पण तो मुसलमान नव्हता..

Submitted by सई केसकर on 6 March, 2017 - 11:53

सध्या अमेरिकेत भारतीयांविरुद्ध हेट क्राईम्स होण्याच्या काही कारणांपैकी एक म्हणजे अमेरिकन लोकांना भारतीय (हिंदू), मुस्लिम आणि शीख लोकांमधला फरक समजत नाही हे दिले जाते. त्यानंतर अमेरिकन लोकांचे "जगाबद्दलचे" ज्ञान हमखास काढले जाते. साधारण अमेरिकन माणसाला जगाची कशी काहीच माहिती नसते, कारण त्यांना अमेरिका सोडून बाकी फारसे काही माहिती नसते. त्यामुळे चुकून त्यांच्या हातून मुस्लिम समजून हिंदू मारले जातात.

या अशा लॉजिकचा ज्यांच्या जवळच्यांचा जीव गेला आहे अशाना काहीच उपयोग नसतो. बंदूक बाळगण्याचे स्वातंत्र्य काढून घेण्यासाठी ओबामा सरकारने बरेच लॉबिंग केले होते. ओबामा सरकारच्या काळात सँडी हुक (कनेटिकट) मध्ये असेच अमानुष हत्याकांड घडले होते, आणि तिथे तर १० वर्षांखालील मुलांवर अंदाधुंद गोळीबार झाला होता. तेव्हा बाराक ओबामांना पत्रकार परिषदेत अश्रू अनावर झाले होते. कोणालाही हलवून टाकेल असा तो प्रसंग होता. आणि त्यामुळे बंदूक वापरायचा परवाना मिळवणे कठीण केले पाहिजे इथपर्यंत तरी चर्चा झाली होती.

पण असे प्रसंग घडतात आणि विसरले जातात. भारतीयांविरुद्ध असे चुकून हेट क्राईम्स ९/११ नंतर देखील झाले होते. यात शीख लोकांचे नाहक बळी गेले. पण मुस्लिम समजून चुकून मारले गेले असले तरी असा द्वेष करणाऱ्या माणसाच्या हातात बंदूक द्यावी, आणि ती बाळगणे हा त्याचा मूलभूत हक्क असावा हा मोठा विरोधाभास आहे.

अमेरिकन लोकांना भूगोलाचे ज्ञान असावे अपेक्षा ठेवण्यापेक्षा अमेरिकेत बंदूक बाळगण्याचा कायदा बदलावा यासाठी प्रयत्न करायला हवे. कारण भौगोलिक ज्ञानाच बघायचे असेल तर सामान्य भारतीय माणसापुढे एक फ्रेंच आणि एक अमेरिकन उभा केला तर त्या दोघांनाही गोरे नाहीतर फिरंगी हे एकच विशेषण लागू होते. आपल्या पैकी किती लोकांना सुन्नी, शिया, बोहरी, बहाई, सुफी अशा सगळ्या प्रकारच्या मुस्लिम पंथांची माहिती असते? किती जणांना ज्युईश लोकांचे अंतर्गत पंथ, जसे की हेसिडिक आणि झियोनिस्ट यातला फरक समजतो? कॅथलिक, प्रोटेस्टंट, अँग्लिकन, मेथाडिस्ट, मॉर्मन असे ख्रिश्चन धर्माचे विभाग माहिती असतात?

एवढेच काय, कर्नाटक, आंध्र, केरळ, तामिळनाडू या सगळ्या राज्यातून आलेल्या लोकांना मराठी लोक "मद्रासी" या एका विशेषणाने निर्लज्जपणे संबोधतात. तसेच मणिपूर, मिझोराम, आसाममधून येणाऱ्यांना नेपाळी नाहीतर चिनी करून टाकतात. फरक एवढाच की ज्या लोकांना यांचा "त्यांच्या राज्यातील नोकऱ्या" चोरल्याबद्दल राग येतो, त्यांच्या हातात भारतीय सरकारनी कायदेशीर बंदुकी दिलेल्या नसतात.

आणि याही पुढे जाऊन, जर जीव गमावलेला माणूस मुस्लिम असेल तर या हल्ल्याचे समर्थन करता येते का? भारतीय वंशाच्या हिंदू लोकांना या घटना घाबरवून टाकतात आणि अस्थिर करतात कारण गोळ्या झाडायची आधी कुणी त्यांचा पासपोर्ट बघायला किंवा धर्म विचारायला येत नाही. त्यांची पहिली ओळख म्हणजे बांगलादेशी, पाकिस्तानी आणि मध्य पूर्वेतील लोकांशी साधर्म्य असणारा त्यांचा रंग.

ट्रम्पच्या आधीचे ओबामा सरकारदेखील इमिग्रेशनबद्दल अतिशय कडक होते. ९/११ नंतर अमेरिकेने त्यांच्या देशाच्या संरक्षणासाठी "व्हिसा मँटिस" हा सिक्युरिटी चेक सुरु केला होता. "स्टेम"(सायन्स, टेक्नॉलॉजी, इंजिनियरिंग, मॅथेमॅटिक्स) या क्षेत्रात काम करणाऱ्या कित्येक शास्त्रद्यांना या पॉलिसीचे फटके बसले आहेत. पण सुरक्षेसाठी काही निष्पाप लोकांचे थोडे नुकसान झाले तरी बेहत्तर पण आतंकवादी अमेरिकेत येऊ नयेत हाच त्यामागचा हेतू होता. असे असतानादेखील ओबामा सरकारने मध्य पूर्वेत आणि मुस्लिम देशांशी संबंध चांगले ठेवायचे आणि इस्लामोफोबिया दूर करण्याचे सतत प्रयत्न केले.

