मला आवडलेले मराठी नाटक - सही रे सही
मराठीलं रंगमंचावर सादर झालेलं पहिल नाटक म्हणजे 'सीता स्वयंवर' विष्णूदास भावे दिग्दर्शित हे नाटक म्हणजे रामायणातला एक भाग. यानंतर मराठी रंगमंचाने कधी मागे वळून पाहिलेच नाही. विजय तेंडूलकर, पु.ल.देशपांडे, व.पु.काळे या लेखकांनी, त्यावेळेसच्या कलाकारांनी मराठी नाट्यभूमी गाजवली. हीच परंपरा पुढे टिकवण्याचे आव्हान हे आजच्या पिढीपुढे होती आणि ती उत्तम रित्या पार पाडली ती केदार शिंदे आणि भरत जाधव ह्या जोडगोळीने. केदार शिंदे लिखित आणि दिग्दर्शित ''सही रे सही" हे विनोदी आणि कौटुंबिक नाटक आहे.
एका सहीच्या खेळाभोवती गुरफटलेल्या ह्या नाटकाने संपूर्ण महाराष्ट्राच्या रसिक प्रेक्षकांच्या मनावर चांगलीच भुरळ घातली. नाटकाच्या कथेत जास्त शिरत नाही पण प्रस्तावना म्हणून सांगतो. मदन सुखात्मे नावाचा कारखानदार त्याच्या पत्नीस तिच्या प्रियकरा सोबत पकडतो. तो प्रियकर दुसरा तिसरा कोणी नसून सुखात्मेंचा पीए असतो. त्याच्यातले वाद प्रकोपाला जातो आणि त्या दोघांकडून ( सुखात्मेंची पत्नी आणि प्रियकर) त्यांचा खून होतो. एक तोतया आणून ते दोघे प्राॕपर्टी स्वतःच्या नावावर करुन घेण्याचा प्रयत्न करतात पण तो प्रयत्न फसतो कारण प्राॕपर्टी संदर्भात असलेल्या प्राॕपर्टी पेपर सुखात्मेंच्या मुलीकडे आणि नातेवाईकांकडे असतात आणि इथून सुरू होते ती सहीसाठी धडपड.
केदार शिंदे यांची कल्पकता आणि व्हिजनस म्हणजे ज्या पद्धतीने चार भरत जाधव लिलये खेळले पाहीजे होते तस साकारलं गेल. ह्या नाटकाची आणखी एक खासीयत म्हणजे नाटकाच संगीत. अजय-आतुल ह्या जोडगोळीने देखील ह्याच नाटकाने संगीताची सुरवात केली. सही रे सही ह्या गाण्यासाठीच ह्या जोडगोळीला पहिलं ॲवार्ड मिळालं. उत्क्रूष्ट लेखन, संवाद यांच मिलन असलेल हे नाटक आहे.
भरत जाधवच कौतुक कराव तेवढे थोडेच आहे. रंग्या ड्रायव्हर असो वा गलगले एजंट आसो की हरी सगळ्याच भुमिकांना त्यांना न्याय दिला. बाकी सर्व कलकारांनी पण चांगली साथ दिली पण केंद्रबिंदू भरत जाधव च होता संपूर्ण नाटक हे त्याच्या भोवतीच गुरफटलय. शेवटच्या क्षणी चारही पात्र तो जेव्हा एकत्र करतो तो नाटकातला सगळ्यात बेस्ट सिन वाटला. अस निखळ मनोरंजनात्मक नाटक बघीतल नसेल तर नक्की बघा "पुन्हा सही रे सही"...
छान, या नाटकाबद्दल अफाट ऐकून
छान, या नाटकाबद्दल अफाट ऐकून आहे, कधी बघायचा योग आला नाही. अजूनही आहे का? आणि भरत जाधव च करतो का? तितक्याच अफाट उर्जेने? निदान यूट्यूब वा सीडी डिवीडी कुठे हे बघता येईल का? ...
लहानपणी कधीतरी यदाकदाचित नावाचे नाटक पाहिलेले. ते सुद्धा केदार शिंदेचेच का? फारसे आठवत नाही. त्याचा अग्ग बाई अरेच्चा मात्र मस्तच् होता. पार्ट टू मात्र रटाळ बंडल बकवास आणि तरीही पुर्ण पाहिलेला होता..
