Submitted by पद्म on 22 December, 2016 - 23:54
मला डॉक्टरने दिवसातून २-३ चीज क्यूब खायला सांगितले आहे. काही दिवसांपूर्वी चीज क्यूब आणले पण एकसुद्धा सहन होत नव्हता, तोच कसाबसा खाल्ला. यावरती काही उपाय करता येईल का? बाजारात टेस्टी आणि flavoured चीज असतं का?
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
बिग बास्केट्वर फ़्लेवर्ड चीज
बिग बास्केट्वर फ़्लेवर्ड चीज उपलब्ध आहे.
इथे माझ्यासारखे भरपूर
इथे माझ्यासारखे भरपूर आहेत(चीज न आवडणारे), बरं वाटलं.......
मियोनीज की मायोनीज बघून मला
मियोनीज की मायोनीज बघून मला माझे बालपण आठवते. माझी आज्जी पायाला कसलेसे पांढरे मलम लावायचे. अगदी तसाच रंग आणि तोच गुळगुळीतपणा. मग पुढे चव बघायचा प्रश्नच येत नाही. खरे तर मांसाहाराकडे बघून ईई करणारे काही ठराविक शाकाहारी आणि शाकाहाराकडे केविलवाण्या नजरेने बघणारे माझ्यासारखे मांसाहारी, आमच्या मानसिकतेत फारसा फरक नाही. हे चूक असले तरी असे ठरवून मनात उत्पन्न होणारया भावना नाही रोखू शकत.
बिग बास्केट वाले मंचरला
बिग बास्केट वाले मंचरला पोचवतील का?
हे तर "चाराणानी कोंबडी नी बाराणाना मसाला" सारखं होईल...
मुळात मेयोनीज शाकाहारी नसते,
मुळात मेयोनीज शाकाहारी नसते, ऋणमेषा.
पद्म, फ्लेवर्ड चीज किंवा इतर
पद्म,
फ्लेवर्ड चीज किंवा इतर प्रकारची चीजं ही अॅक्वायर्ड टेस्ट आहे. शिवाय बक्कळ महाग असतात.
तुम्हाला अमूलचे साधे सिंपल त्यातल्या त्यात कमी पंजंट चवीचे चीज सहन होईना. फ्लेवर्ड अन इतर चीजेसच्या नादी न लागलेले बरे. अन चुकून मागवलंच तर चव सहन होत नाही म्हणून फेकून देऊ नका. मला संपर्क करा, मी पत्ता देईन तिथे पाठवून द्या. कुरियर चार्जेस माझे, चीजचे पैसे तुमचे
वयाच्या २५ व्या वर्ष पर्यंत
वयाच्या २५ व्या वर्ष पर्यंत मी पण असाच होतो. उंची ५'१०" आणि वजन ५६ किलो. या वेळेपर्यंत मी कुठेही, काहीही, कितीही आणि कोणत्याही वेळेस खात असे.
परंतु विक्रांत वर डॉक्टर (१९९०) म्हणून गेलो आणि तेथे असलेले सुग्रास जेवण जेवून माझे वजन ८ महिन्यात ९ किलोने वाढले. वजन ६५ किलो. तेंव्हा माझे डोळे उघडले आणि कुठेही काहीही आणि कितीही खाणे बंद केले. आज २६ वर्षांनी माझे वजन ६७ किलो आहे वय ५१ आणि उंची तीच आहे.
>>
माझ्याबाबतीत पण असेच झाले होते. उंची ५'११" आणि वजन ६० च्या आसपास. नोकरीसाठी जेव्हा हैद्राबादला आलो तेव्हा बाहेरचे अघळपघळ खाऊन वजन ७० च्या पलीकडे गेले. BMI नॉर्मल रेंजमध्ये आला म्हणून सुखावलो होतो. वार्षिक आरोग्य तपासणीत कॉलेस्टेरोल बरेच वाढलेले दिसलेले. शुगरपण बॉर्डर लाईनवर आली होती. तिशीच्या आत हे आकडे म्हणजे धोक्याची घंटा!