पण उघडपणे मुस्लिमांविरुद्ध आणि परदेशातून येऊन स्थायिक झालेल्या लोकांबद्दल इतक्या त्वेषाने बोलणारा ट्रम्प हा पहिलाच राष्ट्राध्यक्ष आहे. जरी "हिंदूंवर" त्यांची मेहेरनजर असली, तरी अशी धर्मीक असहिष्णुता, हिंदू आणि मुसलमान यांच्यातील फरक बघून दाखवली जाणार नाही हे ही एक सत्य आहे. ब्रेक्झिटच्या मतदानाच्यावेळी सुद्धा भारतीय लोकांनी इतर (मुस्लिम) लोकांचे ब्रिटनमध्ये स्थलांतर थांबवायच्या बाजूने मतदान केले होते. तसेच अमेरिकेतील श्रीमंत भारतीयांनी ट्रम्पसाठी प्रचार आणि मतदान केले. पण जेव्हा धार्मिक ध्रुवीकरण करून एखादा नेता निवडून येतो, तेव्हा त्यांनी मतदानाच्या काळात टाकलेली एक ठिणगी पुढे कधी आणि किती अक्राळविक्राळ रूप धारण करेल याचा अंदाज त्या नेत्यालादेखील नसतो.

जागतिकीकरण आणि धार्मिक ध्रुवीकरण हे एकत्र यशस्वी होऊ शकेल असे जग आता कुठेच राहिले नाही. आपल्या सगळ्यांचेच हितसंबंध एकमेकांमध्ये गुंतलेले आहेत. त्यामुळे एखाद्या जमातीविरुद्ध केलेल्या नकारात्मक प्रचाराचे पडसाद सगळ्यांवरच पडण्याची भीती आहे. आणि म्हणून निदान आत्मसंरक्षणासाठी तरी हे ध्रुवीकरण थांबवायला हवे. प्रचारातही आणि सोशल मीडियावरही.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

@वैद्यबुवा आणि अमितव आपण सध्याची परिस्थिती जवळून पहिली आहे का? म्हणजे अमेरिकेत राहून

हिंदूंना ते हिंदू धर्माचे आहेत ह्या कारणावरुन कोणी त्रास देत नाही असं म्हणत होतो. ---- मला हे एखादया सद्गृहस्थला सांगावं लागेल असे वाटले नव्हते पण तरी हे घ्या एक उदा. हिंदूना द्विभार्या प्रतिबंधक कायदा लागू आहे तेच शेजारी राहणारा ४ बायका करू शकतो आणि त्याला कोणी जेलमध्ये घालणे सोडा जाब विचारायला जात नाही. एकाच देशाच्या नागरिकांना दोन वेगळे नियम Sad

बाकी सामान्य माणूस नक्की कोण?

@वैद्यबुवा आणि अमितव आपण सध्याची परिस्थिती जवळून पहिली आहे का? म्हणजे अमेरिकेत राहून>>>>> का भौ, अमेरिकेत राहिलं म्हणजे माणूस अंधळा, बिन्डोक होतो का? अजून मी भारतीय नागरिक आहे, २/३ आयुष्य भारतात गेलं, आई बाप अख्खा गोतावळा तिथे आहे त्यामुळे न समजायला काय झालं?
हिंदूंना ते हिंदू धर्माचे आहेत ह्या कारणावरुन कोणी त्रास देत नाही असं म्हणत होतो. ---- मला हे एखादया सद्गृहस्थला सांगावं लागेल असे वाटले नव्हते पण तरी हे घ्या एक उदा. हिंदूना द्विभार्या प्रतिबंधक कायदा लागू आहे तेच शेजारी राहणारा ४ बायका करू शकतो आणि त्याला कोणी जेलमध्ये घालणे सोडा जाब विचारायला जात नाही. >>>>> तुमची ट्रेन भलत्याच ट्रॅक ला लागली त्यामुळे आणखिन काही बोलत नाही.

मैत्रेयी, आता कशाला थांबता, आता तर सुरु झालंय...... (पोस्ट अजस्त्र लांब आहे, पण माझे त्याशिवाय भागत नाही, त्यास्तव क्षमस्व!)

पण जेव्हा तुम्ही इथे खुल्या बाफ वर लिहिता तेव्हा ते काही फक्त त्याच व्यक्तींना नव्हे तर ज्यांनी खिल्ली उडवली नव्हती त्यांनाही लागू होतं!!
>> जनरल विधानं सगळ्यांनाच विनाअट लागू होतात हे आज नवीन ज्ञान मिळाले. मी इथे रस्त्यावर अपघातात निष्काळजीपणामुळे जीव गमावलेल्यांचे उदाहरण देऊन जर असे म्हणालो की "कसं वाटतंय आता? समजलं ना कसं होतं ते?" तर ते शिस्तीत नीट काळजीपूर्वक वाहने चालवणार्‍यांना उद्देशून असेल की निष्काळजीपणे चालवणार्‍यांना? मी इथे अशी खूप उदाहरणं देऊ शकतो, तेवढा वेळ नाही, जिज्ञासूंनी मनातल्या मनात कल्पना करुन घ्या. तर 'जनरल विधान' असे म्हणून अंगावर ओढवून घ्यायची काय गरज आहे?

माझी विधाने कोणाला अंगावर ओढवून घ्यायची असतील तर ओके ठिक आहे. खुला बाफ आहे. चला तेही मान्य करु.

