द सिक्रेट- नवीन अंधश्रद्धा ?

Submitted by बावरा मन on 2 December, 2014 - 05:30

अंधश्रद्धा या सर्व समाजांमध्ये कमी अधिक प्रमाणात आढळतात . म्हणजे भारत हा साप -हत्ती चा आणि मागासलेला देश आहे असे मानणाऱ्या युरोपिअन देशांमध्ये आणि अमेरिकेमध्ये पण अंधश्रद्धा भरभरून आढळतात . भारतात भानामती आणि अंगात येणे वैगेरे प्रकार होत असतील तर गोऱ्या लोकांमध्ये उडत्या तबकड्या , परग्रहवासी आणि dooms day वैगेरे विज्ञानाचा मुलांमा दिलेल्या अंधश्रद्धा जोरात आहेत . याचा एक दणकून पुरावा म्हणजे २१ नोव्हे . २०१२ च्या निमित्ताने उडालेला धुरळा . जग आता नष्ट होणार म्हणून अनेक लोकांची पळापळ सुरु झाली होती . शेवटी नासा ला मध्ये पडून हे धादांत खोटे आहे असे निवेदन द्यावे लागले होते . तरी पण तो दिवस उलटे पर्यंत अनेक लोकांनी आपले 'जिझस ' पाण्यात बुडवून ठेवले होते . तर सांगायचा मुद्दा हा कि खरच अंधश्रद्धा या बाबतीत खरच 'काळ -गोर ' (No pun intended ) करता येत नाही .

मला 'द सिक्रेट ' या प्रकरणाचा शोध 'चित्रलेखा ' मासिक वाचताना लागला . चित्रलेखाने चक्क या विषयावर कवर स्टोरी केली होती . काय आहे हे प्रकरण ? Rhonda Byrne या लेखिकेने हे पुस्तक लिहिले आहे . याच विषयावर एक फिल्म पण आहे . तू नळी वर तिचा काही भाग उपलब्ध आहे . तर या पुस्तकात Rhonda ने एक नियम मांडला . 'The Law of Attraction ' (आकर्षणाचा नियम ?). Rhonda च्या मते हा नियम फ़क़्त काही ठराविक लोकांनाच माहित होता . यात मोठमोठे महाराजे , कलाकार , सेनानी आणि मानवी इतिहासाला वळण देणार्या व्यक्तींचा समावेश होता . पण Rhonda च्या मते हा मानवी जीवनाला वेगळे वळण देणारा आणि मानवाच्या सगळ्या आशा आंकाक्षा पूर्ण करणारा नियम तिला सर्वसामान्य लोकांपर्यंत पोहोचवायचा आहे म्हणून तिने हे पुस्तक लिहिले होते . हा The Law of Attraction 'असे सांगतो कि माणूस हा सकारात्मक विचारांच्या मदतीने आपल्याला पाहिजे ते म्हणजे भरपूर संपत्ती , प्रेम , सुदृढ तब्येत वैगेरे मिळवू शकतो . वर वर तर हे विधान /नियम निरुपद्रवी आणि खर वाटू शकत . पण ग्यानबाची मेख अशी आहे कि या नियमाला पूर्ण पुस्तकात वैज्ञानिक नियमांचं अधिष्ठान देण्याचा जोरदार प्रयत्न केला आहे . त्यासाठी Placebo Effect च्या मागचे कार्यकारण भाव आणि Quantum Physics चे नियम याचे दाखले देण्यात आले आहेत . म्हणजे एका साध्या नियमाला तो एक त्रिकालाबाधित नियम आहे असे सिद्ध करण्याचा खटाटोप . म्हणजे या पुस्तकात वजन कसे कमी करावे किंवा घातक रोगांपासून The Law of Attraction ' वापरून मुक्ती कशी मिळवावी यावर वेगळे प्रकरण आहे . त्यावर अनेक तज्ञांनी टीका केली . म्हणजे सकारात्मक विचार करणे हि चांगली गोष्ट आहे पण दुर्धर रोगाच्या शेवटच्या टप्प्यात असणारा माणूस The Law of Attraction ' वापरून बरा होऊ शकतो का ? अनेक वैज्ञानिक आणि Medical Experts नी हे पुस्तक रुग्णांना आणि त्यांच्या नातेवाईक याना खोटी आशा लावते अशी टीका केली आहे .