मग व्यायामाला सुरुवात केली, सुर्यनमस्कार, धावणे असे व्यायाम करुन सगळे पॅरामीटर्स नॉर्मल रेंज मध्ये आणले, पण त्याबरोबर वजनपण कमी झाले. आता व जन ६८ किलो आहे. पण कॉलेस्टेरोल, शुगर पासुन सुटका झाली आहे, त्यामुळे चिंता नाही.
सांगायचा मुद्दा हाच की वजन वाढवताना योग्य व्यायामाची जोड द्या.
असो! तुमच्या चीज कसे खायच्या धाग्यावर वजन कसे वाढवायचे हा अवांतर प्रतिसाद दिला त्याबद्दल क्षमस्व.
तुम्हाला अमूलचे साधे सिंपल
तुम्हाला अमूलचे साधे सिंपल त्यातल्या त्यात कमी पंजंट चवीचे चीज सहन होईना. फ्लेवर्ड अन इतर चीजेसच्या नादी न लागलेले बरे. >>>>>>>>>> +१
अन चुकून मागवलंच तर चव सहन होत नाही म्हणून फेकून देऊ नका. मला संपर्क करा, मी पत्ता देईन तिथे पाठवून द्या. कुरियर चार्जेस माझे, चीजचे पैसे तुमचे>>
तुमच्या चीज कसे खायच्या
तुमच्या चीज कसे खायच्या धाग्यावर वजन कसे वाढवायचे हा अवांतर प्रतिसाद दिला त्याबद्दल क्षमस्व.>>> नाही हो, तुम्ही तर मूळ प्रश्नाचं उत्तर दिलं. चीज खाणे तर सेकंडरी आहे.
तुमच्या चीज कसे खायच्या
तुमच्या चीज कसे खायच्या धाग्यावर वजन कसे वाढवायचे हा अवांतर प्रतिसाद दिला त्याबद्दल क्षमस्व.>>>>
पद्म, चीज स्लाइसेस ट्राय करा.
पद्म,
चीज स्लाइसेस ट्राय करा. अमुल / ब्रिटानिया
४ ब्रेड स्लाइस घ्या. २ चीज स्लाइसेस घ्या. ब्रे स्ला तव्यावर थोडे शेकवा. दोन ब्रे स्लाइसवर एक एक चीज स्लाइस ठेवा.वर पिझा सीझनिंग असेल तर, पिझ्झा सोबत मिळालेली चिली फ्लेक्ष ची पाकिटं, किंवा कूठलेही हर्ब्स असतील तर शिपडा.(?) वरुन दुसरा ब्रे स्लाइस ठेवा. सॅन्ड्विच सारखं. दोन्ही बाजुनी खरपुस भाजा. त्रिकोणी कट करुन खा. मका दाणे घातले तर अजुन छान.
सर्वांचे मनापासून
सर्वांचे मनापासून धन्यवाद....आता वजन वाढायलाच पाहिजे.
आता वजन वाढायलाच
आता वजन वाढायलाच पाहिजे.>>>
पद्म तुमचा आताचा आणि पद्मसिंह झाल्यावरचा असे दोन फोटो टाका इथे! म्हणजे धागा सफल झाला असे आपण म्हणूयात! तोवर शुभेच्छा!
पद्मसिंह झाल्यावर नक्की
पद्मसिंह झाल्यावर नक्की टाकेल.......
हे मंचर कुठे आहे म्हणे ?
हे मंचर कुठे आहे म्हणे ?
हे मंचर कुठे आहे म्हणे ?>>>
हे मंचर कुठे आहे म्हणे ?>>> कोण म्हणे?
पुणे जिल्ह्यातल्या आंबेगांव तालुक्यात आहे म्हणे........
धन्यवाद पद्म. भेटू यखान्द्या
धन्यवाद पद्म.
