जपानमधली खादाडी

Submitted by webmaster on 26 February, 2009 - 01:45

जपानमधे खादाडी, विशेषतः शाकाहारी व्यक्तिंसाठी

विषय: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

मी तरी थोडेच महिने राहिले जपानला तरीही मलाही जपानची सारखी आठवण येते, अगदी छोट्या छोट्या गोष्टींवरूनही. पण माझा नवरा मात्र तुमच्यासारखेच उसासे टाकत असतो.

आपल्या गप्पा खादाडीचा ट्रॅक सोडू नयेत यासाठी,

याकिसोबा, मॉस बर्गर मधला फ्रेश बर्गर (निकू नाशी),
आणि प्रॉन्तो मधला पिझा मार्गारेटा, मक्याचे चिप्स (विथ साल्सा सॉस),
आहाहा, नात्सुकाशिई ना ... Happy

नाही, मी वाचून गेले.
जपानमध्ये नवीन असताना मॅक, मॉस बर्गर वगैरेचं जरा आकर्षण होतं. कालांतराने ते गेलं. नंतर नम्तर मॅकमध्ये जाऊन फक्त काही फ्रेंच फ्राईज तोंडात टाकणं इथवरच राहिलं. मॉस मध्ये कधी गेलेच नाही नंतर,
पिझ्झा मार्गेरिटा जनरली कुठेही वाईट नसतोच.

इटालियन खादाडीबद्दल लिहायचं/उल्लेख करायचा तर माझी आवडती जागा एक आणि एकच . ती म्हणजे कॅप्रिचोसा. ह्याच बीबीवर हे लिहिलेलं सापडेल महेश. काय लिहावं त्यांच्या स्पॅगेटी बद्दल? शब्दच नाहीत माझ्याकडे. Wink
तसंच योगा स्टेशनच्या बाहेर tapas and tapas आहे. ते ही माझं अत्यंत आवडतं. दोनच वेजिटेरियन स्पॅगेट्या आहेत/होत्या त्यांच्याकडे. पण त्याच त्याच खाण्यात मला आनंद मिळायचा. पैकी एक होती त्यात सॉस असा काहीच नव्हता. गार्लिक ऑईलमध्ये केलेली असायची बहुधा पण मस्त फ्लेवर असायचा. प्लस टोमॅटोज, फ्रेश मोझ्झारेला, त्यावर थोडं सॅलड. अहाहा, मजा यायची.
दुसरी होती त्यात घट्ट टोमॅटो सॉस होता पण चवीला छान होती. नवीन नवीन गेले तेव्हा तिला २,३ विचारुन खात्री करुन घेतली की सॉस वेजी. आहे. तेव्हा हो म्हणालई वेट्रेस. मग काही दिवसांनी म्हणाली की त्यात फिश एक्सट्रॅक्ट आहे.पण तोवर मला स्पॅगेटी आवडायला लागली होती म्हणून मी गपगुमान खाणं चालूच ठेवलं.:फिदी:
पूर्वी म्हणजे साधारण ९८-९९ च्या आसपास कोझी कॉर्नरची जिथे केक शॉपबरोबर रेस्टॉरंटसही होती तिथे झुकिनी, वांगं, टोमॅटो वगैरे घातलेला पास्ता मस्त असायचा.मी सोडण्यापूर्वी तो पास्ता त्यांच्या मेन्यूतून निघून गेला होता. पण त्यांचं सॅलड ड्रेसिंग मला अजूनही आवडतं. रेस्टॉरंट्स्+केक शॉपमध्ये ते काऊंटरवर ठेवलेलं असतं.
बाकी इथे तिथे सटरफटर रेस्टॉरंटसमध्ये मी स्पॅगेटी खाल्लेली आहे पण त्याचा उल्लेख करण्याएवढी चांगली अजिबातच नाही. रॉयल होस्टमध्ये अगणित वेळा खाल्लीये. पण अगदीच बंडल. असं वाटायचं की घरुन सिझनिंग, मीठ वगैरे सगळं घेऊनच जावं बरोबर. Wink

सायो ने सांगितलं म्हणून मी ही जपानच्या वास्तव्यात कॅप्रिचोसा ला भेट देऊन आले. खरंच स्पॅगेटी, पिझ्झा आणि सलाड सुंदरच होतं. नंतर युराकुचो स्टेशनजवळच्या झेस्ट ला ही भेट देऊन आलो. फाहिता मस्तच होता त्यांचा.

आहाहाहा, कॅप्रिचोझा माझे पण अत्यंत आवडते ठिकाण.
मी पहिल्यांदा ग्योतोकू स्टेशन जवळ एक ब्रँच होती, तिकडे चव घेऊन पाहिलेली.
नंतर एक वर्षाने परत आलो तर ती ब्रँच गायब झाली होती.
मग खुप काळानंतर कावासाकी स्टेशन जवळ लाझोना नावाचा एक नविन मॉल झाला आहे, त्यात त्यांची ब्रँच सापडली.
कामियाच्यो स्टेशन आणि आकासाका एरिया मधे पण खुप वेळा इटालियन रेस्टॉ. मधे गेलो आहे, पण त्याची नावे आता आठवत नाहीत.
दुपारच्या जेवणाच्या वेळी गेलो की, आधी एक छोटी बास्केट आणून ठेवतात छोटे टोस्ट सारखे ब्रेड असलेली.
आणि प्रयोगशाळेत असते तशा काचेच्या बरणीत ऑलिव्ह ऑईल (एक हिरवे आणि एक लाल मिरच्या घातलेले तिखट ऑईल). ब्रेडला ऑईल लावून खायचा. वॉव लिहिताना पण ती चव आठवत आहे.
आणि अगदी एक दोनच व्हेज पास्ते होते.
पण खरोखर, आपल्या देशी रेस्टॉ. नंतर या इटालियन पदार्थांचा खुप मोठा आधार वाटायचा.
पोपोरामामा नावाचे एक म्योदेन, ग्योतोकू मधे ब्रँचेस असलेले चांगले इटा. रेस्टॉ. होते.
अनेक वेळा या पोपोरामामाने आम्हा शाकाहारी बॅचलर लोकांना जगवले होते. Happy

तोक्योमधे काही बदल झालेले आढळले.

माझ्या आधीच्या पोस्टमधे लिहिलेले कामियाच्योचे इटालियन रेस्टॉरंट गायब झाले आहे.

निर्वाणमची अजुन एक शाखा तोरानोमोन एकीच्या पोटात सुरू झाली आहे.

आकासाकाचे ताज आणि मोती, रोप्पोनगीचे राजमहल हे सारे बंद पडून जमाना झाला आहे.

ढाबा इंडिया मधला मुख्य शेफ बाहेर पडून त्याने आंध्रा किचन नावाचे रेस्तोराँ चालू केले आहे,
त्याची एक शाखा ओकाचीमाचीला आहे आणि दुसरी गिंझामधे आहे.

शिओदोमे सिटी सेंटर (शिम्बाशी स्टेशन) मधे असलेले बॉम्बे क्लब नुकतेच बंद झाले आहे.

हिगाशी निहोनबाशीला खानापिना नावाचे एक फार भारी रेस्तोराँ आहे.

रोप्पोनगीचे स्वागत (सुनिलसानचे) पण फार चांगले आहे आणि मुख्य म्हणजे त्यात पोहे वगैरे मराठी प्रकार पण मिळतात.

Pages