पुरुषांचाही विनयभंग होतो!!!!

Submitted by सिंथेटिक जिनियस on 1 December, 2016 - 09:56

२०१२ साली दिल्लीत झालेल्या निर्भयाच्या अमानुष बलात्काराच्या घटनेनंतर देश ढवळुण निघाला.स्त्री सुरक्षे विषयक कायदे कडक केले गेले.देशात स्त्रीयांना भोगायल्या लागणार्या छेडछाड ,विनयभंग ,बलात्कार इत्यादी प्रश्नावर मंथन झाले ,चालू आहे.स्त्री सुरक्षा आपली सर्वांची प्रार्थमिकता असायला हवी या बाबतीत दुमत नाहीच.पण पुरुषांच्याही काही लैंगिकतेच्या अनुषंगाने सामाजिक समस्या असु शकतात याविषयी मात्र ब्र देखिल उच्चारला गेला नाही.प्रत्येकवेळी पुरुषच शोषणकर्ता असतो असा एकांगी विचार मांडायला गेलो तर योग्य होणार नाही.
बायकाही पुरुषांचे लैंगिक शोषण करतात /करु शकतात असे गृहीतक जर कुणी मांडले तर ते एकतर खोटे आहे अथवा हास्यास्पद आहे असे समजले जाते.पण काही पुरुषांना बायकांचे वाईट अनुभव येतात हे खरे आहे.कायद्याचे संरक्षण सर्व बाबतीत स्त्रीला असल्याने पुरुषांना कुणाकडे दाद मागावी हा प्रश्न पडतो.काहीही झालं तरी चूक पुरुषाचीच असते असा प्रवाद असल्याने स्त्रीच्या अत्याचाराला बळी पडलेले पुरुष कुठेच दाद मागायला जात नाहीत.
मलाही माझ्या वैयक्तीत आयुष्यात अश्या स्त्रीयांचे वाईट अनुभव आले होते.पैकी खाली काही देत आहे.
अनुभव१
मी कॉलेजला असताना ,२००४ ला पहिल्यांदा मला बायकाही क्रुर वागु शकतात व पुरुषांचा यथेच्य विनयभंग करु शकतात याचा अनुभव आला.झालं होतं असं कि आमच्या केमिस्ट्री लॅब मध्ये एक महिला लॅब अटेडंट होती.एकदा माझ्याकडून practicle चालू असताना महागडा थर्मामीटर फुटला.मला शिव्या बसल्याच पण त्या महिला लॅब अटेंडंट्लाही शाब्दीक मार सर्वांसमोर मिळाला,का ते माहीत नाहि.पण तीने त्या दिवसापासुन मला त्रास द्यायला सुरवात केली.सर्वांसमोर मला तब्येतीवरुन चिडवणे ,practicleला आवश्यक वस्तु देताना सहेतुक स्पर्श करणे ,रोखुण बघणे,माझ्या मित्रांना खाजगित मी तिच्या प्रेमात पडलो आहे असे अप्रत्यक्ष सांगणे असे अनेक प्रकार तिने केले.
तिच्या प्रेमात पडण्याचा प्रश्नच नव्हता,दिसायला बरी असली तरी मला तिच्यात काडीचाही इंटरेस्ट नव्हता.माझं लक्ष फक्त अभ्यासावर होते.२००४ च्या त्या सहा सात महिण्यात तिच्या harassment चा व unwanted sexual advancesचा मला मानसिक त्रास झाला.मित्र म्हणायचे एंजॉय कर,पण आवडत नसलेल्या बाईची नकोशी जवळीक एंजॉय कशी करायची.तक्रार करायला गेलो असतो तर मीच तिला exploit करतोय असा अर्थ लगेच काढला गेला असता,ते मला नको होते.ति तेव्हा तिशीत होती ,मॅरीड होती.पण स्त्री असुन इतकी सायकोपॅथिक कशी हा प्रश्न मला अजुनही पडतो.
अनुभव २
एकदा महामंडळाच्या लालडब्याने प्रवास करताना एक मध्यमवयीन महीला माझ्या शेजारी येऊन बसली.बस कधी सुटणार वगैरे चौकश्या करायच्या त्यातिच्या माझ्याकडे करुन झाल्या.बस सुटल्यावर यथावकाश बसमधले दिवे घालवल्यावर तिने मला खेटायला सुरवात केली,असेल चालू म्हणुन मी दुर्लक्ष केले .पण तिने चक्क त्या अंधारल्या बसमध्ये माझा हात हातात घेतला .मध्यममार्गी व पांढरपेशा मानसिकतेमुळे मी ओशाळलो.हात झटकम सोडवून घेतला व सीट बदलुन बसलो.तिचा स्टॉप आल्यावर तिने वळुन माझ्याकडे बघितले ,व ' मी फार काही गमावले ,असा हसरा कटाक्ष टाकून निघुन गेली.तिच्या अश्या वागण्याने मला त्या प्रसंगात काही सुचले नाही..आपणच संधी गमावली का ? असा एक पुरुषी विचारही मनात येऊन गेला .पण पांढरपेशी मानसिकता असल्याने गप्प राहीलो.