बरं, खरंतर मला ज्यांनी खिल्ली उडवली नाही, किंवा जे तटस्थ म्हणवून घेतात स्वतःला त्यांना काहीच म्हणायचे नव्हते. पण आता तुम्हीच विषय वाढवलात तिथवर, तर मला पुन्हा विचार करायला संधी मिळाली... मी परत विचार केल्यावर असे लक्षात आले की हे जे कोण तटस्थ आहेत तेही ह्या गोष्टींना तितकेच सहाय्यक ठरतात. काही प्रश्न उभे राहिलेत.

हे तटस्थ तटस्थ कसे काय असू शकतात? आज हे सो कॉल्ड तटस्थ आलेच ना दहशतीच्या सावटाखाली, त्याबद्दल तटस्थ राहू शकत आहेत काय? परस्परप्रेम-सहिष्णूता विरुद्ध दांडगाई-हिंसाचार ह्यापेक्षा तिसरा स्टान्स काय असतो व का असावा? हे सो कॉल्ड तटस्थ कोण्या तिसर्‍याच जगात राहतात काय? हिंसाचार-दांडगाईचे क्रूर हात आपल्यापर्यंत पोचूच शकणार नाहीत असे वाटते का यांना?

आता ह्या सो कॉल्ड तटस्थांना असे तटस्थ राहण्याची चैन परवडणारी नाही हे माझ्या 'त्या' वाक्यातून सुचवायचे आहे असे मी अधिकृतपणे आता म्हणतो. जेव्हा त्या मारेकर्‍याने गोळी चालवली तेव्हा विचारले नाही श्रिनिवासला की 'बाबारे तू तटस्थ आहेस का? मग नै मारत तुला आज..' विचारसरणी ह्या किबोर्डटायपींगमधून उमटलेल्या अक्शरांमध्ये नसतात. त्या आपल्या आजूबाजूला जीवंत फिरत असतात. त्या तुम्ही कोणत्या बाजूचे हे विचारत नाहीत.

तुम्ही ते वाक्य लिहिलं तेव्हा तुमच्या डोळ्यासमोर ते खिल्ली उडवलेले लोक असतील हो पण इथे ते वाचणारे अनेक अनेक अनिवासी भारतीय आहेत ज्यांना खरोखर त्यांच्या सुरक्षिततेची चिंता वाटत असेल , ज्यांचा मोदी, गांधी, काँग्रेस, ब्रिगेड , भारतातले राजकारण वगैरेबद्दल भक्ती / दुश्मनी काहीही नाही आणि ज्यांना या कुचेष्टेची अन उपहासाची आत्ता अजिबात गरज नाहीये!
>> हे कोण्या एकाच देशाचे राजकारण नव्हे, सर्वच जगात कुठे ना कुठे घडतच आहे, हेच सांप्रत काळातले जीवन आहे, आजूबाजूला घडत आहे, परिणाम करत आहे तुमच्या-आमच्या जगण्यावर... कुणीही अलिप्त राहूच शकत नाही. अलिप्त राहणे हा पर्याय नाहीये आता. शांतता-प्रेम किंवा द्वेष-हिंसा ह्यापैकी कोण्यातरी एका बाजूत सामील व्हायलाच लागणार आहे. एवढाच पर्याय आहे.

तेव्हा मुद्दा हाच की एखादी अप्रिय घटना घडल्यावर "काय मग ! आता कसं वाटतंय, बरी अद्दल घडली" वगैरे लिहिण्याला जबाबदारीने लिहिणे म्हणत नाहीत.
>> येस! नाहीच म्हणत... तुमचे म्हणणे मला मान्यच आहे. कारण मी "बरी अद्दल घडली" अशा द्वेषमूल भावनेने ते वाक्य नव्हते लिहिले, तो द्वेष तुम्हीच परत परत सातत्याने जोडत आहात त्यात, त्यामुळे प्लिज असले काही अर्थ माझ्या वाक्यांना जाणूनबूजून चिटकवून मला आरोपीच्या पिंजर्‍यात उभे करायची गरज नाही. आई आपल्या अजाणत्या बाळाला दिव्याशी खेळू नको, चटका लागेल असे सांगते, तरी तो खेळतो आणि चटका बसून रडायला लागतो, तेव्हा त्याला ओरडण्यात आईची जी भावना असते, तोच भाव आहे त्या विधानात. कुणाचा जीव कोणी घेत आहे आणि मला त्याचा उपहास करावासा वाटेल ही एक अशक्य गोष्ट आहे. तसे होत असेल तर शांतता-प्रेम ह्या माझ्या विचारसरणीच्या उलट वागणे होईल, दांभिकता ठरेल.

अजूनही कळले नसेल तर सोकॉल्ड तटस्थपणा सोडून कोण्यातरी एका बाजूत सामील व्हा.. मग माझ्या म्हणण्याचा खरा अर्थ कळेल... कदाचित!

