पण तो मुसलमान नव्हता..

Submitted by सई केसकर on 6 March, 2017 - 11:53

सध्या अमेरिकेत भारतीयांविरुद्ध हेट क्राईम्स होण्याच्या काही कारणांपैकी एक म्हणजे अमेरिकन लोकांना भारतीय (हिंदू), मुस्लिम आणि शीख लोकांमधला फरक समजत नाही हे दिले जाते. त्यानंतर अमेरिकन लोकांचे "जगाबद्दलचे" ज्ञान हमखास काढले जाते. साधारण अमेरिकन माणसाला जगाची कशी काहीच माहिती नसते, कारण त्यांना अमेरिका सोडून बाकी फारसे काही माहिती नसते. त्यामुळे चुकून त्यांच्या हातून मुस्लिम समजून हिंदू मारले जातात.

या अशा लॉजिकचा ज्यांच्या जवळच्यांचा जीव गेला आहे अशाना काहीच उपयोग नसतो. बंदूक बाळगण्याचे स्वातंत्र्य काढून घेण्यासाठी ओबामा सरकारने बरेच लॉबिंग केले होते. ओबामा सरकारच्या काळात सँडी हुक (कनेटिकट) मध्ये असेच अमानुष हत्याकांड घडले होते, आणि तिथे तर १० वर्षांखालील मुलांवर अंदाधुंद गोळीबार झाला होता. तेव्हा बाराक ओबामांना पत्रकार परिषदेत अश्रू अनावर झाले होते. कोणालाही हलवून टाकेल असा तो प्रसंग होता. आणि त्यामुळे बंदूक वापरायचा परवाना मिळवणे कठीण केले पाहिजे इथपर्यंत तरी चर्चा झाली होती.

पण असे प्रसंग घडतात आणि विसरले जातात. भारतीयांविरुद्ध असे चुकून हेट क्राईम्स ९/११ नंतर देखील झाले होते. यात शीख लोकांचे नाहक बळी गेले. पण मुस्लिम समजून चुकून मारले गेले असले तरी असा द्वेष करणाऱ्या माणसाच्या हातात बंदूक द्यावी, आणि ती बाळगणे हा त्याचा मूलभूत हक्क असावा हा मोठा विरोधाभास आहे.

अमेरिकन लोकांना भूगोलाचे ज्ञान असावे अपेक्षा ठेवण्यापेक्षा अमेरिकेत बंदूक बाळगण्याचा कायदा बदलावा यासाठी प्रयत्न करायला हवे. कारण भौगोलिक ज्ञानाच बघायचे असेल तर सामान्य भारतीय माणसापुढे एक फ्रेंच आणि एक अमेरिकन उभा केला तर त्या दोघांनाही गोरे नाहीतर फिरंगी हे एकच विशेषण लागू होते. आपल्या पैकी किती लोकांना सुन्नी, शिया, बोहरी, बहाई, सुफी अशा सगळ्या प्रकारच्या मुस्लिम पंथांची माहिती असते? किती जणांना ज्युईश लोकांचे अंतर्गत पंथ, जसे की हेसिडिक आणि झियोनिस्ट यातला फरक समजतो? कॅथलिक, प्रोटेस्टंट, अँग्लिकन, मेथाडिस्ट, मॉर्मन असे ख्रिश्चन धर्माचे विभाग माहिती असतात?

एवढेच काय, कर्नाटक, आंध्र, केरळ, तामिळनाडू या सगळ्या राज्यातून आलेल्या लोकांना मराठी लोक "मद्रासी" या एका विशेषणाने निर्लज्जपणे संबोधतात. तसेच मणिपूर, मिझोराम, आसाममधून येणाऱ्यांना नेपाळी नाहीतर चिनी करून टाकतात. फरक एवढाच की ज्या लोकांना यांचा "त्यांच्या राज्यातील नोकऱ्या" चोरल्याबद्दल राग येतो, त्यांच्या हातात भारतीय सरकारनी कायदेशीर बंदुकी दिलेल्या नसतात.

