किस्से आणि निरीक्षणं (भाग २)....ट्राफिक मधली गम्मत.

Submitted by बग्स बनी on 4 March, 2017 - 15:35

नमस्कार मायबोलीकर, कसे आहेत सगळे?
मागील भागात मी स्टेशन वरचा किस्सा सांगितला होता, या भागात मी काही गमतीदार निरीक्षणं मांडणार आहे. मला खात्री आहे, तुम्ही जेव्हा कधी रस्त्याने प्रवास कराल तेव्हा अशी निरीक्षणं करून स्ट्रेस फ्री व्हाल, आणि हसाल.

तर, रस्त्यांवरून आपण नेहमीच प्रवास करतो, त्या वेळेस आजूबाजूला बरेच सहप्रवासी असतात, चालक असतात, मुंबई वरच्या रस्त्यावर ड्रायव्हिंग करणे फार जोखमीचं. इथला प्रत्येक ड्राइव्हर हा फ्रस्ट्रेटेड असतोच असतो. मी स्वतः एक ट्रॅव्हेलर असल्यामुळे अनुभवावरून सांगतो. सगळेच, या ट्राफिक ला आणि वाहन चालवण्याच्या पद्धतीवर वैतागलेले असतात. शिवाय मध्ये मध्ये चालणाऱ्या पादचाऱ्यांचं दुखणं तर वेगळंच. पण या सगळ्यांवर रिऍक्ट होऊन आपण आपलं मन कितपत विनाकारण दूषित करायचा हा ज्याचा त्याचा प्रश्न. पण मला पर्सनली वाटतं कि या सगळ्या गोष्टींवर शांत राहून त्या घटनांना मजेशीर वळण देऊन आपण आपला मूड खराब करण्यापासून वाचु शकतो. खरंतर आपण याकडे विनोदी दृष्टिकोनातून पाहिलं पाहिजे. म्हणजे मी अशी बरीच निरीक्षणं करत असतो. त्यातलेच काही......

काही लोक दुचाकीवरून जात असताना, गाडीचा गिअर बदलण्यासाठी अशाप्रकारे पाय फिरवतात....कधी कधी वाटतं, चुकून एखादा पाय निघून माझ्या गाडी खाली येतो कि काय? जाम भ्या वाटत Happy म्हणजे बघा ना, गिअर आपण सहज सिम्पल हळू बदलू शकतो, त्यासाठी पाय एवढा का फिरवायचा?

आजकाल सगळीकडे स्पोर्ट बाईक्स चा जमाना आहे, त्यात एखाद्या स्पोर्ट्स बाइकवल्याच्या बाजूने साधी गाडी गेली तर तो स्पोर्ट्स बाईक वाला अशा नजरेने बघतो कि, त्याच्या बायकोला त्याच्या समोर कोणी तरी डोळा मारून निघालाय. Happy

काही जण आपली गाडी अशी पळवतात अशी पळवतात कि १०००० सी सी च इंजिन त्याच्या एकट्याच्याच गाडीला बसवलंय. अशा लोकांना पुढे पोलिसांनी पकडलं कि फार आनंद होतो. (आसुरी आनंद)"फाडा १००० ची..." Happy

काही लोकांना गाडीवर बसून हवा करायची भारीच हौस, अशी लोकं मस्तपैकी आजूबाजूची हिरवळ बघत चाललेले असतात. आणि जर का ह्यांना हॉर्न वाजवून डिस्टर्ब केलं कि ते असा लुक देतात कि, खाऊ कि नको. जणू काय ह्यांना महत्वाच्या कामातून डायव्हर्ट केलंय. Happy

सिग्नल वरची गोष्टच वेगळी, जर सिग्नल लागला असेल आणि आपण जर सगळ्यात पुढे असेल तर एखाद्या भव्य रेस मध्ये आल्याचा फील येतो. मग काय... कधी कधी मी हि सामील होतो..मग सगळ्यात पुढे असल्याचा आनंद काही वेगळाच. Happy Wink

काही वेळा सिग्नल सुटायला ५सेकंद असतानाच लोकं सुसाट सुटतात, मग काय पुढे गेल्यावर फाऊल. "घे बाजूला गाडी अन फाड १०० ची" (पावती) Happy

काही लोकं गाडी वर अशा स्टाईल ने हेल्मेट घालतात, जणू काय "धूम" मधला हिरो, अन पुढे जाऊन बँक लुटायचीय त्याला. Happy

एकदा असाच निघालो होतो, समोरून एक ३०-३५ वयाची महिला तिच्या ऍक्टिव्हा स्कुटी वरून येत होती, आउटसाइडने. जवळ जवळ आमची धडक होणारच होती, पण वाचलो. मी काही बोलणार इतक्यात तीच बोलली, दिखता नही क्या? अन निघून गेली. आता काय बोलावं या माउलीला ? वोल्लेटमधून लायसन्स काढून तपासलं....नक्की पास झालोय ना? Happy Happy

काही लोकं हेल्मेट घालायलाच मागत नाहीत, मग तिथे उन्हात त्यांचं तोंड कोळश्यासारखा करपलं तरी चालेल. Happy

सिग्नलवर उभे असताना तर फारच गम्मत, कोणाकडेच करायला काही नसल्याने एकमेकांच्या गाडीकडे, तोंडाकडे अधाश्या सारखा बघणं. मग त्यातल्या त्यात एखादं भारदस्त व्यक्तिमत्व मागून येतं. सगळ्यांच्या नजरा त्याच्याकडे खिळतात, तो हेल्मेटची काच वर करतो. तोंडाचा चंबू करून तोंडातला सगळा ऐवज रस्त्यावर उपडी. मग त्याच्या कडे बघणाऱ्यांची रिऍक्शन बघण्यासारखी असते. थुंके पर्यंत सगळे अगदी इंट्रेस्टिंग्ली बघतात पण थुंकल्यावर सगळे आपले इकडे तिकडे पाहतात, काही विचित्र, तर त्या थुंकी कडे इतके टक लावून बघतात इतकं टक लावून बघतात कि जणू काय लॅब चा सॅम्पल सिरम पडलाय, आणि ते लोक आता टेस्ट करून सांगतील कि काय खाऊन थुंकलाय.

(क्रमशः....)

तुम्ही भाग १ या खालील लिंक वर वाचु शकता
http://www.maayboli.com/node/61872

Group content visibility: 
Public - accessible to all site users