जपानमधली खादाडी

Submitted by webmaster on 26 February, 2009 - 01:45

जपानमधे खादाडी, विशेषतः शाकाहारी व्यक्तिंसाठी

विषय: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

अरे मुलांनो, शिबुया, हाराजुकु ला कशाला हवंय जायला नमुने बघायला? जरा रात्री उशिरा टिव्ही लावला तर घर बसल्या, पॉपकॉर्न खात सगळं आयतं बघायला मिळतं.

शिबुयाच्या 'त्या' रस्त्यावर मी नेहमी दुपारीच गेलेय. राजमहल तिथेच पडतं आणि एक दोन चांगली रेस्टॉरंटस ही तिथेच आहेत.

केदार, इटालियन आवडत असेल तर स्टेशनजवळच्या tapas tapas मध्ये गेला आहेस? नसशील गेलास तर नक्की जाऊन बघ. एक दोन रेकमेंडेड पास्ता आहेत. आणि मिझुनोकुचीचं (मारुई मारुई मधलं) कॅप्रिचोसा? गेला नसशील तर ताबडतोब जा बरं. नाहीतर सोमवारी हजेरी घेईन तुझी.

सायो, धन्स... मिझोनोकुचि ला मी नेहेमी पडिक असतो...कारण तिथे रुंबीनी नावाचे छान indian रेस्तऱो आहे ते कॅप्रिचोसा कुठे आहे मिझोनोकुचिला? जाउन बघतो नक्की..पण व्हेज आहे ना?? कारण मी शुद्ध शाकाहारी आहे ... आणी तरीहि जपान मधे तग धरुन आहे १ वर्षे

शिबुयात राजमहल आणी सम्राट चांगली अहेत रेस्तरॉ..

व्हेजिटेरियन्ससाठी मेक्सिकन फूड एक चांगलं ऑप्शन आहे. केईओ लाईन वर असलेल्या शिमोताकाईदोला एक मेक्सिकन रेस्टॉरंट आहे. नाव लक्षात नाही माझ्या. आठवलं तर सांगते. तिथे मी आयुष्यात पहिल्यांदा मेक्सिकन फूड खाल्लं. अर्थातच आवडलं.
त्यामुळे इथे मेक्सिकन फूडस्पॉट्सना माझ्या रेग्युलर वार्‍या असतात .:)

योगाहून शिबुयाला जाताना इकेजिरी ओहाशी स्टेशनजवळ 'झेस्ट' म्हणून मेक्सिकन रेस्टॉरंट आहे. मस्त आहे चव. एकदा गेलं की कायमच जात रहाणार. त्याच्या शाखा रोप्पोंगी आणि यामानोते लाईनवर(जिथे मॉर्गन स्टॅनलीचं ऑफिस आहे त्या स्टेशनात) आहेत.
कॅप्रिचोसा सारखं इटालियन आणि झेस्ट सारखं मेक्सिकन मला अमेरिकेत मिळालेलं नाही. कधीतरी मिळेल या आशेवर आहे. तसंच तेन्याची ब्रँच इथे उघडली तर मी पहिली कस्टमर असेन. नाही म्हणायला इथे हिबाची छान मिळतं.

I agree with Saayo- Zest was good. एबिसु एकि पासून ७ मिनीट अंतरावर- Restaurante' de Pizzeria- फुलक्याच्या Competition ला येण्याइटका पातळ सुंदर पिझ्झा. मालक व्हेज करुन द्यायला नेहमी तयार असतो. त्यावर तिथली काप्पुचिनो. पिवळ्या टाईल्स आणि सुंदर चित्रांमुळे एकदम Warm Welcome च Feeling येतं.अहा !!!!!
Ebisu Garden Place मध्ये Sandwich- बेनुगो- Benugo-सुंदर व्हेज Sandwich
त्याच रस्त्यावर आधी- बेस्ट गार्लिक स्पागेटी- La Bohem मध्ये. लंच ला पाय ठेवायला जागा नसते. Open Kitchen आहे त्यांचं. भर थंडीत त्यातल्या उबेत पाय ठेवला की हूश्श..
South Indian साठी - ढाबा इंडिया - क्योबाशी एकी / तोक्यो एकि जवळ
North INdian साठी- रसोई- मेगुरो एकि जवळ- तिथली दाल माखनी !!!!!!!!!!!!!!!!
याकीसोबा साठी- म्योदेन एकिवरील सोबाया.
ओकोनोमियाकि साठी- हिरोशिमात कुठेही.
काइसेकि -योरी साठी- Ebisu Garden Place
व्हेज चायनिज साठी- जपान एकदम टुकार आहे- तरीसुद्धा वासरात लंगडी गाय म्हणजे- Westin मधील चायनिज Restaurant.

