किस्से आणि निरीक्षणं (भाग ७)....गमतीशीर हॉलीवूड.

Submitted by बग्स बनी on 15 March, 2017 - 04:26

चित्रपट पाहायला कोणाला नाही आवडत..? सगळ्यांनाच आवडतं. मलाही, त्यातल्या त्यात...हॉलीवूड चं अधिक आकर्षण आहे. त्यांच फिक्शन, अॅनिमेशन, व्ही.एफ.एक्स, स्टोरी, डेडिकेशन, टेक्नोलॉजी....वैगेरे, वैगेरे...आणि हा....नट-नटी. त्यांच्या त्या सपोर्टिंग इक्विपमेंट्स, क्र्यू, आणि त्यांच्या मेहनतीच कौतुक. बऱ्याचदा मी ते चित्रपट पाहतो, मला ते भावतात, आवडतात, पटतात....सर्वच असे नाही, मोजकेच. चित्रपट बघून झाल्यावर अर्थात ते आवडो-नावडो चित्रपट बाजूला सारून मी कधी कधी व्यंगात्मक विचार करून स्वतःशीच हसतो. त्यातूनच पडलेले काही प्रश्न....उत्तरं असतील तर नक्की द्या.

१. स्पायडर मॅन, हा जेव्हा त्याचा सुपर हिरो सूट घालतो तेव्हा तो आतमध्ये काही नेसत असेल का.. म्हणजे आत कपडे घालत असेल ना....? नाही म्हणजे सहजच विचारलं.....आमच्या इथलं पप्या लहान असताना पावसाळ्यात नुसतं रेनकोट घालून फिरायचं कधी कधी...

२. सुपर मॅन च्या पॅण्टेला चैन कुठं दिसली का...? (लय महत्वाचा प्रश्न...)

३. हल्क नावाचा प्राणी मोठा होतो, बरं मोठा होताना त्याच्या अंगावर सगळे कपडे असतात, साहजिक मोठा झाल्यावर फाटणार. फाटतात देखील. बरं फाटली तरी सगळी फाटतात, बर मग पॅण्टच कशी नाही फाटत...?

४. हे गोड्झिला, किंग काॅंग, सारखे प्राणी कुठनं पैदा होतात.....बरं जन्मतात, मग ते पाश्चात्य देशीच का...तिथच उच्छाद का माजवतात..?

५. आयर्न मॅन कडनं भंगार वाल्याचा बराच धंदा होत असेल.......न्हाय, कालच आमच्या इथलं भोले भंगारवाल म्हणत होतं, धंदाइच नही है....

६. हॉलीवूड वाल्यांना, असे विचित्र अन भारी आयलंड कुठं सापडत असतील...???

७. हॉरर, अॅक्शन, किंवा डार्क सीन मध्ये काळ्या लोकांना का घेतात कळत नाही...आधीच अंधार त्यात आणखीन एक अंधार...... बसा बोंबलत.

९. बर काळ्या माणसांना घेतात ते घेतात वर त्यांच्यावर इतका क्लोस अप देतात कि चेहर्ऱ्यावरच्या ह्या भल्या मोठ्ठ्या नाकपुढ्या सोडल्या कि काहीच दिसत नाही, त्या पण भल्या मोठ्या गुहे सारख्या.....कवा कवा वाटतं वढून बिडून घील आत मधी.....लई भ्या वाटतं....

९. आणि अशी अक्राळ विक्राळ दिसणारे पात्र टाकतात कशाला त्या चित्रपटात...? आमच्या इथलं बाजूच्या काकी वर लाईन मारणारं बारकं पिंट्या, ज्याला चड्डी घालायची माहित नाही. ते विचारत... हे असले आहेत ह्यांचे आई बाप कसे आसतील.
__________________________________________

असे बरेच प्रश्न आहेत पण, अग्रस्थानी हे....बरेच आठवले नाहीत आठवले कि नक्की सांगीन.

बरं आता जर का हॉलीवूड च्या चित्रपटांचे नाव मराठीतून असते तर काय झाले असते...?? आणि जर नाव द्यायला गावाकडच्या लोकांना सांगितलं असत तर...हॉलीवूड चित्रपट कदाचित हे असे असते.....