आणि याही पुढे जाऊन, जर जीव गमावलेला माणूस मुस्लिम असेल तर या हल्ल्याचे समर्थन करता येते का? भारतीय वंशाच्या हिंदू लोकांना या घटना घाबरवून टाकतात आणि अस्थिर करतात कारण गोळ्या झाडायची आधी कुणी त्यांचा पासपोर्ट बघायला किंवा धर्म विचारायला येत नाही. त्यांची पहिली ओळख म्हणजे बांगलादेशी, पाकिस्तानी आणि मध्य पूर्वेतील लोकांशी साधर्म्य असणारा त्यांचा रंग.

ट्रम्पच्या आधीचे ओबामा सरकारदेखील इमिग्रेशनबद्दल अतिशय कडक होते. ९/११ नंतर अमेरिकेने त्यांच्या देशाच्या संरक्षणासाठी "व्हिसा मँटिस" हा सिक्युरिटी चेक सुरु केला होता. "स्टेम"(सायन्स, टेक्नॉलॉजी, इंजिनियरिंग, मॅथेमॅटिक्स) या क्षेत्रात काम करणाऱ्या कित्येक शास्त्रद्यांना या पॉलिसीचे फटके बसले आहेत. पण सुरक्षेसाठी काही निष्पाप लोकांचे थोडे नुकसान झाले तरी बेहत्तर पण आतंकवादी अमेरिकेत येऊ नयेत हाच त्यामागचा हेतू होता. असे असतानादेखील ओबामा सरकारने मध्य पूर्वेत आणि मुस्लिम देशांशी संबंध चांगले ठेवायचे आणि इस्लामोफोबिया दूर करण्याचे सतत प्रयत्न केले.

पण उघडपणे मुस्लिमांविरुद्ध आणि परदेशातून येऊन स्थायिक झालेल्या लोकांबद्दल इतक्या त्वेषाने बोलणारा ट्रम्प हा पहिलाच राष्ट्राध्यक्ष आहे. जरी "हिंदूंवर" त्यांची मेहेरनजर असली, तरी अशी धर्मीक असहिष्णुता, हिंदू आणि मुसलमान यांच्यातील फरक बघून दाखवली जाणार नाही हे ही एक सत्य आहे. ब्रेक्झिटच्या मतदानाच्यावेळी सुद्धा भारतीय लोकांनी इतर (मुस्लिम) लोकांचे ब्रिटनमध्ये स्थलांतर थांबवायच्या बाजूने मतदान केले होते. तसेच अमेरिकेतील श्रीमंत भारतीयांनी ट्रम्पसाठी प्रचार आणि मतदान केले. पण जेव्हा धार्मिक ध्रुवीकरण करून एखादा नेता निवडून येतो, तेव्हा त्यांनी मतदानाच्या काळात टाकलेली एक ठिणगी पुढे कधी आणि किती अक्राळविक्राळ रूप धारण करेल याचा अंदाज त्या नेत्यालादेखील नसतो.

जागतिकीकरण आणि धार्मिक ध्रुवीकरण हे एकत्र यशस्वी होऊ शकेल असे जग आता कुठेच राहिले नाही. आपल्या सगळ्यांचेच हितसंबंध एकमेकांमध्ये गुंतलेले आहेत. त्यामुळे एखाद्या जमातीविरुद्ध केलेल्या नकारात्मक प्रचाराचे पडसाद सगळ्यांवरच पडण्याची भीती आहे. आणि म्हणून निदान आत्मसंरक्षणासाठी तरी हे ध्रुवीकरण थांबवायला हवे. प्रचारातही आणि सोशल मीडियावरही.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

हे फारच मोघम झाले आहे. जेंव्हा तुम्ही म्हणता की हे सर्व देश अंतोषाच्या उंबरठ्यावर आहेत, तर काही तरी कारण हवे ना?
उद्या मी म्हणेल, भारतात असंतोष नाही, अन तुम्ही विचारले की का नाही? तर त्यावर येणारा काळ ठरवेल हे असे उत्तर मी दिले तर माझ्या स्वतःच्या मतापासून ( भले मग ते चूक का असेना) मी पळत आहे, असे वाटेन.

