नाही बोलता येत आमच्या पोरांना मराठी, बरं मग?

Submitted by ऋन्मेऽऽष फोटो अ... on 2 March, 2017 - 14:01

म्हटलं तर तिच्या प्रश्नाचे उत्तर कोणाकडेही नव्हते. ती आमच्याच ऑफिसमध्ये काम करणारी. दोन प्रायमरी स्कूलमध्ये जाणार्‍या मुलांची आई. स्वत:चे शिक्षण ईंग्लिश मिडियममध्ये झालेली. तरीही तिच्या आईवडिलांच्या कृपेने छान मराठी बोलता येणारी. तिची मुलेही ईंग्लिश मिडीयमचीच. पण ही त्यांच्याशी घरी ईंग्लिशमध्येच संवाद साधत असल्याने त्यांचे मराठी कच्चेच राहिलेली.

मराठी दिना दिवशीच आपल्याला मराठीचे भरते येत असल्याने ऑफिसमध्ये विषय साधारण तोच होता. त्यात एकाने म्हटले, अरे ती अमुक तमुक मराठी हिरोईन, तिच्यापेक्षा त्या अमुकतमुक हिंदी हिरोला चांगले मराठी बोलता येते. बरं मग? ती म्हणाली. त्या अमुक तमुक हिंदी हिरोने आपले मूळ नाव आणि आडनाव बदलले होते कारण त्या नावाला ग्लॅमरच्या दुनियेत आणि बॉलीवूडच्या मार्केटमध्ये काही किंमत नव्हती. त्या अमुकतमुक हिरोने आपल्या मातृभाषेला नेहमीच टांग देत फक्त हिंदी चित्रपटांमध्येच काम केले होते कारण पैसा आणि प्रसिद्धी तिथेच होती. आता त्याचे मराठी चांगले असल्यास त्याचे कारण म्हणजे मुंबईतील वास्तव्य. कदाचित मित्रपरीवार शेजारीपाजारी मराठी भाषिक असावेत. कारण काहीही असले तरी एखाद्या अमराठी व्यक्तीला मराठी बोलता येते ही छानच गोष्ट आहे. पण एखाद्या मराठी व्यक्तीला काही कारणांमुळे मराठी बोलता येत नाही तर यात त्याला हिणवण्यासारखे काय आहे. मुळात त्यामागे जी कारणे असतात त्यांना बरेचदा तो स्वत: जबाबदार नसतो. एखाद्या मराठी जोडप्याचे मूल अमेरीकेत जन्माला आले आणि तिथल्याच मित्रमैत्रींणींमध्ये वाढले तर ते कुठून शिकणार मराठी? आणि त्याने का शिकावी मराठी? हट्टाने शिकवावी का त्याला? आणि का? कारण आईबापांना मराठीचा अभिमान आहे म्हणून? की आपल्या समाजातील लोकं हसतील, आईबाप याला साधी आपली मातृभाषा शिकवू शकले नाहीत म्हणून..

बरं परदेशी वास्तव्यास असलेल्यांकडून ही अपेक्षा फारशी केली जात नाही, पण जे ईथे आहेत त्यांच्याकडून केली जातेच. आणि मग एखादे आईबाप आपल्या कॉन्वेंटमध्ये शिकणार्‍या मुलाला घरच्या घरी चांगले मराठी बोलायला शिकवू शकले नाहीत तर ते थट्टेचा विषय बनतात. त्यांची मुले थट्टेचा विषय बनतात. जसे वर उल्लेखलेली हिरोईन बनली. आणि ही थट्टा उडवणारे तरी कोण असतात? तर जे दिवसभर सोशलसाईटवर ईंग्लिश मिंग्लिश शब्दांचा वापर करून बनवलेले मराठी दिनाची थट्टा उडवणारे मेसेज फिरवत असतात.. आणि जेव्हा तिने त्यांना विचारले , की नाही बोलता येत आमच्या पोरांना मराठी, बरं मग?... तेव्हा त्यांच्याकडे उत्तर नव्हते. कारण त्यांची पोरेही ईंग्लिश मिडीयमध्ये जात होती. आणि अजून दोन पिढ्यांनी आपल्या नातवंडांना पंतवंडाना मराठी बोलता येत असेल का याची खात्री त्यापैकी कोणालाच नव्हती.

