कोल्हापुरातली खादाडी

Submitted by webmaster on 2 March, 2009 - 10:47

कोल्हापुरात कुठे काय खायचं, याचं हितगुज

विषय: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

कामत चा पेपर डोसा त्याच्याच समोरची तृषाशांती ची लस्सी....
>>
मन्या का र बाबा आठवणी करुन देतोस ?... कामत चा पेपर डोसा आणि तृषा शांतीची लस्सी आयुष्यात भारी Happy

मी राजाभाऊची भेळ खाताना, तो कांदा कसा चिरतो तेच खुळ्यागत बघत बसायचो. सुरीने चिरलेला इतका बारीक कांदा मी इतरत्र कुठेही पाहिला नाही आणि तशी अफलातून कुरकुरीत तोंडात घालताच विरघळणारी भेळ पण नाही. मनकवड्या आणि गौरी. माझीबी अवस्था तुमच्यावानीच हाय.
पण एक कबूल करावे लागेल. प्रत्येक गावची भेळेची खुमारी वेगळीच. कोकणात चिरमुरे बारीक ब उभट. कोल्हापुरी चिरमुरे फुगीर. पंढरपुरी चुरमुरे आणखी वेगळे.
नाशिकचा कोंडाजीचा चिवडा /औरंगाबादचा तिखट चिवडा/सांगलीचे भडंग वापरून केलेल्या भेळींचा महिमा स्वतंत्र आहे.
खादाडीची दुनिया न्यारी
अनुभवण्याची गंमत भारी

व्हय का न्हाय?

>> प्रत्येक गावची भेळेची खुमारी वेगळीच.
अगदी!!! पण मला कोल्हापुरचीच जास्त आवाडते Happy

जैसिंगपूरच्या रोडवर एक भडंग मिळते. वाडीला जाताना एकदा खाल्लति...नाव विसरलो पण. अाणि त्यात हल्ली वाडीला जायला एक शॉर्टकट झालाय, त्यामुळं जैसिंगपूरला जायचा प्रश्न येत नाही. पण ती भेळ मला अजूनही लक्श्यात अाहे...

अंबा भडंग....

होय अंबा भडंग..मेन रोडवरंच आहे दुकान..
--------------------------------------------------------------------------------
If you follow all the rules, you miss all the fun!
http://www.mokaat.blogspot.com/

तसा मी चराचर च. म्हणजेच कायम काही तरी चरायला लागणारा. कोल्हापुरात पहिल्या॑दा आल्यावर वाटले येथे आपले कसे होणार ? पण काही दिवसातच येथे चा॑गलाच रुळून गेलो. मी रहायला महाद्वार रोड ला होतो. तेव्हा सुरुवात महाद्वार रोड पासुनच करावी.

महाद्वार रोड वर चा॑गली मिसळ दोन ठिकाणी मिळते. एक म्हणजे चोरघे मिसळ आणि दुसरी मोहन होटेल मधली. डोळ्यातील पाणी आणी डिश मधली मिसळ या॑चा स॑गम झाला म्हणजे मिसळ साठी दिलेले पैसे फिटले असे समजायला हरकत नाही.

कामत होटेल मधे स्पेशल काही नाही. आगदीच पर्याय नसेल तरच जावे.

वा॑गी बोळातला प्रकाशरावा॑चा चहा एकदम अफलातुन. कुठेही खावे पण चहा साठी वा॑गी बोळात यावे. प्रकाशराव बोलायला चहा पेक्षा गोड.

अर्ध्या शिवाजी पुतळ्या जवळील चारुदत्त चा वडा एकदम मस्त. पण उशिरा गेलात तर हात हालवत परत यावे लागणार. मालक बोलायला एकदम उर्मट पण वडा एकदम मस्त म्हणुन सहन करायचे.

समोरच दावणगिरी डोसा मिळतो. एक खावुन समाधान होत नाही. गर्दी असते पण इ॑तजार का फल चा॑गला डोसा होता है.

भवानी म॑डपातील राजा भाऊ भेळ बद्द्ल मी पामराने काय सा॑गावे ? जावे आणी खावुन यावे. आता म॑डपातील जागा बदललेली आहे पण भेळ तीच आहे. तेथेच एक मिसळ वाला पण होता. आता नाव आठवत नाही पण मिसळ चा॑गली करायचा.

विद्यापीठ हायस्कूल जवळील चाट चे गाडे. आयुष्यात पहिल्या॑दा इथे चाट खाल्ले . पण आवडले.

तेथेच जवळ असणारा हेन्द्रे चा पाचक सोडा. पहिल्या घोटालाच मे॑दुला झिणझिण्या येतात आणि सोडा पोटात कसा जातो ते बाहेरुन सुद्धा जाणवते.

