म्हटलं तर तिच्या प्रश्नाचे उत्तर कोणाकडेही नव्हते. ती आमच्याच ऑफिसमध्ये काम करणारी. दोन प्रायमरी स्कूलमध्ये जाणार्या मुलांची आई. स्वत:चे शिक्षण ईंग्लिश मिडियममध्ये झालेली. तरीही तिच्या आईवडिलांच्या कृपेने छान मराठी बोलता येणारी. तिची मुलेही ईंग्लिश मिडीयमचीच. पण ही त्यांच्याशी घरी ईंग्लिशमध्येच संवाद साधत असल्याने त्यांचे मराठी कच्चेच राहिलेली.
मराठी दिना दिवशीच आपल्याला मराठीचे भरते येत असल्याने ऑफिसमध्ये विषय साधारण तोच होता. त्यात एकाने म्हटले, अरे ती अमुक तमुक मराठी हिरोईन, तिच्यापेक्षा त्या अमुकतमुक हिंदी हिरोला चांगले मराठी बोलता येते. बरं मग? ती म्हणाली. त्या अमुक तमुक हिंदी हिरोने आपले मूळ नाव आणि आडनाव बदलले होते कारण त्या नावाला ग्लॅमरच्या दुनियेत आणि बॉलीवूडच्या मार्केटमध्ये काही किंमत नव्हती. त्या अमुकतमुक हिरोने आपल्या मातृभाषेला नेहमीच टांग देत फक्त हिंदी चित्रपटांमध्येच काम केले होते कारण पैसा आणि प्रसिद्धी तिथेच होती. आता त्याचे मराठी चांगले असल्यास त्याचे कारण म्हणजे मुंबईतील वास्तव्य. कदाचित मित्रपरीवार शेजारीपाजारी मराठी भाषिक असावेत. कारण काहीही असले तरी एखाद्या अमराठी व्यक्तीला मराठी बोलता येते ही छानच गोष्ट आहे. पण एखाद्या मराठी व्यक्तीला काही कारणांमुळे मराठी बोलता येत नाही तर यात त्याला हिणवण्यासारखे काय आहे. मुळात त्यामागे जी कारणे असतात त्यांना बरेचदा तो स्वत: जबाबदार नसतो. एखाद्या मराठी जोडप्याचे मूल अमेरीकेत जन्माला आले आणि तिथल्याच मित्रमैत्रींणींमध्ये वाढले तर ते कुठून शिकणार मराठी? आणि त्याने का शिकावी मराठी? हट्टाने शिकवावी का त्याला? आणि का? कारण आईबापांना मराठीचा अभिमान आहे म्हणून? की आपल्या समाजातील लोकं हसतील, आईबाप याला साधी आपली मातृभाषा शिकवू शकले नाहीत म्हणून..
बरं परदेशी वास्तव्यास असलेल्यांकडून ही अपेक्षा फारशी केली जात नाही, पण जे ईथे आहेत त्यांच्याकडून केली जातेच. आणि मग एखादे आईबाप आपल्या कॉन्वेंटमध्ये शिकणार्या मुलाला घरच्या घरी चांगले मराठी बोलायला शिकवू शकले नाहीत तर ते थट्टेचा विषय बनतात. त्यांची मुले थट्टेचा विषय बनतात. जसे वर उल्लेखलेली हिरोईन बनली. आणि ही थट्टा उडवणारे तरी कोण असतात? तर जे दिवसभर सोशलसाईटवर ईंग्लिश मिंग्लिश शब्दांचा वापर करून बनवलेले मराठी दिनाची थट्टा उडवणारे मेसेज फिरवत असतात.. आणि जेव्हा तिने त्यांना विचारले , की नाही बोलता येत आमच्या पोरांना मराठी, बरं मग?... तेव्हा त्यांच्याकडे उत्तर नव्हते. कारण त्यांची पोरेही ईंग्लिश मिडीयमध्ये जात होती. आणि अजून दोन पिढ्यांनी आपल्या नातवंडांना पंतवंडाना मराठी बोलता येत असेल का याची खात्री त्यापैकी कोणालाच नव्हती.
