आयपीएल-१०

Submitted by फेरफटका on 20 February, 2017 - 12:23

आयपीएल - १० चं रणशिंग फुंकलं गेलय. कालच्या लिलावात बेन स्टोक्स ने विक्रमी १४.५ कोटी चा आणी टायमल मिल्स ने १२ कोटी चा बार उडवलाय, तर बहूचर्चित जेसन रॉय १ कोटी (फक्त?) च्या बार्गेन डील मधे गुजराथ लायन्स कडे गेलाय. ईरफान पठाण, ईशांत शर्मा वगैरे भारतीय खेळाडू आणी अ‍ॅलेक्स हेल्स, जॉनी बेअरस्ट्रॉ, ईम्रान ताहीर शॉन अ‍ॅबॉट, रॉस टेलर सारखे टी-२० मधले तगडे परदेशी खेळाडू ह्या वेळी 'अनसोल्ड' आहेत. अन्कॅप्ड कॅटेगरीमधे भारताचे नटराजन, थंपी, गौथम आणी सिराज ह्यांना लॉटरी लागलीये तर अंकित बावणे चा सुद्धा यंदा लिलावात नंबर लागलाय.

पुन्हा एकदा ह्या रणधुमाळी मधे मायबोलीकरांच्या चर्चा, विचार, व्यंगचित्रं, मत-मतांतरं ह्या सगळ्यांसाठी हा धागा सुरू करतोय. होऊ दे चर्चा!!

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

भयंकर अंपायरीग, पण रोहित चा एकंदर फॉर्म नि स्पिन खेळायचे तंत्र बघता फार फरक पडला असता असे वाटत नाही. मुंबई हि एकमेव टीम असेल कि जी त्यांचे विनिंग ओपनिंग काँबिनेशन खेळवण्याचे सातत्याने नाकारते.

केकआर चा दिवस खराब
मिस फिल्ड झेल सोडने
च्यामारी बिनडोक पणा ऐनवेळेस गंभीर का बाहेर गेला ?

पांड्या जबरदस्त फारमात राव ३ ओवर मधे ५० मारले

एका सीजनच्या पुण्याईवर पोलार्ड किती वर्षे राहिलाय राव. ... यादवची ओव्हर खेळून काढली नसति तर शेवटी इतकी बिकट परिस्थिती न येती.

आज मॅक्लेशन ची पाळी राणा नि पांड्या ला रानडे रोड्वर मसाज करण्याची Lol

नोहीट ने (फायनली) परफॉर्म केलं हे कौतुक आहे. पण ईतक्या संधी मिळाल्यावर कपिल ......
>>>>
हे चूक आहे. ईतक्या सण्धी मिळाल्यावर एखाददुसरी इनिंग खेळला असे वाटते यातून. ओवरऑल एवरेज काढा आणि ठरवा ना. एकदिवसीयमध्ये तुम्हाला वर सेंच्युरी प्लेअर लागतात आणि ते तो आहे. सपोर्टींग नाही तर लिडींग रोलमध्ये चमकणारा प्लेअर आहे.

आता आजचा सामना -

पोलार्ड तर फुकट आहे. आज त्याला पांड्याच्या आधी पाठवला तेव्हाच मी शिव्या घातल्या. त्याने अशी एखाद्या न झेपणारया बॉलरची ओवर खेळून दुसरा कोणी गिर्हाईक मिळतोय का बघत उभे राहणे आणि त्या नादात रनरेट असा करून ठेवणे की मागचेही मारू न शकणे हे काही नवीन नाही. नेहनीचेच आहे. तरीही तिथूनही सामना काढला ही खरी कमाल.

मला राणाचा पन्नास झाल्यावरचा आवेश नाही आवडला. बॅट फिरवताना तो असा होता की मी म्याच कशी काढली बघा. मित्रा ती संपवली नव्हतीस अजून. तुझ्यासोबत तो पाण्ड्या आहे. तो ही तितकाच महत्वाचा आहे. दोघे मिळून जिंकवा आणि मग एकत्र जल्लोष करा. मग पुढे बाद झाला...
पाण्ड्याचा आत्मविश्वास मात्र आज बेस्ट वाटला. त्याची बॉडी लॅगवेज आज अशी होती की मी सामना संपवणारच.. आणि त्याने ते तसे केले !