अनुभव ३
आमच्या इथल्या एका नवीन शॉपिंग सेंटरमधे गेलो होतो,खरेदी झाल्यावर काउंटरपाशी आलो.काउंटरवर एक मुलगी बसली होती.
काउंटरवरची ती-( हसुन) आवडले तुम्हाला?
मी- काय ते?
ती- (डोळ्यात रोखुन बघत)आमचे शॉपिंग सेंटर?
मी- हं,बिल करताय ना?
ती-( माझ्या डोळ्याशी भिडवलेले डोळे न हलवता) करतेय की!
मी- कीती झाले?
ती- (लाडात येऊन) लीहलेय की त्याच्यावर!
मी बिल देऊन पुढे गेल्यावर मागे वळुण पाहिले, तिने शेजारच्या काऊंटरवरच्या टगीला टाळी दिली व कसा नजरेने गार केला' असा भाव चेहर्यावर आणला.
तर मंडळी पुरुषांचाही विनयभंग होतो.एक स्त्री तो करु शकते.आज स्त्री सुरक्षेविषयी काथ्याकुट होत असताना ही बाजुही पुढे आलि पाहिजे असे वाटल्याने अनेक अनुभवापैकी हे काही अनुभव शेअर केलेत.आपल्याला आवडलेल्या स्त्रीचा सहवास मिळावा असे मला वाटायचे / वाटते,तसा तो मिळालाही.पण हे unwanted sexual advances ही वाट्याला आले.मान्य, स्त्री इतका पुरुषांना याचा त्रास होत नाही ,पण आखीर मर्द भी इन्सान होता है ना.त्याचि काळजि करणारे कुणीच नाही,तसे कायदे नाहीत हे पाहुन खेद वाटल्याशिवाय रहात नाहि.

Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

स्त्री करु शकत असलेल्या (?) पुरुषांच्या विनयभंगावर धागा काढलात, तर हातासरशी याच धाग्यात, पुरुषच पुरुषाचा विनयभंग (रॅगिंग?) करतो तो विषयही हाताळा की राव....!

पुरुषांकडून होणार पुरुषांचा विनयभंग
लिंबू टिम्बु याला रॅगिंग वगैरे नाही म्हणत, बायकांचा होतो तसाच, प्रॉपर विनयभंग मुलांचाही होतो (मुले = 17-18 यर्स तो 30-35 वर्षे)

मी स्वतः 16-17 वर्षांपासून मफतलाल बाथ या मुंबईतील स्पोर्ट संकुलात पोहायला जात आहे,
पोहण्याच्या पोशाखात असताना, पाण्यात चुकून होणारे सहेतुक स्पर्श,
कॉमन शॉवर मध्ये टक लावून पाहणे, victim च्या समोर मुद्दाम सरकणारा टॉवेल, हे सगळे अनुभवले आहे,
आणि यात विनयभंग करणारी व्यक्ती 25-45 वयोगटातील व्यवस्थित संसार असणाऱ्या होत्या हे विशेष.

मुंबई लोकल ट्रेन, यात कॉलेज च्या वयात अंकल टाइप माणसाकडून विचित्र अनुभव न आलेला पुरुष विरळा,

हे सगळे बदलत्या काळानुसार, अलीकडच्या 5-10 वर्षातील थेरं नाहीयेत, तर या गोष्टी 20 एक वर्ष तरी अस्तित्त्वात आहेत.
कोणाला त्या कार्पेट खाली दडवून ठेवायच्या असतील तर ते करोत बापडे.