भेटू यखान्द्या वक्ती आइत्वार्च्या बाजार्ला...
या मग परवा...नक्की भेटू!
या मग परवा...नक्की भेटू!
मला हि चीज खूप आवडते. तू चीज
मला हि चीज खूप आवडते. तू चीज बडी है मस्त मस्त
पण ते बटर पेक्षा खूप महाग का असते हा प्रश्न मलाही आहे
चीज कोणते चांगले आसते? वजन
चीज कोणते चांगले आसते? वजन वाढवण्यासाठी
स्लाईस चीज का मोज्जारेला चीज का प्रोसेस्ड चीज का आणखी आजुन कोणते चीज... व गो कंपनीचे चीज चांगले आसते का?
मलापन वजन वाढवायचे आहे... व चीजमुळे आलेला आशक्तपना दूर होउ शकतो का??
चीजमुळे आलेला आशक्तपना दूर
चीजमुळे आलेला आशक्तपना दूर होउ शकतो का?
>>
चीजमुळे अशक्तपणा येतो???
चीजमुळे अशक्तपणा येतो??? >>
चीजमुळे अशक्तपणा येतो??? >> अरे असं काय वाचता

चीजमुळे -"आलेला आशक्तपना दूर होउ शकतो का? " असं विचारताहेत ते
अमुलच्या चीझ ची चव सर्वात छान
अमुलच्या चीझ ची चव सर्वात छान आहे.. गोवर्धन (गो) वगैरे इत्यादींची इतकी चांगली नाही.
मुळात मेयोनीज शाकाहारी नसते,
मुळात मेयोनीज शाकाहारी नसते, ऋणमेषा.
>>>
हायला, शॉकिंग. कित्येक शाकाहारी सॅण्डवीच बर्गर रोल मध्ये ते टाकतात बिनधास्त. अर्धी दुनिया भ्रष्ट झाली आणि तुम्ही आता सांगत आहात हे. का लपवून ठेवले एवढे दिवस
अंडे असते रे मेयोनीजमध्ये.
अंडे असते रे मेयोनीजमध्ये.
अरे देवा,.. मला नव्हते हे
अरे देवा,.. मला नव्हते हे माहीत. अंडे कुठल्याही प्रकारात मला आवडते हा माझा अहंकार गळून पडला.
पण त्या अंड्याच्या चवीची वाट लावायला ईतर घटक काय असतात..
आणि एकूण एक प्रकारच्या मेयोनीजमध्ये असते का अंडे?
नाही. आपल्याकडे व्हेजही
नाही. आपल्याकडे व्हेजही बनवतात.
चीज क्यूब ऐवजी मावा / खवा
चीज क्यूब ऐवजी मावा / खवा चलेल का?
खरंच चांगला प्रश्न आहे. सांगा
खरंच चांगला प्रश्न आहे. सांगा लवकर कोणीतरी...
चालत असेल तर मज्जाच मज्जा.....
एकूण एक प्रकारच्या
एकूण एक प्रकारच्या मेयोनीजमध्ये असते का अंडे? >> मार्केट (बहुधा डि-मार्ट) मध्ये एग्ग फ्री मेयोनीज पाहिले होते.
ए भा प्र प्रोसेस्ड
ए भा प्र
प्रोसेस्ड चिज,
मोझरेल्ला चिज
स्लाईस्ड चिज
या तिन्हीतला फरक मज बापडीस कुणी समजावून सांगेल काय?
नाही. आपल्याकडे व्हेजही
नाही. आपल्याकडे व्हेजही बनवतात.>>>>> हो, फनफुडचे व्हेज मायो आहे. आणलय घरी. तसे परदेशात बर्गरमध्ये अंड्याचेच मायो असते. आणी भारतात व्हेज मिळणारच. कारण इतकी वर्ष के एफ सी वाले कोकलत होते की आम्हाला अभिमान आहे की आम्ही नॉनव्हेजच आहोत, पण भारताची बाजारपेठ काबिज करायला पनीर वगैरे वापरावे लागले की.