वर कोणीतरी भगवतगीतेचा उल्लेख
वर कोणीतरी भगवतगीतेचा उल्लेख केलाय, पण त्याच गीतेवर हात ठेवून खरे खरे सांगा, मराठीचा आणि भगवदगीतेचा काय संबंध?
ते पुस्तक मराठी आहे का? किंवा मराठीतच आहे का? मुळात भगवान श्रीकृष्ण यादव हे मराठी होते का? किंबहुना आजच्या जमान्यात ते असते तर मराठी लोकांनीच त्यांच्यावर परप्रांतीय असल्याचा शिक्का मारला असता
बाकी मी बोलतो मराठी, लिहितो मराठी, वाचतो मराठी.... अरे मी तर जगतो मराठी.
च्यायला ईतकेच नाही तर माझी आवडती हिरोईनी सुद्धा मराठीच
माझा मुलगा मराठी शाळेत जातो,
माझा मुलगा मराठी शाळेत जातो, मराठीत स्वतःच्या भाषेत स्वतःचं म्हणणं लिहायलाही लागला आहे. आता पहिल्या वर्गात आहे. त्याला भाषेसाठी कोणतीही घोकंपट्टी, वगैरे करावी लागत नाही. अशी काही उदाहरणं मराठी पालकांच्या मराठी मुलांची जी इंग्रजी शाळेत प्लेस्कूलपासून जातात, त्यांची आहेत काय? स्वतःचं म्हणणं स्वतः लिहिण्याची, विचार करण्याची पद्धत त्याच्या विकसित झाली त्यामागे मातृभाषेत म्हणजे मराठीत बोलणे-शिकणे, व्यवहार करणे हे आहे.
आता स्वतःच इंग्रजी शिकवा म्हणून आमच्या मागे लागलाय.. ए बी सी डी पेक्षा आम्ही त्याला वस्तूंना मराठीत काय म्हणतात, तिलाच इंग्रजीत काय म्हणतात असे शिकवायला सुरुवात केली आहे.
माझ्या मुलाने आयुष्यभरात किमान सहा प्रमुख भाषांवर प्रभुत्व मिळवावे अशी माझी अपेक्षा आहे (हो, लादत नै बरं का!) अपेक्षा म्हणजे आशा+विश्वास. कारण तीन भाषा तर तशाही बहुसंख्य भारतीयांना येतातच.... आपल्या लोकांत काहीतरी खास आहे, भाषेबद्दल.
त्यामुळे मुलगा जगातल्या किमान सहा प्रमुख भाषा बोलू शकेन.. मराठी तर मायबोली...
बोला! कोणत्या भाषेत बोलायचंय...?
माझ्या मुलाने आयुष्यभरात
माझ्या मुलाने आयुष्यभरात किमान सहा प्रमुख भाषांवर प्रभुत्व मिळवावे अशी माझी अपेक्षा आहे (हो, लादत नै बरं का!) अपेक्षा म्हणजे आशा+विश्वास. कारण तीन भाषा तर तशाही बहुसंख्य भारतीयांना येतातच.... आपल्या लोकांत काहीतरी खास आहे, भाषेबद्दल.


त्यामुळे मुलगा जगातल्या किमान सहा प्रमुख भाषा बोलू शकेन.. मराठी तर मायबोली...
बोला! कोणत्या भाषेत बोलायचंय...?>>> I feel this is the right approach or my liking too.
मला वेगवेगळ्या भाषांमधे लिहिता, वाचता आणि त्यान्चे लिखाण, चित्रपट अनुभवता येते याचा मला आनन्द वाटतो. तो मुलानाही घेता यावा अशी इच्छा आहे. पण त्याचसोबत त्यामुळे मुलाना किन्वा पालकाना 'वाईट' किन्वा 'लाज' वाटू नये. एक भाषा आली तरी पुरेसे आहेच.
(हो, लादत नै बरं का!) >>>
(हो, लादत नै बरं का!) >>>
नाहीतर 'हानिकारक बापू' गाणे ऐकू येइल तुम्हाला :). पण सिरीयसली मलाही असेच वाटते. अधूनमधून प्रयत्न करत असतो त्याकरता. मला स्वतःला सुद्धा आपल्या नेहमीच्या तीन भाषा सोडून किमान एकतरी यावी असे नेहमी वाटते (पण अर्धा वेळ माबोवर जात असल्याने....