---------------------------------------

राजकारण, धर्मकारण, समाजकारण ह्यात बहुसंख्य लोकांना रस नसतो, किंवा 'मला काय त्याचे' ही वृत्ती असते.. ही वृत्ती त्यांच्यावर होणार्‍या परिणामांपासून त्यांना वाचवू शकत नाही. त्यापेक्षा ही व्यवस्था नीट करण्यात सक्रिय सहभाग असावा, चूक ला चूक म्हणावे, बरोबर ला बरोबर म्हणावे.. चार चांगले लोक चांगल्या कारणासाठी लढत असतील तर तिथे चाळीस जणांनी नुसते उभेतरी राहावे.. हे जग सुंदर, निर्भय होणे अशाच बहुसंख्य लोकांनी सहभाग घ्यायचे टाळल्याने थांबले आहे. अशा कातडीबचावू तटस्थपणाचे मला कोणतेही कौतुक नाही. अमेरिकेत राहणार्‍या भारतीयांनी काळाची ही पावले वेळीच ओळखायला हवी होती, ट्रम्प जेव्हा मुस्लिमांविरुद्ध उघड विरोधाची भूमिका घ्यायला लागला खरंतर तेव्हाच हे होण्याची शक्यता आहे असे इथल्या अनुभवांवरुन मला वाटले होते. पण बहुसंख्य अमेरिकास्थित भारतीय ट्रम्पच्या ह्या मुस्लिमविरोधी पवित्र्याच्या प्रेमात दिसले.

वैद्यबुवा इथे पटवून देत आहेत की बहुसंख्य अमेरिकन अशा विचारसरणीचे नाहीत, पण जे आहेत त्यांना मात्र अधिकृत राष्ट्राध्यक्ष ट्रम्पच्या वागण्याने अधिकृत हवा मिळाली आहे हे नाकाराल काय? एका साध्या जॉब गमावलेल्या माणसाला 'तुझा जॉब ह्यांनीच हिसकावला आहे' असे एकजण सांगतो, किंवा मुस्लिमांपासून आपल्या देशाला धोका आहे असे सांगतो आणि तोच अखिल राष्ट्राचा अध्यक्ष म्हणून निवडून येतो, ह्या प्रक्रियेतच त्या माणसाला वाटतं की अरे हा अध्यक्ष बनलाय इतक्या लोकांनी निवडून दिले म्हणून.. म्हणजे हा म्हणतो ते खरेच असेन. त्या एका ट्रम्पच्या बोलण्याला आता करोडो मतदात्या अमेरिकनांचे पाठबळ मिळाले आहे हे त्याला दिसतं. त्यामुळे आपण जो काही विचार करतो तो मॉब मेन्टॅलिटीमुळे बरोबरच आहे असे त्याला वाटतं. त्यातून वैयक्तिक तो काय कारनामे करतो त्याची जबाबदारी त्याची स्वतःची असली तरी जीव मात्र त्याच्या सारख्याच दुसर्‍या एका सामान्य माणसाचा जातो.

कोणाही अमेरिकास्थित भारतीयांनी घाबरुन इकडे यायची गरज नाही, तिथेच राहा, ही बदलती परिस्थिती समजून घ्या, त्याला सामोरे जा, परस्परसौहार्द्र आणि प्रेम ह्या दोन गोष्टींनी ह्या विकृत मनोवृत्तीशी लढा द्या. यापेक्षा जास्त काही सांगू शकत नाही...

याउप्परही वरिल मेगाबायटी समजला नसेल तर त्यांच्यासाठी परमेश्वराकडे प्रार्थना करतो आणि असे वाटत असेल की मी त्यांच्या भावना दुखावल्यात तर मी जाहीर माफी मागतो.

हिंदूना द्विभार्या प्रतिबंधक कायदा लागू आहे तेच शेजारी राहणारा ४ बायका करू शकतो आणि त्याला कोणी जेलमध्ये घालणे सोडा जाब विचारायला जात नाही. एकाच देशाच्या नागरिकांना दोन वेगळे नियम

>> हेच ते हेटमॉनगरिंग! विषयाच्या खोलात न जाता, तथ्ये तपासून न पाहता, कोणीतरी भरवलेल्या गोष्टींनी चिथावले जाऊन द्वेषाची पेरणी करत राहायची.

राजसी. एकापेक्षा जास्त बायका असणारे हिंदु आणि एकापेक्षा जास्त बायका असणारे मुस्लिम ह्यांची अधिकृत आकडेवारी जरा घेऊन या. मग बोलूया चार चार बायकांबद्दल.. Happy

मला तर अजूनही कळले नही की हा चार बायकांचा मुद्दा सतत मांडत असणार्‍यांना नेमका प्रॉब्लेम काय आहे? हिंदुंना चार बायका करायला मिळत नाही ह्याचा संताप की मुस्लिमाला चार बायका करायची परवानगी आहे ह्याचा मत्सर? एग्झॅक्टली आहे तरी काय हा प्रकार?

कोणाही अमेरिकास्थित भारतीयांनी घाबरुन इकडे यायची गरज नाही, तिथेच राहा, ही बदलती परिस्थिती समजून घ्या, त्याला सामोरे जा, परस्परसौहार्द्र आणि प्रेम ह्या दोन गोष्टींनी ह्या विकृत मनोवृत्तीशी लढा द्या. यापेक्षा जास्त काही सांगू शकत नाही...>>>>>>> आम्हाला हे लागू होत नाही कारण आम्ही पहिल्या पासूनच हे सगळं करतो त्यामुळे परत हे सांगून काहीच उपयोग नाही. आम्ही कधीही अशा विकृत मनोवृत्तीचा पुरस्कार केलेला नाही त्यामुळे हा सल्ला आम्हाला द्यायची काहीच गरज नाही.

