कोल्हापुरातली खादाडी

Submitted by webmaster on 2 March, 2009 - 10:47

कोल्हापुरात कुठे काय खायचं, याचं हितगुज

विषय: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

मिसळीच्या बहुतेक प्रसिद्ध जागांची नावे आलीच आहेत.
फडतरे मिसळीला नावे ठेवणारे आहेत पण अगदी एक कोल्हापुरी म्हणूनही मला ती संतुलित चवीची, उत्तमरित्या प्रेझेंट केलेली मिसळ वाटते. आता कोल्हापूरमध्येही अतितिखट खाण्याची वृत्ती काहीशी बदलू लागली आहे (वै. म.) त्यामुळे इतर ठिकाणची जहाल मिसळ बर्‍याच जणांना रुचत नाही.

ओ हो....आरती...

~ कमाल आहे तुझी....आणि मी आत्ताच तुझा प्रतिसाद वाचताना दिलखुलास हसलो....कारण मी तसे ते मुद्दामच लिहिले होते....तू चिडतेस का ते पाहाण्यासाठी....झालेही तसेच....लाल बाहुली डोळे वटारलेली इथे अवतरलीच.

ग्रेट.

अन्जूसोबत ये अथवा ऑन यूवर ओन ये....केव्हाही.... तुझे मनःपूर्वक स्वागत होईल या करवीर नगरीतील मामाच्या घरी..... मंदिराच्या हॉटेलमध्ये (ओशो) मी तुमच्या पिंपरीचिंचवडच्या योगुली नामक नेट भाचीला घेऊन गेलो होतो...जेवलो...आणि ती म्हणाली, "मामा, चला आता तुमच्या घरी जायचे...!" मलाही मस्त वाटले. ती, तिचा नवरा, मुलगा, भाऊ....सारे घरी आलो....अर्ध्या तासासाठी आलो होतो....चार तास राहिले ते लोक. तसे आपणही करू.

किती वर्षे झाली मला कोल्हापुरात बाहेर जेऊन Sad गावात घरं असल्याचा हा तोटा!
फारतर दावणगिरी दोसा, क्वचित कामतमध्ये नाश्ता आणि कॉकटेल एवढंच बाहेर खाणं होतं कोल्हापुरला गेलं की..

ओशो तर घरासमोर आहे माझ्या Uhoh पण मी नुसतंच ऐकतेय अजून...

मामा, तुमची भाची रागावल्याशिवाय राहणार का??? Proud एका भाचीला एक तर दुसर्‍या भाचीला परकेपणा. हे आजकालच्या मॉडर्न भाच्या (असा अन्याय) सहन नाही करत Wink
गावात घरं असल्याचा हा तोटा! <<< सई, हो तेही खरच आहे आणि अनुभवल आहे. गावी गेल की घरच्या कामात बिजी त्यामूळे जास्त भटकायला नाही मिळत.
मामा, कोल्हापुरात यायच अजून नक्की नाही पण पुढच्या महिन्यात येण्याचा विचार करत आहे आली तर नक्की भेटायला येईन. गेल्यावर्षीसुद्धा प्लान केला होता पण शक्य झाल नाही. बघू यावेळेस काय होत. उद्यापासून माबोवर येता येणार नाही म्हणून कालपासून विचारत होती. तुम्हाला गुढीपाडव्याच्या खूप खूप शुभेच्छा. नविन वर्ष तुम्हाला सुख, समाधानाच आणि आरोग्यदायी जावो.

मिसळ म्हणाल तर गंगावेस वरच्या आनंद आश्रम च्या मिसळीला तोड नव्हती. अर्थात मी ज्यावेळी कोल्हापूरला होतो त्यावेळची ही गोष्ट आहे.. आता कशी आहे ते माहित नाही.. पण बावडा ,खास बाग ह्या नावाच्या नुसत्या मोठ्या वाटतात.. फडतरे त्यातल्या त्यात बरी..

