चिनी मालावर बहिष्कार

Submitted by ऋन्मेऽऽष on 27 October, 2016 - 16:59

चिनी मालावर बहिष्कार !

पाकिस्तानपेक्षा चीन हा भारतासाठी जास्त धोकादायक आहे हे एक असे सत्य आहे जे फार कमी लोकांना माहीत असेल.
पाकिस्तानच्याही बरयाचश्या उड्या या चीनच्या जीवावरच चालतात. सध्या पाकिस्तान कलाकारांवर बहिष्कार टाका सोबत चिनी मालावर बहिष्कार टाका असा प्रचारही जोरात चालू आहे.

खरे तर मला आधी हे एक फेसबूक-व्हॉटसप फॅड वाटत होते. पण या बातम्या वाचून तसे आता वाटत नाहीये. चीननेही या बहिष्काराची दखल घ्यायला सुरुवात केली आहे..

चिनी वस्तूंवरील बहिष्कारामुळे चीनचे धाबे दणाणले
http://dhunt.in/1BTad
via NewsHunt.com

भारतीय वस्तू आमची बरोबरी करूच शकत नाहीत; चीनची अश्लाघ्य टीका
http://dhunt.in/1Av7p
via NewsHunt.com

या बहिष्काराचा खरेच काही फायदा आहे की नाही, असल्यास कितपत, आणि सोबत तोटाही आहे का? वगैरे मुद्द्यांवर चर्चा करायला हा धागा.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

धागा पुन्हा विषयावर आणतो. अश्या त्या कोणत्या गोष्टी आहेत ज्या चीन बनवू शकतो पण जगात ईतर कोणता देश बनवू शकत नाही. >> great wall of china ! Lol

मला स्वत:लाही ते शोधायचे नसल्याने मी हुज्जत घालायला येणार नाही >> हे बाकी बरोबर बोललास, नवा बाफ उघडशील ना, लबाडा Lol

तसेच आयात बंद करा म्हणजे फक्त कित्येक अनावश्यक गोष्टी जर आयात करत असाल तर ते कमी करा. असा अर्थ घेतला तर यात काही वावगे नाही

....

आवश्यक अनावश्यक हे कुणी ठरवायचे ? मोदी फ्डणवीस ठाकरेनी का ?

गूजरातचे पाकिस्तानशी आयात निर्यात चालते , मg सिनेमावाल्यानी पाकिस्तानचे नट गायक का नाही घ्यायचे ?

पाकिस्तानचा तो नट समजा हिंदू असता , तर हिंदुत्ववाद्यांची काय रिअ‍ॅक्शन असती ?

....

चायनीज मालावरचा बहिष्कार दिवाळीत तरी जाणवतोय. चिनी लायटींगचा झगमगाट कमी जाणवतोय. निदान मुंबईतल्या मध्यमवर्गाने तरी हा बहिष्कार काही प्रमाणात टाकला आहे.

आवश्यक अनावश्यक हे कुणी ठरवायचे ? मोदी फ्डणवीस ठाकरेनी का ?

त्याला मोदी इ. कशाला पाहिजे? तुमचे तुम्हाला कळत नाही का? लोकांनी सारखे सारखे सरकारकडे बघणे ही कसली लोकशाही भारताची? लोकांनी सरकारला सांगितले पाहिजे बहुमताने की अमुक करा नि तमुक करू नका नाहीतर निवडून देणार नाही. ही खरी लोकशाही.

टेकचंद चांगले लिहितो. तो होता तेव्हा लाल किल्ला नेमाने वाचायचो. हा लेख पण आवडला. आपल्या शेजारच्या देशाला आपण समजून घेतलेले नाही अगदी बरोबर वाटते.

बरं ते धागाकर्ता माबो संन्यास घेणार होता त्याचं काय झालं ?

चीनहून खराब माल येतो तर तो विकत घेणारे लोक असतात ना भारतात?
मला वाटते ज्यांना मालाचा दर्जा समजतो ते लोक केवळ स्वस्त म्हणून गोष्टी विकत घेत नाहीत - फक्त एक अपवाद- ज्यांचा इंग्लंड अमेरिकेतली गोष्ट म्हणजे उच्च दर्जाचीच असणार असा गैरसमज असतो ते लोक.