भरत जाधव काही काळापुरता आवडलेला.. खूप आवडलेला.. मात्र लवकरच त्याचे तेच तेच बोअर होऊ लागले.. त्यापेक्षा तो लवकरच आऊट डेटेड वाटू लागला.. प्रेक्षकांची अभिरुची बदलली आणि मागे तो मागेच पडला.. तरी आजही रंगमंच गाजवत असेल तर कल्पना नाही
>>शेवटच्या क्षणी चारही पात्र
>>शेवटच्या क्षणी चारही पात्र तो जेव्हा एकत्र करतो तो नाटकातला सगळ्यात बेस्ट सिन वाटला.-
अगदी अगदी. हे तो भरत जाधवच करु जाणे.
शेवटच्या क्षणी चारही पात्र तो
शेवटच्या क्षणी चारही पात्र तो जेव्हा एकत्र करतो
>>>
त्या झपाटलेला की पछाडलेला सूड दुर्गे सूड बाबा लगीन मालक मालक नवरा आला वेशीपाशी ए ढिंच्यॅक ढिंचॅक ढिंच्यॅक ढिंचॅक चित्रपटातही त्याने शेवटाला एका पात्रातून दुसर्यात उडी मारायचे केलेले ना.. भारी होते ते सुद्धा
शेवटच्या क्षणी चारही पात्र तो
शेवटच्या क्षणी चारही पात्र तो जेव्हा एकत्र करतो>>+१ .. ऑ होतं ते बघताना..
त्या झपाटलेला की पछाडलेला सूड दुर्गे सूड बाबा लगीन मालक मालक नवरा आला वेशीपाशी ए ढिंच्यॅक ढिंचॅक ढिंच्यॅक ढिंचॅक चित्रपटातही त्याने शेवटाला एका पात्रातून दुसर्यात उडी मारायचे केलेले ना.. भारी होते ते सुद्धा >> पण नाटकात लाईव्ह करणे म्हणजे खुप दम (हिंदीमधला) लागतो ऋन्मेष.. टेक रिटेक देऊन जमत पण एकसलग चार पात्र त्यांची भाषा, तर्हा, लकबी, हेल, वेषभुषेसहीत तो एकाचवेळी आणतो ते म्हणजे खतरनाक आहे...
पण नाटकात लाईव्ह करणे >>>>
पण नाटकात लाईव्ह करणे >>>> हो ते मान्य आहेच. नाटक नाही पाहिलं म्हणून पाहिलेले उदाहरण दिले ईतकेच
सही रे सही सहीच आहे. त्यात
सही रे सही सहीच आहे. त्यात शंकाच नाही. मीही पाहून १० वर्षे होऊन गेली आता कोण आणि कसे करते माहीत नाही. पन तेंव्हा मजा आली होती खूपच.
शेवटच्या क्षणी चारही पात्र तो जेव्हा एकत्र करतो>>+१ .. ऑ होतं ते बघताना..>> +1
मलाही आवडले होते, अफाट आहे
मलाही आवडले होते, अफाट आहे भरत ची एनर्जी, त्याची सिडी आहे असेल तर नक्की आवडेल पण लाइव्ह बघण्यातच मजा आहे.
हे नाटक अजूनही आहे का? आणि
हे नाटक अजूनही आहे का? आणि भरत जाधव च करतो का? तितक्याच अफाट उर्जेने? >>> ऋन्मेऽऽषदा विद्या ताई हे नाटक हेच कलाकार आजूनही ' पुन्हा सही रे सही' ह्या नावाने करतात. थोडेफार बदल केलेत पण आजूनही तीच मजा आहे जी आधी होते. ऋन्मेऽऽषदा नक्की बघ हे नाटक तुला आवडेल.
@ प्राजक्ता त्याची सिडी आहे असेल तर नक्की आवडेल पण >>> नाटकाचं एकंदरीत यश बघता सध्या तरी CD बनेल अस वाटत नाही https://youtu.be/uRs6JPAExA0 ह्या लिंकवर नाटकाचा Trailer बघू शकता तुम्ही.
आवडलं लिखाण
आवडलं लिखाण
अजून सविस्तर चाललं असतं
मी कधीपासुन म्हणतेय हे नाटक
मी कधीपासुन म्हणतेय हे नाटक पहाव म्हणुन पण अजुन जाणं झालच नाहि... प्रत्येकाच्या तोंडुन या नाटकाबद्दल चांगलेच उदगार निघालेत.. पहायच आहे..
चांगले लिहिलेय. मलाही हे नाटक
चांगले लिहिलेय. मलाही हे नाटक बघायचं आहे .
