पण तो मुसलमान नव्हता..

Submitted by सई केसकर on 6 March, 2017 - 11:53

सध्या अमेरिकेत भारतीयांविरुद्ध हेट क्राईम्स होण्याच्या काही कारणांपैकी एक म्हणजे अमेरिकन लोकांना भारतीय (हिंदू), मुस्लिम आणि शीख लोकांमधला फरक समजत नाही हे दिले जाते. त्यानंतर अमेरिकन लोकांचे "जगाबद्दलचे" ज्ञान हमखास काढले जाते. साधारण अमेरिकन माणसाला जगाची कशी काहीच माहिती नसते, कारण त्यांना अमेरिका सोडून बाकी फारसे काही माहिती नसते. त्यामुळे चुकून त्यांच्या हातून मुस्लिम समजून हिंदू मारले जातात.

या अशा लॉजिकचा ज्यांच्या जवळच्यांचा जीव गेला आहे अशाना काहीच उपयोग नसतो. बंदूक बाळगण्याचे स्वातंत्र्य काढून घेण्यासाठी ओबामा सरकारने बरेच लॉबिंग केले होते. ओबामा सरकारच्या काळात सँडी हुक (कनेटिकट) मध्ये असेच अमानुष हत्याकांड घडले होते, आणि तिथे तर १० वर्षांखालील मुलांवर अंदाधुंद गोळीबार झाला होता. तेव्हा बाराक ओबामांना पत्रकार परिषदेत अश्रू अनावर झाले होते. कोणालाही हलवून टाकेल असा तो प्रसंग होता. आणि त्यामुळे बंदूक वापरायचा परवाना मिळवणे कठीण केले पाहिजे इथपर्यंत तरी चर्चा झाली होती.

पण असे प्रसंग घडतात आणि विसरले जातात. भारतीयांविरुद्ध असे चुकून हेट क्राईम्स ९/११ नंतर देखील झाले होते. यात शीख लोकांचे नाहक बळी गेले. पण मुस्लिम समजून चुकून मारले गेले असले तरी असा द्वेष करणाऱ्या माणसाच्या हातात बंदूक द्यावी, आणि ती बाळगणे हा त्याचा मूलभूत हक्क असावा हा मोठा विरोधाभास आहे.

अमेरिकन लोकांना भूगोलाचे ज्ञान असावे अपेक्षा ठेवण्यापेक्षा अमेरिकेत बंदूक बाळगण्याचा कायदा बदलावा यासाठी प्रयत्न करायला हवे. कारण भौगोलिक ज्ञानाच बघायचे असेल तर सामान्य भारतीय माणसापुढे एक फ्रेंच आणि एक अमेरिकन उभा केला तर त्या दोघांनाही गोरे नाहीतर फिरंगी हे एकच विशेषण लागू होते. आपल्या पैकी किती लोकांना सुन्नी, शिया, बोहरी, बहाई, सुफी अशा सगळ्या प्रकारच्या मुस्लिम पंथांची माहिती असते? किती जणांना ज्युईश लोकांचे अंतर्गत पंथ, जसे की हेसिडिक आणि झियोनिस्ट यातला फरक समजतो? कॅथलिक, प्रोटेस्टंट, अँग्लिकन, मेथाडिस्ट, मॉर्मन असे ख्रिश्चन धर्माचे विभाग माहिती असतात?

एवढेच काय, कर्नाटक, आंध्र, केरळ, तामिळनाडू या सगळ्या राज्यातून आलेल्या लोकांना मराठी लोक "मद्रासी" या एका विशेषणाने निर्लज्जपणे संबोधतात. तसेच मणिपूर, मिझोराम, आसाममधून येणाऱ्यांना नेपाळी नाहीतर चिनी करून टाकतात. फरक एवढाच की ज्या लोकांना यांचा "त्यांच्या राज्यातील नोकऱ्या" चोरल्याबद्दल राग येतो, त्यांच्या हातात भारतीय सरकारनी कायदेशीर बंदुकी दिलेल्या नसतात.

आणि याही पुढे जाऊन, जर जीव गमावलेला माणूस मुस्लिम असेल तर या हल्ल्याचे समर्थन करता येते का? भारतीय वंशाच्या हिंदू लोकांना या घटना घाबरवून टाकतात आणि अस्थिर करतात कारण गोळ्या झाडायची आधी कुणी त्यांचा पासपोर्ट बघायला किंवा धर्म विचारायला येत नाही. त्यांची पहिली ओळख म्हणजे बांगलादेशी, पाकिस्तानी आणि मध्य पूर्वेतील लोकांशी साधर्म्य असणारा त्यांचा रंग.

ट्रम्पच्या आधीचे ओबामा सरकारदेखील इमिग्रेशनबद्दल अतिशय कडक होते. ९/११ नंतर अमेरिकेने त्यांच्या देशाच्या संरक्षणासाठी "व्हिसा मँटिस" हा सिक्युरिटी चेक सुरु केला होता. "स्टेम"(सायन्स, टेक्नॉलॉजी, इंजिनियरिंग, मॅथेमॅटिक्स) या क्षेत्रात काम करणाऱ्या कित्येक शास्त्रद्यांना या पॉलिसीचे फटके बसले आहेत. पण सुरक्षेसाठी काही निष्पाप लोकांचे थोडे नुकसान झाले तरी बेहत्तर पण आतंकवादी अमेरिकेत येऊ नयेत हाच त्यामागचा हेतू होता. असे असतानादेखील ओबामा सरकारने मध्य पूर्वेत आणि मुस्लिम देशांशी संबंध चांगले ठेवायचे आणि इस्लामोफोबिया दूर करण्याचे सतत प्रयत्न केले.

पण उघडपणे मुस्लिमांविरुद्ध आणि परदेशातून येऊन स्थायिक झालेल्या लोकांबद्दल इतक्या त्वेषाने बोलणारा ट्रम्प हा पहिलाच राष्ट्राध्यक्ष आहे. जरी "हिंदूंवर" त्यांची मेहेरनजर असली, तरी अशी धर्मीक असहिष्णुता, हिंदू आणि मुसलमान यांच्यातील फरक बघून दाखवली जाणार नाही हे ही एक सत्य आहे. ब्रेक्झिटच्या मतदानाच्यावेळी सुद्धा भारतीय लोकांनी इतर (मुस्लिम) लोकांचे ब्रिटनमध्ये स्थलांतर थांबवायच्या बाजूने मतदान केले होते. तसेच अमेरिकेतील श्रीमंत भारतीयांनी ट्रम्पसाठी प्रचार आणि मतदान केले. पण जेव्हा धार्मिक ध्रुवीकरण करून एखादा नेता निवडून येतो, तेव्हा त्यांनी मतदानाच्या काळात टाकलेली एक ठिणगी पुढे कधी आणि किती अक्राळविक्राळ रूप धारण करेल याचा अंदाज त्या नेत्यालादेखील नसतो.