खरे तर अमेरिकेतून भारतात येणार्‍या गोष्टी सुद्धा चीनमधेच बनवलेल्याअसतात, चांगल्या दर्जाच्याच असतातच असे नाही. जे अमेरिकेत परत केले जाते तेच पुनः पॅकेज करून इतरत्र पाठवतात.
इंग्लंड अमेरिकेतला चांगल्या दर्जाचा माल ज्या अनेक भारतीयांना आजकाल परवडू शकतो ते थेट इंग्लड, अमेरिकेत येऊन खात्रीच्या दुकानातून तो माल घेतात. मग तो कुठेहि बनलेला असो.

खरी अडचण अशी आहे की सव्वाशे कोटी लोकांना फक्त माल स्वस्त हवा आहे.
स्वतःहून करतील, स्वस्तात बनवण्याचे, उत्तम दर्जाचे नि परवडू शकेल अश्या किंमतीत बनवणारे थोडेच.
जेंव्हा या सव्वाशे कोटी निदान अर्धे जरी असे निपजले तरी भारताला काहीहि आयात करावे लागणार नाही. हुषारी आहे, पैसा आहे पण कामे करण्याची इच्छा नाही. नुसतेच आरक्षण नि सगळ्या गोष्टी सरकारने करायच्या अशी व्रूत्ति.

If you can not slay the dragon do not wake it up.
अविवेकी देशभक्तीच्या पायावर बेतलेल्या बहिष्काराच्या ह्या मोहिमांपायी ह्या ड्रॅगनची रॅथ झेलावी लागेल नजीकच्या भविष्यात आणि ती डायरेक्ट ड्रॅगनकडून न येता नक्कीच पाकिस्तानातून येईल.

ऊघड पुरावे असून पाकिस्तानशी युद्ध करता येत नाही की त्याला कोंडीत पकडता येत नाही. चायनाने ईरेला पेटून जर पाकिस्तानला सपोर्ट (जो सध्या जास्तं फक्त राजकीय आणि थोडा युद्धसामुग्री बेसिसवर आहे) वाढवला तर काष्मीर बरोबरच ईतर ऊत्तरपूर्व राज्यांमध्येही अजून परिस्थिती चिघळेल.
आपली बाजू न्यायाची असली तरी चायनाच्या घोड्याला सध्या हात न लावणेच बरे.

लोकांनी सारखे सारखे सरकारकडे बघणे ही कसली लोकशाही भारताची?
<<

हे गुह्यज्ञान २०१४ साली उत्पन्न झाले का? की आधीपासूनच होते?

जेंव्हा या सव्वाशे कोटी निदान अर्धे जरी असे निपजले तरी भारताला काहीहि आयात करावे लागणार नाही. हुषारी आहे, पैसा आहे पण कामे करण्याची इच्छा नाही.
<<

आमचा एक छोटुकला प्राब्लेम आहे हो.

americh.jpg

ते आमच्याकडे 'निपजलेले' हुषार अन काम करण्याची इच्छा वाले आपल्या प्रोफायलात 'अमेरिच' लिहितात..

त्या सोनेरी चामडीच्या मारिच राक्षसापाठी हे आधीच पळून गेलेत ना! मग आता आम्ही उरलेले मूर्ख व आळशी लोक, आयतं चिनी आयात करतो म्हणून यांचं हे असलं बोलणं का आयकून घ्यावं?

आमची गरीबाची 'राष्ट्रभक्ती' असूं द्या नं आमच्यापाशी?

वरच्या प्रतिसादात 'वैयक्तिक' असा शब्द लै मोठ्ठा दिसतोय. तसाच हा प्रतिसाद आहे बर्का!

पण काये ना, की मूळ साद जनेरिकली सगळ्याच "भारतियांना" ज्ञान"दान" करणारा आहे, तर प्रति साद स्पेसिफिक द्यावा लागणार ना!

अमेरिका .... भारतातील समस्याना लगेच आरक्षणाला जोडले. !

ते आपले ते हे जुने ..... क्की आहेत का ?

हं.

सरकारी नोकरीतील आरक्षणाच्या जागा सुमारे १० - २० % रिक्तच असतात .

म्हणजे सरकारी नोकरीतहे अनारिक्षतच मेजॉरिटीत आहेत.

पंतप्रधानांपासून मुख्यमंत्र्यापर्यंत सगळे लोक प्रामुख्याने ओपनवालेच.

