याचे स्वातंत्र्य आहे. ज्याचे जसे विचार तसाच तो विचार करणार ना ?

अंबज्ञ तुम्ही पण सर्वांचे ऐकून ?
मा.प्रशासक
अंबज्ञ या आयडीच्या या कमेण्टकडे लक्ष द्यावे. एक तर त्यांनी कुठूनतरी दुस-याचे लिखाण ढापून आणले आहे. त्यावर स्वतःचे मत दिलेले नाही. आणि मत मांडले तर अशा पद्धतीने प्रतिसाद देत आहेत. लक्ष घालावे ही विनंती.

Pages