प्रत्येक देशाचे प्रश्न वेगळे आहेत असेही तुम्हीच म्हणत आहात आणि लगेच "कट्टरवादी फालतू मुद्यांवर लोकांना एकत्र करा, मनात विष मिसळा, आणि विरोधकांवर सोडा" असेही म्हणत आहात. सगळ्यावर उत्तर एकच कसे होईल? असा मला प्रश्न आहे. (म्हणजे आता होता असे म्हणावे लागेल. असे वाटते.)

तर काही तरी कारण हवे ना? >> अहो कारणे आहेत. एक एक देशाचा समोरील प्रश्न बघा. तुम्हाला कारणे आपसूक मिळतील.

त्यावर लिहायला हा धागा योग्य नाही. मग बरेच अवांतर होईल. म्हणून थोडक्यात थांबलो.
मी "मोघम" असे कधीच लिहित नाही. स्पष्ट उल्लेख करून लिहितो.

ते गवताच्या माणसाच्या अर्ग्यूमेंटचं का काड्यांच्या माणसांचं असं काहितरी म्हणतात ना, तसं झालंय हो केदार तुमचं.
म्हणजे तुम्हाला काही उत्तर दिलं कुणी की तुम्ही एक काडी आय मीन गवत उपसणार!
Happy

प्रत्येक देशाचे प्रश्न वेगळे आहेत असेही तुम्हीच म्हणत आहात आणि लगेच "कट्टरवादी फालतू मुद्यांवर लोकांना एकत्र करा, मनात विष मिसळा, आणि विरोधकांवर सोडा" असेही म्हणत आहात. >>>>

केदार किमान आपल्यासारख्यांना तरी या वाक्याचा अर्थ कळू नये ? Uhoh

वर लिहिलेल्या सगळ्या प्रगत देशांची प्रमुख मदार आंतरराष्ट्रीय व्यापारावर आहे. चीन हे प्रॉडक्शन हाऊस होइपर्यंत या देशातल्या सामान्य लोकांना हाताला कामे होती... आता भरपूर काम चायनातून होते. इथल्या बड्या व्यापार्‍यांना काही फरक पडत नाही पण सामान्य माणूस भरडला जातो. त्यात आणखी निर्वासितांचे लोंढे त्यांचे प्रश्न आगीत तेल ओतायला.. घरचे झाले थोडे व्याह्याने धाडले घोडे. सामान्य लोक सहन तरी किती करतील.. डोकं भांबावून जातंच, मग एखादा अशा असहाय परिस्थितीचा फायदा घेऊन यांची डोकी फिरवतो. हे सर्व प्रगत देश सुपात आहेत इतकंच. आंतरराष्ट्रिय समस्यांना एकच एक कारण नसतं.. एकाच वेळी घडणार्‍या अनेक संबंधित-असंबंधित घटनांचा परिपाक असतो. असो. आम्ही भारतात राहुन काय आंतरराष्ट्रीय अक्कल पाजळणार म्हणा... माझे मत बरोबरच आहे असे काही म्हणणे नाही.

र किमान आपल्यासारख्यांना तरी या वाक्याचा अर्थ कळू नये >>> दिपस्त, मला हे नक्की माहिती आहे की तुम्ही वरचेच देश का दिले. फिलिपिन्स किंवा चीन असे का नाही लिहिले. पण तुम्ही कारण मांडायला तरीही तयार नाहीत. ते ऐकावेसे वाटले.

--

तसेही माझ्या मते भारतीय निर्वासितांचा प्रश्न अमेरिकेत नाहीये. ज्या घटना झाल्या त्या दुर्दैवी होत्या, पण त्यात लोकांना ते "मिडल इस्टर्न" लोकं वाटले. पूर्वीही शिखांवर हल्ले झाले तेंव्हा त्यांना ते अरब वाटले होते.
इलिगल इमिंग्रंट , मॅन्युफॅक्चरींग जॉब दुसर्‍या देशात आणि इस्लामिक टेररिझम हे ट्रम्पचे मुख्य मुद्दे होते.