पण माझ्या अनुभवावरून तरी,
पुरुषांचा विनयभंग होतो, होऊ शकतो,
स्त्री किंवा पुरुषांकडून.

अनिल चेंबूर,
मी तेच म्हणतोय,
संस्कृतीरक्षक अशा घटनांना रॅगिंग, मजेत केली जाणारी टवळखोरी, असा अँगल द्यायचा प्रयत्न करतात, कारण अशा घटनांनी आपली महान संस्कृती dagalte,

पुरुष पुरुषाचे लैंगिक शोषण करु शकतो हे काही नवीन नाही.माझा मुद्दा या धाग्यात वेगळा आहे,मागच्या काही वर्षात सगळे पुरुष आरोपीच्या पिंजर्यात उभे केले गेले ,लैंगिक शोषण झाले मग ते स्त्री चे असो वा पुरुषाचे ,perpetrator पुरुषच असतात असा समज पसरला आहे.त्याच्या अनुषंगाने मी स्त्री ही पुरुषाचे लैंगिक शोषण करु शकते ही बाजू मांडत आहे.पण प्रतिसाद वेगळेच येत आहेत.

सिंजी धाग्याचे नाव "पुरुषांचा विनयभंग होऊ शकतो आहे"
ते बदलून "स्त्रिया पुरुषांचा विनयभंग करतात का?/करू शकतात का?/ स्त्रियांकडून पुरुषांना आलेले विनयभंगाचे अनुभव " असे ठेवा,
तुमचा मुद्दा जास्त स्पष्ट होईल

सिम्बा, हे अगदी खरे आहे.

गेल्या काही वर्षात मुंबई ( आणि इतर शहरातूनही ) गे अ‍ॅक्टीव्हीटी फार वाढलेली आहे. रात्री जरा उशीर ( अगदी जराच म्हणजे आठ , नऊ वाजल्यानंतर ) झाला तर स्टेशनवरची टॉयलेट्स, ट्रक पार्किंगच्या जागा, बाहेरगावच्या बस पार्किंग जागा.. इथे असे काहीसे सहज नजरेला पडते. असे संबंध परस्पर संमतीने होत असतील तर समाजाला हरकत घ्यायचे कारणच नाही पण अनेक तरुण मुलांना जो त्रास दिला जातो, तो मात्र नक्कीच आक्षेपार्ह आहे.

या तरुण मुलांना तक्रार करण्यासाठी, अगदी जवळच्या लोकांना हे सांगण्यासही लाज वाटते. पोलिसांना हे माहित नसते असे अजिबात नाही, पण ते देखील काणाडोळा करतात किंवा लुटालूट करतात.

दिनेश दा,
या गे ऍक्टिव्हिटीज नसतात, तर लैगिक दृष्टया अतृप्त लोकांचा लैगिक भूक भागायवाचा प्रकार असतो,
आणि जिथे खरीददार असतात, तिकडे विक्रेते येणारच,

माझे काही गे मित्र आहेत, त्यांच्याशी बोलताना समजले,
आज एका मुलाला/पुरुषाला लैगिक भूक भागवायला मुलगी/स्त्री मिळण्या पेक्षा ( परस्पर संमतीने संबंध ठेवणारी, वन नाईट स्टॅन्ड ठेवणारी पण वेश्या/कॉल गर्ल नव्हे) मुलगा मिळणे जास्त सोपे आहे.

अशा पद्धतीने भेटणारी पुरुष/मुले सगळीच गे असतात असे नव्हे,
हेट्रो sexual माणसे, आपल्या इच्छा शमवायला इकडे येत असतात,
आधी गे स्पेस मध्ये ऍक्टिव्ह असणारा मुलगा, लग्न झाल्यावर त्या वर्तुळातून बाहेर पडतो/कॉन्टॅक्ट कमी करतो अशा बऱ्याच केसेस आहेत.

असो.... धाग्याचा विषय खूप वेगळा आहे,

माझे काही गे मित्र आहेत, त्यांच्याशी बोलताना समजले,
आज एका मुलाला/पुरुषाला लैगिक भूक भागवायला मुलगी/स्त्री मिळण्या पेक्षा ( परस्पर संमतीने संबंध ठेवणारी, वन नाईट स्टॅन्ड ठेवणारी पण वेश्या/कॉल गर्ल नव्हे) मुलगा मिळणे जास्त सोपे आहे

Agree. We have many examples

डॉक्टर.. या प्रकारात एडस चा धोका सोडला तर ( आणि परस्पर संमती असेल तर ) बाकी काय धोके आहेत, याची माहिती दुसर्‍या बीबीवर देणार का प्लीज.

