विडंबन !

Submitted by अनिरुद्ध on 29 December, 2016 - 02:01

अबीर गुलाल गाण्याच्या धर्तीवर विडंबन करण्याचा प्रयत्न केला आहे.

बियर हलाल चिकनच्या संग
डिस्को मध्ये नाचण्यात तरुणाई दंग || धृ ||

पब मध्ये कैसे शिरू आम्ही कॅश हीन
उधारही कोणा मागू मंथ एन्ड चा सीन
क्रेडिट कार्ड स्वाईप करुनी घेऊया आनंद ||१||

सनबर्नी गाऊ आम्ही सनबर्नी नाचू
वारुणीच्या पुरामध्ये अंग अंग न्हाऊ
हफीम,चरस,गांजा घेऊन होऊन जाऊ धुंद ||२||

चौका- चौका मध्ये मामा उभे राहती
ड्रंक -न -ड्राईव्ह च्या केस मध्ये पावती फाडती
गुलाबो गांधी देउनी घर ला जाऊ संग ||३||

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users