रश्मी, पनीर हा व्हेजिटेबल
रश्मी,
पनीर हा व्हेजिटेबल सोर्स नक्कीच नाही. आपण भारतातले लोक दुग्धजन्य पदार्थ शाकाहारात गणतो. अॅक्चुअली, टेक्निकली, लोणी वा तूप हे बोव्हाईन फॅट उर्फ गायीची चरबीच आहे. होय की नाही?
सी सी पी चीज चेरी पाईनअॅपल
सी सी पी
चीज चेरी पाईनअॅपल ट्राय करा
थंडगारपणा मस्ट
बरं. मेयोनीजवर
बरं.
मेयोनीजवर सर्वज्ञानदान.
बेसिकली, हे ऑइल इमल्शन आहे.
अंडे इमल्सिफाइंग एजंट म्हणून कामी येते.
ट्रॅडिशनल मेयो बनवताना, अंडं, व्हिएनेगर, लिंबाचा रस, मस्टर्द आधी व्हिस्क करतात, नंतर त्यात (ऑलिव्ह्)ऑइल थेंब थेंब टाकत व्हिस्क करत रहातात, जेणेकरून ते फ्लफी पांढरे मिक्श्चर बनते.
व्हेज मेयो बनवताना बहुतेक अकॅशिआ उर्फ बाभळीचा डिंक पावडर फॉर्ममधे किंवा तत्सम एइमल्सिफाइंग एजंट म्हणून वापरत असावेत. बाकी कृती तीच.
गूगलल्यावर एगलेस मेयोनिज घरी बनवायच्या अनेक कृत्या सापडल्या.
कठीण शब्दांचे अर्थः
कठीण शब्दांचे अर्थः
सर्वज्ञानदान = सर्वज्ञांनी केलेले ज्ञानदान.
झाडु, चीज पण शाकाहारी नाही
झाडु, चीज पण शाकाहारी नाही की. भारतातले माहिती नाही.
चीज अजिबात आवडत नाही.
पद्म, चीज आवडत नसेल तर खाऊ नका. डॉ. ला सांगा की त्या ऐवजी दुसरे काहीतरी सांगा. डॉ.कडे इतर उपाय असायलाच हवा.
झाडु, चीज पण शाकाहारी नाही
झाडु, चीज पण शाकाहारी नाही की.
<<
बरोबर आहे.
*
डॉ.कडे इतर उपाय असायलाच हवा.
<,
यातल्या "च" शी असहमत.
अरेच्चा झाडू, मला वाटले सहसा
अरेच्चा झाडू, मला वाटले सहसा डायेटमधे जे ऑप्शन्स असतात त्यातले ३-४ डॉ. सांगत असतील (कारण एकदम सगळे सांगितले तरी गोंधळायला होते) व एखादा पेशंटला नाही जमला तर अजुन काही ऑप्शन्स सांगतील. आतापर्यंत ३-४दा dietitian कडे जावे लागले, तेव्हा अनुभव आले. एखादी गोष्ट जमत नव्हती खायला म्हणुन दुसरा ऑप्शन मिळाला होता. त्यामुळे तुम्ही मी डॉ.ला झोडपण्यासाठी 'च' लिहिले असा गैरसमज मात्र करून घेऊ नका. माहीत नसेल डॉ.ला तरी हरकत नाही. दुसरा डॉ. शोधता येतोच पेशंटला.
प्रत्येक सिच्युएशन मध्ये इतर
प्रत्येक सिच्युएशन मध्ये इतर उपाय असतोच, असे नाही.
समज गैरसमज तुमच्या शेवटच्या वाक्यातून बरोब्बर समजले बघा.