जागतिकीकरण आणि धार्मिक ध्रुवीकरण हे एकत्र यशस्वी होऊ शकेल असे जग आता कुठेच राहिले नाही. आपल्या सगळ्यांचेच हितसंबंध एकमेकांमध्ये गुंतलेले आहेत. त्यामुळे एखाद्या जमातीविरुद्ध केलेल्या नकारात्मक प्रचाराचे पडसाद सगळ्यांवरच पडण्याची भीती आहे. आणि म्हणून निदान आत्मसंरक्षणासाठी तरी हे ध्रुवीकरण थांबवायला हवे. प्रचारातही आणि सोशल मीडियावरही.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

अजून तरी ते सार्वत्रिक चित्र असं नाही. आणि न होवो.
मान्य. तसाच गेल्या ४५ वर्षांचा अनुभव आहे.
फक्त आताशा माथेफिरू लोकांसारखे वागणारे जरा जास्तच दिसतात. इतके दिवस त्या लोकांना जरा भीति होती. आता खुद्द राष्ट्रपति व त्याचे सल्लागार ज्या प्रकारे बोलतात, ट्वीट करतात, त्यातून भावना भडकणे सोपे जाते.
खुद्द राष्ट्राध्यक्षच जर पुरावे न देता वाटेल तसे आरोप करू लागले तर बाकीच्यांचे काय चुकले? राष्ट्राध्यक्षांविरुद्ध ओरडा झाला तरी त्याला फेक न्यूज म्हणायचे असे सगळे चालू आहे. त्यामुळे बरेच जण काहीतरी वेडे वाकडे विचार करून तेच खरे म्हणतात!

धार्मिक ध्रुवीकरण करायचे नाही म्हणजे रॅडिकल इस्लाम टेरेरिझम असे म्हणायचे नाही का ? इस्लामिक स्टेट मुळे लोखो लोक परागंदा झाली आहेत, जगात इस्लामचे नाव घेऊन अतिरेकी लोकांना मारत आहेत हे खरे नाही असे म्हणायचे का ? सगळेच मुस्लिम असे नाहीत यासाठी सहमत पण या धर्माचे नाव घेऊन जगात अतिरेकी हल्ले होत आहेत. नकारात्मक प्रचार न करता समस्या आहे हे मान्य करून त्यावर मात करण्यासाठी सगळ्यांनी प्रयत्न केले पाहिजेत. ट्र्म्प सरकार तडकाफडकी निर्णय घेऊन हे समस्या नीट हाताळत नाही हे कबूल. पण ही समस्याच नाही असे म्हणून उघडपणे विरोध न करता छुपे युध्द चालू ठेवावे ही फसवणूक होईल.

>>>धार्मिक ध्रुवीकरण करायचे नाही म्हणजे रॅडिकल इस्लाम टेरेरिझम असे म्हणायचे नाही का ? इस्लामिक स्टेट मुळे लोखो लोक परागंदा झाली आहेत, जगात इस्लामचे नाव घेऊन अतिरेकी लोकांना मारत आहेत हे खरे नाही असे म्हणायचे का ? सगळेच मुस्लिम असे नाहीत यासाठी सहमत पण या धर्माचे नाव घेऊन जगात अतिरेकी हल्ले होत आहेत. नकारात्मक प्रचार न करता समस्या आहे हे मान्य करून त्यावर मात करण्यासाठी सगळ्यांनी प्रयत्न केले पाहिजेत.

अमेरिका ९/११ नंतर हे सगळे प्रयत्न करतच आहे. हे प्रयत्न करण्यासाठी आणि असे हल्ले थांबवण्यासाठी अमेरिकेचा इंटेलिजन्स सतत कार्यरत असतो. त्यासाठी भाषणबाजीची काहीच गरज नाही. आणि गोऱ्या माथेफिरू लोकांनी केलेले गोळी बार हेदेखील टेरर ऍटॅक्स आहेत. जिथे निष्पाप माणसांवर हल्ले होऊन त्यांच्या मृत्यू होतो, ते सगळे आतंकवादी हल्लेच आहेत. ९/११ नंतर २२ वेळा अमेरिकेत असे हल्ले झालेत आणि ते व्हाईट अमेरिकन लोकांनी केलेले आहेत.

पारु, रॅडिकल इस्लाम टेरेरिझम का म्हणायचं नाही याला परवा कोणी तरी डेमॉक्रॅटिक पार्टीचा सिनेटर सांगत होता ते आर्ग्युमेंट सांगतो.
सगळे इस्लाम टेररिस्ट नाहीत हे तर तू पण लिहिलच आहेस. धर्माच्या नावाने होणार्‍या टेरेरिझमला हाक मारली की जे मवाळ आहेत / मध्यममार्गी आहेत त्यांना रॅडिकल लोकांकडुन फुस / फितवणे होऊ शकते. असं काही तरी त्याने सांगितलं.
यावर मी विचार केला की कोणा २-४ हिंदू लोकांनी उद्या कुठे हल्ले केले आणि ते धर्माच्या नावाखाली केले, आणि त्यावर त्याला , रॅडिकल हिन्दु टेरेरिझम म्हणून कोणी म्हटलं तर मला कसं वाटेल. तो / ती हिन्दु आहे आणि हिंदू असल्याने ते हल्ले केले नसुन तो /ती माथेफिरु आहे म्हणुन ते हल्ले झाले.
यावर नेहेमीचं आर्ग्युमेंट की, मग मुस्लिम लोक पुढे येउन याचा निषेध का व्यक्त करत नाहीत, तर काल एक पाकिस्तानी लेखक सांगत होता की टेन्स, थाउजंड्स, मिलियन्स लोकं लाहोर / कराची मध्ये विरोध करतात. प्रेस दाखवत नाही. देव जाणे.
कोणी धर्माचा आधार घेत टेरेरिझम पसरवत असेल तरी त्याला टेरेरिस्ट म्हणावं धर्म मध्ये आणु नये असं मला विचार करुन वाटलं. वहाबी किंवा आणखी स्प्लिट करुन म्हणावं का? मला माहीत नाही.