'ओशो' सई च्या घराजवळ तर , 'दावणगिरी' मामांच्या घराजवळ आहे.. शिवाय अमेयच्या घराजवळ 'आहार ' आहेच. तर आरती ताई ...
जेंव्हा जाल त्यावेळी ह्या सगळ्यांना आगाऊ कल्पना द्या.. आणि अगत्याचा पाहुणचार खाऊन या.. Wink

"...'ओशो' सई च्या घराजवळ तर , 'दावणगिरी' मामांच्या घराजवळ आहे.. शिवाय अमेयच्या घराजवळ 'आहार ' आहेच..."

~ आरती....बघीतलंस ना....हे लोक किती दुष्ट असतात ! तू आता एक प्लॅन कर. कोल्हापूरला येताना कराड लागते, तर हा निवांत पोपट कराडचा आहे, तिथे उतर..... त्याच्या परिसरात एकापेक्षा एक अशी किमान ५० हॉटेल्स आहेत झणझणीत आणि पाहता क्षणीच पोट भरावे अशा पदार्थांनी ठेचून भरलेली.....मनसोक्त खावून घे तिथे अगोदर, निपो पाहुणचार करेलच, १००%....मग कोल्हापूरला येण्यासाठी कार स्टार्ट कर.....इथे आल्यानंतर वरील तिन्ही ठिकाणी परत सुरू.....मजेत सारे !

@ सई.....अजून तो "ओशो" मध्ये गेलेली नाहीस. आता आरतीसमवेत प्लॅन कर....आणि ये कोल्हापूरला...तुम्हा दोघींना ओशोत सोडतो.....[मी नूमवि शेजारील दुकानातील आईसक्रीम खात बसतो, तो पर्यंत].

मामा Happy
अरे हो.. आनंद आश्रम!! मी तर विसरूनच गेले होते.. आम्ही तिथेच खायचो! मिसळ सोडा, ते तरी आहे का अजून तिथे? मी कित्येक वर्षात त्या उतरतीच्या रस्त्यावरून गेलेसुद्धा नाहीये Sad
आता मला एकदा त्रयस्थ म्हणुन यायला पाहिजे आणि दोन्ही घरांत न कळवता लेकासोबत जीवाचे कोल्हापुर करावेसे वाटतेय.. सगळे जुने रस्ते, गल्ल्या, नेहमीची दुकानं, खाण्या-पिण्याची-फिरायला जायची ठिकाणं, शाळा-कॉलेजं छान मारायला हवीत.. एवढं सगळं कव्हर करायला खुप दिवस लागतील.. आठवड्यापेक्षा जास्त.. Sad

येस्स...सई....आठवड्यापेक्षा नक्कीच जास्त. कोल्हापूर शहरातील रस्त्यांची बिच्चारी केविलवाणी अवस्था पाहिल्यास हा कालावधी आणखीन् वाढू शकतो. इथे जितक्या वा ज्या ज्या हॉटेल्सची नावे घेतली गेली आहेत त्यापैकी ७५% हॉटेल्सकडे पार्किंगची स्वतःची अशी व्यवस्था नाही....तिथे गेले की पहिली डोकेदुखी कुठली असते ती गाडी आपणच पार्क करायची....आजुबाजूच्या दुकानदारांशी, ढाबा गाडीवाल्यांशी, अपार्टमेन्टवाल्यांशी भांडणे ठरलेली असतात....कुठून झक मारली आणि आलो इथे खायला असे होऊन जाते.

तरी हरकत नाही....जिथे पार्किंग आहे तिथे मी तुला घेऊन जातो....पार्किंग आणि हॉटेल्सची बिल्स मात्र तू दे.... मी शासकीय सेवानिवृत्त वेतनधारक असल्याने माझी परिस्थिती तू जाणतेसच. Lol Lol Lol

आरती, काल रात्रीच मामांना मी हे विचारणार होते? मला घरी बोलावता तर आरतीला का नाही? अगदी लिहिणार होते ग, तोंडावर आलं होतं पण बरं झालं तूच विचारलंस.

माझ्या अज्ञानाबद्दल क्षमा असावी पण कोल्हापुरी 'तांबडा रस्सा' आणि 'पांढरा रस्सा' यासाठी व्हेज ऑप्शन कोणता आहे? Uhoh

कोल्हापुरी 'तांबडा रस्सा' आणि 'पांढरा रस्सा' यासाठी व्हेज ऑप्शन कोणता आहे?>> नाहि हो. हे फक्त आणि फक्त नॉनव्हेजच आहेत.

