वृक्षगान

Submitted by टीना on 6 February, 2017 - 14:59

कालचं डॉ. शरदिनी डहाणूकर यांनी लिहिलेलं पहिलंवहिलं पुस्तक 'वृक्षगान' वाचुन काढलं.
येथे असलेल्या निसर्गप्रमी माबोकर शांकलीकडून याबद्दल ऐकलं होत आणि वाचायच पक्क केलं.
सुंदर, अप्रतिम अनुभूती.

मुळच्या गोवन असलेल्या शरदिनींने यात मुख्यत्वे मुंबईत असलेल्या वृक्षांबरोबरच त्यांचे गोव्यातले अनुभव, झाडं, इंटर्नशीपकरिता अमेरिकेत असताना अनुभवलेली ऋतुपरत्वे बदलणारी वृक्षसंपदा सुद्धा वर्णिली आहे.
यात त्यांनी या वृक्षांबद्दल असलेल्या माहितीत त्या वृक्षांची नावे, त्यांच मुळ गावं, त्यांचे मराठी, संस्कृत तसेच हिंदी नावांबरोबरच कॉमन इंग्रजी नावे व शास्त्रीय नावे सांगितली आहे. त्यांच वृक्षांप्रति असलेलं प्रेम, वेड, त्यांच्या सोबतच्या आठवणी सगळं काही त्यांच्या अनोख्या शैलीत मांडलं आहे. म्हणायला माहितीपर असलेलं हे पुस्तक एका क्षणालाही ते तसं आहे हे जाणवू देत नाही इतक्या बेमालुमपणे शरदिनी डहाणूकर तुम्हाला त्यातं गुंतवून ठेवतात. आपल्या आजुबाजुला असणार्‍या ह्या झाडांची आपल्याला नव्याने ओळख करुन देतातं. प्रत्येक वृक्षांबद्दलच्या गोष्टी तसेच सोबत रोवलेल्या कवितांच्या ओळी मन रिझवतात.

पु. ल. प्रस्तावनेत या पुस्तकाच्या शैलीबाबत म्हणतात तसं 'हे पुस्तक "लिहिलं" गेलेलं नाही, ते "सांगितलेलं" पुस्तक आहे. लिहिल्या गेलेल्या पुस्तकामध्ये भाषा अधिक सुंदर करण्याकडे, प्रौढ करण्याकडे कल असतो. पण पहिल्या पानापासुन शेवटच्या पानापर्यंत मला तर सारखं वाटत होतं की, शरदिनी अशी गच्चीत बसून मित्र-मंडळींना गोष्टी सांगते आहे.'

बर्‍याचं लोकांना गोष्टीरुपी शैलीतली पुस्तकं वाचायला आवडत असतील. मी स्वतः ती प्रिफर करते. पण माहितीपर असुनही एका बैठकीत हे पुस्तक संपत. अन मागं उरतं ते कुतुहल.. झाडांप्रती आणि या लेखिकेविषयी..

पुस्तकाच्या सुरुवातीचे लेखिकेचे मनोगत अन पाठोपाठ आलेली पु. ल. देशपांडेंची प्रस्तावना यांपासुन मिळवलेली पकड ते पुस्तक खाली ठेवल्यावरच सुटते. एखादं पुस्तक किती प्रसन्न अनुभव देऊ शकतं ह्याचा सुंदर नमुना.

हे वाचल्यावर ते संग्रही असावं म्हणुन पुस्तक शोधायला गेली तर सगळीकडे आऊट ऑफ प्रिंटचे बोर्ड लागलेले दिसले.
शांकलीकडून हे पुस्तकं वाचायला आणलं तिला विचारल्यावर कळलं कि तिनेसुद्धा याकरिता फोनाफानी, पत्रव्यवहार केले प्रकाशनाकडे पण 'वाचनवर्ग नसल्यामुळे आम्ही पुढील आवृत्ती प्रकाशित करत नाही' असा प्रतिवाद आला.
काय पण साला दुर्दैव आहे बघा, फक्त लोकांना माहिती नाही आणि कदाचित म्हणुन वाचनवर्ग न भेटत असल्यामुळे पुस्तक हवं असुनही मिळेना झालयं. यावर कहर म्हणजे या पुस्तकाच्या मुखपृष्ठाचा सुद्धा प्रचि जालावर नाही.
असो. कुणाला जर मिळालं तर नक्की वाचावं अन् संग्रही असावचं असं हे पुस्तकं..

वृक्षगान - डॉ. शरदिनी डहाणूकर
पहिली आवृत्ती- १९८४
दुसरी आवृत्ती- १९९७
श्रीविद्या प्रकाशन, पुणे

Group content visibility: 
Public - accessible to all site users

छान परिचय.

आता कुठून मिळतंय ते बघावं लागेल.

छान लिहिलंयस.

मी लहान असतांना त्यांचे म टा मध्ये निसर्गविषयक लेख यायचे, ते मी वाचायचे आवडीने.

त्यांचे म टा मध्ये निसर्गविषयक लेख यायचे, ते मी वाचायचे आवडीने>>>>>>+१

त्यांनी नंतर पाककलेवर लिहायला सुरवात केली होती. पांचालीची थाळी हे त्यांचे पुस्तक.
मग औषधांवरही एक सदर त्या लिहित होत्या, ते सदर लिहित असतानाच त्या गेल्या.

http://www.bookganga.com/eBooks/Books/Index?BookSearchTags=%E0%A4%A1%E0%...

ज्यांना ते पुस्तक घ्यायची इच्छा आहेत त्यांनी वरील संकेतस्थळावर त्या पुस्तका पुढे "Add to my wish list" क्लिक करावे. बघु या कदाचित मागणी असल्यास ते परत उपलब्ध होते का ते.