)
मात्र यात एका भाषेतून दुसर्या भाषेत सहजपणे जाता येणे व मूळ भाषा न विसरणे - हे एक भाषिक कौशल्य आहे. सर्वांना जमतेच असे नाही. बर्याच वेळा ३-४ वर्षे अमेरिकेत राहून आलेले लोक साध्या साध्या शब्दांना अमेरिकन प्रतिशब्द वापरतात आणि त्याबद्दल त्यांना भारतात तु.क. मिळतात. पण बर्याच लोकांचे पुढचे पाठ मागचे सपाट असे असते - सलग २-३ वर्षे जी भाषा ते वापरतात तीच त्यांच्या अंगवळणी पडते. मूळची आपली भाषा ते विसरतात असे नाही, पण त्यांच्या बोलण्याच्या सरावातून ती जाते. माझ्या ओळखीत असे अनेक आहेत ज्यांना इंग्रजी किंवा मराठी कोणाबद्दलच काही विशेष प्रेम किंवा राग नाही. पण त्यांची बोलीभाषा बदललेली आहे.
अगदी भारतातलेच उदाहरण द्यायचे तर अमिताभ चे आहे. तो हिन्दी व इंग्रजी दोन्ही सफाईने बोलतो व यातील एका भाषेत बोलताना सहसा दुसरी भाषा त्यात त्याची मिक्स होत नाही. पण हे सर्वांनाच जमत नाही.
बर्याच वेळा ३-४ वर्षे
बर्याच वेळा ३-४ वर्षे अमेरिकेत .......... त्यांना भारतात तु.क. मिळतात.
माझा अनुभव जरा उलटा आहे. मीच कटाक्षाने मराठी शब्द वापरतो, तर तिथले लोक, (ज्याला ते इंग्रजी समजतात अश्या), भाषेत नि अॅक्सेंटने बोलतात!
तु. क. वगैरे पाहिले नाहीत. पण जास्त वेळ मी मराठीतच बोललो तर त्यांच्या कपाळाला आठ्या पडतात. नि ते हिंदीवर घसरतात.
एकूण असे असूनहि जेंव्हा लोक आग्रह धरतात की मराठीच बोला, त्यांचा शेवटी राग येतो. नाही बोलत जा, बरं मग? असे म्हंटल्या जाते.
मागे मी "अरे जरा मायबोलीवर तरी मराठीत लिहा" म्हणत असे. पण तेहि मत काही फारसे लोकप्रिय नाही आ़जकाल.
हळू हळू इथेहि मराठी नाहीसे होईल! मग हा प्रश्नच येणार नाही.
संस्कृतमधे का बोलत नाही, लिहीत नाही असे कुणि आ़जकाल विचारतात का? तसेच मराठीचेहि.
सपना, आपण असे का लिहिलेत?
सपना, आपण असे का लिहिलेत?
<<<<< सरकारबाई, कुठल्यातरी एका भाषेत पारंगत असले तर अडचण काय आहे ? >>>>>
ऊलट आपली मते तर जुळली आहेत. माझ्या मूळ लेखातील पोस्टवरून तसे समजत नाहीये का? काही मिसकम्युनिकेशन होत असेल तर सांगा >>>>>
तर मग सगळे निरुत्तर झाले असे का लिहीलेत ?
धाग्यामधे ठाम मतं न मांडल्यास असे प्रश्न येणारच. मग प्रश्नकर्त्याला झगड्या किंवा अन्य आयडीने किंवा झुंडीने झोडपले तरी फरक पडत नाही.
जाता जाता अवांतर - मागे
जाता जाता अवांतर - मागे कुठेतरी वाचलेले. जेव्हा एखादी व्यक्ती एखादी भाषा अशुद्ध बोलत असते. तेव्हा याचा अर्थ तिला नक्कीच आणखी एखादी भाषा येत असते, म्हणजेच किमान दोन भाषांचे ज्ञान असते. >>>>>> कसलं भारी Happy
>> हे चुकीचे आहे. खेड्यातली अशिक्षीत माणसे अशुद्ध मराठी बोलतात याचा अर्थ त्याना आणखी कुठली तरी भाषा येते असा होतो काय?