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

जसे करून राहिला हे नागपुरी मराठी भाषेत शुद्धच आहे तसेच ती गेली ऐवजी "तें गेलं" हे बेळगावी मराठीत शुद्धच.
अनुच्चारित अनुस्वार नसले तर व्याकरणातील चूक धरत. आता ते व्याकरणच बदलले.
अनेक वर्षांमधे भाषेत फारशी, पोर्तुगीज तसेच इंग्रजी शब्द रूढ झाले. त्याला अशुद्ध म्हणायचे नाही.
इथेच बरेचदा लोक मराठी सुद्धा देवनागरीत लिहीतात, काही काही कारणे सांगून. खरी असतील.
असे करता करता आता मराठीच बोलले नाही तरी चालेल असे वाटू लागले आहे बर्‍याच जणांना.

मग काय, जे पाली,संस्कृतचे झाले, जे मोडी लिपीचे झाले, तेच मराठीचे, देवनागरीचे होईल.

काळाचा महिमा!!

मग कधी कधी छापून येते की कुठल्याश्या गावात सगळे लोक संस्कृत बोलतात, किंवा परदेशाट कुणितरी अभारतीय मुलांनी संस्कृतमधे श्लोक म्हंटले, तसे छापून/स्क्रीनवर येईल की काल अमेरिकेतल्या एका खेड्यात मराठी नाटक झाले.

नानकळा,

सर्व प्रतिसाद पटले आणि आवडले.

हम्म, धागा शुद्ध अशुद्ध प्रमाण भाषेवर गेला तर..
आज सविस्तर लिहायला वेळ नाही फारसा पण बोलीभाषेला व्याकरणाचे नियम लावणे वा तशी अपेक्षा करणे चुकीचेच.
शक्य झाल्यास शीर्षक असे वाचावे - नाही बोलता येत आमच्या पोरांना बोलीभाषा मराठी, बरं मग?

कशाला ? चपात्या येतात की.
(हे लाटणं हातात घेउन उभ्या असलेल्या ग्रुहिणीच्या आवेशात वाचावे. ) Lol

'शुद्ध मराठी' वगैरे अंधश्रद्धा आहे, तथाकथित शुद्ध मराठी ही शुद्ध वगैरे काही नाही तर इंग्रजांनी 'व्याकरण प्रमाणीकरण' केलेली प्रशासकीय सोयीची भाषा आहे, भाषा टिकवायची असेल तर बोली जोपासण्याशिवाय पर्याय नाही. इत्यलम.

भाषा टिकवायची असेल तर बोली जोपासण्याशिवाय पर्याय नाही.
You mean, जसे आम्ही conversation मधे इंग्लिश, पंजाबी, हिंदी इन सबका मिक्स्चर बनाके communicate करतो ते मराठी ओन्लि असेच ना?

आज एका गोष्टीवरून ह्या धाग्याची आठवण झाली.एकीकडे आरती चालली होतीसर्वांचा मोथा आवाज होता' विठोबाचे राज्य आम्हा दसरा दिपवाळी'. मूळ आरतीत नित्य दिपवाळी आहे.पण अर्थ लागतो ना,भाव बघायचा की शब्द?नामदेवांनी कशावरून तेच शब्द लिहिले असतील.
असो.

अजिबात नाही, माझ्या म्हणण्याचा तो अर्थ नाही, तरी तुमची चर्चा करायची तयारी असेल तर एकदा
१. लोन वर्ड
२. डायलेक्ट

ह्या दोन परिभाषा आपण दोघांनीही वाचून घेऊयात,

भाषेत सामावलेले परभाषिक शब्द वेगळे (लोन वर्ड) त्या अर्थाने आजही तथाकथित शुद्ध मराठीत प्रचंड प्रमाणात शब्द पर्शियन वगैरे भाषेतले आहेत, त्याला तुम्ही 'मिक्सचर' समजता का?

दुसरी गोष्ट, तुम्ही ज्या प्रकारे 'कॉस्मोपोलिटियन' हिमलिश मध्ये वरती विचारले आहे, त्याला माझा विरोधच असेल, पण बोली म्हणजे फक्त 'मिक्सचर' असा तुमचा अदमास असल्यास तो चूक असल्याचे मला सखेद तुमच्या निदर्शनास आणून द्यावे लागते आहे.

