कोल्हापुरातली खादाडी

Submitted by webmaster on 2 March, 2009 - 10:47

कोल्हापुरात कुठे काय खायचं, याचं हितगुज

विषय: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

नमस्कार मित्रांनो

कोल्हापुरात टाकाळा चौकात नवीन हॉटेल झाले आहे. Lava Rocks Inn नावाचे. इथे चिकन चे भरपूर प्रकार मिळतात जे कोल्हापुरात कोठेही मिळत नाहीत. असे बरेच पदार्थ आहेत की जे कोल्हापुरात कोठेही मिळत नाहीत. उदा. चिकन shawarma, veg shawarma, चिकन सबमरीन, veg सबमरीन. तुम्ही एकदा भेट द्याच. तसेच फुल्ल चिकन चे बरेच प्रकार available आहेत.

वुड्लँडसमध्ये पांढरा रसा,सुके मटण चांगले होते.

ही तंदुरी सुरमई - खास नव्हती.
surm.jpg

कबाब आणि तंदुरी चिकन चांगले होते-
kabob.jpg

राजारामपुरी ५ व्या गल्लीत 'पाहुणचार' मध्ये कोलंबी मसाला, तळलेली सुरमई छान मिळाली. तिथे मटणाचे प्रकारही आहेत. सगळा स्वयंपाक चुलीवर करतात.

हा धागा मुद्दाम वर आणतोय.
सेनापतीच्या कोल्हापुर भ्रमंतीच्या वेळच्या काहि प्रश्नाना अनुसरुन हा धागा आठवला होता.

बिंदू चौकात अंबाबाई दर्शनाला येणार्‍यांच्या गाड्यांसाठी जे पार्किंग आहे त्यासमोरच एक हॉटेल आहे. उत्तम कोल्हापुरी थाळी होती. मालकांच्या मातोश्री सर्व जेवणव्यवस्था पाहतात. भाकरी, रस्सा, सुके मटण वगैरे खासच. दर्जा टिकवून ठेवतात का नाही हे पहावे लागेल कारण बरीच हॉटेल्स सुरुवातीला झकास जेवण देतात आणि हळूहळू कस बिघडत जातो हेही अनुभवले आहे, पण सध्यातरी मस्त जेवण आहे.

kolhapur thali.jpg

वूडहाऊसच्याच जरा पुढे किरण बंगल्यासमोर परवा चीज सँडविच खाल्ले.. गर्दी इतकी की अर्धा तास थांबावे लागले.. पण नेटाने वाट पाह्यली.. आणि त्याचे चीज झाले.. ग्रील टोस्ट वैगेरे प्रकार तर आधीच संपले होते.. फारच मस्त.. Happy

ओह तुमच्या पोस्टमध्ये व्हेजचा उल्लेख दिसला नाही आरती. कदाचित आधी येऊन गेला असेल.
वेल, व्हेजसाठी राजारामपुरीतून रेल्वे फाटकाकडे जाताना पावणेर म्हणून सुरु झालेय, छान आहे जेवण.
वूडहाऊस, पर्ल इथेही व्हेज मस्तच. वूडहाऊस टोटल व्हॅल्यु फॉर मनी.
मिरजकर तिकटीला एक सारथी आहे, गर्दी असते पण जेवण सुरेख.

.

आधीच्या पानांवर काहीजणांनी लिहिलेय वेजबद्दल त्या मी नीट वाचल्या नव्हत्या, ह्या पानावर सगळं नॉनव्हेज जास्त दिसलं म्हणून विचारले पण आधीची पाने वाचली म्हणून कमेन्ट डिलीट केली.

''ओशो' हे बिनखांबी गणपती मंदिराजवळ ,आणि 'वुडहाउस' हे दाभोळकर कॉर्नर पासून थेट खाली गेले की..

का कोणास ठाउक, कदाचित महागाइ वाढल्याचा परिणाम असेल, पण हॉटेल मध्ये नॉनव्हेज खाल्यावर अगोदर सारखे पोट भरल्यासारखे वाटतच नाही. उगाच् आपले किवचुन खाल्यासारखे वाटते Sad

अन्जू , हो व्हेज दिल आहे पण सर्व डीटेल्स खूप जूने आहेत. तुमचा वरचा प्रतिसादाने मी पण कन्फ्युज झाले होते... पण इथे चालला असता. कारण लेटेस्ट अपटेड्समध्ये नॉनव्हजच होत.
तसही तुमचा प्रतिसाद सर्वांनी हलकेच घेतला असता कारण कोल्हापूरी तांबडा पांढरा रस्सा जास्त फेमस आहे.