कारण लिहायला हरकत नाही पण वेगळा अर्थ काढून केलेल्या विषयांतरचे खापर माझ्याच माथी फोडले जाईल याची काळजी आहे Wink

असो. लिहीतो नंतर

>>इलिगल इमिंग्रंट , मॅन्युफॅक्चरींग जॉब दुसर्‍या देशात आणि इस्लामिक टेररिझम हे ट्रम्पचे मुख्य मुद्दे होते.<<

साफ चूक!

खरं म्हणजे, व्हाइट सुप्रिमसी, मुस्लिम बॅन, अ‍ॅबॉर्शन बॅन, मेल शॉविनिझ्म या मुद्द्यांवर आणि रशियाच्या मदतीवर तो निवडुन आलेला आहे. गोर्‍या लोकांच्या ताब्यात देश परत घ्यायचा, हाच उद्देश आहे "मेक अमेरिका ग्रेट अगेन" या घोषवाक्याचा, एव्हढं पण तुम्हाला कळत नाहि? निवडक मिडिया आणि इथले काहि संतुलित विचारांचे तज्ञ मुर्ख आहेत काय?.. Proud

पाश्चिमात्य देशांनी या पुढे चीप लेबरना व्हिसा देऊ नये,तिसर्या जगातले क्रिमीलेयर पाश्चिमात्य देशात जातात ,तिथे सेवा देतात यथाशक्ती ग्रीनकार्ड वा सिटीझनशीप मिळवतात ,यात मातृदेशाला ब्रेन ड्रेनचा सामना करावा लागतो.कन्सास सारख्य घटना होऊ नयेत पण स्वतःचा स्वाभिमान विकुन आश्रीत म्हणून आलेल्यांनी कीती सोशल सिक्युरीटी मागावी याला मर्यादा आहेत.भारतातून कमी वेजेस वर इंजिनिअर उचलने हे कायदेशीर ह्युमन ट्रॅफीकींग आहे,हे भारताने कायदा करुन थांबवले पाहीजे.

राजकाका
मी ट्रंपजी आणि मोदीजींची फॅन आहे.

>>भारतातून कमी वेजेस वर इंजिनिअर उचलने हे कायदेशीर ह्युमन ट्रॅफीकींग आहे,हे भारताने कायदा करुन थांबवले पाहीजे.<<

भारत सरकार किंवा भारतीय कंपन्या असं करतील हा भाबडा विश्वास आहे का तुमचा? तसं काहि भारतीय कंपन्यांकडुन तरी होणार नाहि, पण ट्रंपने वेतनाची किमान मर्यादा $१३०,००० करुन तुमची सुचना अंमलात आणण्याचं ठरवलेलं आहे. (ना रहेगा बांस, ना बजेगी बासुरी...)

कन्सास सारख्य घटना होऊ नयेत पण स्वतःचा स्वाभिमान विकुन आश्रीत म्हणून आलेल्यांनी कीती सोशल सिक्युरीटी मागावी याला मर्यादा आहेत.भारतातून कमी वेजेस वर इंजिनिअर उचलने हे कायदेशीर ह्युमन ट्रॅफीकींग आहे,हे भारताने कायदा करुन थांबवले पाहीजे.>> Biggrin

राज झोई ताईन्च्या बिलाबद्दल बोलताय ना? ते ट्रंपने कुठे आणलंय ?

