४ मध्यम ताजे परवर (ताजे परवर कापायला एकदम क्रिस्प असतात)
२ मोठे बटाटे (साल काढून उभे चिरून घ्यावेत)
१ वाटी सुके खोबरे
खोबऱ्यात आरामात बसेल एवढे दाण्याचे कूट
४ तिखट मिरच्या, ८ लसणाच्या कुड्या, १ इंच आलं आणि आवडेल तेवढी कोथिंबीर यांची पेस्ट
१ टेबल स्पून गूळ (भाजी गोडसर हवी असल्यास)
१ टीस्पून आमचूर पावडर
२ टीस्पून गरम मसाला
मीठ
कृती
१. परवरला एका बाजूने कापून गोलाकार चाकू फिरवून पोकळ करून घ्यावे. साली काढू नयेत.
२. मसाल्याचे साहित्य ताटलीत एकत्र करून घ्यावे. नंतर ते परवरमध्ये घट्ट भरावे.
३. कुकर मध्ये तेलात जिरे हळद आणि हिंगाची फोडणी करून त्यात परवर घालावे. थोडे परतल्यावर पाणी घालावे आणि वरून उरलेला मसाला आणि बटाटे घालावे. २-३ शिट्ट्या (१० मिनिट) कुकरला शिजवावे.
४. वरून सुके खोबरे आणि कोथिंबीर घालावी.
परवर म्हणजे तोंडली का? मी
परवर म्हणजे तोंडली का?
मी उत्तर भारतात असताना आमचा कुक 'परवरकी सब्जी' केली म्हणायचा ती तोंडल्याची भाजी असायची!
पण सालं फार जून लागतात ना ?
पण सालं फार जून लागतात ना ? ती काढायलाच हवीत.
इथे फोटो टाकता येत नाही का?
इथे फोटो टाकता येत नाही का? माझ्याकडे फोटो आहे.
नाही प्रेशर कुकर मध्ये सालं वांग्यासारखी मऊ होतात. नाहीतर परवरचा खूप चिखल होतो.
तोंडली चार घेउन कसे चालेल ?
तोंडली चार घेउन कसे चालेल ? समथिंग एल्स
तोंडली चार घेउन कसे चालेल ?
तोंडली चार घेउन कसे चालेल ? >>>
तेच ना!
छान आहे रेसिपी. पण चारच परवर?
छान आहे रेसिपी. पण चारच परवर? माझ्याकडे जे 'परवर' आहेत ते तोंडल्याच्या तिप्पट आकाराचे आहेत. बंगाली लोक त्याला पोटल म्हणतात, त्याचीच रेसिपी आहे ना ही?
https://www.google.co.in/sear
https://www.google.co.in/search?q=parvar&safe=active&espv=2&source=lnms&...
हे पहा. हे मोठं असतं. नॉट तोंडलं
मी दोनच माणसांसाठी करते!
मी दोनच माणसांसाठी करते! त्यात पण नवरा नाकं मुरडतो. सो चारच.
>>>पोटल
बरोब्बर!
इथे असा छान फोटो बिटो टाकायचा
इथे असा छान फोटो बिटो टाकायचा असेल तर काय करायचं?
इथे लिहायच्या विंडोखाली
इथे लिहायच्या विंडोखाली निळ्या अक्षरात इमेज लिहिले आहे. त्याला क्लिक करुन पुढे प्रोसेस करा
सई, फोटो इथे टाकण्यासाठी आधी
सई, फोटो इथे टाकण्यासाठी आधी साईझ खुप लहान करावी लागेल.
भाजी छानच ! पण मुंबईतही परवर कमीच दिसतात.
छान आहे पाकृ. मला हे तोंडलं
छान आहे पाकृ. मला हे तोंडलं कम काकडी वाटतेय.
याला तर पडवळ म्हणतात ना?
याला तर पडवळ म्हणतात ना?
परवर वेगळं आणी पडवळ वेगळं.
परवर वेगळं आणी पडवळ वेगळं. पडवळ सापासारखे लांब असते.
माझा कूक यालाच पडवळ म्हणतो.
माझा कूक यालाच पडवळ म्हणतो. आत्ता गूगल केलं, पडवळ खरंच सापासारखं लांब असतं म्हणुन त्याला snake gourd म्हणतात.
https://www.google.co.in/sear
https://www.google.co.in/search?q=parvar&biw=1047&bih=505&tbm=isch&imgil...
parvar image from google
te tondla nahi. pointed guard
te tondla nahi. pointed guard mhaNtaat tyala
पण मुंबईतही परवर कमीच
पण मुंबईतही परवर कमीच दिसतात.>> नाही.. परवर सगळीकडेच मिळतात. यात सुकी / ओली करंदी घातली तर अजुन यम्मी !!
सई, छान प्रकार .. यु पी मधे
सई, छान प्रकार .. यु पी मधे खुप आवडीने खातात.. आलु परवल/ भरवा परवल..