1. Titanic – बुडकी होडी.
2. Angry Birds – खवळलेली पाखरं.
3. King Kong – अबब..!! केवढ मोठ माकड.
4. Godzilla – तालमीतली पाल.
5. Harry Potter – हरी कुंभार.
6. Spider Man – कोळी माणूस.
7. Super Man - भलताच माणूस.
8. Bat Man – माणसातलं वाघूळ.
9. Hulk – तगडं अन हिरवगार. (मुळात हल्क (हलकं) हे नाव ठेवता येणार नाही म्हणून.)
10. Hell Boy - नरकातल गाबडं.
11. Hell Boy 2 - आणिक एक दुसरं गाबडं.
12. Evil Dead – घाणेरडा पप्पा.
13. Hollow Man – फुसका माणूस.
14. Men in Black – कळ्या मातीतली माणसं.
15. Men in Black 2 – लईच काळ्या मातीतली माणसं.
16. Men in Balck 3 – एकदम काळ्या मातीत लोळलेली माणसं.
17. Anaconda - अग बया...! लांबड .
18. Anaconda 2 – आता...आणखीन एक लांबड.
19. Anaconda 3 – आयच्या गावात.....लांबडीच लांबडी.
20. Anaconda 4 – आता काय खरं नाही.... पळा... ढिगानं लांबडी.
__________________________________________

तुमच्याकडे पण अशा काही भन्नाट कल्पना असतील तर नक्की सुचवा.....

Group content visibility: 
Public - accessible to all site users

14. Men in Black – कळ्या मातीतली माणसं.
15. Men in Black 2 – लईच काळ्या मातीतली माणसं.
16. Men in Balck 3 – एकदम काळ्या मातीत लोळलेली माणसं.........17. Anaconda - अग बया...! लांबड .
18. Anaconda 2 – आता...आणखीन एक लांबड.
19. Anaconda 3 – आयच्या गावात.....लांबडीच लांबडी.
20. Anaconda 4 – आता काय खरं नाही.... पळा... ढिगानं लांबडी.
__________________________________________.... हा हा हा हा हा..........................

उगा ओढून ताणून...
सुपरहिरो/कॉमिक बुक्स मुव्हीज म्हटल्यावर तिथे लॉजिकचा प्रश्न काढायचा नसतो हे माझ मत..
शेवटचे तीन प्रश्न/निरिक्षण (?) अज्जिब्बात आवडले नाही..
मुळात जेव्हा एका धाग्यात ४ ५ किस्से बसु शकतात तेव्हा छटाक किस्स्याकरीता आणि सो कॉल्ड निरि़क्षणाकरीता धागा कशाला असा प्रश्न अगदी पहिल्या धाग्यापासुन मनात आला.. हॉलीवुड वाचुन इथे डोकावली होती..
असो..
पुढे काहीतरी क्वालिटी मटेरिअल येईल अशी आशा आहे..शुभेच्छा..

सहमत, टीना जी.... +१००. खरं सांगायचं झाले तर... मी अशा प्रतिसादाची वाटच बघत होतो. तुम्ही तर खुपच सिरीयसली घेतलत हे, असं दिसतंय. Wink
प्रॅक्टिकली बघाल तर नक्कीच तुमचे मुद्दे वॅलिड आहेत. परंतु या धाग्याच्या सुरूवातीच्या पॅरा मध्ये लिहील्या प्रमाणे, मला नेहमीच हाॅलिवुड सिनेमांच आकर्षण आणि त्यांच्या प्रति भलताच आदर आहे. ते मला रूजतात, पटतात...हे झालं सिनेमांच. त्यात ही सगळे वॅलिड पाॅईंट्स वगळता म्हणजेच, बाकी कसलाही विचार न करता केवळ आणि केवळ विनोदाच्या दृष्टीकोनातुन या कडे पाहीलंत, तर पदरात उरतं फक्त "हसु". आणि या धाग्यांचा मुळ उद्देशच हा आहे (पहील्या भागांत लिहील्या प्रमाणे, तरीही नावांवरून लेखन निवडले जाते याची खंत.). जर प्रॅक्टिकली विचार न करता हे वाचलंत तर नक्कीच तुमच्या देखिल चेहऱ्यावर हसु येईल एवढं मात्र नक्की. या साठी कुठलंच लाॅजिक किंवा डोकं लावण्याची गरज नाही, फक्त कल्पना करून बघायचं. एकाच धाग्यात ४-५ किस्से सहज बसतील, मान्य...बसत ही असतील. पण त्यात मजा नाही उरणार, हे माझं मत. कारण प्रत्येक किस्स्याला स्वतंत्रपणे खुलवून द्यावं एवढाच काय तो माझा प्रयत्न. मला सुद्धा आधी वाटलं की या "छटाक" किस्से, आणि "सो काॅल्ड" निरीक्षणांकरीता कशाला धागे...? पण या धाग्यांचा उद्देशच मुळतः मनोरंजन करण्याचा आहे,
दिवस भरांत बऱ्याच घडामोडी घडत असतात. त्यात ही मी बऱ्याच वेळी आजुबाजुंच्या घटना बारकाईने टिपतो, जमलंच तर लिहुन काढतो व त्याला विनोदी वळणं देऊन त्या प्रत्येक क्षणांची मजा घेत असतो, आणि नव-नविन अनुभव, आठवणी गाठीशी बांधतो. या मुळे मी स्वतः ला प्रसन्न ठेवण्याच्या प्रयत्न करतो. दिवसभरात मला भेटणाऱ्या ५० लोकांपैकी ५ जणांच्या चेहऱ्यावर माझ्यामुळं हसु यावं, एवढाच माझा दिवसभराचा आटापिटा. आणि हे धागे काढण्याचा माझा वैयक्तिक उद्देश हाच काय तो. मी बऱ्याच जणांना पाहिलंय विनाकारण भलतंच मळभ, ओझं मनावर घेऊन फिरतांना. आणि आजच्या या घडीला दडपणात न राहता प्रसन्न राहणे ही काळाची गरज आहे, असं मला वाटतं. तुम्हांला हसु येईल कदाचित, परंतु मला या धाग्यांची मालिका करायची आहे. हा जर बऱ्याच जणांना वाटत असेल तर त्यांनी तसं सांगाव, मी ही मालिका थांबवायला तयार आहे. शेवटी वाचकच आमचे मायबाप. Wink
माझ्या या धाग्यांमुळे वाचकांमधल्या १० जणांपैकी एकाच्या चेहऱ्यावर हसु आले तरी उद्देश्य सफल झाला म्हणायचा. इतकंच.
आवडणं न आवडणं हा ज्यांचा त्यांचा प्रश्न.
बाकी तुमच्या या रोखठोक प्रतिसादा बद्दल खरेच मनापासून कौतुक, आभार आणि स्वागत्.
शुभेच्छा तशाही दिल्याच आहेत, तर पुढच्या अगाऊ धाग्याची सुरूवात करावी म्हणतोय..... Wink
पुनःश्च मनःपुर्वक आभार....