साहजिकच या पुस्तकावर आणि The Law of Attraction ' वर टीकेची राळ उडाली . अनेक लोकांनी यावर टीका केली आहे कि या नियमावर विसंबून राहणारे आणि प्रत्येक समस्येवर 'Instant Solution ' शोधू पाहणारे लोक आपल्या आयुष्यातील समस्येच्या root cause पर्यंत जाण्याच टाळतात आणि हे त्यांच्यासाठी धोकादायक आहे .आता या पुस्तकातल्या Quantum Physics च्या दाखल्या बद्दल Rhonda Byrne ने विज्ञान या विषयाचा कधी अभ्यास पण केला नव्हता . तरी पण तिच्या दाव्यानुसार The Law of Attraction ' वापरून अतिशय क्लिष्ट अशा Quantum Physics चे नियम समजून घेतले . तिच्या या दाव्यावर सडकून टीका होणारच होती आणि तशी ती झाली देखील .

शिवाय आपल्यासोबत घडणारया सर्व वाईट घटना आपणच नकारात्मक विचार करून आपल्याकडे आकर्षित करून घेतो हा The Law of Attraction चा व्यत्यास पण तितकाच धोकादायक . म्हणजे दिल्ली बलात्कार प्रकरणातील बलात्कारित मुलीने नकारात्मक विचार करून तो बलात्कार ओढवून घेतला होता का ? किंवा लातूर मध्ये झालेल्या भूकंपात मरण पावलेल्या किंवा सर्वस्व गमावलेल्या लोकांनी हा भूकंप नकारात्मक विचार करून घडवून आणला होता का ? साहजिकच victim असणाऱ्याला दोषीच्या पिंजर्यात हा नियम उभा करतो .

पाश्चात्य लोकांकडून आलेलं सगळ भारी अस मानून चालणार्या आपल्याकडे पण या पुस्तकाचा खप चिक्कार वाढला आहे . माझे काही मित्र पण यात आले . ते कायम आम्ही सध्या किती आनंदी आहोत आणि सकारात्मक आहोत हे दाखवत असतात आणि कुठलाही प्रश्न शेयर करायला गेल कि Think Positive ' चा डोक्यात जाणारा सल्ला देतात . इतकेच नाही तर आम्ही द सिक्रेट वाचल आहे हे status of symbol समजणाऱ्या लोकांचा संप्रदाय आपल्याकडे पण मोठ्या प्रमाणावर वाढला आहे . अनेक बापू -महाराज -साध्वी यांचे संप्रदाय कमी होते कि काय म्हणून यात या नवीन cult ची भर . आता तर The Law of Attraction चे दाखले अनेक महाराज लोक पण आपल्या प्रवचनात द्यायला लागले आहेत . हा नियम वापरून प्रबोधन करणार्या Motivational Speakers चे तांडे पण तैयार झाले आहेत . हो आणि ते Speakers आपल्या प्रबोधनासाठी भरभक्कम फी आकारतात . The Law of Attraction वापरून पैसे
कमवत नाहीत . यालाच विरोधाभास म्हणतात कि काय ?

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

सध्या मी हे पुस्तक वाचत आहे..अजुन पुर्ण वाचुन झालं नाहीये..
मला अगदी आवडतय हे.. माझ्या तरी चित्तवृत्तीत सकारात्मक फरक पडलाय...

पण मुळात कोणतीही बरी गोष्ट वाचताना,ऐकताना, बघताना तारतम्य वापरलं तर काही ना काही घेण्याजोगं , शिकण्याजोगं मिळुच शकतं...

आणि आहारीच जायचं असेल तर जग फसवायलाच बसलयं..

जर एखादा चिप्स खात, लोळत, व्यायाम न करता हे पुस्तक वाचत , माझं वजन कमी व्हावं, अशी अपेक्षा करत असेल, तर त्या माणसाबद्द्ल काय बोलु? हा माझ्या दृष्टीने कॉमन सेन्स आहे ..आणि हा सेन्स प्रत्येकाने आपापल्या विवेक बुद्धीने वापरला तर हे पुस्तक छान आहे असं मला वाटतं..