हा सीजन हार्दिक पांड्या फलण्दाजीत गाजवणार .. हे नक्की !

राणा, पाण्ड्या ब्रदर्सचा बिग हिटींग फॉर्म पाहता. आणि पुढे रोहीतनेही अजून मोठी इनिंग केली नाही हे बघता, पोलार्डला बाहेरचा रस्ता दाखवत एखादा डावाला स्थिरता देणारा फलंदाज घ्यायला हवा. बाकी ओवरसीज प्लेअरमध्ये तो कोण आहे याची कल्पना नाही, सिमन्स आहे का यंदा? असल्यास तो देखील चालेल..

गेल बाहेर.???????, $%^&* नानाची टांग त्या आरसीबीच्या. मी सगळ्यामधे गेल ला कॅप्टन केलेला. वाटले आज सोमवार आहे . भोलेबाबांचे नाव घेऊन गेल मारेल ...

विराट येऊ पर्यंत आरसीबी नाही नाही ते एक्स्पेरिमेंट करणार असे वाटते.
गेल ला काढून त्या जागी नवखा विष्णू आणि वॉट्सन दोघे ओपनर म्हणून आले. आणि दोघे ही स्वस्तात परतले.
नेमके काय विचार करून आले असतील ? Uhoh

"नेमके काय विचार करून आले असतील ?" - बॉलिंग स्ट्राँग करण्याचा प्रयत्न ह्या वर्षी सगळे (मायनस गुजराथ सो फार) करताहेत.

ही मॅच एबीडी वि. पंजाब चाललीये आत्तापर्यंत तरी.
>>>>

थोडेसे करेक्शन
एबीडी वि. (पंजाब + बेंगलोर)
फक्त 46 चेंडू स्ट्राईक दिला त्याला...

पंजाब ने परवा दिल्ली ने केली तशी हाराकिरी नाही केली, तर मॅच त्यांच्या कंट्रोल मधे आहे.

त्यावरून सुचलं, उद्या च्या मॅच साठी दिल्ली ने ब्रॅथवैट च्या ऐवजी कॉरी अँडरसन (बॅटींग) आणी मिश्रा च्या जागी जयंत यादव (बॅटींग आणी मिश्रा ला थोडसं डिसिप्लिनरी अ‍ॅक्शन म्हणून सुद्धा) ला आणावं का? संजू च्या जागी सुद्धा बदल चालू शकेल. अंकित बावणे मे बी?

नेहमी एव्हढ्या स्मूथली सिल्की खेळणआर्‍या अमलाला T20 साठी ताणून ओढून खेळताना बघताना एकदम कर्कश वाटते Sad

मनन वोहरा, मनदीप सिंग ह्यांनी सोन्यासारख्या संधी फुकत घालवल्या आहेत.

फेफे, कोरी जस्ट खेळायला लागलाय तेंव्हा रिस्की चेंज होईल..

अत्ताच वाचलं की मॅथ्यूज जॉईन झालाय. पण वाटत नाहीये की लगेच खेळवतील त्याला / किंवा तो सुद्धा कितपत फीट असेल, कुणास ठाऊक?

असामी, अँडरसन ने बॉलिंग रिसेंटली सुरू केलीये. मला वाटतं की तो डोमेस्टीक क्रिकेट (बॅटींग) जानेवारी पासून खेळतोय.

आमलाबद्दल आणी वोहरा आणी मनदीप बद्दल सहमत!