खेड्यातली अशिक्षीत माणसे
खेड्यातली अशिक्षीत माणसे अशुद्ध मराठी बोलतात याचा अर्थ त्याना आणखी कुठली तरी भाषा येते असा होतो काय?
>>
ते इंग्रजीबद्दल असल्याचे वाचलेले आठवत आहे,
एखाद्या व्यक्तीला सफाईदार इंग्रजी बोलता येत नसेल तर याचा अर्थ तिला दुसरी कोणती तरी भाषा (बोले तो 'मातृभाषा') अवगत आहे.
न्हाई येत आमाला विंग्रजी बर
न्हाई येत आमाला विंग्रजी बर मंग?
असा पुढचा धागा येउंद्या!
खेड्यातली अशिक्षीत माणसे
खेड्यातली अशिक्षीत माणसे अशुद्ध मराठी बोलतात याचा अर्थ त्याना
>>>>
ती त्यांची बोलीभाषा असते. शालेय मराठी पुस्तकातही त्या भाषेत धडे असतात. तिला अशुद्ध कसे म्हणावे. तरी त्यालाच अशुद्ध म्हणायचे असेल तर मला तोडकीमोडकी असा अर्थ अपेक्षित होता असे समजावे.
नानाकळा, आपल्याकडे ईंग्रजीचा बाऊ केला जातो म्हणून कोणीतरी त्या मूळ वाक्यात ईंग्रजीचे नाव टाकले असावे. अन्यथा मूळ वाक्य मूळ कन्सेप्ट कुठल्याही भाषांना लागू होते.
खेड्यातली अशिक्षीत माणसे
खेड्यातली अशिक्षीत माणसे अशुद्ध मराठी बोलतात याचा अर्थ त्याना
>>>>
ती त्यांची बोलीभाषा असते.
सहमत. त्याला अशुद्ध म्हणता येणार नाही. शुद्ध बोलीभाषाच असते ती.
फारएंड साहेब ,
फारएंड साहेब ,
मी हा धागा म्हणत होतो.
http://www.maayboli.com/node/33512
खेड्यातली अशिक्षीत माणसे
खेड्यातली अशिक्षीत माणसे अशुद्ध मराठी बोलतात याचा अर्थ त्याना
>>>>
आणि
फक्त खेड्यातील'च' अशिक्षीत माणसे, अशुद्ध मराठी बोलतात हा जावई शोध कोण्या संशोधकांने लावलाय ?
फक्त खेड्यातील'च' अशिक्षीत
फक्त खेड्यातील'च' अशिक्षीत माणसे, अशुद्ध मराठी बोलतात हा जावई शोध कोण्या संशोधकांने लावलाय ?>>>>+१
"अशुद्ध मराठी बोलणे" काय असते
"अशुद्ध मराठी बोलणे" काय असते?
मी आजतागायत एकही मनुक्श असे अशुद्ध मर्हाटी बोलतानी बघितलेलो नाही...
शुद्ध मराठी = पुस्तकी मराठी ?
शुद्ध मराठी = पुस्तकी मराठी ?
"अशुद्ध मराठी बोलणे" काय असते
"अशुद्ध मराठी बोलणे" काय असते? व>>>>>> काय राव?
रुमाल भेटला, वही भेटली हे काय असते हो?
या संदर्भात नुकताच एक विनोद
या संदर्भात नुकताच एक विनोद वाचण्यात आला....
डॉक्टर - बाळा आ कर आ
आई - त्याला फक्तं इंग्लिश कळतं
डॉक्टर - बरं, बाळा, "ओपन योर माऊथ".......
आई - थांबा, मी सांगते. "बाळा, डू आ, डू आ....."
"सेमी इंग्लिश" आहे तो .....

