मला आवडलेले मराठी नाटक - सही रे सही

Submitted by अक्षय. on 3 March, 2017 - 15:06

मला आवडलेले मराठी नाटक - सही रे सही

मराठीलं रंगमंचावर सादर झालेलं पहिल नाटक म्हणजे 'सीता स्वयंवर' विष्णूदास भावे दिग्दर्शित हे नाटक म्हणजे रामायणातला एक भाग. यानंतर मराठी रंगमंचाने कधी मागे वळून पाहिलेच नाही. विजय तेंडूलकर, पु.ल.देशपांडे, व.पु.काळे या लेखकांनी, त्यावेळेसच्या कलाकारांनी मराठी नाट्यभूमी गाजवली. हीच परंपरा पुढे टिकवण्याचे आव्हान हे आजच्या पिढीपुढे होती आणि ती उत्तम रित्या पार पाडली ती केदार शिंदे आणि भरत जाधव ह्या जोडगोळीने. केदार शिंदे लिखित आणि दिग्दर्शित ''सही रे सही" हे विनोदी आणि कौटुंबिक नाटक आहे.

एका सहीच्या खेळाभोवती गुरफटलेल्या ह्या नाटकाने संपूर्ण महाराष्ट्राच्या रसिक प्रेक्षकांच्या मनावर चांगलीच भुरळ घातली. नाटकाच्या कथेत जास्त शिरत नाही पण प्रस्तावना म्हणून सांगतो. मदन सुखात्मे नावाचा कारखानदार त्याच्या पत्नीस तिच्या प्रियकरा सोबत पकडतो. तो प्रियकर दुसरा तिसरा कोणी नसून सुखात्मेंचा पीए असतो. त्याच्यातले वाद प्रकोपाला जातो आणि त्या दोघांकडून ( सुखात्मेंची पत्नी आणि प्रियकर) त्यांचा खून होतो. एक तोतया आणून ते दोघे प्राॕपर्टी स्वतःच्या नावावर करुन घेण्याचा प्रयत्न करतात पण तो प्रयत्न फसतो कारण प्राॕपर्टी संदर्भात असलेल्या प्राॕपर्टी पेपर सुखात्मेंच्या मुलीकडे आणि नातेवाईकांकडे असतात आणि इथून सुरू होते ती सहीसाठी धडपड.

केदार शिंदे यांची कल्पकता आणि व्हिजनस म्हणजे ज्या पद्धतीने चार भरत जाधव लिलये खेळले पाहीजे होते तस साकारलं गेल. ह्या नाटकाची आणखी एक खासीयत म्हणजे नाटकाच संगीत. अजय-आतुल ह्या जोडगोळीने देखील ह्याच नाटकाने संगीताची सुरवात केली. सही रे सही ह्या गाण्यासाठीच ह्या जोडगोळीला पहिलं ॲवार्ड मिळालं. उत्क्रूष्ट लेखन, संवाद यांच मिलन असलेल हे नाटक आहे.

भरत जाधवच कौतुक कराव तेवढे थोडेच आहे. रंग्या ड्रायव्हर असो वा गलगले एजंट आसो की हरी सगळ्याच भुमिकांना त्यांना न्याय दिला. बाकी सर्व कलकारांनी पण चांगली साथ दिली पण केंद्रबिंदू भरत जाधव च होता संपूर्ण नाटक हे त्याच्या भोवतीच गुरफटलय. शेवटच्या क्षणी चारही पात्र तो जेव्हा एकत्र करतो तो नाटकातला सगळ्यात बेस्ट सिन वाटला. अस निखळ मनोरंजनात्मक नाटक बघीतल नसेल तर नक्की बघा "पुन्हा सही रे सही"...

Group content visibility: 
Public - accessible to all site users

सही रे सही फारच मस्त आहे. सिडी च्या स्वरूपात आले नाही त्यामुळे इतके चांगले चालले असे वाटते. दामोदरपंत पण मस्त होते पण सिडी वर आल्याने नंतर खरे नाटक पहायला कोण जाणार !

सीडी असली तरी ओरिजिनल ते ओरिजिनल ... कट्यारची सीडी आहे, यु ट्युबवर फुकटही आहे. तरी ओरिजिनल नाटक, सिनेमाला गर्दी होते.

मुळ सही रे सही आणि नविन पुन्हा सही रे सही दोन्ही नाटके पाहिली आहेत. चपळता आणि जलदपणा या नाटकासाठी महत्वाचा घटक आहे. वयोमानाप्रमाणे भरत जाधवच्या हालचाली आणि वेग मंदावला आणि नाटकातली मजाच निघुन गेली. आधीच्या निर्मात्या लता नार्वेकर यांनी भरत जाधवच्या ऐवजी नविन कलाकार घेऊन नाटक पुन्हा आणुया असे केदार केदार शिंदेला सुचवले होते. पण केदारला ते न पटल्यामुळे मुळ नाटक बंद पडले आणि नंतर पुन्हा नविन नावाने आले. चार-पाच संवाद आणि अर्थातच शेवटचा टायटल ट्रॅक सोडला तर बाकी सगळे नाटक तेच आहे. पण पुन्हा सहीला मुळ सहीची मजा येत नाही.

छान परिचय !! सही रे सही सहीच आहे. मी पुन्हा सही रे सही बघून ४-५ वर्ष झाली त्यावेळी भरत जाधवची एनर्जी क्लासच होती आताच काही माहिती नाही. शेवटच्या क्षणी चारही पात्र तो जेव्हा एकत्र करतो तो नाटकातला सगळ्यात बेस्ट सिन वाटला>>>>>>+१

Pages