>>राज झोई ताईन्च्या बिलाबद्दल बोलताय ना? ते ट्रंपने कुठे आणलंय ?<<

अहो, कोणाच्याहि कोंबड्याच्या आरवण्याने का असेना, सूर्य उगवल्याशी मतलब... Proud

राज, एकदम उपहासात्मक लिहिले!?
असो
सिंजि, मातृदेशाला ब्रेन ड्रेनचा सामना करावा लागतो असले काही भारताच्या बाबतीत होत नाही. जेव्हढे भारतीय सर्व परदेश मिळून बाहेर आहेत यांच्या हून जास्त हुषार , कर्तबगार असे लोक त्याच्या हजार पटीने जास्त भारतातच आहेत . नि कित्येक जण तर भारतीय कंपन्यांचे नोकर म्हणून येतात, त्यामुळे भारतीय कंपन्या नि त्यांचे शेअर घेणारे तुम्ही यांचाच जास्त फायदा होतो. तेंव्हा जाऊ देत त्यांना बाहेर.
भारतातून कमी वेजेस वर इंजिनिअर उचलने
अहो उचलत नाहीत कुणि! तुम्हाला काय वाटते, तीनशे वर्षांपूर्वी जसे अफ्रिकन लोकांना गुलाम म्हणून अक्षरशः उचलून आणले होते तसे भारतीयांना आणले का? तसे नाहीये.
तुम्ही कधी इथे येऊन त्यांच्यासारखे नोकरी करून राहिला आहात का?
कित्येक जण शिकायला आले नि इथेच राहिले. त्यांना इतर अमेरिकनांइतकाच पगार मिळतो.
भारतीय कंपन्यांनी भारतीय नि अमेरिकन कायदे पाळून बरेच लोक इकडे पाठवले, त्यांचे पगार त्यांची भारतीय कंपनी ठरवते. तो पगार ते लोक मान्य करतात, ते जर म्हणाले आम्हाला अमेरिकन लोकांइतकेच पैसे द्या तर भारतीय कंपन्या म्हणतील, जा अमेरिकेत नि शोधा नोकरी.
कुणिहि स्वाभिमान विकत नाहीत. जेव्हढा अमेरिकन लोकांना समाजात सुरक्षित रहाण्याचा अधिकार आहे, तेव्हढाच त्या सगळ्यांना आहे.

कुणि अमेरिकन भारतात भारत बघायला टूरिस्ट म्हणून आला तर त्याला समाजात सुरक्षितता अपेक्षित करण्याला काही मर्यादा आहेत का? मग उद्या कुणि जास्त पैसे मिळतात म्हणून भारतातले पोस्टिंग स्वीकारून अमेरिकन कंपनी तर्फे भारतात आला तर त्याचे काय? त्यालाहि मर्यादा? नि त्यानेहि स्वाभिमान विकून आश्रित म्हणून आला म्हणाल?
आता हे भारताने कायदा करुन थांबवले पाहीजे असे तुम्हाला वाटत असेल तर आजूबाजूला विचारा तुम्हाला किती पाठिंबा आहे, असेल तर कायदा होईल, नसेल तर नुसतेच इथे लिहीत रहा, आम्ही वाचू!

Lol +१

नन्द्याजी ४३ जी

तुमचे विचार पटले. असेच विचार महाराष्ट्रात येणा-या बिहार , परप्रांतीयांबद्दल माझेही आहेत. पण त्यांना इथे लोंढे म्हणतात आणि मारहाण केली जाते. खरे तर पहाटे चारला घाऊक बाजारात जाऊन भाजी विकत आणून ती मुंबईकरांना पुरवणे हा काही गुन्हा नाही. हे इथल्यांना जमत नाही आणि त्यांनी आमचा रोजगार पळवला म्हणून भडकवणा-यांच्या मागे ते जातात. असे भडकवणारे लोक इथे हिरो आहेत. मी पण फॅन आहे अशा नेत्यांची. म्हणूनच ट्रंपजी पण आवडतात. त्यांचे काम चालू आहे पुण्यात. त्या साईटवर तर बिहारीच होते जास्त प्रमाणात. स्वस्तात झाली कामे.

सपना हरिनामे - मी २००५ मधे पार्ल्याला एका न्हाव्याच्या दुकानात गेलो होतो. त्या न्हाव्याने मला जी गोष्ट सांगितली ती मला पटली. पैसे मिळवायला धंदा करायचा तर जे व्यवस्थित काम करतील, वेळच्या वेळी येतील, कामाला दांडी मारणार नाहीत असेच लोक पाहिजेत. त्याने तीन चार अस्सल महाराष्ट्रीयांना शिकवून कामाला ठेवले, त्यांनी गुण उधळले. मला वाटले हे भय्ये चले जाव म्हणून ओरडणारे लोक मला नुकसान भरपाई देतील, कसले काय? मग बिहारी ठेवले, (स्वस्तात), कामाला चोख, धंदा जोरात!
तो म्हणाला माझ्या दुकानाबाहेर मी पण घोषणा देतो, भय्ये चले जाव, फक्त माझ्या दुकानातले नव्हे.