पिझ्झा न आवडणार अजुन कोणी
पिझ्झा न आवडणार अजुन कोणी भेट्ल नाहीये. 'क्युब'च पाहिजे अशी अट नसेल तर करुन बघा. त्यातही लो कार्ब पिझ्झा हवा असेल तर...
http://www.maayboli.com/node/51369
पनीर हा व्हेजिटेबल सोर्स
पनीर हा व्हेजिटेबल सोर्स नक्कीच नाही. आपण भारतातले लोक दुग्धजन्य पदार्थ शाकाहारात गणतो. अॅक्चुअली, टेक्निकली, लोणी वा तूप हे बोव्हाईन फॅट उर्फ गायीची चरबीच आहे. होय की नाही?>>>>> हे खरच लक्षात नव्हते आले, धन्यवाद.:स्मित: भारता बाहेर मासे सुद्धा व्हेज समजले जातात. पण अस्वच्छता सोडली ( अमूल वगैरे बाबत नाही म्हणत मी ) तर बाहेर रस्त्यावर वा थिएटर बाहेर मिळणारे चीज सँडविच कसे तयार करतात देव जाणे.
मी कुठेतरी असे पण वाचले होते की चीज खाल्ल्याने दाता मधील फटी पण कमी होतात, म्हणजे त्यात कॅल्शियम असते वगैरे. पण यात पण किती तथ्य आहे माहीत नाही.
मी कुठेतरी असे पण वाचले होते
मी कुठेतरी असे पण वाचले होते की चीज खाल्ल्याने दाता मधील फटी पण कमी होतात,
म्हणजे त्यात कॅल्शियम असते वगैरे.
>>>>>>>
पुढची ओळ वाचण्याअगोदर माझ्या डोळ्यासमोर पटकन दातांच्या फटीत सिमेंटसारखे भरलेले / अडकलेले चीज आले
ऋ
ऋ
चीज निवडताना ते नैसर्गिक आहे
चीज निवडताना ते नैसर्गिक आहे की प्रक्रियाकेलेले आहे ते पहावे. पाश्चराईज्ड प्रोसेस्ड चीज असे पाकिटावर लिहिले असेल तर ते घेणे टाळावे. साधारण ५०% नैसर्गिक चीज, त्यात रंग, इमलसिफायर, अॅसिडीफायर, मीठ वगैरे घटक घालून प्रक्रिया केली जाते.
वजन वाढवणे एवढेच ध्येय असेल तर आवडत नसताना मुद्दाम चीज खाण्याची गरज नाही. त्यात फ्लेवर्ड चीज वगैरे म्हणजे अजूनच अॅडिटिव्ज. चीज खाण्याचे फायदे हवे असतील तर चीज नैसर्गिक हवे.
झाडू, 'समज गैरसमज तुमच्या
झाडू, 'समज गैरसमज तुमच्या शेवटच्या वाक्यातून बरोब्बर समजले बघा' >> नक्की काय म्हणायचे कळले नाही. पण राहु दे. वाढवत नाही.
ऋन्मेष
ऋ - दातातल्या फटी . मेयोनीज
ऋ - दातातल्या फटी
.
मेयोनीज आणि चीज हा प्रकार मलाही अजिबात आवडत नाही .
पिझ्झ्यावर चीज चालतं पण नुसतं खाण नाही जमणार .
गो चीज अजिबात आवडलं नाही . पिझ्झा वर तर अजिबात टाकू नये .
ऋ , ते मलम कैलास जीवन असाव
नाही कैलास जीव नाही. कैलास
नाही कैलास जीव नाही. कैलास जीवन मेयोनीज पेक्षा जास्त चांगले लागते. आणि त्यापेक्षा पौष्टीक आहे हे विशेष
त्यापेक्षा पौष्टीक आहे << हा
त्यापेक्षा पौष्टीक आहे << हा शोध कसा काय लागला?
आयोडेक्स खातात हे ऐकले होते.
आयोडेक्स खातात हे ऐकले होते. कैलासजीवन पण?

मुळात धागा चीज खाण्याबद्दल आहे, आणी ज्याने प्रश्न विचारला आहे तो सोडून बाकीचेच पतंग उडवतायत.
Pages