सीडी पाहिली आहे.
काय ग्रेट आहे ते कळालं नाही.

ह्या सिक्रेट मध्ये जे आहे तेच हॅप्पी थॉटस वाले सरश्री गुरु तेजग्यान (नाव कन्फर्म करा, मला आठवत नाही.) सांगत होते. तेच एका चित्रपटात डायलॉगच्या स्वरुपात आलय.
असो.

नेहमी पॉजिटिव्ह विचार करुयात असा फायनल मेसेज घेता येइल फारतर.

माझ्या मते खरचं ग्रेट म्हणावं अशा फार कमी गोष्टी असतात..
कोणत्याही माणसासाठी जी गोष्ट त्याच्या आचार, विचार, कुवत, कृती, आचरण याच्या पलिकडे आहे ती ग्रेट...

त्यामुळे या पुस्तकातही काय ग्रेट आहे? काही आहे का? माहीत नाही..

पण आपल्या जगण्याच्या फ़ाईट्मधे काही गोष्टीत आपल्यात निगेटिविटी येते.. ते मळभ या पुस्तकाने काही अंशी नक्की दुर होऊ शकेल..

सकारात्मक विचार करा हि शिकवणूक आपल्या अनेक संतांनी पण दिली आहे . इतर अनेक पुस्तकात पण हे येउन गेले आहे . प्रश्न तिथे सुरु होतो जिथे त्याला काहीतरी चमत्काराचे गुण लावून वर त्याला वैज्ञानिक नियमांचं अधिष्ठान देण्याचा प्रयत्न होतो .

पॉझिटिव्ह विचार करा असं आपल्याला युगानुयुगे सांगण्यात आलं आहे. तोच विचार पुस्तकात मांडला आहे. पुन्हा पुन्हा हॅमर करतो आपण आपल्यावर तो विचार (वाचताना)

पुस्तकं वाचून आयुष्य किंवा विचार प्रणाली बदल ते यावर माझा विश्वास नाही. Sad (दुर्दैवाने)

ह्या सिक्रेट मध्ये जे आहे तेच हॅप्पी थॉटस वाले सरश्री गुरु तेजग्यान (नाव कन्फर्म करा, मला आठवत नाही.) सांगत होते. + १ यावर एक पुस्तकही उपलब्ध ही त्यांच्याच नावाने हॅप्पी थॉटसच्या पुस्तकांच्या यादीत आहे.

नकारात्मक विचार आला की फुली मारा इ. अशी सोप्पी विचारधारा या पुस्तकात आहे. पुस्तक मराठीतुन अनुवादीत आहे. नाव : विचारांचे सामर्थ्य पण रोग बरे होतील इ अतिरेकी सिध्दांत हे पुस्तक मांडत नाही.

दक्षिणा,

पुस्तकं वाचून आयुष्य किंवा विचार प्रणाली बदल ते यावर माझा विश्वास नाही. अरेरे (दुर्दैवाने) एखादा सामान्य विचार घेऊन स्वतः प्रयत्न करुन पहावा.

पायलट प्रोजेक्ट कॉन्फीडन्स बिल्डींग साठीच असतात.

मला या पुस्तक्/मुव्हीतून एक कळले, की आपण सपोज लॉ ऑफ अ‍ॅट्रॅक्शनवर विश्वास ठेवला, तर आपण जास्तीत जास्त पॉझिटीव्ह विचार करू. आणि हळुहळु त्या गोष्टीचा ध्यास लागून आपणच त्यादृष्टीने जास्त कष्ट घेतो. थोडक्यात सगळं आपणच करतो. भरपूर पॉझिटीव्ह थिंकिंग, मग त्यामुळे येणारे ती अमुक गोष्ट मिळवण्याचे ऑब्सेशन (चांगल्या अर्थाने), मग त्यासाठी कष्ट, विलपॉवर वाढते.. बर्‍याचदा आपल्याला यश मिळतेच हे केले की.

