चीज क्यूब्ज खाण्याबद्दल माहिती हवीये...

Submitted by पद्म on 22 December, 2016 - 23:54

मला डॉक्टरने दिवसातून २-३ चीज क्यूब खायला सांगितले आहे. काही दिवसांपूर्वी चीज क्यूब आणले पण एकसुद्धा सहन होत नव्हता, तोच कसाबसा खाल्ला. यावरती काही उपाय करता येईल का? बाजारात टेस्टी आणि flavoured चीज असतं का?

Group content visibility: 
Public - accessible to all site users

वेगळी कंपनी ट्राय करा,
मला स्वतः:ला गो कंपनी चे चीज अजिबात आवडत नाही, अमूल किंवा ब्रिटनिया चे आवडते,
काही कंपन्या फ्लेवर वाले चीज विकतात,
पुण्यात असाल दोराबजी,+खाली दिलेले आऊट लेट्स
मुंबैबमध्ये असाल तर गोदरेज नेचर फ्रेश, फूड हॉल, बिग बाजार इकडे वेगवेगळ्या प्रकारचे फ्रेश चीज मिळू शकेल.

मी गो कंपनीचेच आणले होते. अमूल चं ट्राय करतो.
मी इथे मंचर ला रहात असल्याने बाकी काही पर्याय नाही....

दारूसोबत चखन्याला खात जा. चवीचा त्रास होत नाही, अन दारूचाही त्रास कमी होतो.

रच्याकने, रोज २-३ चीजक्यूब खायचा सल्ला कोणत्या आजारासाठी दिलाय म्हणे??

मंचर मधे पर्याय नाहीत फारसे चीजला हे वाचुन तुमचा प्रश्न खूपच गंभीर वाटतो आहे
यावर एक उपाय म्हणजे डॉक्टर बदलणे हाच उरतो

दारूसोबत चखन्याला खात जा. चवीचा त्रास होत नाही, अन दारूचाही त्रास कमी होतो.
>> चीजमुळे दारूचा त्रास होत नाही, हे माहिती नव्हते.
आम्ही पाश्चात्य संस्कृतीचे अंधानुकरण की काय म्हणून सुरूवात केली. चव आवडली म्हणून कंटीन्यु केले.

रच्याकने, झाडु अाणि माझा प्रतिसाद एकाच वेळी अाला अाणि तोही दारुवर Happy

आजार नाही weight gain साठी सांगितलंय.....
>>
इतर काय उपाय सांगितले असतील तर शेयर करा. मलापण फायद्याचे ठरेल.
हा पण पोट न वाढवता वजन वाढायला हवे. Wink

दारूसोबत चखन्याला खात जा. चवीचा त्रास होत नाही, अन दारूचाही त्रास कमी होतो. >>: पण दारु पित नसेल तर प्यायला चालु करा, असा अर्थ समजायचा का? Uhoh

चीज नुसते खाउन वजन वाढवण्यापेक्षा इतर ही उपाय करा. केळी, दुध वैगेरे.

बाहुबली ला वजन वाढवायचंय Lol Light 1

ओ पद्म, तुम्ही सोयाबीन चिल्ली करून पाहिलंत का सांगा आधी.
मग मी चीजबद्दल माहिती सांगेन.
उगाच 'पुढचं पाठ आणि मागचं सपाट' व्हायला नको.

अहो साती, काल पहिल्यांदा किचनमध्ये गेलो, नुस्ता फ्राईड राईस करायला घाम फुटला होता. सोयाबीन चिल्ली साठी नवीन जन्म घ्यावा लागेल वाटतं.....कुकिंग सोपा असतं असा गैरसमज कालच दूर झालाय....
थोडा वेळ द्या.....

>>>चीज नुसते खाउन वजन वाढवण्यापेक्षा इतर ही उपाय करा. केळी, दुध वैगेरे.<<<<< डाएट प्लॅनिन्ग ची पूर्ण लिस्ट दिली आहे, त्यात चीजच तेवढा कठीण वाटला. त्यात दूध + केळी पण आहे.

हवे असेल, तर पूर्ण डाएट प्लॅनिंग नविन धाग्यावर लिहू का?

डाएट प्लॅनिन्ग ची पूर्ण लिस्ट दिली आहे, त्यात चीजच तेवढा कठीण वाटला. त्यात दूध + केळी पण आहे.>>>>ओके.

पण चीज कठीण का वाटयंय? आमच्याकडे पिझा-पास्ता वर घालण्यासाठी चीज क्युबस आणुन ठेवल्या तर ज्या दिवशी पिझा-पस्ता करायचाय तेव्हा पहिलं तर अर्ध्य पाकीट संपलेलं असतंय नुसतेच क्युब्स खाउन. चीज स्लाइसेस पण खातात.

