भटक्या प्राण्यांचा वाली कोण???

Submitted by सिंथेटिक जिनियस on 22 December, 2016 - 05:09

भारतात जवळपास सर्वच ठीकाणी भटक्या जनावरांचा प्रश्न जटील होत चालला आहे.कुत्रे,गाय हे प्राणी विशेष करुन आढळतात.अनेकदा भटक्या कुत्र्यांना रेबिज होऊन ते पिसाळातात,लहान मुलांवर हल्ला करुन त्यांना जखमी केल्याच्या बातम्या आपण वाचतच असतो.पण प्राणी त्यांच्या नैसर्गीक प्रेरणेने वागत असतात.त्यामुळे प्राण्यांना दोष देऊन उपयोग नाही.
हा विषय डोक्यात यायचे कारण म्हणजे आजचा अनुभव,एक अस्थिपंजर झालेलं कुत्र्याचं पिलू इकडे तिकडे सैरावैरा पळत होतं ,दिसेल त्या गोष्टीचा वास घेत होतं,अन्नाच्या शोधासाठी.बहुधा आईपासून दूरावलेलं.त्या केविलवाण्या जिवाची अन्नासाठी चाललेली धडपड मला बघवली नाही.संवेदनशील मन हेलावलं.मि घरातून थोडे दूध आणि पोळी घेऊन आलो व त्याच्यापुढे ठेवले.ते खाण्याचही त्राण त्याच्या अंगात न्हवते.कसेबसे थोडे खाऊन तो जीव निघून गेला.मग विचार करत राहिलो की या भटक्या जनावरांची ही परवड का? माणसाने स्वतःच्या स्वार्थासाठी यांचे नैसर्गीक स्त्रोत हिसकावून घेतले.परिणामतः अनेक जीवांवर वाईट हालाकीत जगण्याची वेळ आली.
माणुस स्वार्थी आहे हे मान्य.पण या भटक्या जीवांचे हाल बघवत नाहीत.लोक गाईने दूध द्यायचे बंद एले की तिला सोडून देतात,कुत्रा पिसाळला की सोडून देतात कुठेही.
यावर मला एक उपाय सुचला ,तो मांडतो.भटक्या जनावरांसाठी शासनाने निवारा उपलब्ध करुन द्यावा.या ठीकाणी या प्राण्यांचे प्रथम निर्बिजीकरण करावे.या प्राण्यांना पुरेसे अन्न व औषधोपचार द्यावेत.ज्यांना कुत्रा किंवा इतर प्राणी ॲडॉप्ट करायचेत त्यांना ते देऊ करावेत.
आज महासत्ता होऊ घातलेल्या आपल्या देशात भटक्या जीवांसाठी कोणतीच योजना नाही ,हे आपल्याला शोभणारे नाही.वाघ,सिंह या सारख्या लुप्त होऊ घातलेल्या प्राण्यासाठीच योजना आहेत,व जनतेत त्याबद्दल अवेरनेस आहे.
तर या भटक्या जीवांकडे शासनाचे लक्ष जावे याकरता मला ऑनलाईन पिटीशन तयार करायचे आहे.ते कसे करावे,?कुणी असे पिटीशन तयार केले असेल तर त्याची लिंक द्यावी. हे पीटीशन शेअर व साईन करुन शासनाकडे स्ट्रे ॲनिमल वेल्फेअरची मागणी करता येइल.धन्यवाद.

Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

अगदी तुझ्याच शब्दात सांगायचे तर तुझ्याकडे नुसते बघून किंवा तुझ्या नुसत्या स्पर्शाने तुझे गफ्रे ओळखत असेल तुझा आज मुड कसा आहे! 
>>>>>
कुत्रीमांजरी कत्तल मांसाहाराच्या धाग्यावरही अंगावर गोड गुलाबी काटा येणारी पोस्ट येईल असे वाटले नव्हते Happy

मी मांसाहारचे सुपरीणाम असा धागा काढायचा विचार करतेय.
>>>>
बस्स काय सस्मित, हा सेवक तुमच्या सेवेला हजर असताना आता तुम्ही त्रास घेणार का Happy
तरी तुम्हीच काढा. स्वत:च धागा काढले की प्रतिसादात काय लिहायचे सुचत नाही ..

चायनात कुत्रा, गाढव, झुरळं, साप, मुंग्या सगळंच खातात.
>>

अरे वा! आपल्या देशातून चायनाला कुत्रे, झुरळं वगैरे निर्यात करु या.
तेवढे परकीय चलन मिळेल.

सिंजी, टेरेसची वाट लावणारी, सतत भांडणं आवाज आणि कचरा करणारी कबुतरं अनुभवली नाहीएत का?

