चीज क्यूब्ज खाण्याबद्दल माहिती हवीये...

Submitted by पद्म on 22 December, 2016 - 23:54

मला डॉक्टरने दिवसातून २-३ चीज क्यूब खायला सांगितले आहे. काही दिवसांपूर्वी चीज क्यूब आणले पण एकसुद्धा सहन होत नव्हता, तोच कसाबसा खाल्ला. यावरती काही उपाय करता येईल का? बाजारात टेस्टी आणि flavoured चीज असतं का?

Group content visibility: 
Public - accessible to all site users

या धाग्याखाली त्यांच्या इतर धाग्यांखाली दिसतो तसा पद्मांचा सुद्रूढ फोटो का दिसत नाहिएय ?

नोटबंदीच्या काळापासून चीज खाताहेत तरीही तसेच गुटगुटीत दिसतात आजकालाही.

{महिरपी कंसात} स्वगतः बाकी हाउ खान्देसना बोरसे [संदर्भ : बोरसे आडनांव व 'चाराणानी कोंबडी'वाला यांचा प्रतिसाद] मंचरथीन नींघीसन म्हमईले अंधेरीमा पोची गया. आम्रिकाले कवय जाइ र्‍हाय्ना भो? विंजिनेर ना तू? {महिरपी कंस समाप्त}

इकडे पुटिन ( Poutine ) नावाचा एक प्रकार मिळतो (याचा रशियाशी काही संबंध नाही).

गरम गरम फ्रेंच फ्राईज वर चीज आणि लाईट ब्राऊन ग्रेव्ही देतात. वजन वाढवण्यासाठी याचा हमखास उपयोग होईल असे वाटते. आणि फ्रेंच फ्राईज + ग्रेव्ही असलयाने नुसतं चीज आवडत नसेल तर हा प्रकार टेस्टी देखील लागेल.

इकडचे बहुतांश खाद्य पदार्थ हे कोरडे असतात त्या मुळे सॉफ्ट ड्रिंक बरोबर कॉम्बो करतात. पुटिन मात्र वितळलेल्या चीज मुळे आणि ग्रेव्ही मुळे ओलसर असतो. क्वचित कधीतरी खाण्यासाठी तेव्हढाच थोडा बदल !

धन्यवाद चामुंडराय!

मंचरथीन नींघीसन म्हमईले अंधेरीमा पोची गया. आम्रिकाले कवय जाइ र्‍हाय्ना भो? विंजिनेर ना तू?>>> अती तिथे माती!

ओह ओके.
असो. तुमच्य वजनवाढीच्या प्रयत्नांना शुभेच्छा Happy

मंचर मध्ये राहून गो चीज आवडत नाही. त्यांचे इतर हि चीज प्रोडक्ट आहेत, अगदीच अडचण येत असेल तर मंचारला माझ्याकडे या मी सांगतो चीज कसे खायचे.

Pages