शाळेचे ते दिवस परत नाही येणार...

Submitted by अक्षय. on 4 March, 2017 - 05:23

काल पुस्तक शोधताना ही एका पानावर लिहून ठेवलेली कविता सापडली. दहावीच्या निरोप समारंभाला लिहलेली माझ्यानंतर माझ्या लहान भावंडानी पण हीच कविता त्यांच्या निरोप समारंभात वाचून दाखवल्या. खरतर फोटोच पाठवणार होतो पण कुठेतरी चायनीज भाषा वाचतोय की काय असं वाटू नये म्हणून कीबोर्ड वर बोटे आपटली.
शाळेचे ते दिवस परत नाही येणार ...
काही रस्ते आम्ही न थकता चालायचो
काही क्षण थांबवून थांबत नाहीत
आठवणी बनला तो प्रत्येक क्षण
शाळेचे ते दिवस परत नाही येणार ...
लहानपणी मोठे होणं एक स्वप्न होतं
आणि लहानपणच आठवण झालेली होती
आनंद कशात असतो हे आज कळलय
लहानपण काय होतं ते आज उमगलय
शाळेचे ते दिवस परत नाही येणार ...
चिमणी चिमणी पाणी पी हत्ती घोडा नाचूदे
म्हणत पाठीवरच पाणी सुकवण
पेन्सिल साठी भांडणं
मैत्री मधले ते रूसवे फुगवे
बड्डेला नवीन ड्रेस घालून येणं
एकूण काय तर प्रत्येक क्षण आनंदाने जगणं
ते खेळाच्या तासाला ग्राउंडवर खेळणं धडपडन खरचटन
ते हारणं जिंकण ते छोट्या छोट्या कारणासाठी भांडणं
असे कित्येक क्षण निसटले ते घर तुटलं ते लहानपण संपलं
खूप प्रेमळ आठवणी देऊन गेलं
ते लहानपण हाळूच माझ्या हातून निसटून गेलं
फिरसे मुझे जिने दो जरा फिरसे मुझे स्कुल जाने दो जरा
शाळेचे ते दिवस परत नाही येणार ...

Group content visibility: 
Public - accessible to all site users

मस्तच हो दादा...
खरच ते दिवस नाही येणार आता....
जुन्या आठवणी ताज्या झाल्या हि कविता वाचून... Happy

शेखरजी धन्यवाद.
च्रप्सजी धन्यवाद अश्या प्रतिसदामुळेच लिहायला आणखी मजा येते.
धन्यवाद मिनलजी बदल केला आहे.

@ अक्षय दुधाळ, काल पुस्तक शोधताना ही एका पानावर लिहून ठेवलेली कविता सापडली. दहावीच्या निरोप समारंभाला लिहलेली >>> छान कविता! आवडली. कवितेत त्या कोवळ्या वयातसुद्धा आपणांकडे असलेली प्रगल्भता जाणवून येते.