कोल्हापुर सोडुन आता १७ वर्षे झाली. पण अजुन सुद्धा कधी कोल्हापुरात गेलो तर महाद्वार रोड ला जावुन पुर्वीच्या आठवणी जाग्या होतात का ते पहातो.

कामत होटेल मधे स्पेशल काही नाही. >> Sad
आता माहीती नाही, पण तिथला पेपर डोसा आणि आंबोळी खुप भारी असते... Happy
महाद्वार ला आले कि मोहन मिसळ हाउस किंवा कामत हॉटेल, तृषा शांती लस्सी असा कार्यक्रम अगदी ठरलेला असायचा...

अजुन एक दुकान म्हणजे, अगदी महाद्वाराच्या समोर कोल्हापुरी संगीत चिवडा आहे ..खुप वर्षांपासुन अगदी फेमस :)... तिथल्या चिवड्या बरोबरच भडंग, चकली, लाडु वैगेरे पदार्थ खुपच भारी... हमखास ट्राय करा.

०-------------------------------------------०
दुनिया मे है जंग क्यो...बेहेता लाल रंग क्यो..
सरहदे है क्यो हर कही ... सोचा है..ये तुमने क्या कभी ?

प्रा‍थ॑ना होटेल जवळ राजपुरोहित नावाची बेकरी आहे. त्यान्चा जेवण विभाग पण होता आता आहे का नाही ते माहित नाही पण तिथले जेवण एकदम मस्त होते. तिथल्या सारखी आमटी मी आज पर्यन्त कुठे खाल्ली नाही आहे.

कोल्हापूर मध्ये आलात.

राजाभाऊ भेल आणि फडतारे मिसळ खाल्याशिवाय येवु नका. सॉलीड असते. कोल्हापूरी मिसळ.

rajarampuritil hotel castle try kela ka? kheema apratim.
stand jawal htl noopur non veg sathi mastach.

नमस्कार,
मी नंदकुमार केळकर, केरळ मधील कोचीन या मध्यवर्ती ठीकाणी आमचे होम-स्टे आहे.
ज्याचा लाभ खुप लोकांना झाला आणी होत आहे. आपणाला पण तो व्हावा
म्हणुन त्याची माहिती पाठवत आहे.आपल्याला शक्य असल्यास ही माहिती
आपल्या परिचीत लोकांना तसेच मित्रमंडळींना कळवा.

स्वत:च प्लान करा केरळची सहल कुटुंबाबरोबर किंवा मित्र मैत्रिणिंबरोबर
अगदी कमी खर्चात आणि घरगुती वातावरणात आपल्या माणसांबरोबर.

तसेच या लिंक पण तपासुन बघा
http://jahirati.maayboli.com/detail.php?id=1015
अथवा
http://nkelkar.spaces.live.com/

कळावे आपला विश्वासु
नंदकुमार केळकर

तिथे मिळतो. आमच्या स्.म. लोहियाच्यासमोर पण संध्याकाळी असायचा तसा गाडा. पण त्यातलं फ्लेवर लगेच संपत. आधी जुन्या चौपाटीवर एक गोळ्याची गाडी असायशी. त्याच्याकडे २५ फ्लेवर होते. आणि तो गोळ्याबरोबर एका प्लॅस्टिक कपातुन थोडं लिक्वीड फ्लेवर द्यायचा त्यामुळं नुसता बर्फ लागला कि त्यात बुडवुन परत खाता यायच. मी दरवेळी त्याच्याकडे कालाखट्टा फ्लेवर घाय्चो. मागच्या सुट्टेत गेलो तर तो गाडाच तिथुन गायब झालाय. असं अ‍ॅडिशनल फ्लेवर देणारा गाडा आण्खी कोठी आहे का? म्हणजे आता ख्रिसमस च्या सुट्टीत गेल्यावर मला मनसोक्त बर्फाचा गोळा खाता येईल.

म्हणजे आता ख्रिसमस च्या सुट्टीत गेल्यावर मला मनसोक्त बर्फाचा गोळा खाता येईल.
>>
राजारामपुरीत पण मिळतो एका ठिकाणी असे ऐकलेय..
सध्या गोळे कसले खातोस ? डेंग्यु वैगेरे ची साथ आहे कोल्हापुरात.. जपुन बाबा Proud

हो राजारामपुरीतच आही असं मी पण ऐकलय पण कोठे? आता गेल्यावर आख्खी राजारामपुरी पालथी घालीन पण बर्फाचा गोळा खाल्ल्याशिवाय परत येणार नाही. डेंग्युचं म्हण्शील तर पावसाळ्यानंतर डेन्ग्युनि गॅस्ट्रो हे कोल्हापुरचे नेहमीचे पाहुणे. त्यांना काय घाबराय्चं?