वा वा रैना, बरेच दिवसांनी.....येत रहा.

केपी ने लिहिलं नाही का इथे अजून काही? त्याला पण बरीच माहिती आहे जपानच्या खादाडीची.

रैना...अहो पाणी सुटले ना तोंडाला Wink
South Indian साठी - ढाबा इंडिया - क्योबाशी एकी / तोक्यो एकि जवळ
North INdian साठी- रसोई- मेगुरो एकि जवळ- तिथली दाल माखनी !!!!!!!!!!!!!!!!

ही खरोखर छान ठिकाणे आहेत्...पण Sount Indian साठी मी,
कामियाचो (तोक्यो टॉवर जवळ चे एकी)... जवळ 'निर्वाणम' म्हणून एक fandoo हॉटेल आहे..ते recoomend करेन
त्यासारखे मी पुण्यात पण नाही खाल्ले... दोसा-इडली-मेदु वडा एकदम झक्कास..

०---------------------------------------०
ये दिल भी अडा है किसी बच्चे के तरहा...
या तो सब कुछ मुझे चाहिये...या तो कुछ भी नही..

केदार, आम्ही निशिकसाईला मोंजायाकी नावाचा एक पदार्थ खाल्ला होता. आपल्या समोरच्या टेबलवर तवा बसवलेला असतो, त्यात गरम गरम बनवून खायचा. त्यात भाज्या आणि अंडं असल्याचं आठवतंय.
तोक्यो ला ढाबा इंडिया ला गेलो होतो, तिथली इंडियन थाळी खूपच सुंदर होती.
http://www.dhabaindia.com/dhaba/index.html
या दोन्ही ठिकाणी आम्हाला केपी घेऊन गेला होता.

नंतर भटकताना अकिहाबाराला आम्ही एका ठिकाणी व्हेज सूप नूडल्स खाल्ले होते, त्यात् तिखट नसल्याने 'तोगाराशि' या नावाचा मसाला टाकला होता. हा मसाला इतका सही होता, की मी अजूनही इथे तो आणते आणि तेंपुरा / सूप नूडल्स बनवल्यास त्यात टाकते.
बाकी बर्‍याच चिकट भात आणि बीन्स वापरून बनवलेल्या मिठाया आणि केक्स ची दुकाने पाहिली, त्यातल्या काही गोष्टी एकदम सही होत्या.

हाय भाग्या. काय म्हणताय ?

केदार-निर्वाणम' बद्दल माहित नव्हते आधी याची आता हळहळ वाटते. Happy

अजून- ते भाजलेले चेस्टनटस आणि रताळी विकणारे ते फिरते विक्रेते.
थाई साठी- एरावान - योकोहामा एकि जवळ
व्हेज बर्ग्रर आणि फ्राईज- TGIF- Yokohama eki mae
उदोन साठी- कुठेही..
जपानी गोया राईस- (कारली फ्राईड राईस)- साठी- ओकिनावा. अप्रतिम !

रैना, मेगुरो एकी जवळचं 'रसोई' मस्तच. सगळंच छान असतं तिथे. पनीर पकोड्याबरोबरची टोमॅटो चटणी तर यम्मीच.

ह्या रसोई जवळचं एक २,३ मिनीटांवर 'काठमांडू' म्हणून अगदी साधं नेपाळी रेस्टॉरंट आहे ते ही मस्तच. मोमो, टोमॅटो सूप, नूडल्स वगैरे एकदम छान. अजून तेवढं कमर्शियल झालेलं नाही त्यामुळे घरगुती टेस्ट वाटते.

निर्वाणम बद्दल ऐकलंय पण जायचा योग नाही आला. रोप्पोंगीचं 'देवी' ही चांगलंय. सँडविचेस करता शिबुया जवळंच 'कुआईना(kuaina)' हे हवाईयन रेस्टॉरंट. व्हेज मस्त मिळतं. टोक्योत मला वाटतं फक्त १,२ शाखा आहेत. एक लॉस अँजेलिस ला आणि एक माऊईला.

अकासाका मित्सुके स्टेशनजवळच 'ताज' ही आधी खूप आवडतं होतं. मालकाशी संबंधही खूप चांगले होते/आहेत. अगदी नवीन नवीन होतो तेव्हा ते नवर्‍याला नी मित्रांना मेन्यू मध्ये नसलेलंही करुन घालायचे. हल्ली हल्ली जरा क्वालिटी बदलल्याची जाणवते.

मी क्योतो की नाराला अशीच भट्टीत भाजलेली रताळी खाल्ली होती. ती चव नंतर कुठेच मिळाली नाही.