पण ट्रंपने वेतनाची किमान मर्यादा $१३०,००० करुन तुमची सुचना अंमलात आणण्याचं ठरवलेलं आहे.
कुणा कुणाच्या वेतनाची? कुठल्या धंद्यातले? सगळ्या नोकर्‍या १३०,००० पगाराच्या लायकीच्या नसतात, तरी? का H1B वाल्याला १३०,००० नि त्याच कामातल्या अमेरिकनला ९०,०००!
नुसते सूचना करणे सोपे आहे. अंमलात कशी आणणार? की इथल्या कंपन्या आता भारतातल्या कंपन्यांसारखे करणार? कागदावर १३०,०००, हातात ५,०००! म्हणजे सूचनेची अंमलबजावणी!
न रहेगा बांस न रहेगी बांसुरी! यापेक्षा गाजराची पुंगी म्हणा - चालले धंदे तर ठीक, नाहीतर काढा दिवाळे!

Submitted by नन्द्या४३ on 12 March, 2017 - 05:49
>>>>>>>
हाच मुद्दा मी आधीच्या दिर्घ प्रतिसादात उचलला होता. जो "प्रति ट्रंप" यांना कळला नाही Wink

नुसते सूचना करणे सोपे आहे. अंमलात कशी आणणार? की इथल्या कंपन्या आता भारतातल्या कंपन्यांसारखे करणार? कागदावर १३०,०००, हातात ५,०००! म्हणजे सूचनेची अंमलबजावणी!
न रहेगा बांस न रहेगी बांसुरी! यापेक्षा गाजराची पुंगी म्हणा - चालले धंदे तर ठीक, नाहीतर काढा दिवाळे!
<<
तुमच्या सूचना ट्रंप यांना पाठवा.
अमेरिकेचा लवकरच भारत होईल अन तिथेही मोदी निवडून येतील.

होळीनिमित्ताचे मुक्तचिंतनः

एक क्रूसेड्स नावाचा प्रकार जगात होऊन गेला.

दोन्ही महायुद्धांत बहुतांश ख्रिश्चन्स एकमेकांत लढले, सोबत त्यांनी गुलाम बनविलेले एतद्देशिय हिंदू अन जगातील इतर धर्मिय सैनिक. पण बेसिकली दोन्ही वेळा ख्रिश्चन्स एकमेकांत.

आता, या आधीच्या काळांतले पग्रोम्स जे ज्यू विरुद्ध ख्रिश्चन होते, ते विसरा (तिथे ज्यूद्वेषाच्या ठिणग्या सापडतात), त्याही आधीच्या क्रूसेड्स लक्षात घ्या.

क्रूसेड्स अन महायुद्धे, जगाची लोकसंख्या अन संहाराचे पर्सेंटेज लक्षात घ्या.

आता झूम आऊट करून आजच्या काळात परत या.

मुसलमान सगळेच टेररिस्ट असतात असा प्रचार करून जगभरात भांडणं पेटविणे सुरू आहे. अन याला साथ देण्यासाठी हिंदूबंधू हिरिरीने उतरताहेत कारण पाहुण्याच्या लाठीने साप मरतो आहे.

इतक्या सगळ्या ऐतिहासिक लढ्यांनंतरही मुसलमानांच्या नावाचे इतके देश जगात का आहेत? तेल न प्रोड्यूस करणार्‍या किती देशांनी मुस्लीम धर्म स्वीकारलेला आहे? का?