बाकी, गन व्हायोल्न्स ने गेलेले प्राण आणि दहशतवादामुळे गेलेले प्राण (अर्थात एकाही गेलेला जीव हा तितकाच महत्त्वाचा) यात काही शे- हजाराचा फरक आहे. त्यामुळे गन व्हायोल्न्सची मला पर्सनली जास्त भीती वाटते.

अखलाख च्या हत्येनंतर आमीर खानच्या वक्तव्याचा विपर्यास करून त्याला झोडपण्यात अनेक जण आघाडीवर होते. त्यांच्या पैकी जर कुणी आता ट्रंपजींच्या उदयानंतर यू टर्न घेत नाहीत ना ? आमीर खानचा संपूर्ण एपिसोड आणि शाहरूख खानचा संपूर्ण एपिसोड पाहिला तर ते दोन्ही वाद जाणीवपूर्वक पेटवले होते. राष्ट्रवाद काय, पाकिस्तानात जा काय ही भारतियांची मानसिकता नसून काही मूर्खांची मानसिकता आहे. जेव्हढे मूर्ख अमेरिकेत आहेत तेव्हढेच भारतात आहेत. फक्त भारतातला मीडीया ते जनमत असल्याचा आव आणत आहे. त्याला अनेकांची मूक संमती आहे.

हेट क्राईम मुस्लिम धर्माविरोधी नाही तर बाहेरुन आलेला आणि जॉब्स घेणार्याबद्दल आहे असं मला वाटतं.
सहमत...

सगळेच अमेरिकन खुनशी मारेकरी नाहीत हे इथे हिरिरीने पटवून देण्याचा प्रयत्न करणारांना हेच वक्तव्य मुस्लिम समाजाबद्दल केले तर पटतं का?
----------------
'त्यानंतर आलेच नाही' ह्याचा अर्थ काय होतो मैत्रेयी? असे वक्तव्य आपण माझे नाव घेऊन का केलेत? धागा बंद झालाय का? बंद झाला, वाचनमात्र झाला तरी वेगळा धागा काढून माझे म्हणणे मांडेन... काळजी नसावी. उगाच उकसवून चर्चेला भलतेच वळण देण्याची गरज नाही. धन्यवाद.

नानाकळा, बरोबर आहे. मी तुम्हालाच उद्देशून लिहिले होते ते पोस्ट.
याचे कारण "काय मंडळी , आता कसं वाटतंय!!" वालं जे पोस्ट होतं ना ते मला उकसवणारं वाटलं होतं आणि अजूनही वाटते आहे! त्यावर प्रश्न केला असता तुमची रिअ‍ॅक्शन संदिग्ध होती. म्हणजे "माझ्या पोस्ट ची जबाबदारी माझी तुम्ही अर्थ काय घेतला त्याची नव्हे" असं जोरात म्हटलंत पण अमेरिकेत भारतीय मारले गेले याबद्दल "काय मग मंडळी! आता कसं वाटतंय" असा कुचेष्टेचा सूर का याचे काही एक्सप्लेनेशन नाही. तो तसा नसेल तर तसं म्हणा की. सविस्तर लिहितो असे म्हणून नंतर इथे फिरक्ला नाहीत हे खरेच आहे.
आता आलात, छान झालं, पण त्या मुद्द्यावर अजूनही लिहिलेलेच नाहीत.
असो. जर 'जबाबदारीने' विधान केले असते तर त्यावर सविस्तर लिहायला इतका वेळ का लागावा असा प्रश्न वाचणार्‍याला पडणे साहजिक आहे.
बाफ अजून बंद झाला नाहीये हे काही पटण्यासारखे उत्तर नाही वाटले.

>>सगळेच अमेरिकन खुनशी मारेकरी नाहीत हे इथे हिरिरीने पटवून देण्याचा प्रयत्न करणारांना हेच वक्तव्य मुस्लिम समाजाबद्दल केले तर पटतं का?>> हो. सगळेच मुस्लिम्स टेररिस्ट नाहीत.

अमूक इतक्या वेळात प्रतिसाद लिहिलाच पाहिजे असा काही मायबोलीवर नियम आहे काय मैत्रेयी? तसे असेल तर कळवा.. कारण मी फारसा येत नसतो इकडे. त्यामुळे माहित नाही बॉ!

बाकी, मला प्रतिसाद द्यायला किती वेळ लागतो आणि नाही ह्याचे प्रश्न कुणाला का पडावेत?
जालावर आहात, अर्नबगोस्वामीच्य न्यूजआ'र च्या विन्डोत नाही हे कळले तरी पुरे!

आणखी.... "काय मग मंडळी! आता कसं वाटतंय" ह्यात कुचेष्टा वाटली ह्यात तुमचा पूर्वग्रह स्पष्ट दिसून येतो. कारण त्याच्या पुढच्या ओळी व त्यानंतर दिपस्त यांच्या प्रतिसादाला माझे अनुमोदन, मला लिहायच्या त्या बहुतांश गोष्टी त्यांच्या प्रतिसादात आल्याचे स्पष्ट नमूद केलेले हे सगळे इग्नोर मारले का?

मला कोणाला एक्स्प्लेनेशन द्यायची गरज नाही वाटत. ज्याला जे वाचायचे असते तो तेच वाचतो हेच तुम्ही सिद्ध केलेत. त्यामुळे अधिक स्पष्टीकरणाची गरज नाही.
---------------------------------------------------------------------------

मागे असहिष्णुता, बीफबंदी, गोरक्षकांची मनमानी, अखलाकचा खून, अनेक ठिकाणी पशुव्यापार्‍यांवर झालेले हल्ले, युपीत दोघांना झाडाला फाशी दिलेले, गुजरातेत दलितांना मारहाण हे सगळे आठवले ह्या अमेरिकन खूनसत्रामुळे... त्यावेळी अनेक हिंदुत्वसमर्थक चढ्या आवाजात असं काहीच नाही, अमूक झालं आणि तमुक झालं, झालं तर काय त्यात एवढं, असल्याप्रकारची भूमिका घेऊन होते. त्यात अनेक अनिवासी भारतीयही होते... त्यावेळी आम्ही - म्हणजे माझ्यासारखे काही - जेव्हा परस्परसौहार्द्र, सहिष्णुता इ. बद्दल बोलत होतो तेव्हा आमची खिल्ली उडवली जायची. हे खिल्ली उडवणारे आता अमेरिकेत भारतीयांचे खून पडले तर चिंताग्रस्त चेहरे घेऊन बसले आहेत. मला ह्यांची खिल्ली नाही उडवायची, किंवा चेष्टाही नाही करायची. तसे केले तर त्यांच्यात माझ्यात फरक काय? मी फक्त एवढेच विचारले, की आम्ही जे कोकलत होतो तेव्हा त्याचा अनुभव आल्यावर कसं वाटतं? भले करोडो अमेरिकन तुमच्यासोबत उभे असतील. छातीची ढाल करुन तुम्हाला वाचवतील... पण एका जरी माथेफिरुने तुम्हाला गाठले तर एक आयुष्य, एक कुटूंब सहज उध्वस्त होते. तेच इकडे भारतात होत होते. गोरक्षकांचा माज, आणि दहशत मी माझ्या डोळ्यांनी बघितलीये... तेव्हा दहशत काय असते ते माहित आहे. हा माज कुणामुळे आला तेही सर्वस्पष्ट आहे.