पुरुषांचा विनयभंग स्त्रियांपेक्षा पुरुषांकडून जास्त होत असावा. लोकलची अफाट गर्दी म्हणजे अशा संधीसाधूंची पर्वणीच. मलाही असे पुरुषांच्या किळसवाण्या स्पर्शाचे अनुभव लोकल प्रवासाच्या वेळी आलेत. रागाने मन ताडताड उडत होतं, पण गर्दीमुळे काहीच करणे शक्य झाले नाही. Angry
बायकांना यापेक्षा अजून काय काय भोगायला लागत असेल, देवच जाणे.

सिम्बा यांच्या 2 December, 2016 - 11:27 च्या संपूर्ण पोस्टला अनुमोदन

मुंबईत लोकल प्रवासात पुरूषांच्या डब्यात पुरूषांकडून पुरूषांना गर्दीचा फायदा घेऊन नको तिथे स्पर्श केले जातात.

सिंजींनी सांगितलेला एस टी मधला अनुभव मला देखील आला होता. मी तेव्हा सेकंड किंवा थर्ड यिअरला असेन, आईच्या वयाच्या बाई नको ते चाळे करु पाहत होत्या. मनमाड ते शिरडी प्रवास करताना हा अनुभव आला होता, शेवटी वैतागून मी उभ्याने प्रवास केला.

याशिवाय तृतीयपंथी लोक पण पैसे उकळण्यासाठी गालगुच्चे घे, गालावर हात फिरव किंवा इतर कुठे काही कर असे धंदे करतात. तेदेखील किळसवाणे वाटते.

याशिवाय तृतीयपंथी लोक पण पैसे उकळण्यासाठी गालगुच्चे घे, गालावर हात फिरव किंवा इतर कुठे काही कर असे धंदे करतात. तेदेखील किळसवाणे वाटते.
>>>>

हो मागे मी एकदा अनवधानाने अश्या एकाचा जीवच घेतला असता.
मी ट्रेनच्या दारावर कानात हेडफोन लावून गाणी ऐकत उभा होतो. तल्लीन झालेलो. अचानक कानामागे, मानेला कसल्याश्या घाणेरड्या ओंगळवाण्या स्पर्शाची जाणीव झाली. आणि मी चिडून खरे तर अंगावर पाल पडल्यासारखे दचकून मोठ्याने किंचाळत मागे वळलो. तसा तो मागचा तृतीयपंथी त्या अचानकच्या हल्ल्याने बावचळून हलला आणि तोल जात ट्रेनच्या बाहेरच पडणार होता. नव्हे गेलेलाच. मागे उभ्या असलेल्या एका माणसाची आमच्यावरच नजर असल्याने त्याने मोठ्या चपळाईने त्याला पकडले आणि तो वाचला. तरीही त्याचा उर धपापत होता कारण जवळपास मृत्यु बघून आलेला. लोकांनी त्याला पाणी वगैरे पाजले आणि मग ठीक झाला.

कश्याला धरेल. एकटाच होता तो बहुतेक. किंवा असेलही एखादा साथीदार. पण तो स्वतःच घाबरलेला. आणि लोकंही या प्रकाराने बरीच जमलेली. बहुतेक एक दोघांनी त्यालाच शिव्या घातलेल्या. तसेही बरेच लोकं यांच्या या स्पर्श करायच्या आणि ओये चिकणे बोलत गालावरून डोक्यावरून हात फिरवायच्या सवयीला वैतागलेलेच असतात, फक्त संघटीत होऊन बोलत नाही ईतकेच.

फर्स्टक्लास मध्ये मात्र हे लोकं चढत नाहीत.