तैमूरजी, ओके. चांगला होता की
तैमूरजी, ओके. चांगला होता की तो धागा. बोलण्यात प्रचलित मराठी शब्द जास्त वापरण्याबद्दल. सपना हरिनामे - तुम्हीही लिहीलेले ही वाचले (हे त्या बाफशी संबंधित नसण्याबद्दल)
तो पुन्हा वाचताना मीच पाच वर्षांपूर्वी लिहीलेले हे सापडले. जे "अशुद्ध" वाचल्यावर आत्ता मी पुन्हा लिहीणार होतो
कृपया शुद्ध भाषा व प्रमाण भाषा यात गल्लत करू नये. एखाद्या मोठ्या भाषिक गटाच्या नेहमी बोलल्या जाणार्या भाषेला अशुद्ध म्हणणे मला अपमानकारक वाटते. पाणी ला जे पानी म्हणतात त्यात काही अशुद्ध नाही - कारण असंख्य लोक तीच भाषा बोलतात.
प्रमाण भाषेसाठी ते नियम असणे वेगळे. मराठी वाचणार्या/ऐकणार्या सर्वांना एखाद्या शब्दाचा/वाक्याचा अर्थ व संदर्भ एकच असावा म्हणून प्रत्येक भाषेची एक "प्रमाण भाषा" असतेच. इंग्रजीची, हिन्दीचीही आहे. "जेवण केले का" चा प्रमाण मराठी अर्थ खाल्ले का असा होतो पण बर्याच लोकांच्या बोलीभाषेत स्वयंपाक केला का असाही होतो. वर्तमानपत्री मराठीत/बातम्यांमधे तो पहिल्या अर्थानेच यायला हवा. पण अनौपचारिकरीत्या बोलताना दुसर्या अर्थाने वापरला तर त्यात अशुद्ध काही नाही.
माझ्या मते शुद्ध भाषा असा काही प्रकारच नाही.
रुमाल भेटला, वही भेटली हे
रुमाल भेटला, वही भेटली हे हिंदीचा मराठीशी झालेला वर्हाडी संगम आहे.
त्यात ते तुमच्यासारख्या लोकांना अशुद्ध वाटत असेल तर तो तुमचा संकुचित दृष्टिकोनाचा प्रश्न आहे. सीमावर्ती भागांमध्ये असे भाषाभाषांचे रंग एकमेकांत मिसळतातच, त्यात गैर काहीही नाही. शुद्ध अशुद्ध भाषा हा वैयक्तिक विचारसरणीचा भाग आहे. मी सर्व महाराष्ट्रात फिरलो, मला कोणी अशुद्ध मराठी बोलणारे भेटले नाहीत, सर्व लोक 'आपली' भाषा अतिशय उत्तम बोलतात. भाषेची शुद्धता हाच भ्रम आहे. भाषा ही नदीसारखी प्रवाही असते, तलावासारखी साचलेली नव्हे.
आम्ही वर्हाडी लोकांच्या भाषेतच कित्येक प्रकार आहेत, अनेक लोक पुणेरी मराठी- प्रमाण मराठी भाषेच्या अंगाने वर्हाडी बोलायला जातं तेव्हा तेही आम्हाला खटकत नाही, "तू का बरं असे करुन राहिला आहेस?" असे कोणी बोलत असेल तर आम्हाला खटकत नाही. पुण्यामुंबैच्या लोकांना मात्र लगेच इतर भागातल्या मराठी भाषकांची इभ्रत काढायची असते ते अगदी डॉक्यात जातं...
लिहिण्यासाठी वापरली जाणारी प्रमाण मराठी भाषा हा एक वेगळा विषय आहे. तीची शुद्धता कायम राहणे आवश्यक असते. त्याबद्दल काही दुमत नाही.
>> शुद्ध अशुद्ध भाषा हा
>> शुद्ध अशुद्ध भाषा हा वैयक्तिक विचारसरणीचा भाग आहे
हो. आजकाल अनेक ठिकाणी "केली गेलेली" ऐवजी "केल्या गेलेली", "लिहिली गेली" ऐवजी "लिहिल्या गेली" असे उल्लेख सर्रास आढळून येत आहेत. मला व्यक्तिश: हे खटकते. अशुद्ध वाटते. पण काही भागात तसे बोलले जात असावे (किंवा "बोलल्या जात" असावे).
>>लिहिण्यासाठी वापरली जाणारी प्रमाण मराठी भाषा हा एक वेगळा विषय आहे. तीची शुद्धता कायम राहणे आवश्यक असते.