ज्यांना पास्ता घरी करुन खायची आवड असेल तर त्यांनी S&B ब्रँडचा बेजील (बाजीरु)सॉस ट्राय केलाय का? मस्त असतो.
केदार, योगा स्टेशनजवळच्या 'फुजी' सुपरमार्केट मध्ये पास्ता सॉस सेक्शनला मिळतो. तसा पेस्टो इथे खायला मिळालेला नाही. नी इथल्या जॅपनीज ग्रोसरी स्टोअरलाही मिळाला नाही.

मी शिंजुकुच्या ताज मधे गेलोय...चांगले असते जेवण ......अकासाका मित्सुके (हे म्हणजेच नागाताचो जवळ ना?) च्या इकडचे माहिती होते, पण जाणे झाले नाही...

रसोइ छोटे आहे..पण टेस्ट एकदम झकास्स्च्..काठ्मांडुला गेलो नाही अजुन..आता बाकिचे mexican itaalian पण try करीन..:)
सायो....पास्ता बद्द्ल माहित नव्ह्ते..फुजि मधे जाइन त्यासाठी....

०---------------------------------------०
ये दिल भी अडा है किसी बच्चे के तरहा...
या तो सब कुछ मुझे चाहिये...या तो कुछ भी नही..

सायो- डिट्टो. ते मेगुरो च काठमंडू झक्कास आहे- तिथे तव्याएव्हढा मोठ्ठा फुलका मिळतो आणि अक्षरशः घरचे फोडणीचे वरण.

हो,हो. मी एकदा जॅपनीज मैत्रिणींना घेऊन गेले होते दुपारी जेवायला. त्यात चक्क वरण सूप म्हणून दिलं होतं प्यायला. मला आवडलं पण त्यांना अर्थातच नाही.:(

सेतागाया साईड ला जर कधी आलात (देन्-एन्-तोशी लाइन)..तर साकुरा-शिनमाची एकि जवळच 'सवेरा' म्हणुन एक छोटे इंडियन हॉटेल आहे....जेवणाची टेस्ट खूपच छान आहे...गेल्या १२ वर्षापासुन ते हॉटेल तेथे आहे असे तिथला मॅनेजर सांगत होता....विशेषतः तिथले भारतिय पद्धतिचे माश्याचे पदार्थ जपानी लोकात famous आहेत Happy

०---------------------------------------०
ये दिल भी अडा है किसी बच्चे के तरहा...
या तो सब कुछ मुझे चाहिये...या तो कुछ भी नही..

मला गेलेय असं वाटतंय पण खूप वर्षांपूर्वी. त्यामुळे आठवत नाहीये आत्ता.

मी गेलो आहे मेगुरोला सर्व हाटेलात. त्या ब्रिजजवळच्या हॉटेलात तर वांग्याचे भरीत मिळायचे. Happy

बाकी कॅप्रीचोझा, ढाबा ईंडीया, राजमहाल, म्योदेनच च्युगोकु र्‍योरी, मोंज्यायाकी, दोदोंपा अहाहा Proud बाकी अनेक गोष्टी तुम्ही लिहीलेल्याच आहेत.

~~~~~~~~~~~~
हे बघा. http://www.maayboli.com/node/6108
~~~~~~~~~~~~

त्या रोप्पोंगी राजमहलची एक गम्मत. एकदा चूकून ४ मजल्याऐवजी (राजमहल चा मजला)आमच्या बरोबरच्या एकाने- ३-या मजल्याचे बटन दाबले. उद्वाहक (लिफ्ट साठी शब्द बरोबर आहे ना ?) तिस-या मजल्यावर उघडला, आणि आम्ही सगळे अवाक आणि बेशूद्ध पडायच्या बेतात... !!! तिथे मतदानयोग्य वयाच्या वरच्या(च) लोकांसाठी अ** करमणूकीचा क्लब !!दोन अजस्त्र, महाकाय कृष्णवर्णीय द्वारपाल, आणि मतदानयोग्य वयाच्या वरच्या(च) लोकांना बघायला परवानगी असलेलं एक पोस्टर ;-)- त्या क्लबात स्वागत करण्या साठी सज्ज.

त्या क्लबात स्वागत करण्या साठी सज्ज.>>> Happy

हे हे हे हे.... सह्हीच रैना... मग पुढे काय झाले??... नक्की कुठे गेला Wink
जरा detail पत्ता द्या...राजमहाल चा हो...

०---------------------------------------०
जमले अथवा जमले नाही.. खेद खंत ना मज काही,
अद्रुश्यातिल आदेशांचे ...ओझे फक्त वहाणे...

