Submitted by चैतन्य दीक्षित on 17 January, 2017 - 05:12
हे दार,
त्याच्या मागचं दार,
आणि त्या दाराच्याही मागचं दार...
अशी आत आत असलेली सगळी दारं
एक एक करत बंद करून
मी कालची एक पायरी चढून
'आत्ता'त आलेय!
हुश्श!
"आता ना, मला फक्त पुढचं पहायचंय"
असं म्हणून मागं वळते, तोच...
तिथे तुम्ही हजर,
तुमच्याही 'आत्ता'च्या दारात.
पण तुमचं दार,
त्याच्या मागचं दार,
आणि त्या दाराच्याही मागचं दार मात्र
पारदर्शक काचेचं...!
~ चैतन्य
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Use group defaults
शेअर करा
प्रयत्न छान वाटला...
प्रयत्न छान वाटला...
मला नीटशी नाही कळली हो कविता....
धन्यवाद कावेरि !
धन्यवाद कावेरि !
काहीशी अशी भावना आहे-
ती तिचा भूतकाळ विसरून नवीन सुरुवात करू पाहते आहे,
पण इतर लोक भूतकाळ विसरायला तयार नाहीत.
ओके....
ओके....
छान आहे कल्पना...
पुढील कवितेसाठी शुभेच्छा ! ! !