ट्रम्प आला म्हणून अमेरिकेतल्या भारतीयांचे जिनोसाईड होणार नाही. तसले काही मला दुरान्वयेही वाटत नाही, तसले काही माझ्या मनात आहे असे कुणाला वाटत असेल तर त्यापेक्षा मोठा गाढ्वपणा नसेल.

पण उच्चशिक्षित, विचार करु शकणारे, विवेकबुद्धी शाबूत असणारेच सर्व नसतात. असे जे नसतात त्यांच्या विचार करण्याच्या पॅटर्नवरच ट्रम्प सारखे लोक निवडून येतात... आइसिस सारखे दहशतवादी फोफावतात, वेलेन्टाइनडेला मुलामुलींना मारणारे बोकाळतात, गोरक्षक माजतात.... ही सर्व विचारसरणी एकच आहे. ह्याबद्दल आम्ही सांगत असतो तेव्हा आम्हाला उडवून लावण्यात येतं... समस्यांवर उपाय शोधण्यापेक्षा अमूक एका टोळीचे लोक तुमच्या संधींची लूट करणारे आहेत असे सांगणे सोपे आणि राजकारण्यांना, धर्ममुखंडांना आपले कार्यभाग साधायला सोयीचे असते. त्यांचा खेळ होतो आणि आपल्यासारख्यांचा नाहक जीव जातो. असल्या भडकावू लोकांच्या तत्त्वज्ञानाला समर्थन द्यायला बसल्या जागेवरुन आपले काही जात नाही.. पण हे समर्थन फिरुन जेव्हा आपल्याच टाळक्यात काठी, पोटात सुरा, मानेवर तलवार, छातीत गोळी म्हणून घुसते तेव्हा ह्या द्वेषाच्या सैतानाचा खरा चेहरा दिसतो आणि तो फार भेसूर असतो.

इथे जालावर कितीही विवेकबुद्धी कुटली तरी रस्त्यावर कोण माणूस तुमच्याशी कसा वागेल हे तुम्ही ठरवू शकत नाही. शिकलेले, उच्चभ्रू वेगळ्या पद्धतीने शिरकाण करतात तर सामान्य लोक धसमुसळेपणाने... पण जीव शेवटी टार्गेटेड ग्रुपचा जातो. इथे अमेरिकन, भारतीय, अरबी, असले काही भेद नाहीत. इथे फक्त दोनच जमाती, एक सूड घेऊ पाहणारी आणी दुसरी टार्गेट झालेली. ज्यांनी दंगली प्रत्यक्ष अनुभवल्या असतील त्यांना माझे म्हणणे पटेल. बाकीच्यांनी हॉलिवूड सिनेमे पाहावेत.... वी अमेरिकन विल सेव द मॅनकाइन्ड!

इथले, तिथले भारतीय, अमेरिकन, वगैरे सर्वांनाच भीतीमुक्त वातावरणासाठी मनापासून शुभेच्छा!

या चर्चेचं ध्रुवीकरण होऊ नये म्हणून मी (पुन्हा एकदा) नाक खुपसते.

प्रत्येक माणसाची एक स्टोरी असते. "ब्लॅक अमेरिकन्स" असं म्हंटलं की लगेच इनर सिटी मध्ये राहणारे गँगस्टर डोळ्यासमोर येतात. मेक्सिकन म्हंटलं की लगेच इलिगल इमिग्रेशन डोळ्यासमोर येतं. मुस्लिम म्हंटलं की लगेच टेररिस्ट डोळ्यासमोर येतो. भारतीय चष्मेवाले प्रियस चालवणारे तरुण बघितले की लगेच एच १ बी मुळे गेलेले जॉब आठवतात.

पण यातच बराक आणि मिशेल ओबामा आहेत, सलमा हायेक आहे, फरीद झंकारिया आहे, आणि सुंदर पिचाई आहे.

इस्लाम बद्दल आकस किंवा भीती असलेल्या लोकांना जर सीरियातून दोन पोरे काखेत घेऊन बोटीतून उतरताना ठेचकाळून पडलेल्या आईचा फोटो दाखवला तर त्यांच्या डोळ्यात देखील पाणी येईल.

अशी एक एक सुटी सुटी गोष्ट सांगितली की आपल्यात सहानुभूती अभिमान अशा छान भावना येतात. त्यांची आठवण मास मीडिया कंझ्युम करताना ठेवली पाहिजे.

सई आणि नानाकळा +१

इथे जालावर कितीही विवेकबुद्धी कुटली तरी रस्त्यावर कोण माणूस तुमच्याशी कसा वागेल हे तुम्ही ठरवू शकत नाही. शिकलेले, उच्चभ्रू वेगळ्या पद्धतीने शिरकाण करतात तर सामान्य लोक धसमुसळेपणाने... पण जीव शेवटी टार्गेटेड ग्रुपचा जातो. इथे अमेरिकन, भारतीय, अरबी, असले काही भेद नाहीत. इथे फक्त दोनच जमाती, एक सूड घेऊ पाहणारी आणी दुसरी टार्गेट झालेली. ज्यांनी दंगली प्रत्यक्ष अनुभवल्या असतील त्यांना माझे म्हणणे पटेल. बाकीच्यांनी हॉलिवूड सिनेमे पाहावेत.... वी अमेरिकन विल सेव द मॅनकाइन्ड!>>>>>> अचुक

हा धागा लै सीरियस होऊ र्‍हायला राव! जग खूप भयंकर आहे असं वाटायला लागलंय...
नानाकळाने कॄर सत्य भस्सकन लिहून टाकलं...धड नाकारताही येत नाही अणि स्विकारताही येत नाही!!