पण मूळात लॉ ऑफ अ‍ॅट्रॅक्शन या॑ कन्सेप्टचा लिटरली अर्थ घेणे मला धोकादायक वाटते, जसे तुम्ही म्हणता ती अंधश्रद्धाच आहे. पण नुसता असा विचार केला की काहीही झाले तरीजर आपण डिरेक्टली आपल्याला जे अपेक्षित आहे त्या गोष्टी इमॅजिन केल्या की कष्ट करायला बळ मिळते. दॅट्स इट. मग निगेटीव्ह विचार आला म्हणून चपापणे वगैरे होत असेल तर ती अंधश्रद्धा. Happy

अगदी डेथबेडवर असलेल्या व्यक्ती नाही परंतू कॅन्सर वगैरे आजारांशी लढताना विलपॉवर व पॉझिटीव्ह थिंकिंगचा खूप हातभार असतो रिकव्हरी मध्ये हे मी बर्‍याचदा वाचले आहे.

बावरा मन तुझी शैली, तुझे शब्द, वाक्यरचना खूप छान लिहिता तुम्ही.

बी पॉझिटिव्हचा सल्ला हल्ली कुणीही देत राहतो. पण हे दरवेळी जमतच अस नाही.

मला द सिक्रेट खुप आवडते. सकारात्मक विचारप्रवृत्ती वाढली आहे. वैयक्तिक आयुष्यात खुप फायदा झालाय याचा.

माझ्या एका मैत्रिणिने मला या पुस्तकाबद्दल सांगितले होते. ती माझ्या बरोबर बी.कॉम ला होती. नंतर कित्येक वर्षांनी भेटली. तिने कॉलेज मध्ये असताना सीए करायला सुरुवात केली पण graduation नंतर इंटरचा एक ग्रुप क्लिअर केल्यावर काही पेपर लगेच क्लिअर झाले नाहीत. मध्येच लग्न झाले. २ मुले झाली. नोकरी तर सुरूच होती. त्यामुळे सीए राहून गेले. कालांतराने इतर परिचित उच्चशिक्शित झालेले पाहून हिला वाईट वाटे. म्हणुन नवर्याने नोकरी सोडुन सीए सुरु कर असे सांगितले. हिने नोकरी सोडली, अभ्यास सुरू केला, क्लास लावला. पण क्लासमधली इतर मुले वयाने खुपच कमि असल्याने हिच्याशी नीट वागत नसत आणि पाठिमागुन टिंगल टवाळी करत. त्यावेळि एक मध्यमवयीन स्त्री क्लासमध्ये येऊ लागली. तीने व्हिआरएस घेतली होती आणि सीए कम्ल्पिट करावे अशी तिचि खुप इच्छा होती. परिणामी या दोघिंची मैत्री झालि. त्या स्त्रीने माझ्य मैत्रीणिला हे पुस्तक दिले. ते पुस्तक वाचुन माझी मत्रिण इतकी प्रभावी झाली की, तिने झपाटून अभ्यास केला आणि भराभर सर्व पेपर क्लिअर केले.

तो अखेर वैतागून म्हणाला,
"भाईसाहब आप ये हमेशा बी पॉजिटीव्ह, बी पॉजिटीव्ह कहते रहते है.. क्या है ये बी पॉजिटीव्ह??"

"ब्लड ग्रूप है यार मेरा.." भाईसाहब साळसूदपणे उत्तरले. Happy

संदर्भ - इश्क दि गली विच नो एंट्री.
...

बाकी हे असले फंडे वर्क करतात हे तर नक्कीच. फक्त आचरणात कोण किती आणते यावर अवलंबून. आणि त्यासाठी यावर विश्वास हवा.
देवाचे दुकान सुद्धा त्याच्यावरच्या श्रद्धेवरच चालते. मी नास्तिक असलो तरी माझ्यामते देव हि संकल्पनाही फायद्याचीच आहे. देव चांगल्या माणसांचे चांगलेच करतो हा सकारात्मक विचार त्यातून येतो.

घरून जमल्यास अजून लिहेन..

