जपानमधली खादाडी

Submitted by webmaster on 26 February, 2009 - 01:45

जपानमधे खादाडी, विशेषतः शाकाहारी व्यक्तिंसाठी

विषय: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

महेश, पिटा की फलाफेल? अकासाका मित्सुके जवळ मिळणारं फलाफेल मी खाल्लंय. जरा तिखटसर टोमॅटोची चटणी यायची त्याच्या बरोबर.
शिनागावाच्या, रोप्पोंगीच्या देवी मध्ये मी खाल्लंय ३,४ वेळेला. पण भारतीय जेवणाकरता माझं आवडतं रेस्टॉ. म्हणजे रोप्पोंगीचं राजमहल. त्याला पर्याय नाही.
जपानमध्ये नवीन होतो तेव्हा अकासाकाचं ताज म्हणजे आमचं घरचं होतं दुसरं. विकेंडला सतत जायचो तिथे, नी त्यावेळी पाणीपुरी मिळणारं ते एकमेव ठिकाण. एकदम रॉयल ट्रिटमेंट मिळायची आम्हांला. पण कालांतराने त्याची चव घसरायला लागली नी आमचं जाणं ही कमी झालं तिथे.

सायो, राजमहल ची quality चांगली राहिली नाही आता.. Sad सम्राट बर त्यापेक्षा.
मला शिंजुकु एकिच्या जवळच ताज खुप आवडते.. तिथला बफे पण भारी असतो. देवी पण चांगले आहे.
तरी अजुनही माझे फेवरेट, कामियाचो जवळचे निर्वाणम !! लाजवाब साउथ इंडियन डिशेस

सायो, बरोबर, तिथे फलाफेल पण मिळते.
फलाफेल हा कटलेट सारखा पदार्थ असतो.
कसल्यातरी पिठाच्या कणिकेच्या नान सारख्या जाडसर पोळ्या लाटतात.
त्याचा पिशवीसारखा आकार करून त्यात ते फलाफेल ठेवून देतात.
या प्रकाराला पिटा म्हणतात.

मला आवडलेली उपाहारगृहे,
ढाबा इंडिया, क्योऊबाशी, टोकियो स्टेशन पासुन पण चालत जवळ आहे. (तमिळ किंवा आंध्र स्टाईल)
(कोण ते ढाबा इंडियाला नावे ठेवत होते रे ...)
राजमहल, गिंझा (पंजाबी)
देवी, शिनागावा (पंजाबी)
निर्वाणम, कामियाच्योऊ (खास केरला स्टाईल)

निईगाता मधला खादाडीचा किस्सा सवडीने लिहिन.

निर्वाणमला आमचं जाणं झालंच नाही. टोकयो च्या ढाबाला गेलेलो चिक्कारवेळा. चव म्हणजे तुका म्हणे त्यातल्यात्यात.
मेगुरो स्टेशनजवळचं रसोई पण आवडतं आमचं.

मला तरी ढाबा मधे रात्रीच्या जेवणातला भात, सांबार, रसम हे खुपच आवडत होते.
आत्ता सुद्धा लिहिताना चव आठवत आहे. २००० येन मधे अमर्यादित भात, सांबार, रसम...
मेगुरोला काठमांडू माहित नाही, पण माया नावाचे नेपाळी उपाहारगृह होते,
तिकडे पण फुलके छान मिळायचे.
छ हा हिंदी छ प्रमाणे का लिहिला जात आहे ?

sadhya mi ANA Intercontinental madhye rahaat aahe, javalapass konate changale indian restaurant saanga. gelya 2 divasaat mi Swagat aani Taj try kele aahe. Ajun konate aahe ka?

North Indian jevan kahi zepale nahi, south indian kuth milel?

Ajun 2 weeks aahe mi ethe.

मद्या, ANA Intercontinental कुठे आले नेमके.. ?
http://bento.com/tokyofood.html
या लिंक वर जवळ्-जवळ सगळे इंडियन हॉटेल्स चे पत्ते मिळतील

निर्वाणम, ढाबा इंडिया साउथ इंडियन डिशेस साठी मस्त आहेत

kedar,
below is the address:
ANA InterContinental Tokyo
1-12-33, Akasaka, Minato-ku, Tokyo 107-0052, Japan
TEL: +81-3-3505-1111 +81-3-3505-1111 / Fax: +81-3-3505-1155

ओह्ह आले लक्षात Happy , तेथुन नागाताचो आणि आकासाका-मित्सुके फार जवळ आहेत स्टेशन्स.
तुम्ही मग ढाबा-इंडिया ला जावा.. क्योबाशी स्टेशन - गिंझा लाइन- Exit 5 च्या जवळ..

आकासाका-मित्सुके वरुनच गिंझा लाइन मिळेल तुम्ह्लाला.. इकडे ट्रेन्स चे रुट्स बघा.
http://www.jorudan.co.jp/english/norikae/e-norikeyin.html

hi Kedar, thanks.
Tu kolhapur cha aahes kaay?

thanks for the info, hya 1/2 divasaat javun yeyin tikade.

hoy, mi pan kolhapur chach aahe.
tumhi vagaire mhanun nako, ekdam mhatara zalyasarakhe watate.

mi shivaji pethet rahato. narake wadhyachya shejari.

ethe officechya kamasathi aaloy 2 weeks. 23 la parat jayin.