दिल्लीला लगेचच भारंभार बदल करायची अजिब्बात आवश्यकता नाहीये
ब्रेथवेटच्या जागी कोरी ॲंडरसन हा एकमेव बदल उद्याच्या मॅचसाठी पुरेसा आहे
मिश्राला लगेच उचलून बाहेर नका फेकू.... मान्य की मागच्या सामन्यात त्याची कामगिरी अगदीच खराब होती पण तो आयपीएल स्पेशल बॉलर आहे .... बसला की तीन चार विकेट्स नक्की!
त्यामुळे त्याला अजुन संधी मिळेल
अय्यर येइपर्यंत तरी सॅमसनला खेळवावा.... न जाणो एखादी मॅच काढेल पण तो!
रिषभ पंतचा फॉर्म बघता त्याला बिलिंग्ससोबत ओपनिंगला खेळवावे.... तरे खाली पण खेळू शकतो
कमिन्स आणि मॉरीस हा डेथ ओव्हर्ससाठी जबरी ॲटेक आहे
उद्या फक्त त्या ताहीरच्या चार ओव्हर्स नीट खेळून काढा रे, मग बाकी बॉलर्सचे काही टेंशन नाही

I am sure DD will bounce back tomorrow!

बरोबर आहे स्वरूप. माझी मिश्रा विषयीची नाराजी त्याच्या परफॉर्मन्स वरून नाहीये. त्याने बॅटींग करताना जो अ‍ॅटीट्यूड दाखवला, त्यावरून मी वैतागलो होतो. तो टी-२० चा चांगला बॉलर आहे.

पुण्याचा कॅप्टन अजिंक्य रहाणे आहे आज. स्मिथ आणी तिवारी बाहेर. पुण्याने टॉस जिंकून बॉलिंग घेतलीये (अपेक्षेप्रमाणे). आज रहाणे द्रविड ला 'शिष्यादिच्छेत पराजयम' अशी गुरूदक्षिणा देणार का?

स्मिथ बाहेर म्हणजे मॅच even आहे.

द्रविड राहाणे चा गुरू कसा झाला रे ? RR मधे यायच्या आधीपासून राहाणे झक्कास खेळत होता ना ? म्हणूनच द्रविड ने त्याला उचलले होते.

धोनी खेळणार का रे आज ? Wink

स्मिथ शिवाय हि टोटल चेस करतील असे वाटत नाही. झंपाला एव्हढ्या उशिरा पर्यंत ठेवण्याचे गँबल गंडले पार.

"द्रविड राहाणे चा गुरू कसा झाला रे " - हिर्याला पैलू पाडायचं काम केलं द्रविड ने.

असो. मस्त खेळला संजू आणी मॉरीस. संजू सॅमसन ला अशी एक इनिंग हवीच होती. लाँग ड्यू होती.

धोनी आज खेळेल की नाही माहीत नाही पण तो खेळल्याशिवाय आयपीएलमध्ये मजा नही.लोकं त्याची फटकेबाजी आणि त्याने फिनिश सामने बघायला येतात.

फे फे मला वाटते, राहणे चा द्रविड रोल मॉडेल होता (नि सचिन पण अर्थातच- त्याने पहिले टेस्ट शतक द्रविड्ला अर्पण केले होते - हे सगळे RR च्या सुरूवातीचे) त्यामूळे गुरू वेगळ्या ढंगाचे वाटते.

संजू सॅमसन ला अशी एक इनिंग हवीच होती. >> अशा काही अजून खेळेल तर लिमिटेड टीम मधे येउ शकेल.

विंटेज धोणी नाहि वाटत रे केदार. reflex कमी पडतात दुर्दैवाने. खेळला तर मजा येईल हे नक्कीच,

"विंटेज धोणी नाहि वाटत रे ' - सहमत!

दिल्ली ला एक जबरदस्त विजयाने सीझन ची सुरूवात करता आली, हे छान झालं. स्वरूप चे काल चे सगळे अंदाज बरोबर आले.

आता उद्या मुंबई वि. हैद्राबाद! हैद्राबाद फॉर्म च्या बाबतीत फेव्हरिट्स असले तरी उद्या मुंबई मेजर अपसेट करेल (हैद्राबाद ला) असं वाटतय.

Pages