छान लिहिलय दादा....
छान लिहिलय दादा....
आवडत्या नाटकांपैकी....एक..
आवडत्या नाटकांपैकी....एक..
मस्त लिहलंय....
अफाट अप्रतिम आहे सही रे सही!
अफाट अप्रतिम आहे सही रे सही!
मी तीनदा पाहिलंय हे नाटक. एकदा घरातल्यांसोबत, एकदा फ्रेंड्ससोबत आणि आमच्या कंपनीच्या ५० व्या वाढदिवसानिमित्त कंपनीने षण्मुखानंद ला सही रे सही चा खेळ ठेवला होता तेव्हा. साधारण बारा वर्षांपुर्वी बघितलंय.
भरत जाधव ने त्यात जे काही काम केलंय त्याला तोड नाही.
मला भरत आवडतो. आणि अंकुशपण. अंकुश आणि भरत आमच्याच कॉलेजचे आहेत.
पण खुप सिनीयर. आमचा कॉलेज डे, फन फेअर असायचं तेव्हा त्यांना नेहमीच बोलवायचे.
छान लिहिलयं !
छान लिहिलयं !
छान लिहिलं आहे. या नाटकाच्या
छान लिहिलं आहे. या नाटकाच्या पहिल्याच परिक्षणापासून ते गाजते आहे.
भरत जाधव, संजय नार्वेकर अफाट मेहनत घेतात आणि तरीही त्यांचे पाय जमिनीवर आहेत.
मी अधांतर चा एक प्रयोग बघितला होता ( तो काही कालावधी नंतर झाला होता. ) यातील मुख्य भुमिका अर्थातच ज्योति सुभाष करत असत.. पण त्यांच्या जोडीला त्यात राजन भिसे, भरत जाधव, संजय नार्वेकर, लिना भागवत, सविता मालपेकर होते.. त्यावेळी हे सर्वच कलाकार नाव कमावलेले होते, पण या नाटकातील काहिशा दुय्यम भुमिका पण त्यांनी अगदी सहज केल्या होत्या, कुठेही कुरघोडी करायचा प्रयत्न नव्हता.
मीही तीन वेळा पाहिले आहे .
मीही तीन वेळा पाहिले आहे . अजूनही पाहील... सगले भरत जाधव एका सीन मध्ये येतात ती दिग्दर्शकाची कमाल आहे. अॅक्च्युअली बॅक स्टेजच्या लोकाना गेट अप देऊन साधलेली किमया आहे पण फारच धमाल आहे तो सीन. यातला मूळ भरत कोणता ते लवकर कळत नाही इतके बेमालूम अॅक्शन्स दिल्या आहेत
चार पात्रे एकत्र यायची कल्पना
चार पात्रे एकत्र यायची कल्पना, त्या आधी बे दुणे पाच या नाटकात प्रशांत दामले करत असे. त्यात बॅक स्टेज कलाकारांसोबर श्याम पोंक्षे पण प्रशांत ची बॉडी डबल म्हणून वावरत असे. ते नाटकही धमालच होते.
चार पात्रे एकत्र यायची कल्पना
चार पात्रे एकत्र यायची कल्पना, त्या आधी बे दुणे पाच या नाटकात प्रशांत दामले करत असे. त्यात बॅक स्टेज कलाकारांसोबर श्याम पोंक्षे पण प्रशांत ची बॉडी डबल म्हणून वावरत असे. ते नाटकही धमालच होते.>>> मराठी नाटकात एका पेक्षा अनेक भुमिका एकाच पात्राने रंगवलेत अस खूपदा झालय. हसवा फसवी मधे दिलीप प्रभावळकारांनी एकावेळी ६ पात्र रंगवली पुढे हेच नाटक पुष्कर श्रोत्री करतोय. सबकुछ संतोष पवार यांनीही आसे रोल केलेत. श्रीमंत दामोदर पंथ मध्ये ही भरत जाधव ने दोन पात्र चांगली रंगवलेत.
मी पण तीन वेळा पाहिलंय हे
मी पण तीन वेळा पाहिलंय हे नाटक. दोनदा "सही रे सही" आणि एकदा "पुन्हा सही रे सही" झालं तेंव्हा.
शेवटच्या क्षणी चारही पात्र तो जेव्हा एकत्र करतो तो नाटकातला सगळ्यात बेस्ट सिन वाटला>>>>>>+१
सीडी रुपात आणायला हवं पण हे नाटक आता.