एकुणच तुमच्या इतर धाग्यांची शिर्षके वाचुन
सिं जि तुम्ही खुपच नकार्रर्थी मानसिकतेत आहात असे दिसते.
काही गोष्टी घडुन गेल्या आहेत. भुतकाळ आहे तो. त्याचे भुत मानगुटीवरुन काढुन टाका.
एका धाग्या वर तुम्ही शेती करता असे वाचलेले आठवतेय. तर त्यातच मन गुंतवा ना.
तुमच्या इतके सुखी कोणी नाही. तुम्हाला निसर्ग़ाचा सहवास मिळतोय. अधुनिक शेती, फ़ुलशेती, भाज्या, अनेक पर्याय आहेत.
नीट प्लॅन करुन यातील नगदी शेती निवडा आणि तिथे सुसाट प्रगती करा.
सगळ्या चिंता, काळज्या, व्यसन यापसुन आपसुक दुर जाल. कारण तिथे तुम्हाला वेळ च मिळणार नाही.
कसय भरल्यापोटी सगळ सुचत..त्याच चालीवर रिकामे मन आहे..त्याला दुख: च दिसणार.
मेंदु आणि शरिर यांना योग्य खाद्य द्या...सुदैवाने शेती आहे तर त्यात चांगले काही पेरा.
सग़ळ्याच प्रश्नातुन आपसुक बाहेर याल. स्वात: ला सारखे बजावा...'आर यु हिअर फ़ॉर प्रोब्लेम्स ऑर सोल्युशन्स?'
स्वत:ला आलेल्या वाईट अनुभवातुन मित्रांना/आप्तेष्टांना सावध करा.
-----
माफ़ करा...खुपच लिहीले... रोमात असताना तुमचे इतके प्रश्न वाचुन राहवले नाही. तुम्ही खरे असाल तर..तुम्हाला शुभेच्छा!
(आणि खोटे असाल तरी शुभेच्छा! प्रतिसादकर्त्यानां)
तुमच्या धाग्यांवर ही माझी पाहिली व शेवटची पोस्ट

मी ट्रेनच्या दारावर कानात हेडफोन लावून गाणी ऐकत उभा होतो. >>>> हेडफोन म्हणजे स्काय रेडीओ ऐकत होतास कि काय ? सिगरेट वगैरे नव्हती का ओठात ?? प्रसंग पण तुला साजेसा नाट्यपूर्ण (अचाट) होता. आय मीन साध्या साध्या गोष्टी घडत नसाव्यात तुझ्या बाबतीत.

एका नंतर एक धागे काढणं सुरु आहे आणि विधानं सुद्धा जरा.............. सध्यातरी शंकेला भरपूर वाव आहे की तुम्ही बळच हे धागे काढत आहात.
१०० टक्के अनुमोदन.
दुर्दैवाने मा़झ्यासारखे निरुद्योगी लोक उगाचच प्रतिसाद देऊन धाग्याला प्रसिद्धी देतात. धागा, विषय यांचा गंभीरपणा घालवतात. असे अनेक धाग्यांच्या बाबतीत घडलेले तुम्ही पाहिलेच असेल, तेंव्हा इथे वाचून लोकांचे खरे मत काय याबद्दल निष्कर्ष काढणे शास्त्रीय होणार नाही, असे मला वाटते.
कदाचित उदात्त हेतू असेल की समाजाचे लक्ष असल्या विषयांकडे वेधून घ्यावे, पण ते इथे शक्य नाही.
तेंव्हा तुमच्या शंकेलाच माझे अनुमोदन.

सपना, यात काय अचाट, गाणी एकत होतो मोबाईलमधील, मजा येते ट्रेनच्या दारात हवा खात गाणी ऐकायला. सिगारेटचा शौक नाही मला. असता तरी ट्रेनच्या दारात उभे राहून ? मलाच लोकांनी मारला असता..

सिम्बा, खुपच आश्चर्य वाटलं तुम्ही लिहिलेली माहिती वाचून. हे तर मला एकून सुद्धा माहित नव्हतं.

बुवा, मी लिहिलेय त्यात एका शब्दाची अतिशयोक्ती नाही,
जर मी चुकून असे इम्प्रेशन दिले असेल की स्विमिंग टॅंक वर येणारे मेजोरीटी लोक असेच आहेत, तर तो माझ्या लिखाणाचा दोष समजा,
पण आलेले (मला +पाहिलेले) नगण्य म्हणून दुर्लक्ष करण्यासारखे नक्कीच नव्हते.

वर दिनेशदा नि जे कारण दिलेय, मुले लाजतात, ते पुष्कळ अंशी खरे आहे, कारण आपल्यालाच असा अनुभव आला म्हणजे i am less man, आपण स्त्रैण दिसतो, असा समज सहज करून घेतला जातो, आणि भारतीय समाजात असणाऱ्या अवास्तव पौरुषाच्या कल्पना त्याला बाहेर बोलू देत नाहीत.

