सिंड्रेलाचा कापडी बूट

Submitted by आऊ on 31 January, 2017 - 04:53

लहान असताना सिन्ड्रेला ची गोष्ट ऐकली कि तीच्या पायातले काचेचे सुंदर बूट कसे असतील याचा विचार करत कल्पना करायचे, आपल्याला तसेच बूट मिळाले तर कित्ती मज्जा येईल असं वाटायचं. मग मोठे होत गेलो वय वाढल विचार बदलले पण सिन्ड्रेला चे बूट अजूनही एका कोपऱ्यात घर करून बसलेत, असो ...

थंडी सुरु झाली तेव्हा लागलीच बूट घेतले, म्हटलं काहीतरी करूया याच्यावर , विद्यालयात असताना एक प्रयोग केला होता बुटांवर म्हटलं आत्ता करायला काय हरकत आहे म्हणून सुरुवात केली पण थंडी गेली आणि माझा उद्योग पूर्ण झाला, जाऊदे पुढच्या हिवाळ्यात वापरता येतील आता....

तर हा माझा उपद्व्याप

shoes 1.JPGshoes 3.JPGshoes 2.JPG

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Use group defaults

मस्तच!
तुम्ही याचा business पण करु शकता..
ठोक भावात बूट विकत घेउन असे सुंदर बनवून विकणे.
कला + आवड + business एकत्र करता येईल.

धन्यवाद अंजु, रेणू, दिनेशदा, मानवपृथ्वीकर
हो दिनेशदा कापडावर भरतकाम करण्यापेक्षा थोडाजास्त वेळ लागतो.
जरूर मानवपृथ्वीकर छान कल्पना मी पण संधीची वाट बघतेय कधी मोकळा वेळ मिळतोय आणि काही करतेय...