हवे असेल, तर पूर्ण डाएट प्लॅनिंग नविन धाग्यावर लिहू का?>>>>>>>> मला वजन घटवायची गरज आहे. Happy

पण दारु पित नसेल तर प्यायला चालु करा, असा अर्थ समजायचा का?
<<

अंडी, चिकन, मासे, मटन यानेसुद्धा उत्तमरित्या वजन वाढते. प्रोटीन्स असल्याने फायद्याचेच.

त्यात चीजच तेवढा कठीण वाटला. >>> अर्र्र्र्र्र्र! आम्हाला चीज न खाणे कठीण वाटते.

एक सोपी पाकृ : अंडे खात असल्यास -
मा.वे.बल ताटली घेऊन त्यात पावाची स्लाईस ठेवा. वर अंडे फोडून घाला. मग ३० सेकंदाकरता मा.वे.करा. मग बाहेर काढून त्यावर चीजची स्लाईस ठेऊन वर थोडी मीरपूड भुरभुरा. वर परत एक पावाची स्लाईस ठेवा आणि परत ३० सेकंदाकरता मा.वे.करा. सुपर डिलीशीअस एग-न-चीज तय्यार! तुम्हाला क्रेसाँ / क्रॉयसाँ मिळाले तर सुपर डुपर!

तिखट चालत असेल तर पावाच्या स्लाईसवर चीजच्या दोन स्लाईस ठेऊन वर हिरव्या मिरच्यांचे तुकडे टाका चिमुटभरच चाट मसाला भुरभुरा. वरून दुसरी पावाची स्लाईस ठेऊन ५० सेकंदाकरता मा.वे.करा. चीज-चिली सँडवीच तयार.

मी मांसाहारचे सुपरीणाम असा धागा काढायचा विचार करतेय.

नाही खात ना अंडे. ओके. नैतर मी एक मस्त माझ्या घरी फेव्ह्रीट ईझी ब्रेफा रेस्पी देणार होते.

स्प्राउट्स + बारिक चिरलेला कांदा, टोमॅटो, कोथिंबिर + चाट मसाला + लिंबु रस थोडासा + चीज क्युब्ज बारिक चिरुन असं सलाड ट्राय करा ब्रेफामधे आणि आवडलं तर डिनर बरोबर.

चीझ क्युब्ज किसुन त्यामधे फाइनली चॉप्ड कोथिंबिर आणि हिरवी मिरची घालुन ते जर पोळीच्या कणकीमधे मिसळलं तर मस्त पोळी रोल खाता येइल. किंवा कोणतेही पराठे ( कॅबेज, पनीर, बटाटा) बनवताना त्यामधे चीज किसुन टाकलं तरीही छान लागेल.

नैतर मी एक मस्त माझ्या घरी फेव्ह्रीट ईझी ब्रेफा रेस्पी देणार होते. >>> ते खात नसतील, पण इतर काहीजण असतील की. त्यांचे भले करा.

वजन वाढवण्याचा सोपा उपाय --
तळवलकर VLCC किंवा तत्सम संस्था च्या बाहेर सकाळी उभे राहा.
तेथून बाहेर पडणाऱ्या सुदृढ लोकांची भेट घ्या आणि त्यांना आहार तज्ञांनी जे जे खाऊ नका म्हणून सांगितले आहे ते ते सर्व आणि भरपूर खा.
उदा. भजी, समोसे, फरसाण, बासुंदी, मलई, मिठाई, चिकन, मटण इ.
हा का ना का

वाह सुबोध, खरे बोललात...
मनीमाऊ, सलाड साठी धन्यवाद.

वजन वाढवणं ही समस्या असुच कशी शकते? किती सोपं असतं ते.>>>

मनीमाऊ, ते आपल्यासारख्या वजनदार लोकांना वाटते!