मला तर अजूनही कळले नही की हा चार बायकांचा मुद्दा सतत मांडत असणार्‍यांना नेमका प्रॉब्लेम काय आहे? हिंदुंना चार बायका करायला मिळत नाही ह्याचा संताप की मुस्लिमाला चार बायका करायची परवानगी आहे ह्याचा मत्सर? एग्झॅक्टली आहे तरी काय हा प्रकार?>>>> +1000000000000

वैद्यबुवा.... हे आम्ही आम्ही म्हणजे कोण हो? सईताईंनी हा धागा तुमच्या एकट्यासाठी काढलाय काय?>>>>>> आमच्या एकट्यासाठी नाही पण सगळ्यांसाठी आहे. त्या सगळ्यांमध्ये आम्ही पण येतो, इतर बरेच लोकं येतात, जे चर्चेच्या विषयाचा धागा धरुन बोलत आहेत. ह्याचा विचार तुम्ही न करता सगळ्यांना संबोधून तुम्ही आधी तुमच्या छोट्या बाईटीत एटित बोलून गेलात. त्या नंतर मैत्रेयीनी त्या विषयी आक्षेप घेतल्यावर वर परत आणखिन एटित त्याहून मोट्ठी बाईटी टाकलीत ज्यात परत तेच बादरायण कनेक्शन अन तोच बिनकामाचा अन बिनबुडाचा सल्ला दिलात म्हणून मी केव्हाचा पोस्ट प्रपंच करत आहे.
आज काल इथे आणि व्हॉट्सअ‍ॅप वर फॅशनच आहे. कशात काही कनेक्शन नसताना त्यातून वरकरणी अगदी मुद्देसूद वाटेल असे आर्गुमेंट करायचे.

सई, सगळ्या पोस्टींना अनुमोदन (हे सांगायचं राहिल Happy )

कुठल्याही बाईला "तू ओप्रेस्ड आहेस का?" तुला हा हिजाब घालणे बंद करायचे आहे का? असा प्रश्न व्यक्ती पासून सरकारपर्यंत कुणीही विचारुदेत. ती खरंच ओप्रेस्ड असेल तर तिला हो म्हणण्याचे सुद्धा भय आहे. त्यामुळे हिजाब घालू नका असा कायदा केला तर ते फक्त वर वरचे उपचार होतील. आणि समजा ती म्हणाली की नाही घालत मी हिजाब, मला घरातले बाहेर काढतील तुम्ही माझे पुनर्वसन करा. मला काही शिक्षण नाहीये आणि ३ लहान मुलं आहेत. तर अशा असंख्य मुस्लिम बायकांचे आणि त्यांच्या मुलांचे पुनर्वसन करायची व्यवस्था सरकारकडे असेल का?

बायकोने बुरखा घातला नाही म्हणून तिला तीन लहान मुलांसकट घराबाहेर काढणारे असंख्य 'घरातले' अमेरिकेत असणं हाच मोठा धोका अनेक अमेरिकन्सना वाटतो आहे. अमेरिकन गोरे विचार करत आहेत की हे असे लोक माझ्या देशात का आले- का येऊ दिले गेले? उदया यांची संख्या व राजकीय ताकद वाढत गेली तर माझ्या व्हाईट ख्रिश्चन पोरीवर पण सार्वजनिक ठिकाणी हिजाबची सक्ती होणार काय?

वैद्यबुवा... जाउद्या, तुम्ही फक्त एवढंच वाक्य वाचा...

याउप्परही वरिल मेगाबायटी समजला नसेल तर त्यांच्यासाठी परमेश्वराकडे प्रार्थना करतो आणि असे वाटत असेल की मी त्यांच्या भावना दुखावल्यात तर मी जाहीर माफी मागतो.

तुमची माफी काही उपयोगाची नाही बघा, कारण पहिल्या वाक्यात आम्हाला नेमकं तुम्ही काय बोलत आहात ते समज नाहीये असं तुम्ही म्हणत आहात. माफी म्हणजे काही तोंडावर फेकायची गोष्ट आहे का? त्या पेक्षा समजून घेतलत, नीट आर्गुमेंट तपासून पाहिलात तर ते जास्त योग्य नाही का?

नानाकळा,
जाऊ द्या हो.
कुठे आपली एनर्जी या लोकांवर वेस्ट करता.
देवाने या लोकांसाठीच ट्रम्पला जन्माला घातलंय असं समजा!

त्या पेक्षा समजून घेतलत, नीट आर्गुमेंट तपासून पाहिलात तर ते जास्त योग्य नाही का?

>>> लुक हु इज टॉकिंग..... Wink

सातीतै... बेस्ट सल्ला! ह्या धाग्यावरुन आता कल्टी. धन्स!

गंमतच आहे. जसे काही आपण डोळे दिपवणारी भाषा वापरली नाही तर दुस-या कुणाला तरी प्रतिसादाबद्दल नोबेल पारितोषिक किंवा ५ मिलियन डॉलर्स मिळणारेत अशीच जमाडी जंमत चालू आहे. समजा तसे मिळणारच असतील तर प्रतिसादात मुद्दा असेल तर देतीलच ना ते... कि दिपून गेल्याशिवाय ते ही ऐकणार नाहीत ?

>>नानाकळा,
जाऊ द्या हो.
कुठे आपली एनर्जी या लोकांवर वेस्ट करता.
देवाने या लोकांसाठीच ट्रम्पला जन्माला घातलंय असं समजा!
Submitted by साती on 10 March, 2017 - 14:04>>

सातीताई, अभिनंदन!!! हीच ती मायबोलीवरची रिडिक्युलस विकृत मनोवृत्ती/मेंटॅलिटी ज्याबद्दल मैत्रेयीने पहिल्याच पोस्टमध्ये नानाकळा ह्यांना विचारलं होतं. तुम्ही जाहिररित्या ती आहे आणि इथेच नांदतेय हे दाखवून दिल्याबद्दल अभिनंदन केलंय. Happy
सई, मागच्या पानावरची हिजाब पोस्ट पटली आणि आवडली.