अमूक झालं आणि तमुक झालं, झालं तर काय त्यात एवढं, असल्याप्रकारची भूमिका घेऊन होते. त्यात अनेक अनिवासी भारतीयही होते... त्यावेळी आम्ही - म्हणजे माझ्यासारखे काही - जेव्हा परस्परसौहार्द्र, सहिष्णुता इ. बद्दल बोलत होतो तेव्हा आमची खिल्ली उडवली जायची. हे खिल्ली उडवणारे आता अमेरिकेत भारतीयांचे खून पडले तर चिंताग्रस्त चेहरे घेऊन बसले आहेत. >>>>>> हां एक्झॅक्टली! हेच 'त्या' वाक्यातून मला वाटलं होतं आणि तेच तुमच्याकडून ऐकायचं होतं.
थोडक्यात काय तर तुमचा कुठल्या तरी व्यक्ती / माबोकर/ समूहाशी वाद झाला, त्यांचे तुमच्याशी राजकीय विषयावर मतभेद होते, त्यांनी तुमची भारतातल्या परिस्थितीसंदर्भात खिल्ली उडवली हेही कबूल करू. पण जेव्हा तुम्ही इथे खुल्या बाफ वर लिहिता तेव्हा ते काही फक्त त्याच व्यक्तींना नव्हे तर ज्यांनी खिल्ली उडवली नव्हती त्यांनाही लागू होतं!! तुम्ही ते वाक्य लिहिलं तेव्हा तुमच्या डोळ्यासमोर ते खिल्ली उडवलेले लोक असतील हो पण इथे ते वाचणारे अनेक अनेक अनिवासी भारतीय आहेत ज्यांना खरोखर त्यांच्या सुरक्षिततेची चिंता वाटत असेल , ज्यांचा मोदी, गांधी, काँग्रेस, ब्रिगेड , भारतातले राजकारण वगैरेबद्दल भक्ती / दुश्मनी काहीही नाही आणि ज्यांना या कुचेष्टेची अन उपहासाची आत्ता अजिबात गरज नाहीये!
तेव्हा मुद्दा हाच की एखादी अप्रिय घटना घडल्यावर "काय मग ! आता कसं वाटतंय, बरी अद्दल घडली" वगैरे लिहिण्याला जबाबदारीने लिहिणे म्हणत नाहीत.
अर्थात तुम्ही कुणाला एक्सप्लेनेशन द्यायला बांधील नाही, तुम्हाला हवे ते हवे तिथे लिहू शकता, मला हवे ते मी समजू शकते वगैरे वगैरे सर्व मान्य आहेच.
तुमचेच हे एक पोस्ट नव्हे तर माबोवर आणि तत्सम इतर साइट्स वर ही वृत्ती हल्ली हल्ली खूप दिसली, जी मला रिडिक्युलस वाटली. तुमचं ते पोस्ट फक्त निमित्त . असो, आता थांबते.

सध्या अमेरिकेत भारतीयांविरुद्ध हेट क्राईम्स होण्याच्या काही कारणांपैकी एक म्हणजे अमेरिकन लोकांना भारतीय (हिंदू), मुस्लिम आणि शीख लोकांमधला फरक समजत नाही हे दिले जाते

--------------------

खुद्द लेख लिहिणार्‍यालाच काही माहीत नाही असे वाटते.

भारतीय शब्दाला जोडुन कंसात हिंदू !

अन मुसलमान व शीख डायरेक्ट कंसाबाहेर !!!

भारतीय लोकांचीच ही अवस्था , अमेरिकनाना का दोष द्यायचा म्हणे ?

Proud

नानाकळा , तुमचा प्रतिसाद पटला ( असे म्हणणे हे कंपूगिरीत बसेल का?).
धागा वाचल्याबरोबर सत्ताधा-यांनी पुरस्कृत केलेला वैचारीक हिंसाचार हा कॉमन फॅक्टर आठवला नसता तरच आश्चर्य. त्यामुळे सर्वसामान्यांच्या मनात निर्माण होणारी दशहत हा जर कॉमन मुद्दा नाही असा कांगारावा करणारे आणि उना घटनेनंतर झालेली घटना योग्य होती असे म्हणणारे यांच्यात काही फरक आहे का असे न वाटते तरच नवल. रोहीत वेमुलाची हत्या हा विषय इथे सुसंगत नाही असे म्हणणा-यांना अमेरिकेत होणा-या हत्यांबद्दल बोलायचा खरंच काही अधिकार आहे का ?

भारतात काय जो उठतो तो विरोधी विचारांची हत्या करतो असे चित्र दिसते का ? अतिरेकी विचारसरणीचे लोक द्वेष पेरतात आणि ठराविक लोकांना हाताशी धरून हिंसा घडवून आणतात. त्या हिंसेला हिंसक पत्रकार मोठ्या प्रमाणावर प्रसिद्धी देतात हा भारतातला ट्रेण्ड आहे.

भारतात अतिरेकी किंवा हिंदुत्ववादी विचारसरणीचे विरोधक मोठ्या प्रमाणावर आहेत. त्यामुळे ते विखुरलेले असताना झालेल्या दहशतसदृश्य वातावरणात मूग गिळून बसणारे, टिंगल उडवणारे हे अशा वातावरणाचे समर्थक मानले गेले तर कुणाला वाईट नको वाटायला. त्यांच्याबद्दल चीड असतेच असते. अशा हत्या होऊनही त्याची जबाबदारी न घेणा-या नेत्याचा उदो उदो करणा-यांबद्दल जे काही वातावरण अमेरिकेत आहे तेच इथेही आहे.

अमेरिकेत आणि भारतात साम्य असेल तर अतिरेकी विचारसरणी सत्तेत आहे. फरक असेल तर मीडीय़ाचा. मीडीया ट्रंपजींच्या पूर्णपणे विरोधात आहे. शिवाय ट्रंपजींचा कोणताही कल्ट नाही. त्यांची तुलना बाहेरून येऊन रोजगार पळवणा-यांविरुद्ध तथाकथित जागृती करणा-या तथाकथित नायकांशी करता येईल. जर्मनीत देखील भारतियांवर हल्ले होतात. इंग्लंड मधे एका विद्यार्थ्याची हत्या झाली आहे. ऑस्ट्रेलियात तर सत्र सुरू झाले होते. अमेरिकेत हू मूव्हड माय चीज या पुस्तकाला मिळणारा प्रतिसाद (अभिव्यक्तीस्वातंत्र्य मान्य करूनही) चिंताजनक होता.