राजारामपुरित मी कधी ऐकल नाही आहे. बर्फाचा गोळा इथ टेक्सास मध्ये या खायला. मस्त असतो.परत डेंग्यु ची भीती नाही.:)

सीमाजी धन्यवाद . खुपच जवळचं ठिकाण सांगितलं तुम्हा गोळा खाण्यासाठी.!!!!!! बर्फाचा गोळा खाण्यासाठी टेक्सासला यायचं म्हणजे असं झालं की "चाराण्याची कोंबडी नि आठाण्याचा मसाला". त्यापेक्षा तुम्हीच भारतात आल्यावर कोल्हापुरला या आपण बर्फाचा गोळा, राजाभाऊची भेळ, चौपाटीवरची पाणीपुरी, फडतर्‍यांची मिसळ, "दाजिबा"तला तांबडा-पांधरा रस्सा नि सोळंकीचं आईस्क्रीम सगळंच खाऊ.

खुपच जवळचं ठिकाण सांगितलं तुम्हा गोळा खाण्यासाठी >> Rofl

आता थंडी सुरु झाली असेल.. तरी थंडीत थंड खाण्याची मजा काही वेगळीच !!.. कोल्हापुरात कुठेही इन जनरल आइसक्रीम छानच मिळते Happy

कुलु, बर्फाचा गोळा नाही, तरी मला एक झकास आइसक्रीम पार्लर माहिती आहे...
टाकाळा रोड ला...राजरामपुरीकडे जाताना , पुर्वा हॉस्पिटल च्या थोडे पुढे, सिग्नल जवळ सुदिमा म्हणुन दुकान आहे....
झकास आहे एकदम.. ताराबाई पार्कातपण किरण बंगल्या समोर तुंबडुन दुकाने आहेत.. मस्त आहेत सगळीच Happy

हे मी वाचतोय रे केड्या Happy

डीसेंबरात कोल्हापुरास जातोच आहे. तेव्हा खादाडी करेच. तुला टूकटूक Proud

Thank you Kedar. I was not knowing that Parlour. Now I will definitely go ther to taste icecream. I am agrwee with you that ,everywhere in Kolhapur you get the tasty iccreams. I Kolhapur only I have tasted Mastani, n various sther types of icecreams which are made by combining basic types of icecream flavours(like tuty fruity, jumbo, dhamaka,pilwai, shahi vanilla,etc.) In metro cities like Mumbai, Hyderabad, Banglore I have not seen such tasty combinations of icecreams.(We Kolhapurkars are enough intellegent to make such combinations.).

मटण खायचे असेल तर "कृष्णा" ला जा एकदा. आदित्य कॉर्नरकडून दाभोळकर कॉर्नरला जाताना उजव्या हाताला वाटेत लागते.
दुसरे ठिकाण म्हणजे "शेतकरी" धाबा, रन्काळ्याकडून फुलेवाडीला जाताना वाटेत आहे.
किंवा मग शिवाजी पेठेतल्या कुठल्याही घरगुती खानावळीत जा.

मिसळीसाठी मोहन हॉटेल, खासबागेतली मिसळ (हॉटेलचे नाव irrelevant आहे) Happy किंवा मग पन्हाळ्याला तबक उद्यान बाहेरची मिसळ.

अरे केदर मल बर्फाच्या गोळ्याचे दुकान राजारामपुरीतल्या चौथ्या गल्लीत सापडले, कालाखट्टा फ्लेवर छान मिळतं तिथे!

माझा नवरा २ वर्षांनी कोल्हापूर ला गेला आहे,
मस्त पैकी काय काय खोऊन येईल..
राजाभाऊ ची भेळ, फडतरे ची मिसळ, दावणगिरी लोणी डोसा,
तृषाशांती ची लस्सी, राजाराम कॉलेज चा श्याम चा वडा, विद्यापीठ चे चाट आणि रगडा पॅटीस
हे तर मिनिमम खाउन येच म्हणून सांगितला आहे मी...
..फक्त आल्यावर आजारी पडू नको म्हणजे झालं... Happy

पण अजुन काही नवीन हॉटेल्स किंवा नवीन खादाडी ची ठिकाणे असतील तर मंडळी पट्पट सांगा
हा पण फक्त व्हेज ऑप्षन्स च सांगा ....आम्ही नॉनव्हेज नाही खात...(आता माहीत नाही किती reply येतील Sad )