मी हे पुस्तक वा त्याबद्दल काहीही वाचलेले नाही.
मात्र "सकारात्मक द्रुष्टिकोन" याचा फायदा होतोच होतो असे अनुभवास आहे.
मात्र वर काही दुर्घटनांची उदाहरणे देऊन शन्का व्यक्त केलीये. तशा शन्केची गरज नाही, कारण मुळात सकारात्मक दृष्टीकोन हा "मी काय घडवणार/घडवू इच्छितो" याचेशी संबधित आहे, व त्या संदर्भात प्रतिसादात्मक मला दुसर्‍यांकडून काय अपेक्षित आहे त्याबद्दल आहे. या सर्वांचा संबंध वैयक्तिक मानसिक क्षमता व इच्छाशक्तिशीही आहे, जी प्रत्येकात अर्थातच भिन्न असते व त्यानुसार त्यास फळे मिळतात.
(इथे हे उदाहरण लागू पडेल वा नाही कळत नाही, पण दिल्लीत वाघाच्या पिंजर्‍यात पडलेल्या दुर्दैवी व्यक्तीचे व्हिडीओ जसे फिरले तसेच लगेचच आमटे यांचे जंगली प्राण्यांबरोबरचे (सहज वावरतानाचे) व्हिडीओही फिरले, मला वाटते की त्या त्या परिस्थितीतील या व्यक्तिंचा दृष्टीकोन, व त्यात "सकारात्मक" कोणता, हे समजायला कदाचित हे उदाहरण सुयोग्य ठरेल - कदाचिन्.या उदाहरणांबाबत मी चूकतही असेन.)
बाकी काही नाही, पण "भित्यापाठी ब्रह्मराक्षस" येवढी म्हण लक्षात घेऊन कुठेही न भिता, व स्वतः करीत असलेल्या/करु इच्छित असलेल्या नैतिकदृष्ट्या योग्य कृतीवर पूर्ण निष्ठा ठेवून कार्य करीत रहावे, इतके जरी कळले अन वळले तरी पुरेसे आहे.

....

tejgyan foundation che book "vicharniyam " aahe.book kharach chan aahe tyat cd pan aahe. me tejgyan chya seminar la pan jate book pan wachte ...chan aahet life madhe problem simple kase karavet ani solve karave he kalte...sorry for english...type from Mobile ...

भारतात भानामती आणि अंगात येणे वैगेरे प्रकार होत असतील तर गोऱ्या लोकांमध्ये उडत्या तबकड्या , परग्रहवासी आणि dooms day वैगेरे विज्ञानाचा मुलांमा दिलेल्या अंधश्रद्धा जोरात आहेत

yachyawar ek akkha discussion hou shakto... Aliens ... ase mhantat ki pruthwi aani hi sour mala tyani create keliy.. Ancient alien navachi ek discovery war malika aahe tumhi nakki bagha... as per them ... pyramids ... tasech aaple dev aani akashatla swarg wagaire aliens ... mandire mhanje tyanchyashi communicate karnyache thikan.. .

आपल्या संत वांग्मयामध्ये सुद्धा अश्या प्रकारचे दाखले आहेत

मन करा रे प्रसन्न सर्व सिद्धीचे कारण - तुकाराम महाराज
मनोजात् म जगत्सर्वम मनोजातं जगत्पती: - वैदिक वांग्मय

मी काही सिक्रेट पुस्तक वाचले नाही आणि माझ्या तर्कशुद्ध मनाला ते झेपणार नाही. वरचा लेखसुद्धा मी धडसा वाचला नाहीय पण कालच ह्या सिक्रेटचा अनुभव आला आणि हा धागा वरती आला म्हणून लिहितेय...
२" x ३" च्या बाल्कनीच्या तुकड्यात माझ्या आईने ५ छोट्या कुंड्यात सतराशे साठ झाडं लावली आहेत. आणि तिच्या दृष्टीने बागकाम म्हणजे दिवसातून दोन वेळा पाणी घालणे. गेल्या १० वर्षात तिने माती साधी वरखाली पण नाही केलीय, नवी माती आणणे तर दूरच! लिंबू, तुळस, गुलबक्षी, खजूर आणि काय काय त्या कुंड्यांत भरलय... अशा परिस्थितीत गेल्या वर्षी माझ्या वहिनीने ब्रह्मकमळ आणले तेव्हा मी म्हटले "वेडे आहात का? ह्या असल्या कुंड्यांत त्याला कधीच फुल यायचे नाही."
पण दोघींनाही पूर्ण खात्री होती. आणि काल खरच एक कळी आलीय!!
काय म्हणावं याला?!! Uhoh

खूप छान लिहिलय. " भारतात भानामती आणि अंगात येणे वैगेरे प्रकार होत असतील तर गोऱ्या लोकांमध्ये उडत्या तबकड्या , परग्रहवासी आणि dooms day वैगेरे विज्ञानाचा मुलांमा दिलेल्या अंधश्रद्धा जोरात आहेत ." हे अगदी खरंय.

