भरलं परवर

Submitted by सई केसकर on 22 December, 2016 - 04:13
प्रत्यक्षात लागणारा वेळ: 
३० मिनिटे
लागणारे जिन्नस: 

४ मध्यम ताजे परवर (ताजे परवर कापायला एकदम क्रिस्प असतात)
२ मोठे बटाटे (साल काढून उभे चिरून घ्यावेत)
१ वाटी सुके खोबरे
खोबऱ्यात आरामात बसेल एवढे दाण्याचे कूट
४ तिखट मिरच्या, ८ लसणाच्या कुड्या, १ इंच आलं आणि आवडेल तेवढी कोथिंबीर यांची पेस्ट
१ टेबल स्पून गूळ (भाजी गोडसर हवी असल्यास)
१ टीस्पून आमचूर पावडर
२ टीस्पून गरम मसाला
मीठ

क्रमवार पाककृती: 

कृती
१. परवरला एका बाजूने कापून गोलाकार चाकू फिरवून पोकळ करून घ्यावे. साली काढू नयेत.
२. मसाल्याचे साहित्य ताटलीत एकत्र करून घ्यावे. नंतर ते परवरमध्ये घट्ट भरावे.
३. कुकर मध्ये तेलात जिरे हळद आणि हिंगाची फोडणी करून त्यात परवर घालावे. थोडे परतल्यावर पाणी घालावे आणि वरून उरलेला मसाला आणि बटाटे घालावे. २-३ शिट्ट्या (१० मिनिट) कुकरला शिजवावे.
४. वरून सुके खोबरे आणि कोथिंबीर घालावी.

वाढणी/प्रमाण: 
पाककृती प्रकार: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

परवर म्हणजे तोंडली का?

मी उत्तर भारतात असताना आमचा कुक 'परवरकी सब्जी' केली म्हणायचा ती तोंडल्याची भाजी असायची!

इथे फोटो टाकता येत नाही का? माझ्याकडे फोटो आहे.
नाही प्रेशर कुकर मध्ये सालं वांग्यासारखी मऊ होतात. नाहीतर परवरचा खूप चिखल होतो.

छान आहे रेसिपी. पण चारच परवर? माझ्याकडे जे 'परवर' आहेत ते तोंडल्याच्या तिप्पट आकाराचे आहेत. बंगाली लोक त्याला पोटल म्हणतात, त्याचीच रेसिपी आहे ना ही?

इथे लिहायच्या विंडोखाली निळ्या अक्षरात इमेज लिहिले आहे. त्याला क्लिक करुन पुढे प्रोसेस करा

माझा कूक यालाच पडवळ म्हणतो. आत्ता गूगल केलं, पडवळ खरंच सापासारखं लांब असतं म्हणुन त्याला snake gourd म्हणतात.

पण मुंबईतही परवर कमीच दिसतात.>> नाही.. परवर सगळीकडेच मिळतात. यात सुकी / ओली करंदी घातली तर अजुन यम्मी !!