Gym च्या चेंजिंग रूम्स, शॉवर, स्वीमिंग टॅन्कस, पब्लिक टॉयलेट्स, या सगल्या ठिकाणी या दमन केलेल्या लैगिंकतेचा आविष्कार दिसत असतो.

नाही, मी शंका घेत नाहीचे, फक्त आश्चर्य व्यक्त केलं. फिमेल पार्टनर पेक्षा मेल पार्टनर मिळणं सोपं आहे तो मुद्दा पण खुपच लॉजिकल आहे पण आता तसं खरं खरं घडतय ह्याची माहिती पहिल्यांदाच मिळाली.
भारतात होतो तेव्हा आणि आता इथे बर्‍याच वेळा पुरुषांनी बायकांकडे केलेले सेक्शुअल अडवॅन्सेस बघितले होते पण पुरुषांनी पुरुषांकडे केलेले न कधी बघितले आणि एकले सुद्धा.
आपल्या दिसतं तसच जग चालत नाही हे कधीच न विसरलेलच बरं.

माझा ही अनुभव

माझी बारावीची परीक्षा चालू होती कुठलासा कठीण पेपर होतो मी पेपर लिहीत होतो इतक्यात पर्यवेक्षक माझ्या जवळ आली आणि माझ्या डोक्यावरून हात फिरवायला लागली सगले जण माझ्या कडे बघायला लागले माझे गाल आरक्त झाले मला वाटल झाला आपला विनयभंग झाला तितक्यात ती म्हणाली " तुम बालोका कुछ करते क्यो नहीं " सगळे हसल्रे आणि .....

आणि माझा विनयभंग होता होता राहीला

हे पहा:
https://www.youtube.com/watch?v=FHlYx3NaMzk
https://www.youtube.com/watch?v=LnyYwDTyMW4

तुम्ही इतके देखणे असाल की स्त्रियांना स्वतःला आवरणे कठीण होत असेल तर फार धोका आहे हो तुम्हाला.
खुप काळजी घ्यायला हवी स्वतःची..

तुम्ही इतके देखणे असाल की स्त्रियांना स्वतःला आवरणे
कठीण होत असेल तर फार धोका आहे हो तुम्हाला>>>>>>> ,हे असले प्रतिसाद माझ्या धाग्यावर येत आहेत.हे पाहुन वैषम्य वाटते .स्त्री सुरक्षेला आपण जरुर प्राधान्य देतो.पण दुसरी बाजू पाहीली पाहीजेत एवढेच मला या धाग्यात म्हणायचे होते.

>> स्त्रीच्या अत्याचाराला बळी पडलेले पुरुष कुठेच दाद मागायला जात नाहीत

असे काही घडत असताना पुरुषाने आपल्या बरोबर असलेल्या स्त्रीला किंवा कोणी स्त्री बरोबर नसेल तर तिथे आजूबाजूला उपस्थित असणाऱ्या स्त्रियांना याची जाणीव करून द्यायला हवी. मग त्या स्त्रियांनी त्या विनयभंग करणाऱ्या स्त्रीला "तुला काय बाप भाऊ आहेत कि नाही" म्हणून बापाबहिणीवरून शिव्या देत मारहाण करावी.
(थोडक्यात, पुरुषाने स्त्रीचा विनयभंग केल्यास सध्या जे घडते तसेच सगळे फक्त भूमिकांची अदलाबदल)

सिंजि,
भारतातील रेप आणि सेक्शुअल हॅरॅसमेंट बाबतचे कायदे एकंदरीतच जेंडर न्युट्रल होण्याची खूप गरज आहे. तुम्ही त्यासाठी प्रयत्न करु शकता. तुम्ही इंटरनेटच्या मध्यमातून प्रयत्न सुरु केलेत तर तुम्हाला समाजातून मदतीचे अनेक हात मिळतील. नुसता खेद व्यक्त करुन काहीच साध्य होणार नाही.

अवांतर : सध्या भारतात सोन्याबाबत विवाहित स्त्री, अविवाहित स्त्री आणि पुरुष यांच्यासाठी वेगवेगळी मर्यादा जाहीर केली ती वाचून आश्चर्य वाटले.

Pages