छान परिचय! पाहिलं नाही. याची
छान परिचय! पाहिलं नाही. याची सीडी मिळते का बघतो.
छान लिखाण. आवडले.
छान लिखाण. आवडले.
एकदा पाहिलय "पुन्हा सही रे सही" .
शेवटच्या क्षणी चारही पात्र तो जेव्हा एकत्र करतो तो नाटकातला सगळ्यात बेस्ट सिन वाटला>>+११
माझे हे भयंकर आवडते नाटक आहे.
माझे हे भयंकर आवडते नाटक आहे. छान लिहिले आहे. पुन्हा एकदा पाहायची इच्छा झाली आता.
निर्माता व दिग्दर्शक की कुणात
निर्माता व दिग्दर्शक की कुणात तरी कायदेशीर वाद झाल्याने ते नाटक बंद झाले.
मग पुन्हा त्याच टीमने तीच कल्पना घेऊन ' पुन्हा सही रे सही' हे नाटक सुरु केले, जे आजही सुरु आहे. मूळ नाटक बघायला मिळाले नाही.
आता आहे ते 'पुन्हा सही रे सही'
दोन्ही नाटकात काय काय फरक
दोन्ही नाटकात काय काय फरक आहेत?
निर्माता व दिग्दर्शक की कुणात
निर्माता व दिग्दर्शक की कुणात तरी कायदेशीर वाद झाल्याने ते नाटक बंद झाले. >>>>> हो नाटकाच्या निर्मिती लता नार्वेकर आणि दिग्दर्शक केदार शिंदे यांच्यामध्ये नाटकाच्या मालकी हक्कावरुन वाद झालेला आणि प्रकरण कोर्टात गेलेल. नंतर कोर्टाने नाटकाचा रिमेक साठी परवानगी दिल्यानंतर नावात बदल करुन ते पुन्हा प्रेक्षकांच्या भेटीला आलय.
ह्या सर्व गोष्टींचा नाटकावर काहीच फरक पडला नसून नाटक हाउसफूल आहे.
दोन्ही नाटकात काय काय फरक आहेत? >>>>
थोडेफार बदल सोडले तर दोन्ही नाटकामध्ये फरक काहीच नाहीये.
पुन्हा पाहायला नक्कि आवडेल,
पुन्हा पाहायला नक्कि आवडेल, अगदी नुकतेच आलेले असताना बघितले होते.
मी 'पुन्ह्स सही रे सही'
मी 'पुन्ह्स सही रे सही' बघीतलं होतं बालगंधर्वला..
पुन्हा सही रे सही नाटक फार
पुन्हा सही रे सही नाटक फार कमी केलं आहे, मूळ नाटकामधले काही सीन्स आणि पंचेस काढले आहेत. आणि नाटक दोन अंकी केलं आहे.
"पुन्हा" बघताना भरत जाधवची एनर्जी मात्र प्रचंडरीत्या कमी पड्तेय असं वारंवार जाणवत होतं. मूळ नाटकाचा सगळा जोर हा केवळ भरत जाधवच्या स्टेज वावरावर आणि अभिनयावर होता. आता मात्र वयोमान असेल किंवा अजून काही भरतला तितकं झेपत नाही असं वाटायला लागलं आहे. दुसृया अंकाच्या शेवटी त्याची दमछाक प्रेक्षकांनाही जाणवत होती. तरीही, भरत भाई छा जाते है. त्याच्या नाटकामधली ही चार पात्रं नं तर वेगवेगळ्या रूपामध्ये नाटक-सिनेमांमधून आली आहेत. आजही मराठी पॉपुलर कल्चरमध्ये गलगले निघाले, गोडगोजिरी, बाई का वराडल्या, या गोष्टी अजरामर झाल्या आहेत.
आता मात्र वयोमान असेल किंवा
आता मात्र वयोमान असेल किंवा अजून काही भरतला तितकं झेपत नाही असं वाटायला लागलं आहे. दुसृया अंकाच्या शेवटी त्याची दमछाक प्रेक्षकांनाही जाणवत होती.>>>>>>>+१ ह्या साठीच सीडी रुपात नाटक यायला हवं असं म्हणाले मी, फक्त मला तुमच्या इतकं नेमक्या शब्दात मांडता आलं नाही.
नवीन कलाकार घेऊन भविष्यात येईल ही हे नाटक पण त्या वेळच्या पिढीला भरत जाधव चं ओरीजनल नाटक बघायला मिळायला हवं.
Pages