नानाकळा,
जाऊ द्या हो.
कुठे आपली एनर्जी या लोकांवर वेस्ट करता.
देवाने या लोकांसाठीच ट्रम्पला जन्माला घातलंय असं समजा!>>>>>> Lol ट्रंप ला येऊ दे किंवा अजून कोणाला, आम्ही पण इथेच उभे आहोत झंडा गाडून. काही वर्षांनी ट्रंप गेलेला असेल तरी इमिग्रंट्स इथेच असणार आहेत, त्याच कारण सोपं आहे. गरज. मार्केटची गरज सबसे बडा भाई आहे. हॅपी जंपींग साती! Proud

इथे वेगळ्या मुद्द्यावर बरीच चर्चा झाली आहे.
@अमितव @सई : माझा मुद्दा असा होता की रॅडिकल ईस्लाम टेररीस्टचा प्रॉब्लेम आहे हे म्हणण्याने धार्मिक ध्रूवीकरण होते असा समज नसावा.
४-५ केसेस असल्या तर कोणी असं म्हणाले नसते. पण आता बरीच वर्षे जगाला इस्लाम टेरेरिस्ट चा त्रास होत आहे. कितीतरी अतिरेकी संघटना उघड उघड जिहादचा पुरस्कार करत आहेत. लोखो लोक देशोधडी ला लागले आहेत. मिलियन्स डॉलर इंटेलिजिन्स सिस्टीम वर खर्च होत आहे. त्यांचे हल्ले थोपवले नसते तर अजून जास्त प्रमाणात हल्ले झाले असते. गन कंट्रोल करायलाच हवा आहे. अमेरिकेत गन व्हायोल्न्सने , भारतात रोड अक्सिडंटने जास्त जीव जातात तो वेगळा प्रश्न आहे पण त्यामुळे टेरेरिस्टचा धोका कमी होत नाही.
सीरियातून दोन पोरे काखेत घेऊन बोटीतून उतरताना ठेचकाळून पडलेल्या आईचा फोटो दाखवला तर डोळ्यात पाणी येते म्हणूनच त्यांची अशी अवस्था करणार्‍या रॅडिकल ईस्लाम टेररीस्टचा निषेध केला पाहिजे. टेरेरिस्टना धर्म नसतो हे पॉलिटिकली करेक्ट विधान झाले. "ब्लॅक अमेरिकन्स" मध्ये उच्च शिक्षणाचे प्रमाण कमी आहे, क्राईम रेट जास्त आहे हे मान्य केले तरच ते सुधारण्यासाठी प्रयत्न करता येतील आणि अजून जास्त ओबामा सारखे लोकं तयार होतील. तसेच व्हाईट सुप्रिमसी साठी. सगळं आलबेल आहे असं समजणे डोळ्यावर झापडे लावल्यासारखे होईल.

त्यांची तुलना बाहेरून येऊन रोजगार पळवणा-यांविरुद्ध तथाकथित जागृती करणा-या तथाकथित नायकांशी करता येईल.
अहो कुणि पळवत नाहीत हो रोजगार - इथलेच लोक त्यांना आपणहून देतात. घर साफ करायला अमेरिकन लोक १५० मागतात तर लॅटिनो ७५! कोण नाही ठेवणार लॅटिनो ला? आता ते कायदेशीर आले का वगैरे विचारत बसला तर ते येणार नाहीत मग देणार का १५०? म्हणून तुम्ही गप्प बसता. आणि मग जिथे ७५ डॉ. ऐवजी लाख डॉलरचा प्रश्न असेल तिथे शेतात काम करायला मोठे शेतकरी अश्या बेकायदेशीर लोकांना ठेवतात. हा दोष त्या गरीब लोकांचा की तुमच्या संपूर्णपणे फसलेल्या पॉलिसी चा? इतक्या वर्षांत तुम्हाला अक्कल नाही की काही काही पॉलिसीज बदलाव्या लागतात, ते केल नाही!!
मूर्खपणा स्वतः करायचा, आपल्याच लोकांनी पैशाचा हव्यास करायचा नि दोष मात्र दुसर्‍यावर, विशेषतः दुर्बल लोकांवर. अजापुत्रं बलिं दद्यात् दैवो दुर्बलघातकः - माहितय आहे सगळ्यांना. तेंव्हा आता बंद करा बेकायदा घुसखोरांना दोष देणे, आणि पूर्णपणे कायदेशीर रीत्या आलेल्या नि आपली लायकी पटवून दिलेल्या इमिग्रंट्स ना. अक्कल असती अमेरिकनांना तर असे झालेच नसते - अकलेपेक्षा, देशापेक्षा यांना पैसा प्यारा. मग असेच होणार!
अर्थात बरेच लोक बेकायदेशीर येतात हे खरे आहे, पण कायद्याने त्यातहि पळवाटा आहेत. शिवाय उपाशी रहाण्यापेक्षा जरा धोका पत्करून इकडे आले तर त्यांना दोष देणार का?
“Give me your tired, your poor, Your huddled masses yearning to breathe free,
The wretched refuse of your teeming shore.
Send these, the homeless, tempest-tossed to me, I lift my lamp beside the golden door!”