मी असे पाहिलेत काही मित्र माझे! आमच्या दुप्पट खायचे पण त्यांचे कधी वजनच वाढल्याचे जाणवले नाही!(५०-५५ किलो मध्येच रेंगाळायचे कायम) तेंव्हा आम्ही त्यांना डिवचायचो तुम्ही मनाला खाता जीवाला नाही खात त्यामुळे खाणे तुमच्या अंगी लागत नाही! Happy

हे घ्या. कुणाचं भलं होत असेल तर

एका माणसाला एकावेळ्च्या ब्रेफाला
२ ब्रेड स्लाइस छोटे चोकोनी तुकडे करुन
एक किंवा दोन अंडी
२ चमचे दुध
१ चीज क्युब
लहान कांदा बारीक कापुन
लहानसा टमाटर / मोठ्यातला अर्धा बारीक कापुन
मीरपुड, मीठ, हळद, लाल तिखट, कडीपत्ता, हिरवी मिरची ऐच्छिक, किथिंबीर

कृती
वाडग्यात अंडी फोडुन त्यात दुध, मीरपुड आणि मीठ घालुन फेटा. पॅनमधे थोडं तेल घालुन ह्या मिश्रणाची भुर्जी बन्वुन घ्या. प्लेटम्धे काढुन घ्या. त्याच पॅनमधे तेल घालुन त्यावर थोडीशी राई कांदा कडीपत्ता घालुन फोडणी करा. मग टमाटर घाला. जरावेळ परतुन हळद, लाल तिखट, हिरवी मिरची (ऐच्छिक) मीठ घालुन ब्रेडचे तुकडे घाला. जरावेळ परतुन मग अंड्याची बुर्जी (प्लेटम्धे थेवलेली आहे ना ती) घाला. परतुन जरावेळ झाका. मग कोथिंबीर घाला पुन्हा वाफ येउद्या. एका वाफेनंतर चीज किसुन घाला व गॅस बंद करा. गरम गरम खा.

आम्ही ह्याला अंडा-ब्रेड उपमा म्हणतो.

मी असे पाहिलेत काही मित्र माझे! आमच्या दुप्पट खायचे पण त्यांचे कधी वजनच वाढल्याचे जाणवले नाही!(५०-५५ किलो मध्येच रेंगाळायचे कायम) तेंव्हा आम्ही त्यांना डिवचायचो तुम्ही मनाला खाता जीवाला नाही खात त्यामुळे खाणे तुमच्या अंगी लागत नाही! >>> आणि आता ? Wink Lol

वजन वाढवणं ही समस्या असुच कशी शकते? किती सोपं असतं ते. डोळा मारा>>>> नाही ग ,,, ही सुध्दा समस्या असु शकते.जंक फुड न खाता हेल्थी फुड खाऊन वजन वाढवण अवघड असत ग.सेम फेज आहे सध्या माझी.

एखाद्याचे वजन वाढत नाही हि समस्या असू शकते पण त्यातील बराचसा भाग हा मानसिक आहे. म्हणजे आपण फार बारीक दिसतो त्यामुळे इतर मुले/ मुली आपल्याकडे बघत नाहीत हि खरी समस्या असते.
परंतु याचा एक चांगला पैलू असा असतो कि आपण कितीही कुठेही आणि काहीही खाऊ शकतो. वयाच्या २५ व्या वर्ष पर्यंत मी पण असाच होतो. उंची ५'१०" आणि वजन ५६ किलो. या वेळेपर्यंत मी कुठेही, काहीही, कितीही आणि कोणत्याही वेळेस खात असे.
परंतु विक्रांत वर डॉक्टर (१९९०) म्हणून गेलो आणि तेथे असलेले सुग्रास जेवण जेवून माझे वजन ८ महिन्यात ९ किलोने वाढले. वजन ६५ किलो. तेंव्हा माझे डोळे उघडले आणि कुठेही काहीही आणि कितीही खाणे बंद केले. आज २६ वर्षांनी माझे वजन ६७ किलो आहे वय ५१ आणि उंची तीच आहे.
तेंव्हा ज्यांना कोणताही इतर आजार नाही त्यांनी वजन वाढत नाही या गोष्टीचा बाऊ करणे सोडून द्या. उलट खा प्या आणि वजनाची चिंता न करता मजा करा.
फर्स्ट इम्प्रेशन इज नॉट लास्ट इम्प्रेशन हे लक्षात असू द्या. आपले व्यक्तिमत्त्व सुधारण्याच्या मागे लागा
म्हणजे ज्या मुलाला किंवा मुलीला तुम्हाला इम्प्रेस करायचे आहे ते साध्य होईल किंवा लोकांमध्ये आपण उठून दिसू लागाल.
टिनपाट मुलावर एखादी गुलछबू मुलगी का लट्टू होऊ शकते याचे रहस्य त्याच्या व्यक्तिमत्त्वात आहे केवळ दिसण्यावर नाही.

एखाद्याचे वजन वाढत नाही हि समस्या असू शकते पण त्यातील बराचसा भाग हा मानसिक आहे.>>>

तेच मी वर म्हटलयं 'जीवाला न खाता मनाला खाणे'!