द सीक्रेट मी अज़ून वाचले नही आहे त्यामुळे त्यावर मला काही कमेंट करता येणार नाही. तरीही law of attraction च्या थियरी मधे तोड़फार तरी तत्य्थ असेल असे मला वाटतय. आजारी माणसाला डॉक्टर सांगतात नं, की आनन्दी रहा, पॉज़िटिव राहा म्हणजे लवकर बरे व्हाल.

मी CD वर "the secret" चित्रपट पाहिला आहे. त्यातले सगळे काही एकदम जसेच्या तसे आणि शब्दश: घेतले तर आपल्याला ती अंधश्रद्धा वाटते. अन्यथा ते खूप चांगले पुस्तक/कल्पना/चित्रपट आहे. अमलात आणण्याजोगा आहे.

लेखकानुसार Rhonda च्या मते हा नियम फ़क़्त काही ठराविक लोकांनाच माहित होता . यात मोठमोठे महाराजे , कलाकार , सेनानी आणि मानवी इतिहासाला वळण देणार्या व्यक्तींचा समावेश होता .

मला वरील गोष्टीवर काही सांगायचे आहे:
माझ्या मते वरील वाक्य बरोबर आहे. निदान त्या काळात तरी, जो काळ चित्रपटात वापरलाय. एखादा कारखान्यातला सामान्य कामगार, नोकरदार वर्ग हा रोजच्या एका ठराविक साचेबद्ध आयुष्यापलीकडे काहीही विचार करत नाही/नव्हता. कारण दोन वेळेची भाकरी मिळवणे यातच त्यांचा वेळा जातो. पुस्तके वाचणे, Management चे काही नियम अमलात आणणे आणि इतर लोकांवर प्रभुत्व गाजवणे याचे कसब ठराविक लोकाना माहिती होते. (उदा: पूर्वीच्या काळी राजा किंवा आता एखाद्या कंपनीचा CEO). एखाद्या कंपनीचा मालक, नेता वगैरे याना लोकाना आपल्यानुसार वाकवून घेण्याचे कसब माहित होते. उदाहरणार्थ- एखादा सेल्समन नवीन शिकतो तेव्हा त्याला काय शिकवले जाते? Body language चा अभ्यास करून आपले product समोरच्या सामान्य ग्राहकाच्या माथी कसे मारायचे! सामान्य माणूस फसतो. तेच कसब सामान्य माणसाने जर का समजा शिकले तर ते सुद्धा असे salesman ला बळी पडणार नाहित.

थोडक्यात सगळे शब्दश: न घेता त्याचा मतितार्थ समजला तर ते बरोबर वाटेल.
"the secret" मध्ये असे नाही म्हटलेय की फक्त positive thinking तुम्हाला हवे ते मिळवून देईल.
त्यात त्यांनी "जाणीव/feeling/भावना" ला महत्व दिले आहे.
positive feeling मनापासून आल्याशिवाय positive thinking चा असर होत नाही.
आणि positive feeling येण्यासाठी तसे "visualization" किंवा "imagination" करणे आवश्यक आहे.

आपण आपल्या ध्येयाबद्दल आपण positive "feel" आणि "imagine" करायला लागलो की त्या दृष्टीकोनातून आपले प्रयत्न मनापासून आणि एकाग्रतेने सुरु होतात आणि आपण एकाग्रतेने पर्यंत केल्यास "खरोखरच" इतर जगाकडून पण त्या ध्येयाच्या च्या पूर्तीसाठी सकारात्मक प्रतिसाद मिळतो.
त्यांनी चित्रपटात दिलेले एका लेखकाचे उदाहरण अगदी या संदर्भातले योग्य उदाहरण आहे. (Jack Canfield - चीकन सूप पुस्तक मालिकेचा एक सह-लेखक): "जेव्हा तो ध्येयाबद्दल सकारात्मक "feel" करायला लागतो तेव्हा त्याला एका mall मध्ये त्याला मासिक दिसतात आणि एका समारंभात त्याला एक lady भेटते जी त्याला त्याच्या पुस्तकाच्या प्रकाशनाचा मार्ग दाखवते..."