बिहार, उत्तर प्रदेश इथून आलेल्या गरीब ट्~एक्सी ड्रायव्हरला मारहाण करणा-या राज ठाकरेंबद्दल त्या राज्यातल्या नागरिकांना काय वाटत असेल याचा अनुभव हिंदुत्ववाद्यांची सत्ता आल्याबरोबर महाराष्ट्रातील दलित, मुस्लिम, डावे व पुरोगामी मंडळींनी घेतला. पानसरे सरांची हत्या हा इथल्या काही जणांचा आक्रोश आहे. काहींना त्याची टिंगल कराविशी वाटते.

(माझा पूर्वीचा -अ‍ॅडमिनने उडवलेला- प्रतिसादच इथे योग्य होता. कोण काय लिहीणार हे ठरून गेलेलं असतं. त्यामुळे कुणाचा काय प्रतिसाद येणार याचे ठोकताळे प्रतिसाद वाचल्यावर अचूक असल्याचं समाधान मिळते इतकेच. मी अजूनही प्रतिसाद पूर्ण वाचलेले नाहीत. ती इच्छाही नाही. धाग्याचा विषय काय आहे त्या अनुषंगाने लिहीलं होतं. प्रतिसाद कुणीकडे गेलेत त्याचा माझ्याशी काही एक संबंध नाही. कुठल्या एका गटाचं प्रेमही नाही आणि द्वेषही नाही. कुणालाही उद्देशून लिहीलेलं नाही त्यामुळे कुणाला मिर्ची लागत असेल तर ती माझी जबाबदारी नाही आणि ओढवून घेणा-यांचं वाईट तर अजिबातच वाटत नाही. झाली तर करमणूकच होईल). त्यामुळे कुणाला जर आशय सोडून ट्रोलिंग करायचेच असेल तर खालील मुद्दे विचारात घ्यावेत.

१. कशाला आलात मग मायबोलीवर ?
२. आता काय पृथ्वीच्या उगमापासून सुरुवात होईल
३. काही लोकांची मळमळ दिसून आली
४. भारतातले लोक जन्मत:च हुषार ब्ला ब्ला ब्ला (हा असंबद्ध प्रतिसादात धरला जाणार नाही)
५. सत्तेत नसल्याने काही लोकांचा तडफडाट दिसून येतो..
७. एव्हढा मोठा प्रतिसाद... ब्ला ब्ला ब्ला
८. पार्टी चेंज का ?
९. यापेक्षा वेगळे मुद्दे आले तर स्वागतच करण्यात येईल. बुद्धीमत्तेचं आमच्याकडे नेहमी कौतुक करण्यात येईल.

यातल्या ८ क्रमांकाच्या मुद्याबद्दल ममत्व असलेल्यांचा सत्कार व्हाईट हाऊस वर किंवा शनिवारवाड्यावर करण्यात येईल.

१ जर जीव गमावलेला माणूस मुस्लिम असेल तर या हल्ल्याचे समर्थन करता येते का? > होय

२ ओबामा सरकारने मध्य पूर्वेत आणि मुस्लिम देशांशी संबंध चांगले ठेवायचे आणि इस्लामोफोबिया दूर करण्याचे सतत प्रयत्न केले. > त्यामुळेच हिलरीबाई हरल्या ... एका मुस्लिम अतिरेकी महिलेला आपला उजवा हात बन्वण्याचा जबर फटका क्लिन्टन ना बसला

३ निदान आत्मसंरक्षणासाठी तरी हे ध्रुवीकरण थांबवायला हवे > ध्रुवीकरण थाम्बणार नाही , उलट अधिकच वाढत जाणार . मुस्लिमांची बेसुमार वाढत चाललेली लोकसंख्या अन त्यांचा बिनडोक कट्टरतावाद पाहता इस्लाम बद्दल बोटचेपी भूमिका घेणे कोणत्याच देशाला परवडणारे नाही , सगळे मुस्लिम दहशतवादी नसले तरी सगळे दहशतवादी मुस्लिमच आहेत त्यामुळे इस्लामिक जनसंख्या कायम संशयाच्या सुईखालीच राहणार ... त्याला इलाज नाही

थोडक्यात काय तर तुमचा कुठल्या तरी व्यक्ती / माबोकर/ समूहाशी वाद झाला, त्यांचे तुमच्याशी राजकीय विषयावर मतभेद होते, त्यांनी तुमची भारतातल्या परिस्थितीसंदर्भात खिल्ली उडवली हेही कबूल करू. पण जेव्हा तुम्ही इथे खुल्या बाफ वर लिहिता तेव्हा ते काही फक्त त्याच व्यक्तींना नव्हे तर ज्यांनी खिल्ली उडवली नव्हती त्यांनाही लागू होतं!! >>>>>> हे एकदम परफेक्ट लिहिलय. हेच लिहणार होतो नानाकळांची पोस्ट बघून.
तुम्ही जनरल विधान करता तेव्हा ते सगळ्यांना उद्देशून असतं आणि त्या सगळ्यात आम्ही येतो ज्यांनी उगाच दुसर्‍या राज्यातल्या लोकांना त्रास दिलेला नाही, कोणाची खिल्ली उडवलेली नाही. हा साधा विचार तुम्ही लिहिताना नाही करायला पाहिजे का? की डायरेक जनरल विधानं करायची अन इन्टेन्डेड आडियन्सला गोळी लागली तर ठिक पण इतर संबंध नसलेल्या आडियन्सला गोळी लागून त्यांना ना ना कळा सोसाव्या लागल्या त्याचं काय?

ट्रम्प आला म्हणून अमेरिकेतल्या भारतीयांचे जिनोसाईड होणार नाही. तसले काही मला दुरान्वयेही वाटत नाही, तसले काही माझ्या मनात आहे असे कुणाला वाटत असेल तर त्यापेक्षा मोठा गाढ्वपणा नसेल.>>>>>>>> हे वाक्य आणि त्या खालचा फाफटपसारा हे कॉमन नॉलेज आहे इथल्या लोकांना. इथल्या म्हणजे लेखीकेला आणि आम्हा इमिग्रंट्स ना. वरच्या सई, अमित, माझ्या, हायझनबर्ग च्या पोस्टी चेक कराल, किंवा वाचाल तर तुमच्या लक्षात येइल. मग ही भाषणबाजी नक्की कोणासाठी? लोकं नेमके काय बोलत आहेत, चर्चेचा ओघ काय आहे, हे काही काही न बघता द्यायची पोस्टं ठोकून अन नंतर काही जाब विचारला की सारवासारव करत उगा भाषणं देऊन ना ना कळा सोसायच्या! कोणी सांगितलय हा खटाटोप करायला? Lol