तेंव्हा ज्यांना कोणताही इतर आजार नाही त्यांनी वजन वाढत नाही या गोष्टीचा बाऊ करणे सोडून द्या. उलट खा प्या आणि वजनाची चिंता न करता मजा करा. >>> डॉक्टर तुम्ही तरी असं म्हणु नका , वजन वाढलं नाही तर हरकत नाही पण तेलकट , तुपकट , जंक फुडवर मर्यादा हवीच.

तळवलकर VLCC किंवा तत्सम संस्था च्या बाहेर सकाळी उभे राहा.
<<

आता मंचरमधे तळवलकर शोधणे आले. Wink

तुम्हाला दूध आणि दूधाचे पदार्थ( खीर, दही, पनीर असे) पचते का?

भारतीय लोकांना चीज असे वरचे वर खायची सवय नसते. ( पंजाबी पनीर कसे खातात अशी उदाहरणे नकोत लगेच ).

>>>>>वयाच्या २५ व्या वर्ष पर्यंत मी पण असाच होतो. <<

अहो, वयाच्या २५ व्या वर्षी बरेच असतात हो काडीपेलवान.

माझी आई चिंता करायची माझे वजन का वाढत नाही. अगदी झुरळ नसले तरी आई वाढत नाही मुलीला असा अवतार.

तुम्हाला दूध आणि दूधाचे पदार्थ( खीर, दही, पनीर असे) पचते का?>>>>>> दुध & चीज दोन्ही सांगितले आहेत.

वयाच्या २५ व्या वर्षी बरेच असतात हो काडीपेलवान.>>>> मी सद्ध्या चिंता सोडू का मग?

मी सद्ध्या चिंता सोडू का मग?>>

म्हणजे काय?
'चिंता माणसाला चिते कडे नेते' हे वाक्य ठाऊक नाही का तुम्हाला!

तेंव्हा चिंता सोडा चिंतन करा आणि अवसरीला केंव्हा येऊ सांगा बसुयात (गप्पा मारत)!

तेंव्हा चिंता सोडा चिंतन करा आणि अवसरीला केंव्हा येऊ सांगा बसुयात (गप्पा मारत)!>>> केंव्हाही या. आत्ता सुद्धा येऊ शकतात.

माझ्यामते चीज हा जगातला बोअर पदार्थ आहे. त्याची किंमत बटरपेक्षा जास्त का असते हा प्रश्न नेहमी मला पडतो. याऊलट माझ्या गर्लफ्रेंडला नेहमी पिझ्झा, सॅण्डवीच, पावभाजीवर एक्स्ट्रा चीज टाकून हवे असते. मसाला डोश्यावरही नसले तर मागून घेते. अगदी त्या दिवशी तिला एके ठिकाणी ऑमलेट पाव खाऊ घातले, तर तिथेही एक्स्ट्रा चीज मिळेल का विचारत होती. बरं ते तर एक्स्ट्रा घेतेच. वर माझ्या वाटणीचेही मी खरडवून तिच्या ताटलीत कोंबतो. आणि तो वासही नको म्हणून तिच्यापासून दोन बोटे दूर सरकून बसतो. त्यामुळे एकंदरीतच तुमची चीज खाताना काय अवस्था होत असेल ती समजू शकतो. अर्थात मी या जागी असतो तर मेलो तरी बहात्तर पण चीज नाही खाणार असा पवित्रा घेतला असता हे वेगळे. पण तुमच्या दुखात सहभागी आहे Sad

'चिंता माणसाला चिते कडे नेते' हे वाक्य ठाऊक नाही का तुम्हाला!
>>>>
प्लस सेव्हन एटी सिक्स!
किमात ते गाणे तरी ठाऊक असेलच,
चिंता ता चिता चिता.. चिंता ता ता रे

माझ्यामते चीज हा जगातला बोअर पदार्थ आहे. >>> ऋन्म्या वाईनबरोबर केव्ह चीज खाऊन बघ , त्याची क्रंची चव एकदा घे आणि नंतर मला सांग .
किंवा गोट चीज ट्राय कर Proud

चीज, पनीर हे असले पदार्थ मला पण आवडत नाहीत. कशात घालून तर नाहीच, नुसते तर यक्क Sad
अजुन एक चीड आणणारी गोष्ट म्हणजे मियॉनिज Uhoh बरोबर लिहिलंय ना मी?
चीज चिली टोस्ट खूप भारी लागत्तात असं मला कुणीतरी बोललं, मी दोन तुकडे जेम्तेम खाल्ले. Sad

Pages