दुधाच्या मलाई पासून ???

Submitted by रतिका on 16 November, 2016 - 06:34

खूप दिवस मलाई साठवून ठेवली आहे. खरंतर त्याचे तूप करून कंटाळा आला.
अजून काही प्रकार आपण करू शकतो का या मलाई चे जसे कि paneer किंवा इतर काही.
ice cream करून झाले आता अजून काय???
सुचत नाही तुम्ही कोण मदत करू शकता का ????

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

तुपच बनवा. एवढे दिवस साठवलेल्या मलाईचे अजुन काही बनवणे म्हणले पोटाला त्रास होउ शकतो.

मलई, दूध, मिल्क पाऊडर सारख्या प्रमाणात उकळून कन्डेन्सड मिश्रण बनवून घ्यायचं. त्यात पाहीजे ते फ्रुट किंवा फ्लेवर किंवा पल्प टाकायचं. मग ते मिक्सर किंवा बीटर मधे फिरवून घ्या. नंतर आईस्क्रीम मेकर किंवा मग फ्रीज आवडीप्रमाणे किंवा जे असेल त्याप्रमाणे वापरा.

माझ्या दिराने गावावरून येताना चार पाच डझन सीताफळं दिली होती. तेव्हां मी सिताफळाचा गर काढून आइस्कीम बनवलं.ते भरपूर झालं होतं. त्यानंतर शहाळ्याचं एकदा बनवलेलं.

आमच्या इथे खत्री पॉट आईस्क्रीमचं दुकान आहे. तो पेरूचं आईस्क्रीम बनवतो. त्यावर तिखट आणि मीठ घालून देतो. ते एकदा ट्राय करायचंय. चव यम्मी आहे एकदम.

खराब नसेल झाली तर वड्या करा. चक्का एक वाटी एक वाटी मलई व दीडवाटी साखर मिसळून एकत्र शिजवा घट्ट होत आलं की त्यात दोन चमचे पीठीसाखर मिसळून गैस बंद करुन ढवळत रहा दोन मि. ताटात पसरवून वड्या थापा.

स ह - मी ice क्रीम केलं हो. पण पेरू चे sound interesting . तरी करायला हवं खरंच
पनीर बनवता येत का हो मलाई च खुप fats वाल.

मेथि मलाइ मटर बनवू शकाल...
शंकरपाळे पण करु श्काल...खुसखुशित होतील

खवा करुन ठेवु शकता. तो बर्‍याच पदार्थात वापरता येतो. गुलाबजाम करता येतील. खव्याच्या पोळ्या पण छान होतात.
खवा/ साय थोडी परतुन दुधी हलवा, गाजर हलवा यांत वापरता येईल.
मलई कोफ्ता, खोया मटर पनीर, मेथी मटर मलई अश्या कोणत्याही पंजाबी भाज्या, कोणत्याही प्रकारच्या वड्या करताना वापरता येईल.
नाहीतर सगळ्यात जास्त टिकाऊ आणि सोप्प तुपचं आहे. तेच करुन ठेवा लाडु, वड्या, शिरा करायला भरपुर घरचं तुप वापरता येईल. रोज पोळ्यांना तेलाचा हात लावण्यापेक्षा तूप लावायचं.

गोठा वगैरे आहे का तुमचा?>>>>> Lol Lol

मुग्धा केदार वा बनवण्याची रेसिपी देऊ शकता का plz ?? >>>> पसरट भांड्यात साय मंद आचेवर परतत राहणे, खव्यासारखं दिसायला लागलं कि गॅस बंद, नॉनस्टीक कढई असेल तर उत्तम.

गुलाबजाम आणि बेदाणे काहीही हा स हा >>> यात काहीही काय ? जे सुचतंय ते सांगितलं. यातलं काही एक आवडत नसेल तर मग घरात एखादा पाळीव प्राणी असेल (नवरा सोडून) तर त्याला दिलेलं चांगलं.