आयायटीत आरक्षण नाही... म्हणजे तिथेही हुश्शारच लोक.

...

असं असताना भारतात स्वस्त माल बनत नाही , चीनचा माल येतो. याला आरक्षण कसे जबाबदार , हे मज पामरास कुणी अमेरिकन बुद्ध्हीवंत समजावून सांगेल का ?

बरं ते धागाकर्ता माबो संन्यास घेणार होता त्याचं काय झालं ?
>>>>

हे नक्की कुठल्या संदर्भाने बोलत आहात.. कारण माझ्याबद्दल अश्या अफवा अधूनमधून ऊठत असतात.. त्यातल्या निम्म्या मीच उठवतो Happy

ते आमच्याकडे 'निपजलेले' हुषार अन काम करण्याची इच्छा वाले आपल्या प्रोफायलात 'अमेरिच' लिहितात..

अहो हे जुने रडगाणे आहे आणि साफ खोटे आहे.

इथे आलेले म्हणजे काही फार शहाणे असतात असे नाही, उलट फारशी अक्कल नसूनहि भरपूर पैसा इथे मिळतो म्हणून येतात. भारतात सगळेच हुषार, तिथे यांना काय मिळणार? म्हणून नशीब काढायला परदेशात रहातात.

जेव्हढे बाहेर आहेत त्याच्या शंभरपट संख्येने नि कमीत कमी दसपट अकलेने, जास्त लोक अजून भारतातच आहेत. फक्त काहीच जण काही करायच्या ऐवजी नुसते दुसर्‍याने काही बोलले की कुचाळक्या करत बसतात.

आमची गरीबाची 'राष्ट्रभक्ती' असूं द्या नं आमच्यापाशी?
डोंबलाची राष्ट्रभक्ती! खरी राष्ट्रभक्ती असती तर असे रडत नसले बसते.

एक व्हॉटसप मेसेज -

Sent by another group:

चिनी वस्तू स्वस्त का आहेत?
या लेखाचा उद्देश आपण जो देश म्हणूंन आर्थिक/सामाजिक/राजकीय मुर्खपणा करतो आणि त्यामुळे आपल्या देशाच्या वस्तुंच्या किमती का जास्त आहेत त्याबद्दल आहे.

चांगल्या वस्तू स्वस्त बनवण्यासाठी गरज आहे
इकॉनॉमी मध्ये efficiency of capital असण्याची. कशाने येते हि efficiency of capital?

मी चीन मध्ये 45 दिवस राहिलो, शेतकऱ्यांच्या घरी राहिलो, 10000 पेक्षा जास्त किलोमीटर passenger train ने प्रवास केला
युनिव्हर्सिटी च्या प्राध्यापकांना भेटलो, शेकडो लोकांना भेटलो. एवढच जाणून घ्यायचं होतं की 1950 साली भारतापेक्षा मागासलेला असलेल्या देशाने एव्हडी सामाजिक आणि आर्थिक प्रगती कशी केली?

काही कारणं सांगतो जी महत्वाची आहेत. मूलभूत प्रश्न सोडवल्याशिवाय हा प्रश्न सुटणार नाही.

1) कंमुनिस्ट क्रांतीने स्त्रियांना मुक्त केलं, जबरदस्तीने का होईना शर्ट पॅन्ट घालायला लावली, केस कापायला लावले आणि कामाला लावलं.चीनच्या आणि भारताच्या GDP मधला फरक समजून घ्यायचा असेल तर फक्त पडद्यात आणि बुरख्यात असलेल्या स्त्रियांचं उत्पन्न (जर त्यांनी काम केलं असतं तर) gdp मध्ये जमा करा आणि 65 वर्षांचा compounding effect द्या.

चीनशी स्पर्धा करायची असेल तर पाहिलं काम स्त्रीमुक्ती चं करा.

एका बाजूला कोट्यवधी बालमजूर शाळेत जात नाहीत आणि दुसऱ्या बाजूला कोट्यवधी स्त्रिया चूल आणि मूल यात अडकवून ठेवण्याविषयी तुम्ही काही करत नसाल तर तुमची देशभक्ती नपुंसक आहे. तुम्हाला त्याची लाज वाटली पाहिजे.

कारण देश म्हणजे देशातील माणसे असतात.