असे तुमच्या लिबर्टी च्या पुतळ्यावरच लिहीले आहे ना? मोठ्ठा अभिमान आहे ना तुम्हाला त्याचा? मग आले हे लोक तर का ओरडता? किती ढोंगी पणा करावा? जमत नसेल तर प्रथम तो पुतळा काढून टाका - जगापुढे मोरॅलिटी, लोकशाही, कॅपिटॅलिझम इ. च्या बढाया मारू नका यातले एकहि धड जमत नाही अमेरिकनांना! नुसते कुठेतरी जाऊन बाँब टाकायचा एव्हढेच माहिती!! तेहि इरा़क, ग्रेनेडा सारख्या लहान देशांवर, हिंमत आहे का चीन, रशिया कडे वा़कड्या नजरेने बघण्याची?

कोणाही अमेरिकास्थित भारतीयांनी घाबरुन इकडे यायची गरज नाही, तिथेच राहा,
घाबरू नका कुणि येत नाही भारतात, आलो तर अत्यंत असूयेने बघतात नि बोलतात तिथले लोक. कधी अनुभवले आहे का?

नि समजा घाबरून नाही तरी स्वेच्छेने आले तर तुम्हाला का काळजी त्याची? तुमच्या नोकर्‍या तर जात नाहीत ना? तसेहि जास्त दिवस रहाणारच नाहीत. कुणीच रहात नाहीत.
अमेरिकेत आल्यावर लोकांना वाटते इथेच रहावे, भारतात आल्यावर घरी कधी परत जातो अमेरिकेत असे होते!
हे अर्थातच अत्यंत वैयक्तिक. उगाच इतर लोकांची काय मते आहेत हे सांगण्या इतकी अक्कल किंवा घमेंड नाही.

नाना,
इथे सल्ले द्यायचा अधिकार फक्त त्यांनाच आहे.
वाद घालू नका.

ता.क. साती यांना १०००% अनुमोदन.

अहो कुणि पळवत नाहीत हो रोजगार - इथलेच लोक त्यांना आपणहून देतात. >>>> बरं. एक मुद्दा विचारात घेतल्याबद्दल धन्यवाद.
https://www.quora.com/Why-does-American-media-project-that-India-steals-... इथे युक्तीवाद केला तर काही तरी आउटपुट मिळेल. मराठी भाषिकांमधेच युक्तीवाद करून अमेरिकनांच्या डोक्यात काय प्रकाश पडणार ? कप्पाळ ?

नानाकळांच्या सगळ्या पोस्ट्ससाठी +१

<याउप्परही वरिल मेगाबायटी समजला नसेल तर त्यांच्यासाठी परमेश्वराकडे प्रार्थना करतो>
प्रतिसाद समजून घ्यायचाच नाहीए.

यारब वो न समझे हैं न समझेंगे मेरी बात
दे और दिल उनको जो न दे मुझको जुबां और

जात्यातले रडतात, सुपातले हसतात. दुसर्‍या जात्यात भरडल्या जाणार्‍यांना पाहून हसणार्‍यांना (हसलो नव्हतो इत्यादी मखलाशीला उशीर झालाय. सन्माननीय अपवादांनी स्वतःला लावून घेऊ नये) आपण फक्त सुपात आहोत, याची जाणीव असायला हवी इतकाच या सगळ्याचा अर्थ.

मला उलट ते स्वामी विश्वरूपानंद आवडले. निदान पोटात एक ओठावर दुसरं असं नाही.

हीच ती मायबोलीवरची रिडिक्युलस विकृत मनोवृत्ती/मेंटॅलिटी ज्याबद्दल >>ही पोस्ट सायो सारख्यांनी लिहावी .. यातच सारे आले. Wink

असो. जास्त विषयांतर नको.
--------------------------------------------------------------------------------------------------

जग हे आता कट्टरतेकडे जास्त झूकू लागले आहे. याचे मुख्य कारण धार्मिक बरोबर बेरोजगारी पण आहे. आयएसआयएस या दहशदवादी संघटनेने जगभरातील मुस्लिम तरुणांना जॉब ऑफर केली होती. पेट्रोलियम, संगणक, इ. विविध क्षेत्रात जॉब ऑफर , पैसाचे आमिष देऊन तरुणांना आपल्या बाजूने वळवून घेतले होते. निव्वळ लढणे या प्रकारात आयएसआयएस ने बदल केला आहे. त्याच्याच पायावर पाय ठेवून "बोको हराम", जपानचा ओम शिंक्रिओ इ. संघटनांनी या बेरोजगारीचा फायदा उचलायला सुरुवात केली आहे. असा फायदा आधी मुंबई अंडरवर्ल्डने उचललेला. तो मोठ्या प्रमाणात यशस्वी झाला होता. दाऊद, छोटा राजन, कल्याणचा मंचेकर, अश्विन नाईक इ. टोळ्यांनी कॉलेज ड्रॉपआउट मुलांना आमिष दाखवून ड्रग्स, तस्करी सारख्या गुन्ह्यात सामिल केले होते. जेव्हा या मुलांना पकडले गेले तेव्हा गँग मधे भरती होणारे मुल ही प्रामुख्याने "झोपडपट्टी" मधून आलेली असतात या मुंबई पोलिसांच्या विश्वासाला तडा गेला होता. त्यानंतर कॉलेज, युनिवर्सिटी, महाविद्यालय यांच्यावर मुंबई पोलिसांचे लक्ष वळले. त्याचाच एक भाग म्हणून "कॉलेज निवडणूका" या बंद केल्या गेल्या. ज्याचा सकारात्मक परिणाम दिसला.