नाही अमेय व्हेज मधे पण मिळतात. तयार मसालेही मिळतात.. आपल्या मनाप्रमाणे सुरण, लाल भोपळा, दोडका, शेवग्याच्या शेंगा वापरायच्या आणि झकोबाला जेवायला बोलवायचे.

प्रसिक.... { नाव छानच आहे.....काही विशिष्ट अर्थ आहे का याला ? }

~ कोल्हापूरी "तांबडा" आणि "पांढरा" हे आता आमच्या गावचे ब्रॅन्ड नेम बनून गेले आहेत....पुणे-बंगलोर रस्त्यावर जागोजागो "कोल्हापूरी स्पेशल तांबडा पांढरा रस्सा" अशी भलीमोठी होर्डिंग्जही दिसतील.... पण हे दोन्ही घटक नॉन-व्हेजमध्ये येतात.....त्याला शाकाहारी पर्याय नसतो....किमान हॉटेल्समध्ये तरी.....

तांबड्यापेक्षाही पांढर्‍या रश्शाची चव न्यारी....आणि कोल्हापुरी हॉटेल्समध्ये याला मर्यादा नाही....तुम्ही मागेपर्यंत वेटर गरमगरम रश्शाने वाटी भरतच असतो.....पाचकही आहे.

दिनेश, तुमचे पर्याय जरी योग्य असले तरी मांसाचे अर्क उतरल्यामुळे त्या रश्श्यांची चव जी बदलते तशी शाकाहारी रश्श्यांना नाही येणार, हे मला माझ्या कोल्हापुरच्या आत्याने सांगितले होते.

एकदा मी तिच्याकडे हाच हट्ट केला की मला पण चाखायचेत. ती बनवत असताना मी दोन्ही ग्रेव्हींची आणि पूर्ण पदार्थांची कृती पाहिली होती नेटाने, तेव्हा ती म्हणाली ते पटलं!

मामा, मला कोल्हापुरची ही ओळख नाही आवडत पण!! कोल्हापुर यापेक्षाही कितीतरी अधिक आहे त्या सगळ्यावर हे रस्से शब्दशः तर्री ओततात Sad

सई, तांबडा पांढरा हे जरा तरी बरे आता एक खाद्यवैविध्य म्हणून जरा ग्लॅमर आहे त्याला, सोळा एक वर्षांपूर्वी जेव्हा पहिल्यांदा उत्तर भारतात आलो तेव्हा सहकारी आणि शेजारी यांना कोल्हापूर बद्दल दोनच गोष्टी माहिती होत्या ... चप्पल आणि पद्मिनी कोल्हापुरे. त्या चपलेनेच मारावे असा बर्‍याचदा मोह व्हायचा Happy
शिवाय "अरे वो चद्दर शोलापूर की या कोलापूरकी ?" ... ह्याचे शंकानिरसनही करत बसायला लागायचे !

अभय....

साकोलीला नेमक्या कोणत्या भागात ?....तिथे तर किमान एक डझनभर झालेली दिसतात. पाटणकर हायस्कूलच्या समोरील भागातील माहीत आहेत मला..... मी पुण्याच्या मित्रांना घेऊन येईन तुमच्या हॉटेलमध्ये....त्या सार्‍यांना आपल्या पांढर्‍या रश्शाविषयी किती प्रेम आहे हे ते तिथे आल्यानंतर समजेलच तुम्हाला....[ तुम्हीच वैतागाने म्हणाल, "काय रे देवा...कशाला मी त्या कोल्हापुरी धाग्यावर हॉटेलची जाहिरात केली ?]

हॉटेलला "रस्सा मंडळ" हेच नाव दिले आहे का ?

सई...