सगळा खेळ पोटासाठीचा हाय म्हाराजा !
एक काळ होता जेव्हा बारावी पास म्हणजे डोक्यावरून पाणी जायचे. जुने कित्येक नातेवाईक ७ वी, १० वी,१२ वी - म्हणजे टिपीकल हायस्कूलच्या शिक्षणावर कामाला लागले. अमेरिकेची सांपत्तिक स्थिती त्याच काळी आताच्या मानाने बरीच चांगली होती, कामाची कमतरता नव्हती. शिक्षणाची विशेष आवश्यकता नव्हती.
पण पाहता पाहता जगाच्या रहाटगाडग्याने असा काही वेग घेतलाय, जुने नियम केव्हाच मोडून पडलेत. आज किमान पदवी नसेल, तर नोकरीच्या बाजारात तुमची किंमत शून्य. प्रत्येक जागी स्पर्धा इतकया मोठ्या प्रमाणात वाढलीय आणि तिच्यापाठोपाठ निराशा आणि अगतिकता समाजात वेगाने हातपाय पसरताहेत.

आपल्याकडे आरक्षणावरून जो असंतोष मनामनात साचलाय, तसंच काहीसं अमेरिकेत भारतीयांबद्दल वा कोणीही बाहेरून आलेल्यांबद्दल निर्माण झालंय. जे काम पूर्वी सहज मिळून जायचं, त्यासाठी आज वणवण भटकावं लागतंय, कर्जाचा बोजा उचलून उच्च शिक्षण घ्यावं लागतंय. ही स्पर्धा, आणि चढाओढ बाहेरून आलेल्यांमुळे आहे, असा समज व्हायला मग फारसा वेळ थोडीच लागतोय?

आपल्याकडेसुद्धा थोड्याफार फरकाने असंच आहे, मराठा मोर्चाने ते पहिल्यांदा जरा जास्तच प्रखरतेने जाणवलं. रिकाम्या पोटी कोणाची बुद्धी चाललीय?
घरात खायचे वांदे झाल्यावर योग्य आणि अयोग्य कोणाला कळतंय? वंशद्वेष, दहशतवाद हे फक्त मुखवटे आहेत, त्यामागचा खरा चेहरा भुकेचाच आहे.

हेट क्राईम का होतात हे लोक समजून घेत नाहीत.गौरवर्णीय लोक नेहमीच रेसिस्ट राहीले आहेत.ज्याने डिएनएचा शोध लावला तो जेम्स वॅटसन देखील काळे लोक गोर्यांपेक्षा कमी हुशार आहेत असे म्हणतो तेव्हा सामान्य गोर्यांविषयी बोलायलाच नको.कायद्याचा आदर करतात म्हणून तोंडावर गोरे लोक पॉलिटीकली करेक्ट वागतात,पण मनात भारतीय /मध्यपुर्वेतल्या लोकांना shit coloured people असेच बिरुद हे लावतात.storm front नावाच्या व्हाईट नॅशनलीस्ट पोर्टलवर गेलात तर इतरांना कुत्र्याची उपमा हे लोक देत असतात.
त्यामुळे आपला देश बरा म्हणून शक्य असेल त्याने परतावे.

सिंजि, असे लोकं खुप जास्त होते पुर्वी, आता सुद्धा आहेत पण प्रमाणात खुप कमी आहे. ते उपमा देतात, वाईट वागणूक देतात पण त्याच बरोबर देशाचे लॉ अ‍ॅण्ड ऑर्डर तुमच्या सेवेला (मदतीला नाही) उभे आहेत आणि त्या बरोबरीनी आणखिन सपोर्ट सुद्धा आहे हे मी वर आधोरेखित करत होतो.
भारतात परत यायचा ऑप्शन आहेच पण तो मी किंवा माझ्या सारखे लोकं इथल्या पेक्षा तिथे बरं म्हणून घेणार नाहीत. भारतात हिंदूंना काही त्रास नसला तरी इतर गोष्टींमुळे सामान्य माणसाला भरपूर त्रास आहे. फक्त असं आहे की लोकांना त्या त्रासाची सवय झालीये. Its only a matter of preference for me (or us?)

@सनव

या मुद्द्यावर मी खूप विचार केला आहे आणि वेगवेगळी मतं वाचली आहेत. सुरुवातीला मलादेखील हिजाब हे अँटिफेमिनिस्ट, ओप्रेसिव्ह वाटायचे. पण काही बायका अभिमानाने हिजाब घालतात. गर्दीमध्ये ओप्रेस्ड आणि अभिमानी कशा वेगळ्या करायच्या?

दुसरी गोष्ट, सगळ्या धर्मांमध्ये बायकांना काही ना काही बंधनं असतात. सगळ्याच बायका ती झुगारु शकत नाहीत आणि काही बायकांना ती आपणहून अंगिकारावीशी वाटतात. जसे की स्त्रीनेच मंगळसूत्र घालून तिचे लग्न झाले आहे हे जगजाहीर करायचे. स्त्रीने लग्न झालंय हे दाखवायला लाल कुंकू लावायचे. आपल्यावर अशी सक्ती करणारे कुणीच नाहीये, पण तरीदेखील कित्येक स्त्रिया अभिमानाने कुंकू लावतात, सिंदूर लावतात. कितीतरी बायका अभिमानाने नवऱ्याचे नाव हातावर गोंदून घेतात. त्या ओप्रेस्ड असतात. पण पाश्चात्य संस्कृतीत असेच करणारी बाई अति फ्री मानली जाते. कित्येक हिंदू जाती अजूनही घुंगट पाळतात. आणि यातही आपणहून पाळणाऱ्या आणि ओप्रेस्ड अशा दोन्ही असतील. पण त्यांना दोन्ही परिस्थितीत घुंघट घेऊन कुठल्याही भेदभावाशिवाय समाजात वावरता येऊ नये का?

तिसरी गोष्ट म्हणजे माझे निरीक्षण आहे. ते कदाचित १०० % बरोबर नसेल. माझ्या आईच्या वयाच्या बायका जेव्हा त्यांच्या मुलांकडे/मुलींकडे परदेशी जातात (खास करून युकेमध्ये) तेव्हा त्यांना रस्त्यानी जाताना रेशियल सलर्सचा सामना करायला लागू नये (काही काही एरियात असे हुलीगनिझम असते) म्हणून त्यांची मुलं त्यांना सलवार कुडता/साडी हा पारंपरिक पेहराव करायचा नाही असा सल्ला देतात. हे अर्थात त्यांच्या सुरक्षेसाठी आणि ब्लेंड इन होण्यासाठी (जे मला काही अंशी पटते). पण तसे करायला त्या बायकांना विशेष आवडत नाही कारण त्यांचे सगळे आयुष्य भारतीय पोशाख घालण्यात गेलेले असते.