रात्रभर विनाकारण भुंकत रहाणारी, प्रचंड प्रजा वाढवणारी आणि टोळक्याने फिरताना छोट्या मुलांवर हल्ला करणारी कुत्री अनुभवली नसतील तर तुम्ही लकीच. मी परवा सकाळी जॉगिंगला गेले तेव्हा एका स्कुलबसची वाट पहाणार्‍या मुलावर ३ कुत्र्यांनी हल्ला केलेला पाहिला. प्रचंड धक्कादायक होतं माझ्यासाठी. तो छोटा मुलगा तर ट्राउमामधे आहे.

मी स्वतः कुत्रा मांजर प्रेमी आहे, पण भटके? नो !!!!! त्यांना संपवणं एवढाच पर्याय मला योग्य वाटतो. त्यांचं निर्बजीकरण महाग आहे. त्यांच्यासाठी शेल्टर्स तुमच्यासारख्या भुतदया आणि प्राणीप्रेमींनी स्वत:च्या खर्चाने काढावीत. शासनाने आमचे पैसे वापरुन बिनकामाचे प्राणी सांभाळायला आमचा विरोध आहे. अजुन खुप बेसिक गरजा भागल्या नाहीएत. शासनाला अजुन खुप महत्वाचे खर्च भागवता येत नाहीत, तो पर्यंत अशा शेल्टर्ससाठी पैसा घालवणं आवश्यक नाही. तो पैसा गरीब मुलांच्या पौष्टिक सोडा पण किमान पोट भरेल एवढ्या आहारासाठी नाही तर त्यांच्च्या शिक्षणासाठी वापरावा.
तर तुमच्या 'भटक्या प्राण्यांचा वाली कोण???' या प्रश्नाचं उत्तर, तुम्हीच ज्यांना अशा प्राण्यांबद्दल कळवळा आहे असे लोक.

ज्यांचा कोणी नसतो, त्यांचा देव असतो
ज्यांचा देवही नसतो, त्यांचा रजनीकांत असतो
भटक्या प्राण्यांचा वाली,
कबाली कबाली

@ मनिमाऊ,भटक्या प्राण्यांचे निर्बिजीकरण करणे फार महाग नाही,एकदाच खर्च आहे.एकदा निर्बीजिकरण झाल्यास संख्येवर बरीच मर्यादा येईल.
कबुतरांसाठी कबुतरखाने असतात,त्याने तुमचा त्रास वाचेल.

,भटक्या प्राण्यांचे निर्बिजीकरण करणे फार महाग नाही,एकदाच खर्च आहे.एकदा निर्बीजिकरण झाल्यास संख्येवर बरीच मर्यादा येईल.

>>
छान कल्पना. अापण आपल्या लाडक्या मोदी काकांना सांगुयात.
एका रात्रीत जशी नोटबंदी केली, तशी एका रात्रीत भटक्या प्राण्यांची 'नसबंदी' करवतील. हाय काय नाय काय?

अगदी तुझ्याच शब्दात सांगायचे तर तुझ्याकडे नुसते बघून किंवा तुझ्या नुसत्या स्पर्शाने तुझे गफ्रे ओळखत असेल तुझा आज मुड कसा आहे!>>>>>> अरे काय हे ????
Rofl

@ मनिमाऊ,भटक्या प्राण्यांचे निर्बिजीकरण करणे फार महाग नाही,एकदाच खर्च आहे.एकदा निर्बीजिकरण झाल्यास संख्येवर बरीच मर्यादा येईल. >>> ते किती पटापट मल्टिप्लाय होतात माहित आहे ना? त्यांना पकडुन नेणं आणि सध्या हजारोंच्या संख्येने फिरणार्‍या सगळ्या कुत्र्यांची ही उस्तावार करणं म्हणजे एक मोठा प्रोजेक्टच होइल शासनासाठी.
कबुतरांसाठी कबुतरखाने असतात,त्याने तुमचा त्रास वाचेल. >>> त्यांना पकडुन कोण नेणार कबुतरखान्यात? कबुतर पाळणारी लोकच त्यांना सोडुन देत असतात. सध्या चिमण्या पुर्ण गायब झाल्या आहेत. अजिबात दिसत नाहीत, पण पुर्वीच्या चिमण्यांच्या संख्येत आता कबुतरं दिसतात. मी तर चिमणी पहायला तरसते आहे. आणि कबुतर नाहीशी व्हावीत अशी कायम आशा करत असते.

