चिनी मालावर बहिष्कार

Submitted by ऋन्मेऽऽष on 27 October, 2016 - 16:59

चिनी मालावर बहिष्कार !

पाकिस्तानपेक्षा चीन हा भारतासाठी जास्त धोकादायक आहे हे एक असे सत्य आहे जे फार कमी लोकांना माहीत असेल.
पाकिस्तानच्याही बरयाचश्या उड्या या चीनच्या जीवावरच चालतात. सध्या पाकिस्तान कलाकारांवर बहिष्कार टाका सोबत चिनी मालावर बहिष्कार टाका असा प्रचारही जोरात चालू आहे.

खरे तर मला आधी हे एक फेसबूक-व्हॉटसप फॅड वाटत होते. पण या बातम्या वाचून तसे आता वाटत नाहीये. चीननेही या बहिष्काराची दखल घ्यायला सुरुवात केली आहे..

चिनी वस्तूंवरील बहिष्कारामुळे चीनचे धाबे दणाणले
http://dhunt.in/1BTad
via NewsHunt.com

भारतीय वस्तू आमची बरोबरी करूच शकत नाहीत; चीनची अश्लाघ्य टीका
http://dhunt.in/1Av7p
via NewsHunt.com

या बहिष्काराचा खरेच काही फायदा आहे की नाही, असल्यास कितपत, आणि सोबत तोटाही आहे का? वगैरे मुद्द्यांवर चर्चा करायला हा धागा.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

Proud

चायनीज माल वापरणे फाय्द्याचेच ठरेल ना ? तांचे प्लॅस्टिक , त्यांची झाडे वापरलि जातील

Analyst is renounced Professor in IIT.
<<

रिनाऊन्ड व रिनाउन्सड मधला फरक न समजणारा प्राणी असल्या 'विचारप्रवर्तक' वगैरे फॉर्वर्ड्स पाडू शकतो याचं अंमळ कौतुक वाटलं.

हा बीबी वाचून कालच एक चिनी मोबाईल फोन ऑनलाइन मागवला ... आता माझ्या घरात घुसून याच्याकडे चिनी मोबाईल ह्याचा शोध घेताना मला मारतील का?::अओ:

Pages