"...कोल्हापुरची ही ओळख नाही आवडत...." मान्य मला तुझे हे म्हणणे....पण दिसले आहे असे की निव्वळ तुमच्या पुण्यातच आमच्या कोल्हापूरची अशी ओळख ठासून राहिली आहे.....शिवाय अंबाबाई, रंकाळा, शाहु खासबाग मैदान, गूळ, गोकुळ दुध, कोल्हापुरी चप्पला...अशीही ठिकाणे आहेतच.... पर्यटकदेखील अंबाबाईचे दर्शन झाले की मोकळे होतात ते तांबड्या पांढर्‍या रश्शाच्या शोधार्थ भटकण्यासाठीच.

असते एखाद्या गावाच्या खाद्यसंस्कृतीचे वैशिष्ठ्य....काहीवेळा तेच प्राधान्यानी पुढे येत राहते अन् बाकीच्या महत्त्वाच्या बाबी मागे पडत जातात.

आशोक.
हो. साकोली कडुन उभा मारुतिकडे जाताना डाव्याबाजुस आहे.आणि एक मी कोल्हापुरचाच आहे. त्यामुळे हे सगळे माहीत आहे एकदा याच चव पहायला

कोल्हापूर म्हटलं की मला नाही पांढरा-तांबडा रस्सा आठवत. मला मिसळ आठवते, तीच खाईन कोल्हापूरला आल्यावर आणि मामांकडे भाकरी आणि पोकळा भाजी खायला जाईन.

सर्वात प्रथम कोल्हापूर म्हटलं कि मला 'महालक्ष्मी' आठवते, मग राजवाडा, रंकाळा तलाव, कोल्हापुरी साज, चप्पल, आणि आवडती मिसळ.

गंमत म्हणजे मी कोल्हापूरला एकदाही गेलेले नाहीये फक्त श्रीरामपूरहून कोकणात जातांना त्यामार्गे गेले तेव्हा रंकाळा पहिला आणि तिथली भेळ खाल्ली. आणि येताना मिसळ खाल्ली, बास. पण आवडलं मला.

अन्जू....अन्जू....अन्जू....अन्जू....

~ अगं आता कोल्हापूर हे तुझ्या मामाचं म्हणजे माहेरचं गाव झाल्ये ना ? मग हक्कानं ये....आणि ती वर वर्णन केलेली सारी ठिकाणे अगदी आनंदाने पाहायला मी राहतो तुझ्यासमवेत....खाण्यापिण्याचे तर विचारूच नकोस. तू शाकाहारी आहेस ना.....चल तर मग, शाकाहारी तर इतकी चवदार आहेत आजकाल...माणूस मांसाहारीपण विसरून जातो.

माझ्याकडे भाकरी आणि पोकळा....वेलकम.

व्वा कोल्हापूर ला एक चक्कर मारावीच लागणार आता.
सर्वात कॉमेडी म्हणजे अख्या भारतात हॉटेल मधे सर्रास मिळणारी व्हेज कोल्हापूरी ही पनीर्/सिमला मिरची घातलेली भाजी कोल्हापूरात मिळतच नाही. एक लाल मिरची मिक्स भाजीवर ठेवली आणि थोडी तिखट बनवली की झाली 'व्हेज कोल्हापूरी'. ही होटेल वाल्यांनी उगाचच मारून मुरकून बनवलेली डिश आहे.
मी एकदा घरी 'व्हेज कोल्हापूरी' बनवत होते बंबईया स्टाईले ने . मला कोल्हापूर च्या मावशींनी विचारले की यात 'कांदा- लसूण चटणी' घालणार का? आणि माझ्या भाजीतले जिन्नस म्हणजे मश्रूम्स, मटार,काजू, सिमला मिरची वैगरे. त्या म्हणाल्या ही कसली व्हेज कोल्हापूरी ज्यात कांदा लसूण चटणी नाही. Happy

सामी....

तुझ्या कोल्हापूरच्या मावशीला मार्क्स दिलेच पाहिजेत कारण आमच्या कोल्हापूरात मसाला चटणी....तुम्हा मुंबईपुण्याला कांदालसूण चटणी म्हणतात....मस्तपैकी भाजीत वा आमटीत नसली की त्या पदार्थांना कसलीच चव नसते हे ठाम मत बनले आहेत. हे झाले शाकाहारी पदार्थाबाबत....मग मांसाहारीची जी चव आहे तीदेखील या मसाला चटणीमुळेच.

Pages