सहमत
लिहिण्यासाठी वापरली जाणारी
लिहिण्यासाठी वापरली जाणारी प्रमाण मराठी भाषा हा एक वेगळा विषय आहे. तीची शुद्धता कायम राहणे आवश्यक असते.
काय लिहिण्यासाठी? अग्रलेख, वर्तमानपत्रातली भाषा वगैरे ठीक आहे. पण अग्रलेख किती लोक वाचतात?
पण मासिकात. पुस्तकात जर ग्रामीण गोष्ट लिहीली तर? शास्त्रीय माहितीच्या पुस्तकात जर बळेच मराठी शब्द वापरले तर नीट कळणार नाही, कारण तसे मराठी शब्द कुणीच शास्त्राच्या अभ्यासात, पुस्तकात नसतात.
नि आजकाल लोक एकदम भेसळ भाषा बोलतात, अगदी नेते, कलाकार, नि काही मराठीचे प्राध्यापक सुद्धा. त्यांनी काय म्हंटले हे शब्दशः छापायचे असेल तर?
या सगळ्या गोंधळात ते प्रमाण भाषेत लिहीलेले कुणाच्या लक्षात रहाणार?
रुमाल भेटला, वही भेटली हे
रुमाल भेटला, वही भेटली हे हिंदीचा मराठीशी झालेला वर्हाडी संगम आहे. >>>
फक्त वर्हाडातच नव्हे, कोकणाकडील काही लोकांकडुनही असे ऐकले आहे.
वर्हाडात मराठीवर हिंदीचा प्रभाव आहे. हिंदी शब्दांबरोबरच शब्दशः भाषांतरही येते.
जसे: तू क्या कर रहा? याचे शब्दशः भाषांतर : तू काय करुन राहीला.
याला अशुद्ध म्हणणे योग्य नाही.
सत्तास्थान पुण्यात असल्याने
सत्तास्थान पुण्यात असल्याने तिथली भाषा प्रमाणभाषा झाली. इतर भाषा या अशुध ठरल्या
नन्द्या भौ! वर्तमानपत्रे किती
नन्द्या भौ! वर्तमानपत्रे किती लोक वाचतात, अग्रलेख किती लोक वाचतात, असे विचारत गेले तर मासिकं आणि शास्त्रिय पुस्तके तरी किती लोक वाचतात असा प्रश्न विचारायला लागेल....
कोणी कितीही भेसळ भाषा बोलू देत... बातम्या छापायला प्रमाण भाषाच वापरणे योग्य. आता बिहारी भाषेत लालू, गुजरातीत मोदी आणि तमिळ मध्ये अम्मा काय बोलल्या हे तर मराठीत छापत होते ना? की शब्दशः उच्चार छापत होते? मला वाटतं हे अनाठायी ताणणे आहे. 'ग्रामिण भाषेतली कथा' ह्या शिर्षकातच कोणत्या भाषेत छापावी हे स्पष्ट आहे. पण अहिराणी भाषेतली कथा, कोकणातल्या मुलांना पुस्तकात असेल तर मराठी प्रमाणभाषा ही मध्यस्थ होते. इथे साहित्याला, कथेच्या मूल्याला महत्त्व आहे की विशिष्ट भाषेला ते स्पष्ट होणे महत्त्वाचे असते. माहितीचे आदान-प्रदान करणारी पुस्तके, शास्त्रिय विषयांवरची पुस्तके, इतर अनेक नॉन-फिक्शन पुस्तके प्रमाणभाषेत लिहिणे गरजेचे असते. बोली भाषा आणि छापिल भाषा यांचे द्वंद्व लावणे अगदी अयोग्य आहे व ते प्रमाणभाषेत बोलणार्यांच्या (खरंतर, असं वाटून घेणार्यांच्या) अहंकाराला कुरवाळणे आहे, बाकी काही नाही.
---------------------------------------------------------------
---------------------------------------------------------------
असल्या कथित शुद्धतेचा आग्रह धरणार्या लोकांकडून अशुद्ध भाषा बोलणारे, अशिक्षित, गावंढळ, कमी अकलेचे, खालच्या पातळीचे, गरीब समजले जातात.