रैना, Proud
हो, त्या रोप्पोंगीच्या राजमहलला शुक्रवारी संध्याकाळी जायचं म्हणजे संकटच असतं.

केदार, सिझलर ला गेला असशीलच...

हे काय लोकहो, जपानी खादाडी संपली की काय Happy सगळं शांत शांत का आहे Happy

सगळं शांत शांत का आहे ??>>> कारण सगळे जण जपान मधे येउन खूप खादाडी करुन गेलेत आधिच!! Wink
मीच एकटा आहे इकडे असे वाटतेय... Sad

०---------------------------------------०
जमले अथवा जमले नाही.. खेद खंत ना मज काही,
अद्रुश्यातिल आदेशांचे ...ओझे फक्त वहाणे...

>>>>>>मीच एकटा आहे इकडे असे वाटतेय..

म्हणून तर तुला इथे खा, तिथे खा असं सुचवतोय.;)

भारतीय:
सितार - निहोन-अोदैारी (मिनातो मिराई सेन)
सितारा - अाअोयामा २-चोमे (*)
ढाबा - इंडीया - भंपक, त्यंाचेच एक गिंझा मध्ये अाहे, नाव विसरलो ते पण सो...सोच अाहे...परंतु त्यांचे एक स्पेशल रेस्त. अाहे खैबर (*)...हे मात्र चंागले अाहे.

इटालियन:
नाव विसरलो - कावासाकी योदोबाशि च्या रेस्त. मजल्यावर एक अाहे
u.n. कॅफे् अाअोयामा दोरो
नाव विसरलो - शिनागावा प्रिंन्स हॉटेल च्या कॅंपस मध्ये अाहे
साबातिनी - योकोहामा (*)
...

बरीच नाव अाहेत...जपान मध्ये फक्त खाण्याची अावड असणारा पाहिजे...
(* by reservation)

गिरिश, जरा आणखीन स्मरणशक्तीला ताण देऊन रेस्टॉरंट्स ची नावे आठवा व तिथे काय काय मिळतं ते ही लिहा इथे.
इथल्या इंडियन रेस्टॉरंट्स मधल्या त्या टिपिकल मेनूचा (करी व नान सेट) आत्ताच कंटाळा आला.

@outdoors
होय रे होय...अाठवलं पाहिजे ना भावा!
तसे मला अगदी JR / सब-वे स्टेशन मधले सोबा-रामेन चे ढाबे / दर्शन्या पण माहिती अाहेत, पण किती लोकाना त्यात इंटरेस्ट अाहे माहिती नाहि. असो ... विषयंातर नको.

कावासाकिमधल्या त्या इटालियन रेस्त. चे नाव अाहे - इल्-िव्हरोने् (इटलित राहून अालेल्यानी स्पेलिंगची चुक भुल द्यावी-घ्यावी / दुरूस्त करावी)

गिरिश-सान, माझा प्रोफाईल बघण्याची क्रुपा करावी.

आणि मी शाकाहारी असल्याने तुम्हांला तसदी देतेय. नाहीतर जपान म्हणजे जन्नत होती.
तुम्ही हे जे टाईपताय त्यात मधे मधे हे गोल कसले येतायत?

आऊटडोअर्स, कृपा लिहिताना kRupa असं लिही.

मी खुप वर्षान पुर्वि तोकयओ,योकोहामा,किशुकु ला नवर्र्या बरोबर फिरुन आले आहे. नव्ररा मरिन एन्जिनियर होता ना
तेह्वा चायना टाउन अएर्यत एका क्लब मधे कहितरि खादाडि केलि होति. पन खदाडि पेक्शा तिथे डान्स केलेलाच आठवतो. धमाल दिवस होते ते तेह्वा रस्त्यावर्ति अपल्या भेल् पुरि, पनि पुरि सार्खे स्टा ल होते पन खाण महा कठिन .काहि चव नाहि काहि नाहि

अरे शिनागावाच्या देवी बद्दल कोणीच कस लिहिलं नाही ?
छोटेखानी पण चांगली चव असलेलं भारतीय उपाहारगृह.
पुर्वी टो.म.मं. च्या कार्यक्रमाला त्यांच्याकडून जेवण मागवले जात असे.
इस्त्राइली पदार्थ पिटा नावाचा पुर्णपणे शाकाहारी असलेला,
बहुतेक आकासाका मित्सुके जवळ मिळतो.
योत्सुया स्टेशनच्या जवळ एक भारतीय उपाहारगृह आहे (नाव आठवत नाहीये)
तिथे तर चक्क मराठी स्टाईलच्या पोळ्या पण मिळत होत्या.

Pages