लिहिते परत. मी सहजच इथे आले होते आणि ह्या पानावर नॉनव्हेज वाचून असं वाटलं अरे कोल्हापूरमध्ये वेज मिळतच नाही का? पण मग आरतीने विचारल्यावर अमेय आणि निपो यांनी वेजबद्दल सांगितले. कोल्हापूरला शाकाहारी जेवण फार कमी मिळते असं वाटलं.

लेटेस्ट पोस्टमध्ये वेजबद्दल जास्त लिहा नाहीतर शाकाहारी लोकांची कोल्हापूरमध्ये पंचाईत होते असं वाटेल.

अन्जू....

आमच्या कोल्हापूरमध्ये जितकी नॉन-व्हेजची तितकीच व्हेजची देखील सोय आहे....आणि ती देखील पुरेपूर पसंद पडणारी....शिवाय हल्ली तर जाईल त्या ठिकाणी पंजाबी डिशेसची रेलचेल दिसत्येच....त्यामुळे कुणाची कसलीही अडचण येत नाही. तू ये ना कोल्हापूरला....घरीदेखील सोय करणारच मी....शिवाय तुला जिथे जावेसे वाटेल त्या व्हेज हॉटेलमध्ये वा पन्हाळा इथेही घेऊन जाईन.

आरती....

तुम्ही "ओशो" चा पत्ता विचारला आहे. "ओशो" हॉटेल महालक्ष्मी मंदिराच्या परिसरातच आहे...त्यातही "बिनखांबी गणेश मंदिर" च्या समोर,....नूतन मराठी विद्यालय भाग.....छान आहे हॉटेल...शिवाय १००% शाकाहारी.

झकासराव....

"राजपुरुष" चे नाव चांगलेच प्रसिद्ध झाले आहे....ते त्यांच्या शाकाहारी ताटातील वाट्यांच्या संख्येमुळे. ताट समोर आल्यानंतर गिर्‍हाईक "देवा, आता यातील काय आणि किती खायचे ?" असाच विचार करतो. दुर्दैवाची गोष्ट अशी की त्यातील निम्म्याहून जेवण ताटात तसेच राहते....(हे मी पाहिले आहे)....विशेषतः चार सदस्यांचे एक कुटुंब तिथे जेवायला आले आणि त्यानी चार ताटे मागविली तर दोन मुलांसाठी आलेल्या ताटातील जवळपास ७५% पदार्थ स्पर्श न लागता पडून राहतात.....व्यवस्थापन काही करत नाही हे तर दिसल्येच कारण या हॉटेलची ख्याती पदार्थांमुळेच झाली आहे.

"गोकुळ" साऊथ इंडियन आहे....तेथील गर्दी अंगावर येते....केवळ प्रवाशांसाठी ते उपयुक्त आहे. खास प्लेट वा डिशसाठी ते ओळखले जात नाही.

कोल्हापूर = मांसाहारी जेवण प्रकारचे गाव असे जे समीकरण तयार झाले आहे त्याला हल्ली बर्‍याच शाकाहारी हॉटेल्सनी चांगलाच छेद दिला आहे. केवळ शाकाहारी [कोल्हापूरी भाषेत "शुद्ध शाकाहारी"] जेवण देणार्‍या हॉटेल्सची संख्या लक्षणीय झाली आहे.

घरीदेखील सोय करणारच मी....शिवाय तुला जिथे जावेसे वाटेल त्या व्हेज हॉटेलमध्ये वा पन्हाळा इथेही घेऊन जाईन. <<< मामा Angry फक्त अंजूला तुमच्याकडे राहयची सोय, व्हेज हॉटेलमध्ये जेवण आणि पन्हाळा अशी भली मोठी पार्टी आणि मी काय पाप केलय मला डायरेक्ट मंदीराच्या ईकडच्या हॉटेलमध्ये जायला सांगून हकलवून लावणार तुमच्या कोल्हापूरातून. Uhoh पण तरीही धन्यवाद Proud

shweta25, झकासराव धन्यवाद. Happy

मिसळसाठी लेटेस्ट अपटेडस द्या.

आरती , चोरगे मिसळ , बावडा मिसळ, फडतरे मिसळ ही पूर्वीपासुन प्रसिध्द असलेली ठिकाणे आजही बरयापैकी आपली चव जपुन आहेत..
त्यातल्या त्यात चोरगे मिसळ लवकर जाता येईल अस आहे... महाद्वार रोडवरच आहे..

दिपु धन्यवाद. कोल्हापूरी मिसळ फेमस त्यामूळे ती खायचीच आहे फक्त कमी तिखट मिळायला हवी.
सामी, हो नक्की खाणार दा. डोसा विथ लोणी. त्यालासुध्दा लिस्टीत अ‍ॅडल. Happy

Pages