माझी बोली 'वऱ्हाडी' आहे, आमच्या बोली मराठीवर हिंदीचा प्रभाव बऱ्यापैकी आहे, पण हिंदीतून जसेच्या तसे आलेले शब्द प्रमाणात खूप कमी आहेत, जे काही शब्द हिंदी 'प्रभावाने' आलेत, त्याचे उच्चार एखाद्या हिंदी भाषिक मनुष्याला कळायची सुतराम शक्यता नाही अन कळतही नाहीत, ते 'वऱ्हाडी ह्या मराठीच्या बोलीभाषेचे' भाषावैशिष्ट्य परिभाषित करणारे भाषासौष्ठव सांगणारे शब्द आहेत, मूळ मराठी जपायची तर तिला समकालीन विकसित झालेले हे सगळे शब्द जोपासणारी बोली मग ती वऱ्हाडी असो कोकणी असो अहिराणी असो डांगी असो जपण्यामुळे जोपासली जाऊ शकते, असे माझे वैयक्तिक मत आहे, तरीही जर तुम्ही ह्याला असहमत असाल तर मात्र मी 'ऍग्री टू डिसॅग्री' असे इंग्रजीत म्हणून पुढे सरकावे म्हणतो

धन्यवाद.

भाषा टिकवायची असेल तर बोली जोपासण्याशिवाय पर्याय नाही >>> सोन्याबापू, सहमत आहे. किमान अशुद्ध आहे वगैरे ने हिणवू नये.

देवकी - नामदेव नव्हे. विष्णुदास नामा Happy

सभ्य लोक सभ्यपणे जी भाषा बोलतात तीच शिष्टसंमत भाषा असते,
शिव्या देणे, घालून-पाडुन बोलणे, अपमान करणे, घृणा करणे हे कोणत्याही स्वच्छ भाषेत असले तरी ते शिष्टसंमत नसते.

>> अगदी हजारवेळा सहमत. 'पदपथ आपल्या तीर्थरुपांचा आहे काय?' आणि 'रस्ता/ फुटपाथ तुझ्या बापाचा आहे का बे?' यात मला फार फरक वाटत नाही. दोन्हीकडे अपमानच होतो व्यक्तीचा. 'पदपथ', 'आपल्या' आणि 'तीर्थरूप' हे शब्द वापरल्याने समोरच्याला काही गुदगुल्या होत नाहीत. पुण्यात मात्र असं वाक्य म्हणून आपण काहीतरी शालजोडीतले(?) दिल्याचा दिव्य आनंद होतो पुणेकरांना. Angry

मराठी लिहिता, वाचता बोलता आलीच पाहिजे.

प्रश्नावर उत्तर - मग? हा प्रश्न प्रश्नकर्तीला पडला पाहिजे.

४ पुस्तके घ्या. ४ शिक्षकांचे मार्गदर्शन घ्या.

शिका. शिकवा.

नामदेव नव्हे. विष्णुदास नामा>>>> अरे देवा,मी नानदेवांची आरती समजत होते.विष्णुचा दास असा मी नामा' असे वाटलं होतं.धन्यवाद फा.

अरे देवा, मी नानदेवांची आरती समजत होते >>>>

>>>>>>>>

विषयांतर होतय खर, पण रहावल नाही म्हणुन लिहतो ... Happy
मला तो "अरे देवा" वाचुन त्या देवदास मधील सीन आठवला व मी एकटाच हसलो थोडसा... तो नाही का सीन ज्यात देवदासला आरोळी देत कुणितरी..

देवा !! .. अsssरेsss देवा ... अरे ओssss देवा....

वऱ्हाडी असो कोकणी असो अहिराणी असो डांगी असो
ते सगळे मान्य हो. म्हणूनच आजकाल शहरात मराठी लोक तसे बोलतात म्हणून ती पण मराठी बोलीच की! म्हणून तसे बोलणे हे मराठीच समजावे का असे मला म्हणायचे आहे. मा़झे उत्तर हो.
म्हणजे हिंदी सिनेमातल्या गाण्यात एखाद्या ओळीत काही स्वर एखाद्या रागात असतील तर ते गाणे त्या रागात आहे म्हणतात तसे वाक्यात एक दोन मराठी शब्द बाकी दहा बारा इतर भाषेतले असले तरी ते मराठीच आहे असे म्हणावे असे मला वाटते. जसे वर्‍हाडी, अहिराणी तसेच मुंबई पुण्याची बोली - मराठीच. म्हणून

Pages