वेळ मर्यादा असल्याने जास्त लिहिणे आता जमणार नाही. पण एक अजून सांगावेसे वाटते:

चित्रपटाच्या शेवटी त्यांनी कबुल सुद्धा केले आहे की law of attraction मुळे सगळेच लोक CEO, श्रीमंत, राजे का होत नाहीत? तर प्रत्येकाची जीवनात गरज आणि priority वेगळी असते. त्यानुसार ते बनू शकतात. प्रत्येकालाच फक्त पैसाच थोडाच हवा असतो? प्रत्येकालाच राजा (CEO) व्हायचे नसते.

आणि भूकंप वगैरे नैसर्गिक आपत्ती या मानवाच्या नियंत्रणाच्या बाहेरच्या आहेत. त्याला law of attraction" लावणे हास्यास्पद आणि अतिशयोक्ती आहे.

एक लक्षात घ्या:
law of attraction हा मानवांच्या एकमेका संदर्भातील वागणूक, संवाद या संदर्भात परिणाम करतो, असे मला वाटते. मला "the secret" चित्रपट जितका समजला आहे त्यानुसार मी माझी मतं मांडली आहेत. माझे गृहितकं चुकलेही असू शकतात.

माझा झालेला पोपटः

मिसळपाववर एका सदस्याने "द सीक्रेट" नावाच्या पुस्तकाची कथा लिहीली होती त्यात काँम्पुटर क्षेत्राशी निगडीत अशी मस्तपैकी रहस्यकथा होती, तेच नाव लक्षात ठेवुन मी पुस्तक शोधले आणी जास्त चौकशी न करता ऑर्डर केले.
इतर पुस्तकांबरोबर हे आले तेव्हा वाचायला उघडले, हे राम ४ पानांच्या वर अजुनही वाचु शकलो नाही.
नाही म्हणायला बांधणी, कागद, पोत, रंग, डिझाइन एकदम भारी आहे आणी तुमच्या सारख्या हे पुस्तक वाचणार्‍या सुजाण लोकांसमोर भाव खायला सुद्धा.
पुन्हा ते मी कधी उघडेन माहित नाही ?
मायबोलीवर "ओरिजनल आयडींनी न कुरकुरता न भांडता केलेली अतिशय माहितीपुर्ण चर्चा" व्हायला हवी असा विचार मनात धरुन पुस्तकाबरहुकुम करुन पाहिले तर यश मिळेल काय ?.......वाटल्यास उघडतो मग आजच !

मी ४ वर्षा आधी वाचले आणि त्या दिवसापासून आयुष्य बदलले हवं तर तुम्ही मला मूर्ख म्हणा हरकत नाही पण माझ्या आयुष्यात खूप सकारात्मक फरक पडला. त्यानंतर मी जाणीवपूर्वक काही प्रयोग करून पहिले अगदी अशक्य वाटाव्या अश्या काही बाबतीत आणि ते सर्व यशस्वी सुद्धा झाले. आज मी अगदी छोट्या छोट्या गोष्टींपासून ते आयुष्यात हव्या त्या मोठ्या गोष्टींसाठी सुद्धा LOA चा उपयोग करते. हा फोर्मुला वापरूनच मी आयुष्याच्या २६ व्या वर्षी स्वतःच्या भरवशावर २BHK flat घेतला. या Flat च्या बाबतीत सुद्धा विश्वास बसणार नाही असे योगायोग आहेत. आता नवी घेतलेली गाडी त्याची नंबर प्लेट मला हवा होता तोच नंबर मिळाला. या व्यतिरिक्त तुम्हाला अचंभित करतील असे ४ वर्षापासून अनेकानेक उदाहरण आहेत माझ्याकडे आज मी करत असलेली नौकरी, गाडी हे सगळं मी दहा वर्षाआधी जे स्वप्न पाहिलं होतं तसंच आहे. हे सगळेच्या सगळे योगायोग असू शकत नाही … कुणी काहीही म्हणू देत मला LOA (Law of Attraction) वर प्रचंड विश्वास आहे.

Pages