सॉरी खूपच मोठी कॉमेंट झाली. पण इथे मुद्दा हा आहे की आपल्याला जसं राहायचंय तसं आपला सन्मान अबाधित ठेऊन आणि सुरक्षितपणे राहता आले पाहिजे. आणि कुणी एक कुणा दुसऱ्याला काय घालायचं हे सल्ले देऊ शकत नाही.
दुर्दैवाने स्त्रियांच्या बाबतीत हिजाब घातला तरी तो घालू नका असे सांगितले जाते आणि शॉर्ट्स घातल्या तरी ते सांगितले जाते. पण त्यांना काय घालायचंय ते त्यांच्यावर कुठलीही सत्ता न गाजवता घालू देणे हा विचार पण महत्वाचा आहे.

सई, वरच्या पोस्टला १००% अनुमोदन. कुणी काय घालायचं किंवा नाही याचा निर्णय ज्याने त्याने घ्यावा.

१ जर जीव गमावलेला माणूस मुस्लिम असेल तर या हल्ल्याचे समर्थन करता येते का? > होय >> निषेध

भारतात हिंदूंना काही त्रास नसला तरी इतर गोष्टींमुळे सामान्य माणसाला भरपूर त्रास आहे.----- आं! हिंदूना त्रास नाही, मला माहीतच नवत. सामान्य माणसाला आहे?

कित्येक हिंदू जाती अजूनही घुंगट पाळतात. आणि यातही आपणहून पाळणाऱ्या आणि ओप्रेस्ड अशा दोन्ही असतील. पण त्यांना दोन्ही परिस्थितीत घुंघट घेऊन कुठल्याही भेदभावाशिवाय समाजात वावरता येऊ नये का?

दोन्ही परिस्थितीत? म्हणजे ओप्रेस्ड असल्या तरी ते ओप्रेशन तसंच चालू दयावं आणि त्याला कोणी विरोध करु नये?

अमितव आहो तुम्हाला मुद्दा कळलाच नाही कसा कि अमेरिका कितीही फ्री वर्ल्ड आहे म्हंटलं तरी शेवटी ती पण माणसाचं आहेत हे विसरू नये त्यांच्या भूमीवर लोंढेच्या लोंढे आल्यावर काही मूर्ख असे वागणारच ..

आणि वैद्यबुवा तुम्ही एकदम जगमित्र आहेत मान्य आहे परंतु सगळेच तसे असतील असा नाही ना.. बरं तुमचा पत्ता सांगा काही बांग्लादेशींना छप्पर हवे आहे

हो. विरोध त्यांना वाटलं तर त्या करतील. त्यासाठी शिक्षण द्यावे, समान संधी, समान हक्क नक्कीच द्यावे. पण कपडे काय घालावे याचे नियम कदापि नको. पर्सनल स्पेस ही पर्सनलच राहिली पाहिजे. पिरीयेड.
लोंढे च्या लोंढे >> Lol कुठे दिसले तुम्हाला? विनोदी आहात. हे म्हणजे ट्रंप सारखं झालं. एव्हरी डे मिलियन्स ऑफ इल्लिगल पीपल आर कमिंग. Lol

युरोप मधले छोटे छोटे देश किती विस्थापित घेतायत आणि अमेरिका किती घेत्येय याचे नंबर सांगा बरं? आणि लीगल इमिग्रटस किती येतात ते पण सांगा. मग इल्लिगल किती ते पण सांगा. काहीच्या काही बोलायचं आपलं!

आं! हिंदूना त्रास नाही, मला माहीतच नवत.>>>> हिंदूंना ते हिंदू धर्माचे आहेत ह्या कारणावरुन कोणी त्रास देत नाही असं म्हणत होतो.

आणि वैद्यबुवा तुम्ही एकदम जगमित्र आहेत मान्य आहे परंतु सगळेच तसे असतील असा नाही ना.. बरं तुमचा पत्ता सांगा काही बांग्लादेशींना छप्पर हवे आहे>>>>>> एक नागरिक म्हणून तुम्हाला फक्त बांग्ला देशींना त्रास देऊ नये अशी अपेक्षा आहे. त्यांना घरात ठेवून घ्यायची अपेक्षा नाहीये. Lol

कुठल्याही बाईला "तू ओप्रेस्ड आहेस का?" तुला हा हिजाब घालणे बंद करायचे आहे का? असा प्रश्न व्यक्ती पासून सरकारपर्यंत कुणीही विचारुदेत. ती खरंच ओप्रेस्ड असेल तर तिला हो म्हणण्याचे सुद्धा भय आहे. त्यामुळे हिजाब घालू नका असा कायदा केला तर ते फक्त वर वरचे उपचार होतील. आणि समजा ती म्हणाली की नाही घालत मी हिजाब, मला घरातले बाहेर काढतील तुम्ही माझे पुनर्वसन करा. मला काही शिक्षण नाहीये आणि ३ लहान मुलं आहेत. तर अशा असंख्य मुस्लिम बायकांचे आणि त्यांच्या मुलांचे पुनर्वसन करायची व्यवस्था सरकारकडे असेल का?

आणि मी म्हणते ते दोन्ही परिस्थितीत, म्हणजे कोणावर हिजाब घालायची सक्ती केलीये आणि कोणी तो धर्माचा आदर करण्यासाठी घातलाय हे बाहेरचा आणि तो देखील त्या धर्माचाच काय पण त्या वंशाचाही नसलेला माणूस कसा ओळखू शकेल? फक्त जो काही पेहराव त्या व्यक्ती नी केला आहे त्या पेहरावामुळे तिला स्वतःच्या सुरक्षिततेची भीती वाटू नये. आणि हे विरुद्ध दिशेने पण तितकेच लागू आहे. एखाद्या मुलींनी छोटे कपडे घातले आहेत म्हणून देखील तिला तिच्या सुरक्षिततेची काळजी वाटू नये. इथे मुद्दा फक्त पेहरावाचा आहे. तसा पेहराव त्यांनी मनाविरुद्ध केलाय की आवडीने हा वेगळ्या वादाचा विषय आहे.

Pages