आता हीच अंडरवर्ल्डची टेक्निक जगभरातील दहशदवादी संघटना वापरू लागली आहे. धार्मिक कारणांबरोबर बेरोजगारीचा मुद्दा उचलून घेतला आहे.
त्यावरून इतर मुद्दे निर्माण करून तरुणांचे लक्ष विचलित करणे सुरु आहे. ट्रंप सारखा नेता (नेता म्हणणे खरतर चुकिचे आहे तरीपण) जो देश सर्वोच्च स्थानी आहे हे जागतीक सत्य आहे अशा देशातील लोकांना "आपल्याला पुन्हा देश सर्वोच्च स्थानी घेऊन जायचा आहे" असा अजब मुद्दा उचलतोय आणि त्यावर बहुसंख्य जनता विश्वास ठेवून त्याला पाठिंबा देत आहे. या मानसिकतेची व्याख्या होणे कठिण आहे.
उद्या तुम्हाला एव्हरेस्ट वर उभे करून .. " माझ्यावर विश्वास ठेव.. मी तुला अजुन उंच शिखरावर पोहचवेल" असे बोलण्यासारखे आहे. पण तरी लोक त्याला सुध्दा भुलले आहे. यामागे ध्रुवीकरण हाही एक घटक आहे.

लोक झटपट कोण देईल, विनाश्रम कोण देणार त्याच्या मागे जाऊ लागली आहे. मग त्यासाठी समोरचा त्यांच्यासमोर कितीही खोटे बोलला किती ही चुकिचे सिध्दांत मांडला तरी त्यावर डोळे झाकून विश्वास ठेवू लागली आहे. "मी नाही माझ्यासाठी सरकारनेच प्रयत्न केले नाही" हे लवकर कॅच केले जाऊ लागले . अशा मनस्थितीला खतपाणी दिले गेले की अर्धे काम फत्ते झाले. मुळात आपली तितकी क्षमता आहे का याकडे लक्षच देत नाही.
भारतीय इंजिनिअर्स यांचे काम त्याची क्वालिटी याला अमेरिकन तोडीसतोड देउ शकतात का? तर नाही. उद्या भारतीयांना काढल्यानंतर ते काम त्याच क्षमतेने अमेरिकन्स करु शकणार आहे का ? हा मुख्य प्रश्न आहे. उदा. महाराष्ट्रात युपीवाले ज्या क्षमतेने काम करतात त्याच क्षमतेने तितक्याच पैशात मराठी/ स्थानिक लोक करत नाही. उलटपक्षी युनियन, टीपी, दादागिरी, इ. कामाव्यक्तिरिक्त बरेच काही चालते. त्याचा परिणाम कंपनी इ. वर होतो.
मग ते का स्थानिक लोकांना भरती करतील ? याकडे नेते लक्ष देणार नाही. जपान हा लहानसा देश आहे. तिथे ही बाहेरुन आलेले लोक काम करतात परंतू तिथे असा कुठला मुद्दा नाही. कारण तिथले लोकच इतके जास्त सक्षम आहे की त्यांच्याकडे अशा प्रश्नाकडे लक्ष द्यायला वेळ नसतो.
तिथे ही बेरोजगारी असेल नाही असे नाही. पण तिथले राजकारणी इ. लोकांकडून तो मुद्दा उचलला गेला नाही अथवा लोकांनी त्यास सपशेल नाकारले.

मुख्य मुद्यांवरुन लक्ष वळवून इतर कट्टरवादी फालतू मुद्यांवर लोकांना एकत्र करा, मनात विष मिसळा, आणि विरोधकांवर सोडा. हे आता राजकारणाचे सुत्र जगभरात यशस्वी ठरू लागले आहे. अमेरिका नंतर आता जर्मन, फ्रांस, इंग्लंड, ऑस्ट्रीया, ग्रीस, तुर्कस्थान, इ. असंतोषाच्या उंबरठ्यावर उभे असणार्‍या देशांमधे हे येत्या काही काळात सुरु होणार आहे. / अथवा सुरु केले जाईल.

>>म्हणजे तुम्ही लिहिणारच हे ही खरं तर सायोकाकूंनी प्रेडिक्ट केले होते.>> अगदी... सातीताई/काकूंच्या मदतीला अनुमोदन देत कोण कोण धावून येणार ह्यावर आकडे लावले होते. Wink क्रम चुकला पण माणसं नाहीत. कंपूबाजी हो. Wink

अमेरिका नंतर आता जर्मन, फ्रांस, इंग्लंड, ऑस्ट्रीया, ग्रीस, तुर्कस्थान, इ. असंतोषाच्या उंबरठ्यावर उभे असणार्‍या देशांमधे हे येत्या काही काळात सुरु होणार आहे. / अथवा सुरु केले जाईल >>

वरचे सगळे देश प्रगत मध्ये मोडतात. तरीही आपण ते असंतोषाच्या उंबरठ्यावर आहेत, असे लिहिले. तर एक प्रश्न आहे. हे देश असंतोषाच्या उंबरठ्यावर का आहेत?

हे देश असंतोषाच्या उंबरठ्यावर का आहेत?>> अमेरिका सुध्दा प्रगत आहे. तरी तिथे असंतोष आहेच ना.? तसेच.
अर्थात प्रत्येक देशाचे प्रश्न वेगवेगळे आहे. आता ते तेथील राजकारणी लोक त्या प्रश्नांना शांततेत सोडवतात की ट्रंप सारखे आगी लावतात हे येणारा काळ सांगेल.

Pages