याचे सुरुवातीच्या काळात चटके बसल्याने अशा लोकांविरोधात मी कायम बोलत आलो आहे. विदर्भातून ताजाताजा मुंबईत कॉलेजात आलो तेव्हा एक अर्ज देतांना कारकूनाने काहीतरी अडचण उभी केली. मी माझ्या वर्हाडीत, ''घ्यून घ्या, साहेब" अशी विनवणी केली, तर ते महाशय माझी खिल्ली उडवत म्हणाले, "घेऊन घ्या काय? ही काय भाषा आहे, कसे बोलता तुम्ही लोक? एकदा घेऊन परत कसे घेऊ?"
मी म्हणालो, "जसे 'घेऊन टाका' म्हणतांना तुम्ही 'एकदा घेऊन जिथे कुठे टाकता' तसे"
हा काही एकमेव व माझाच अनुभव नाही. आपली बोली व लहेजा नवीन शहरात तिथल्या बोलीप्रमाणे बदलण्यात नवीन लोकांना खुप त्रास होतो, हा त्रास त्या शहरात जन्म काढलेल्या लोकांनी समजून आपलेपणा दाखवणे अपेक्षित असते. ते होतांना सहसा दिसत नाही.
तर, बोलीभाषा, मग ती समग्र भारतातली कोणतीही असो, तिला हिणवण्याची कोणतीही आवश्यकता नाही. आपल्याला जे समजत नाही, आपल्या अनुभवविश्वाच्या बाहेर आहे, ते समजून घेण्यात, त्याला आपल्या अनुभवांचा भाग बनवण्यात नवीन नवीन शिकण्यात जी विनम्रता बाळगली जाते, इतरांप्रती जो आदर दाखवला जातो ते माणूस म्हणून आपल्याला प्रगल्भ करत जातो.
सीमावर्ती भागांमध्ये असे
सीमावर्ती भागांमध्ये असे भाषाभाषांचे रंग एकमेकांत मिसळतातच, त्यात गैर>>>>>>> ही मी मुंबईत वाढलेल्या मुलांची भाषा ऐकली आहे.
एकीने तर सांगितले की त्यांच्या बाई म्हणायच्या की सजीव भेटतात,वस्तू मिळतात.तरी म्हणे सवयच झाली आहे.
माझ्या माहेरी,आईवडील एकमेकांशी कोकणीतून बोलत.पण इतरांशी बोलताना,स्वच्छ मराठीमधे बोलत.ना कोकणीचे हेल किंवा त्यातले शब्द.
तसेच मिनि(मी) केलं,तुनी(तू) केलं हे खटकतेच.
स्वच्छ मराठीमधे बोलत.
स्वच्छ मराठीमधे बोलत.
>> हे स्वच्छ मराठी कोण ठरवतं?
सांगितलं ना , सत्ताकेंद्र
सांगितलं ना , सत्ताकेंद्र पुणे , म्हणुन ती भाषा प्रमाणभाषा झाली , उरलेल्या अशुद्ध्ह
हे स्वच्छ मराठी कोण ठरवतं?>>>
हे स्वच्छ मराठी कोण ठरवतं?>>>>> ना कोकणीचे हेल किंवा त्यातले शब्द. हे आधीच लिहिले होते.
याउलट आमच्या एक नातलग बेळगावच्या होत्या.पण इथे राहूनही २०-२५ वर्षांनीही ते कुठे गेलं (ती कुठे गेली) असं शाळेत शिकवताना म्हणायच्या.मुलं चेष्टा करायची.
बोली भाषेचा गोडवा,लहेजा ऐकायला छान वाटतो.पण ज्यावेळी इतरही लोक असतात्,त्यावेळी जी शिष्टसंमत भाषा असते ती बोलायला काहीच हरकत नसावी.
तर, बोलीभाषा, मग ती समग्र भारतातली कोणतीही असो, तिला हिणवण्याची कोणतीही आवश्यकता नाही. आपल्याला जे समजत नाही, आपल्या अनुभवविश्वाच्या बाहेर आहे, ते समजून घेण्यात, त्याला आपल्या अनुभवांचा भाग बनवण्यात नवीन नवीन शिकण्यात जी विनम्रता बाळगली जाते, इतरांप्रती जो आदर दाखवला जातो ते माणूस म्हणून आपल्याला प्रगल्भ करत जातो.>>>> हे पूर्णपणे मान्यच आहे.