ऑन द अदर हँड, बेसिकली भारतातल्या सर्वच लहान मोठ्या सत्ताधार्‍यांनी प्रबळ आक्रमकांनाच साथ दिलेली आहे. हा निजाम किंवा तो खान. मला जहागिरी देईल त्याची मी चाकरी करीन. ३% 'वरती' दिले की उरलेल्यापैकी खर्च वजा जाता मला मिळणार्‍या दीड टक्क्यावर मी खुश असतो.

मग तो निजाम असो, लाटसाहेब असो, की पेशवा. मी मला 'राजे' म्हणवूण घेऊ शकतो आहे अन माझ्या 'प्रजे'वर माझी सत्ता आहे, हे पुरे. ही मानसिकता आपली आहे.

मी इमिग्रेट करून कोकणातून पुण्यात आलो काय, अन पुण्यातून क्यालीफॉर्नियात गेलो काय. शेवटी मी 'इंड्यन' आहे. व, कुणी त्या फडतूस मानसिकतेच्या माणसाला ट्रंप"जी" म्हणते किंवा एतद्देशीय कुणा इतराला "जी" म्हणतात, त्याबद्दल माझ्या मनी केवळ कणव आहे.

तर मुद्दा सुटतोय परत.

१. त्या क्रूसेड्सपासून मारून टाकायचा प्रयत्न करण्यात आलेल्या मुसलमानांत आजही इतका जोर का आहे? इतके वाईट आहेत तर टिकून का आहेत?

२. आपले हिंदूबंधू नवक्रूसेडी ख्रिश्चनांना सो कॉल्ड सपोर्ट तर करताहेत, पण त्याचवेळी तो फादर स्टेन्स अन तत्सम प्रकरणेही होताहेत.

३. हा मुद्दा पुन्हा केव्हातरी. स्पेशल पार्ल्यातून येऊयेऊ एकेक पोस्टी टाकण्याच्या उज्ज्वल परंपरेला जागूनही कंपूशाहीला नांवं ठेवण्याच्या यक्सलंट मानसिकतेला समर्पित ठेवतो सध्या.

किती विचार (चिंतन) करून लिहिताय ते!
माबोवर शोभत नाही हो.
इथे फक्त जुन्या उखाळ्या पाखाळ्या काढायला पोस्टस लिहायच्या असतात.

भारतीय इतिहासात मुसल्मान राजे हे हिंदू राजांना प्रमुख स्पर्धक ठरल्याने हिंदु राजानी जाणीवपूर्वक मुसलमानाना बदनाम केले. असे आमचे स्पष्ट मत आहे.

ता.क. पग्रोमनंतरच्या ज्यूज ना भेटायला 'जी' जाणारेत म्हणे. अन चर्चा अशी करवली जाते आहे, कि ज्यूंसोबत त्या पॅलेस्टाइनवाल्यांना अजिब्बात न भेटणारे पहिले युनेस्को प्रमाणित परिधानमंत्री असणारेत?

आपपर भाव नाही हो भारतीयांना! हे विश्वचि माझे घर! धर्म वगैरे बघायला विष्णू घेईल अवतार, आपण धर्मासाठी, धर्माबद्दल काही करण्यापेक्षा सरळ समोर जो येईल त्याला अतिथी म्हणून मान द्यावा - आपलेच घर समजून रहा म्हणावे नि गृहस्थधर्म पाळला म्हणून धन्य म्हणवून घ्यावे.
आम्हाला काय, पोटापुरता पसा पाहिजे, नको मिळाया रोटी!
येऊ देत मुसलमान, ख्रिश्चन, करू देत वाट्टेल तसे अत्याचार, फोडू देत देवळे, त्यांना वाईट म्हणायचे नाही.

Hi this is a cheerful post. Alert. Several white Americans living in the heartland are in my dog lover group. Today one had posted a picture of him getting married and the dog was standing there wearing a hat and next to the best man . I wished them on the marriage Nd also happy holi indian festival of colours. For the newliweds. He
immediately liked my post. If we tell them about us and our culture. They will know about us. And the ignorance will come down. Every life matters. Next step to immigration is to meld cultures. We take something from them and share ours with them . Let us not demotivate our maayboli friends who have invested years building a life in the US.

Pages