माझी शाळा एस.एम. आणि पूर्वी राहायला शिवाजी पेठेत... आणि अजूनही खंडोबा तालमीचा सपोर्टर...... त्यामुळे साहजिकच मंगळवार पेठेबद्दल चार शब्द चांगले बोलावले जात नाहीत ... पण तरीही, कोल्हापुरात जर मटण आणि तांबडा पांढरा खायचा असेल, तर मंगळवार पेठेला पर्याय नाही...... दौलत, रामदूत, मेघदूत, आनंद प्रसाद, महादेव प्रसाद, समाधान, आणि असंख्य घरगुती खानावळी.... मटण खाव तर इथच...... ओपल च मटण चांगले आहे.... पण तांबडा- पांढरा अनलिमिटेड नाही... आणि त्यामुळे ते हॉटेल डोक्यात जात...

मंगळवार पेठ सोडून जर कुठे चांगली हॉटेल्स असतील तर ती शनिवार पेठेत... खासकरून निलेश......

भेळेसाठी एकाच.... राजाभाऊ..... इतके फ्लेवर्स आहेत त्यांच्याकडे .. कि रोज एक फ्लेवर खावा म्हटला तरी एक महिना निवांत निघून जाईल.... आणि रात्री १.३० वाजता जरी गेल तरी भेल मिळते..
राजाभाऊ नंतरची आवडती भेळ म्हणजे राजकमल...

सँडविच खायचं असेल तर राजारामपुरी शुन्यावी गल्ली किंवा खासबाग मध्ये किशोर...

लोकांना चोरगे ची मिसळ इतकी का आवडते ह्याच मला अजूनही कारण कळलेलं नाही... एक नंबर भंगार मिसळ.. शिवाय extra कांदा घेतला तरी पैशे घेणार...... मिसळीत बेस्ट ..फडतरे आणि खासबाग....

वडा खायचे भरपूर spots आहेत.... सर्वात जुना म्हणजे माझ्या शाळेसमोरचा... शीतल वाडा आणि राहुल वडा.... त्यानंतर गंगावेशेत्ला .. छकुली वडा.. चारुदत्तचा आणि शामचा वडा मी आजवर खाल्ला नाही..... आणि शामच्या वाड्याची इतकी हवा आहे म्हटल्यावर तो खाल्लाच पाहिजे... शिंगोशी मार्केट जवळ एक वडा सेंटर आहे.. बहुतेक अनेगा वडा.... तो पण मस्त असतो.. पण जर पेठेत असेन आणि दुपारची वेळ असेल तरच इथला वडा

आईस्क्रीम करीता माझ फेव्हरीट सोळंकी... तिथलं कॉकटेल आईस्क्रीम आज जवळपास शंभर रुपये झाल आहे... पण त्याची टेस्तच वेगळी आहे.... आणखी एक फेवरीट आईस्क्रीम पार्लर ... टाकाळयात.. बहुतेक राजमंदीर,,, पण इथले पान फ्लेवर आईस्क्रीम निव्वळ झक्कास...

पानावरून आठवलं.... पान खाण्यासाठी फेवरीट जागा म्हणजे राजाबाळ किंवा पद्मा टोकीज जवळच्या पान पट्ट्या....

बाकी कोल्हापूरी खाण्याचा मन भरून आस्वाद घ्यायचा असेल तर तिथे जाऊन खाण्याशिवाय पर्याय नाही...... पण जर डोळे भरून आस्वाद घ्यायचा असेल, तर एक पर्याय आहे...

http://www.facebook.com/media/set/?set=a.1277184545013.30811.1691990262

अमोघ सगळ्या भारीतल्या जागा लिल्हाय तुम्ही. Happy
राजमंदिर मधले केशर पिस्ता आईसक्रीम पण एकदम जबरदस्त आहे. आणि तिथल फ्रुट श्रीखंड पण छान आहे एकदम.
आणि हो मिसळीत बेस्ट फडतरेच. Happy हायस्कुल जवळचा चाट मेन्शन करायचा राहिला . आता तो कुठेतरी दुसरी कडे गेलाय बहुदा.

ओपल च मटण चांगले आहे>>>> अगोदर भारीच होतं. पण या भारत वारीत काय मजा आली नाही. मध्ये एकदा पद्मा मध्येपण गेलो होतो. पण तेथेही पार निराशा झाली.

चोरगे मिसळ >>> अनुमोदन...

संगम टॉकिज समोर एक हॉटेल आहे. तेथे तंदुरी लय भारी होती.

अमोघ सगळ्या भारीतल्या जागा लिल्हाय तुम्ही >>> अनुमोदन. कोल्हापुरला जावुन आलेच पहिजे आता. सगळ्या खाण्याच्या जागा नजरेसमोर दिसायला लागल्या आहेत.

Pages