कळावे, Wink

अरे हा...मटेरिअल वरून आठवलं, हा धागा http://www.maayboli.com/node/61982 नक्की आवडेल. बाकी मटेरिअल राखिव ठेवलंय. वेळ आल्यावर नक्कीच काढीन.... Wink Wink Wink

.............(टीप : कोणीही पर्सनली किंवा मनावर घेऊ नये...! Wink )

सहमत, टीना जी.... +१००. खरं सांगायचं झाले तर... मी अशा प्रतिसादाची वाटच बघत होतो. तुम्ही तर खुपच सिरीयसली घेतलत हे, असं दिसतंय. Wink
--> LOL

हे पण छान ! ! !
दिवस भरांत बऱ्याच घडामोडी घडत असतात. त्यात ही मी बऱ्याच वेळी आजुबाजुंच्या घटना बारकाईने टिपतो, जमलंच तर लिहुन काढतो व त्याला विनोदी वळणं देऊन त्या प्रत्येक क्षणांची मजा घेत असतो, आणि नव-नविन अनुभव, आठवणी गाठीशी बांधतो. या मुळे मी स्वतः ला प्रसन्न ठेवण्याच्या प्रयत्न करतो. दिवसभरात मला भेटणाऱ्या ५० लोकांपैकी ५ जणांच्या चेहऱ्यावर माझ्यामुळं हसु यावं, एवढाच माझा दिवसभराचा आटापिटा. आणि हे धागे काढण्याचा माझा वैयक्तिक उद्दे श हाच काय तो. मी बऱ्याच जणांना पाहिलंय विनाकारण भलतंच मळभ, ओझं मनावर घेऊन फिरतांना. आणि आजच्या या घडीला दडपणात न राहता प्रसन्न राहणे ही काळाची गरज आहे, असं मला वाटतं. तुम्हांला हसु येईल कदाचित, परंतु मला या धाग्यांची मालिका करायची आहे. हा >>> Happy हे जास्त आवडलं....
धाग्यांची मालिका करायची आहे>>>म्हणजे अजून बरच काय काय वाचायला मिळणार आहे तर...

वाचुन जाम हसले. विशेषता लांबडं वगैरे शब्दांना.>>>>>>>> उद्देश सफल झाला म्हणायचा.. Happy Happy Wink
धन्यवाद...!!!
.
विशेषता लांबडं वगैरे शब्दांना>>> या वर देखिल माझ्याकडे किस्से आहेत... Wink

धन्यवाद... कावेरीजी Happy _/\_
हो... अजुन खुप काय काय भन्नाट आहे...आणि मला ही आवडेल सादर करायला Happy तो पर्यंत.... स्टे ट्युन्ड्.... Wink
मनापासुन आभार... Happy _/\_

_/\_ Happy

_/\_

Mission impossible जमत न्हाई
- " - २ एकदा सांगीतल ना जमत न्हाई म्हनुन