अरे वा.. सहीच.. पेठतल का ?
मी ताराबाइ पुतळ्याजवळ.. शिवाजी पार्क मधे.. आणि जॉब कुठे पुण्यात का ?

job Standard Chartered Bank, Singapore. Gele 9 yrs Singapore madhye aahe.

Sadhya Sanno Park chya SCB office madhye aaloy.

gelya 1 week madhye mi Roppongi chya javal Swagat, Taj, Moti, Devi aani Kyobashi chya Dhaba India la jevun alo.

Naan kuthehi changala milat nahi. Rice, basmati ghetala tarach changala asato nahi tar japenese rice khava lagato.

जपानी पदार्थ चाखून पाहिले का काही ? शाकाहारी असाल तर शक्यतो त्या वाटेला जाऊ नका.
कारण शाकाहारी म्हणून मिळणार्‍या गोष्टी सुद्धा अनेक वेळा १००% शाकाहारी नसतात.

ओ महेश. कशाला घाबरवताय त्यांना ? नायतर ओकीनावा सारखं कारलं आणि टोमॅटो खाऊन रहाचीच वेळ येईल Proud

तुम्ही महेश पिंपरीकरच ना (मी एवढ्या सलगीने म्हणूनच सांगीतलं, नसाल तर सॉरी हाँ)

रैना, मी महेश पिंपरीकरच Happy
तसेही मद्या यांचा मुक्काम फक्त दोन आठवडे एवढाच आहे.
त्यामुळे ते घाबरणार नाहीत.

नवीन नवीन असताना आम्ही कप नूडल्स कित्ती आवडीने खायचो. पॅकवर लिहिलेलं काहीही वाचता यायचं नाही म्हणून बरं. एकदा ह्यात बीफ असतं कळल्यावर बंद झालं खाणं. थंडीत गरमागरम रामेन खायला जायचो. मिसो रामेनमध्ये आपण मीट नको म्हटलंय म्हणजे काहीच नॉनव्हेज नाही हा गैरसमज होता तो एक दिवस पिंपात टाकलेले पोर्कचे तुकडे/स्टॉक आमच्या रामेनमध्ये घालताना बघितल्यावर दूर झाला.:फिदी: नंतर ही खावंसं वाटायचं पण जिवावर यायचं.
आत्ताही मिसो सूपमध्ये फिश आअहे हे माहित असूनही मी आवडीने पिते हीच काय ती माझी इतकी वर्ष तिथे राहून झालेली प्रगती. Wink

...

माद्या ढाबा इंडिया कसे वाटले ? नान पेक्षा पराठा- रोटी वैगेरे ट्राय करा.. आणि डिनर सेट पेक्षा, रोटी आणि भाजी वैगेरे separate Order करा.. डिनर सेट मधली टेस्ट एवढी चांगली नसते..

महेश बरोबर आहे.. मी तर निकु आणि साकाना (मटण आणि मासे) च्या कांजी लक्षात ठेवल्यात.. पण एकदा चिप्स मधे पोर्क ऑइल वापरले होते Sad
काही इलाज नाही त्याला...

mi baher faarase try karat nahi, aapalyala bhat aamati milali ki panch pakkvaannasarakhe aahe.

kedar, dhaba india changale watale, pan last weekend la kofu la mitrakade gelo hoto tevha assal kolhapuri jevun aalo, tyamule ajun 1 week kadhu shaken ethe.

stay ajun 1 week wadhala aahe. 26 tarakhelaa SGP la parat janar aahe.

Monday la Nagano la javun yenar, tevadhach bullet train cha expr.

हो. जपानच्या आवडत्या रेस्टॉरंट्सची, ट्रेन्सची, मित्र मैत्रिणींची जास्त करुन...
नशिबाने आमच्या तिथल्या मित्र मंडळापैकी ४,५ फॅमिलीज इथे न्यू जर्सीत आहेत. त्यामुळे मजा आहे.
रैना, कारुईझावाला निकोस व्हिलेज कारुईझावा ह्या लॉग व्हिलेजला गेली आहेस? सुंदर जागा. एकदा गेलीस की परत परत जात रहाशील.

जपान सोडण्यापूर्वी ह्या सर्व हॉटेल्सना भेट द्यायची खूप इच्छा होती. पण छे, राहूनच गेलं. कायम रुखरुख राहाणार त्याची. योकोहामाहून ऑल द वे टोकयो ला जेवायला जायला नाही जमलं.

ढाबा इंडिया ला जायचा योग आला होता. पण आमची कामं आवरून जाईपर्यंत त्यांची वेळ संपली होती.

फालाफेल मधे अबु-धाबी ला अस्सल लेबनीज रेस्टॉरंट मध्ये खाल्ले. एकदम मस्त. खबूस ग्रीक सलाड आणि गार्लिक स्प्रेड बरोबर खायचे. अहाहा.....

कारूईझावा , ह्म्म्म्म्म्म्म,
अनेक वर्षे राहूनही अनेक ठिकाणी जायचे राहिले आहे. Sad
आता जेव्हा आमच्या त्या लाडक्या कर्मभुमीत पुन्हा जायचा योग येईल,
तेव्हा उर्वरीत ठिकाणे पहाणे होईल.

नाही गं सायो. तिथे नाही गेले. आता कधी योग येईल तेव्हा पाहु.
केपी कसा आला नाही अजून आपल्यासारखे उसासे ढाळत ?

माझं युकीमात्सुरीही राहिलं आहे. आणि क्युशु. Sad

Pages