2) कंमुनिस्टांनी धर्म संपवला. आता बौद्ध मंदिरात फक्त पर्यटक जातात. धर्मांच्या मठात आणि ट्रस्ट मध्ये चीनची राष्ट्रीय बचत अडकली नाही ती productive use मध्ये येऊन capitalism चा विकास चिनी कंमुनिस्ट पार्टी च्या नियंत्रणाखाली झाला.

भारतात प्रचंड पैसा धर्मामुळे unproductive कामासाठी मंदिर/मशीद/चर्च मध्ये ब्लॉक झाला आहे.

आज भारतात जवळपास 30 टक्के deposit हे तिरुपती/मशीद/चर्च सारख्या धार्मिक ट्रस्ट/सोसायटी/क्लबचे आहेत. त्यांना बँका 10 टक्के व्याज देतात त्यामुळे उद्योगांवर कर्जावरील व्याजाचे दर 13-14 टक्के आहेत. चीन मध्ये हेच व्याजाचे दर उद्योगांसाठी 6 टक्के आहेत.

म्हणजे आपण तिरुपती आणि त्यासारख्या मंदिरात संपत्ती ब्लॉक करायची. त्या संपत्तीला 10 टक्के व्याज द्यायचं आणि आपल्या उद्योजकांना सांगायचं वस्तू स्वस्त द्या.
कसं शक्य आहे?

बाकी 50 टक्के deposits गव्हर्नमेंट आणि कॉर्पोरेट्स च्या आहेत, गरीब/मध्यमवर्गीय जनतेचे deposits फक्त 20 टक्के आहेत.
रिटेल loans जी लोकांनी घेतली आहेत ती जवळपास 30 टक्के आहेत त्याला व्याजाचे दर अजून जास्त आहेत. ढोबळमानाने असं म्हणता येईल की 50 टक्क्यांपेक्षा जास्त व्याज सामान्य जनता भरते

ही व्याजरूपी लूट कोणाच्या बोडक्यावर टाकली जाते- मंदिर/मशीद इत्यादी,
हाऊसिंग/education/शेती या साठी लोन एक टक्क्याने देता येतील आणि उद्योगांसाठी 5-6 टक्क्याने. मग इथले उद्योजक वस्तू स्वस्त बनवू शकतील.

चिनी वस्तू आपोआप महाग आणि भारतीय वस्तू स्वस्त होतील. धार्मिक मूर्खपणामुळे efficiency of capital कमी होते.

3) चीनमध्ये जमिनीची मालकी राष्ट्राची असल्यामुळे सगळ्या जमिनीवर शेती होते, सगळ्या तळ्यात मत्स्य शेती होते, त्यामुळे अन्न धान्य/ फळं/मांस मासे ही खूप स्वस्त आहे. त्यामुळे लोकांचं जीवनमान चांगलं आहे.

भारतातल्या 40 टक्के शेतीयोग्य जमिनीवर शेतीच होत नाही. जमिनीच्या मालकांना शेतीत इंटरेस्ट नाही आणि मजुरांकडे शेती नाही.

तळ्यात मत्स्यशेती तर नगण्य होते, त्यामुळे अन्नधान्याच्या किमती खूप जास्त आहेत. या व अनेक कारणांमुळे भारत in general कुपोषित आहे. Business हे देखील युद्ध असतं, कोट्यावधींना कुपोषित/वंचित ठेवून तुम्ही ते जिंकू शकत नाही. इतिहासात तसं केल्याने आपण खूप वेळा हरलो आहोत.

हे बदला .ती खरी देशभक्ती, चिनी वस्तूंवरील बंदी तुम्ही करू शकत नाही आणि ते करणं मुर्खपणा आहे.

चीनची भांडवलशाही यामुळे अमेरिकेपेक्षा efficient आहे. आज अमेरिकेपेक्षा पेक्षा चीन ची अर्थव्यवस्था PPP बेसिस वर मोठी आहे.

Analyst is renounced Professor in IIT.

चीनची कल्पना नाही, पण आमच्या नाक्यावरच्या व्यापारांचे धाबे दणाणलेले. मग आम्ही आमच्या नगरसेवकाला पकडून मांडवली केल आता ते व्यापारी यापुढे चीनचा माल घेताना शंभरदा विचार करतील. जेव्हा ते घेणार नाहीत तेव्हा चीनचे धाबे दणाणतील. थोडा वेळ द्या.

Pages