काल पुस्तक शोधताना ही एका पानावर लिहून ठेवलेली कविता सापडली. दहावीच्या निरोप समारंभाला लिहलेली माझ्यानंतर माझ्या लहान भावंडानी पण हीच कविता त्यांच्या निरोप समारंभात वाचून दाखवल्या. खरतर फोटोच पाठवणार होतो पण कुठेतरी चायनीज भाषा वाचतोय की काय असं वाटू नये म्हणून कीबोर्ड वर बोटे आपटली.
शाळेचे ते दिवस परत नाही येणार ...
काही रस्ते आम्ही न थकता चालायचो
काही क्षण थांबवून थांबत नाहीत
आठवणी बनला तो प्रत्येक क्षण
शाळेचे ते दिवस परत नाही येणार ...
लहानपणी मोठे होणं एक स्वप्न होतं
आणि लहानपणच आठवण झालेली होती
आनंद कशात असतो हे आज कळलय
लहानपण काय होतं ते आज उमगलय
शाळेचे ते दिवस परत नाही येणार ...
चिमणी चिमणी पाणी पी हत्ती घोडा नाचूदे
म्हणत पाठीवरच पाणी सुकवण
पेन्सिल साठी भांडणं
मैत्री मधले ते रूसवे फुगवे
बड्डेला नवीन ड्रेस घालून येणं
एकूण काय तर प्रत्येक क्षण आनंदाने जगणं
ते खेळाच्या तासाला ग्राउंडवर खेळणं धडपडन खरचटन
ते हारणं जिंकण ते छोट्या छोट्या कारणासाठी भांडणं
असे कित्येक क्षण निसटले ते घर तुटलं ते लहानपण संपलं
खूप प्रेमळ आठवणी देऊन गेलं
ते लहानपण हाळूच माझ्या हातून निसटून गेलं
फिरसे मुझे जिने दो जरा फिरसे मुझे स्कुल जाने दो जरा
शाळेचे ते दिवस परत नाही येणार ...
मायबोलीचे मोबाईल अॅप (अँड्रोईड + आयओएस) सर्वांसाठी उपलब्ध आहे.
मस्त !!..
मस्त !!..
मस्तच हो दादा...
मस्तच हो दादा...
खरच ते दिवस नाही येणार आता....
जुन्या आठवणी ताज्या झाल्या हि कविता वाचून...
प्रसन्न , कावेरि धन्यवाद
प्रसन्न , कावेरि
धन्यवाद
छान !!
मस्त !!.
मस्त... तुमचे लेखन प्रामाणिक
मस्त... तुमचे लेखन प्रामाणिक असते...
त्यामुळे वाचून रिफ्रेश होतं मग...
पुढील लेखनाला शुभेकचा
Akshayji...why its येनार ???
Akshayji...why its येनार ??? Why not येणार.??
शेखरजी धन्यवाद.
शेखरजी धन्यवाद.
च्रप्सजी धन्यवाद अश्या प्रतिसदामुळेच लिहायला आणखी मजा येते.
धन्यवाद मिनलजी बदल केला आहे.
मस्त...
मस्त...
Good one...आता वाचायला छान
Good one...आता वाचायला छान वाटलं
धन्यवाद मिनलजी.
धन्यवाद मिनलजी.
खूप सुंदर..
खूप सुंदर..
छान...
छान...
@ अक्षय दुधाळ, काल पुस्तक
@ अक्षय दुधाळ, काल पुस्तक शोधताना ही एका पानावर लिहून ठेवलेली कविता सापडली. दहावीच्या निरोप समारंभाला लिहलेली >>> छान कविता! आवडली. कवितेत त्या कोवळ्या वयातसुद्धा आपणांकडे असलेली प्रगल्भता जाणवून येते.
मस अक्षय खुप छान
मस अक्षय खुप छान
खुप मस्त....शाळेच्या आठवणि
खुप मस्त....शाळेच्या आठवणि परत जाग्या झाल्या खुप छान !!
सायू, राहुल, सचिनजी, पंडितजी
सायू, राहुल, सचिनजी, पंडितजी , डब्बू धन्यवाद.