Chesta theek ahe pan he khup over hotay. Te ya desha che pantpradhan ahet he visaru naka

Angry

anilchembur | 23 December, 2016 - 17:37 नवीन
भटक्या प्राण्यांनी मोदींचा आदर्श घेतला तर त्यांची संख्या आपोआपच घटेल.>>> पण ते तुमच्या लाडक्या आदर्शांचा आदर्श घेत आहेत. ग्यानबाची मेख तिथेच आहे. जरा तुमच्या भाषेत त्यांना समजावून बघा. Proud

कुत्रीमांजरी कत्तल मांसाहाराच्या धाग्यावरही अंगावर गोड गुलाबी काटा येणारी पोस्ट येईल असे वाटले नव्हते
>>
Rofl

>>>> anilchembur | 23 December, 2016 - 17:37

भटक्या प्राण्यांनी मोदींचा आदर्श घेतला तर त्यांची संख्या आपोआपच घटेल.
<<<<

छान झाले मोदीविरोधकांनी ही पातळी गाठली ते! निदान विद्वत्तेचे आणि जालीय चातुर्याचे मुखवटे तरी गळून पडले. एकाच्या वक्तव्यावरून समुहाची मानसिकता समजते ते असे!
================

सिंथेटिक जिनियस,

मलाही वाटते की भटक्या प्राण्यांना नीट वागवावे. सध्याच्या कामातून मोकळा झालो की भटक्या कुत्र्यांना नियमीत काही ना काही खाऊ घालण्याची इच्छा आहे. खूप बिचारे असतात काही प्राणी! आणि गोडस आणि निरागस वाटणारे पारवे जरा जादा झालेत.

ऋन्मेष,

{{{ कुत्र्यांची घाणेंद्रिय भारी असतात म्हणून तसे म्हटले. }}}

घ चे पोट फोडा. घ्राणेंद्रिय असे लिहा. नाहीतर अर्थ बदलतोय

मोदी जसे परदेशात फिरायला जातात , तसे भटके प्राणी परदेशात गेले तर त्यांची संख्या घटेल , असे मी बोललो.

बेफिकिर भौ , तुम्हच्या वक्तव्यावरुन तुमच्या गटा (रा) ची मेंट्यालिटी समजली.

Proud

मोदी जसे परदेशात फिरायला जातात , तसे भटके प्राणी परदेशात गेले तर त्यांची संख्या घटेल , असे मी बोललो.>>>> फिरायला गेलेले जाऊन परत येतात.
बाकी तुमची मानसिकता मायबोलीकरांना चांगली माहित आहे.:फिदी:

घ चे पोट फोडा. घ्राणेंद्रिय असे लिहा. >>> धन्यवाद, मी लहानपणापासून या शब्दाला घाणेंद्रिय असेच समजत होतो. घाण नक्की कुठे आहे हे ओळखण्यासाठी देवाने दिलेले ईंद्रिय असा ढोबळमानाने समज होता. चूक सुधारल्याबद्दल आभारी आहे.

अवांतर - पोट फोडतात की फाडतात? पुण्यात नक्की काय करतात हे जाणून घ्यायला आवडेल.

परदेशात जाउन परत येउन दोन दिवस झाले की पुन्हा जायचं.

५० % प्राणी बाहेरच असले आणि ते ये जा जरी करत असले तरी देशावरचा लोड कमी होईलच की.

असा प्रश्न का विचारलाय ?
>>>
असेच हो, गंमतीने,
चहा पितात ? घेतात ? की मारतात?
साडी घालतात? नेसतात? की गुंडाळतात?
अश्या काही ईतर धाग्यावरील व्याकरणचर्चेचा संदर्भ आहे त्यात ईतकेच Happy

रावणाने कुबेराच्या सुनेवर अतीप्रसंग केला त्यामुळे तिने तिला शाप दिला होता की यापुढे कुठल्या स्त्री वर जबरस्ती करशील तर डोक्याशी शकले होतील म्हणून रावण सीतेेचे मन जिंकण्याच्या प्रयत्नात होता.

अजून एक भीषण थिएरी म्हणजे, सीता रावणाचीच मुलगी होती आणि वनवासात आपल्या मुलीला त्रास होऊ नये आणि रामासारख्या भणंगाबरोबर राहू नये म्हणून त्याने तिला पळवून आणली.

ही सगळी ऋ बाळाची किमया स्मित
>>>
अरे मला काय बोलत आहात, मीच गेले दोनचार दिवस भंजाळलोय Proud
एखादा सतरा ड्यू आयडी बाळगणारा जसे कुठल्या आयडीतून लिहितोय हे अधूनमधून चेक करत राहतो तसे मध्येच वर स्क्रॉल करत कुठल्या धाग्यात प्रतिसाद टाकतोय हे अधूनमधून बघावं लागतंय.

Pages