' शिष्टसंमत' ह्या शब्दावरच
शुद्ध व स्वच्छ मराठी ठरवतांना ' शिष्टसंमत' ह्या शब्दावरच माझा आक्षेप आहे. शिष्ट म्हणजे सभ्य, शिष्टसंमत म्हणजे सभ्यलोकांना संमत असलेली, म्हणजे जी काही स्वच्छ मराठी तुम्ही मानता ती सभ्य लोकांची, व इतर लोक जी भाषा वापरतात ती असभ्य, ते लोकच असभ्य असे नसावे. वर तैमुर म्हणत आहेत तसं पुण्यात सत्ताकेंद्र म्हणून पुण्याची ती प्रमाण भाषा असे ठरलेले दिसते. कोकणास पुणे-मुंबई जवळ व घरोब्याचे आहे. मुंबई-पुण्याची मराठी कोकणी माणसाला अवगत असणे फार कौशल्याचे काम किंवा विशेष बाब नाही. त्यामुळे मुख्यत्वेकरुन कोकण भागातल्या लोकांना आम्हाला कशी शुद्ध मराठी बोलता येते हा नेहमीचा युक्तिवाद उपयोगाचा नाही. कोकणातल्या लोकांची जितकी सरमिसळ मुंबई-पुणे भागात गेल्या दोनशेवर्षात झाली तितकी मराठवाडा, विदर्भ, खानदेश ह्या भागातल्या लोकांची झाली नाही. ती आताकुठे गेल्या तीसेक वर्षात वाढली आहे. आपणास सहज वाटत असलेल्या शक्यतांचेही अनेक पैलू असू शकतात हे ध्यानात घेणे आवश्यक आहे.
सभ्य लोक सभ्यपणे जी भाषा बोलतात तीच शिष्टसंमत भाषा असते,
शिव्या देणे, घालून-पाडुन बोलणे, अपमान करणे, घृणा करणे हे कोणत्याही स्वच्छ भाषेत असले तरी ते शिष्टसंमत नसते.
नेहमी ज्या भाषेची सवय असेल त्याला काही वेगळे नवीन शब्द खटकतात हे मलाही मान्यच आहे. पण ते खटकतात म्हणून साफ चूकच आहेत व आम्ही म्हणतो तसेच बरोबर आहे असा हट्ट धरणे योग्य नव्हे असे माझे मत आहे.
दोन वेगळ्या भागातल्या, वेगळी बोली बोलणार्यांनी एकमेकांशी संवाद साधतांना एक प्रमाणभाषा (प्रमाण म्हणजे दोघांनाही कोणताही त्रास न पडता समजेल अशी एकच भाषा) वापरावी हे मला मान्यच आहे. इथे मराठीच नाही तर जगातल्या कोणत्याही दोन भागातल्या व्यक्तींबद्दल बोलत आहे.
ह्याऊलट एक अनुभव बघा. मुंबई-पुण्यात वाढलेले लोक आमच्या वर्हाडी भागात गेल्यास त्यांची शुद्ध भाषा कधीकधी कळत नाही, लहेजा, टोन, शब्द इकडच्यांना विचित्र भासतात, अर्थ न समजून गैरसमज होण्याचे कारण घडते. आता इथे कितीही स्वच्छ मराठी बोलले तरी ते 'शिष्ट'संमत होत नाही. दॅट्सऑल....!
खरंतर कोणती मराठी शुद्ध व स्वच्छ समजावी हाच मोठा प्रश्न आहे...
यादवकालिन//महानुभाव पंथी /ज्ञानेश्वरीतली /तुकारामांची-शिवाजीराजांची/पेशवेकालीन/१९व्या शतकातली मराठी/२०व्या शतकातली /२१व्या शतकातली
"आले असल्यास" म्हणावे की "आल्यास" म्हणावे?
"परांजपे यांनी" असे म्हणावे की "परांजप्यांनी" असे म्हणावे?
"बोलावलं, बोलावले, बोलविले, बोलाविले" ह्यापैकी नक्की काय?
असो... असे अनेक प्रश्न उपस्थित होतात...
Pages