७००० किमी, १८ दिवस, ७ राज्ये आणि लेह-लदाख - खार्दुंगला पास

Submitted by मनोज. on 4 October, 2016 - 07:17

************************

भाग १ - तयारी

भाग २ - पुणे ते रोहतक

भाग ३ - पानिपत

भाग ४ - चंदिगड आणि मनाली

भाग ५ - रोहतांग आणि केलाँग

भाग ६ - केलाँग ते कारू

भाग ७ - लेह शहर आणि BRO

भाग ८ - पँगाँग लेक

************************

पँगाँग लेक बघून लेह ला दुपारीच पोहोचल्याने लेह शहरात शॉपींग करणे आणि खादाडी करत फिरणे यामध्ये वेळ घालवला. लेह मध्ये प्रचंड प्रमाणात आर्मीचे भाऊबंद आहेत आणि त्यांच्या सिव्हीलियन्ससाठी असलेल्या वेगवेगळ्या कँटीनमध्ये एकदम भारी भारी थंडीची जॅकेट्स, कपडे, बुट वगैरे मिळतात. तेथे महाराष्ट्रातले भरपूर जवान भेटले. नेमप्लेट वाचून किंवा आमचे आपआपसातले बोलणे ऐकून अनेक लोक आपणहून बोलत होते.

तेथे नाशिकचाही एक बुलेटवाला ग्रूप भेटला. त्यांच्यातल्या एकाला ती उंची, थंडी आणि विरळ प्राणवाऊ चांगलाच बाधला होता. त्यामुळे तो विमानाने परत जाणार होता.

दुसर्‍या दिवशी प्रचंड थंडीमुळे स्लीपिंग बॅग सोडून उठणे व आवरणे जीवावर आले होते. तसेच कसेबसे आवरले, खादाडी केली. आर्मी कँटीनमध्ये एक चांगली गोष्ट होती ती म्हणजे एकदम साधे घरच्यासारखे जेवण. खूप मसालेदार, तिखट असे नसलेले पण एकदम चविष्ट जेवण आणि नेहमी पिण्यासाठी असलेले गरम पाणी. तेथे कम्पल्सरी गरम / कोमट पाणी प्यावे लागत होते. या सगळ्या गोष्टींमुळे तेथील जेवण एकदाही बाधले नाही.

आजचे आमचे टारगेट होते खार्दुंगला पास - जगातील सर्वात उंच वाहतुकीचा रस्ता.

लेह शहरातून एके ठिकाणी खार्दुंगला चा रस्ता सुरू होतो. सुरूवातीला अगदी गल्ली गल्लीतून जाणारा रस्ता नंतर मोठा झाला मात्र खराब रस्ता आणि दगडगोट्यांची संगत होतीच.

.

हा पर्यावरणसंदेशही दिसला..

.

यथावकाश या लेह व्हू पॉईंटला पोहोचलो..

.

येथून लेह शहर असे दिसत होते. (..आणि एक विचित्र बांधकामही दिसत होते)

.

तेथे पुढे चेक पॉईंट लागला. या चेक पॉईंटवर एक नवीनच गोष्ट कळाली. खार्दुंगला ला जाण्यासाठी लेह बाहेरील भाड्याच्या गाड्या / झूमकार वगैरेना परवानगी नाही. खाजगी गाड्या (मालकासहीत असलेल्या) किंवा लेहमध्ये भाड्याने घेतलेल्या गाड्यांना पुढे सोडत होते.

.

चेक पॉईंट पार पडला आणि लदाखमधले चिरपरिचीत दृष्य सामोरे आले.

मातीचे डोंगर, खराब रस्ता आणि चरणारे एखाचे चुकार जनावर

.

विजय आणि रोहित

.

खार्दुंगला अक्षरश: राक्षसी उंचीवर असल्याने बर्फाचा सामना होणार होताच...

.

एके ठिकाणी धुळीच्या वादळात सापडलो.. येथे उजव्या कोपर्‍यात दिसत आहे तो हिरवा तुकडा म्हणजे लेह शहर आणि मातीच्या रेघा-रेघा दिसत आहेत तेथून आम्ही गाड्या हाणत आलो होतो.

.

विजय.

.

आणखी थोड्या उंचीवर आल्यानंतर धुळीच्या वादळाचे नामोनिशान दिसत नव्हते. मात्र बर्फ आणि खराब रस्ता होताच..!!

.

लेह शहर टिपण्याचा आणखी एक प्रयत्न..

.

ही अशी खडी चढण होती.

.

रस्त्याचा क्लोजप. Wink

.

अचानक एक वळण घेतले आणि खार्दुंगला पासची गर्दी दिसली आणि लगेचच आम्हीही त्या गर्दीत सामिल झालो.

.

तेथे प्रचंड गर्दी होती. अक्षरश: तेथेही ट्रॅफिक जाम झाले होते. मग थोडावेळ त्या गर्दीची मजा बघितल्यानंतर फोटोसेशन सुरू केले.

.

आणखी एक प्रयत्न..

.

विजय आणि रोहित

.

येथे वरती एक मंदिर होते.

.

जगातील सर्वात उंच मोटार वाहतुकीचा रस्ता..!!!!

.

आम्ही गाड्या लावल्या तेथे आर्मीचे एक सोविनीयर शॉप होते. तेथे ही माहिती मिळाली.

.

विजय आणि रोहित.

...

आंम्ही थोडा वेळ फोटोसेशन करतच होतो तोच अचानक बर्फाचे वादळ सुरू झाले.वादळ सुरू झाले तशी गर्दीही कमी होवू लागली.

.

आमची सोविनीयर शॉपमधून खरेदी झाली होतीच. पुन्हा एकदा सगळा परिसर नजरेत साठवला व लगेचच निघालो.

पहिल्या वळणापाशी जे दृष्य दिसले ते पाहिल्यावर पुन्हा थांबलो, कॅमेरे बाहेर निघाले.

हे बर्फाचे वादळ हळूहळू आमच्याकडे सरकत होते...

.

आणखी एक व्हू..

.

विजयच्या हातावर पडलेला बर्फ..

.

गर्दीतून निघताना..

.

थोडे अंतर उतरल्यानंतर बर्फाच्या वादळाचीही चिन्हे संपुष्टात आली..

कडाक्याची थंडी आणि ढगाळलेले वातावरण... विजय आणि सायलेन्सरला हात लावून हात गरम करणारा रोहित.

.

माझी बुलेट..!!!

.

पुन्हा एकदा रारंगढांग आठवले...

.

तो स्मृतीस्तंभ + रस्ते + लेह शहर..

.

यथावकाश पुन्हा लेह शहर जवळ आले...

..

आम्ही नुब्रा व्हॅली कटाप केले असल्याने दुपारीच खार्दुंगलाहून परत आलो. संध्याकाळी विजयचे नातेवाईक; पाडळे सर आणि आम्ही कारगिलच्या दिशेने जावून एक नद्यांचा संगम, मॅग्नेटिक हिल, पत्थरसाब गुरूद्वारा ही ठिकाणे बघून आलो.

परत आल्यानंतर आमच्याकडील चिवडा आणि कांदा, टोमॅटो वगैरे मिसळून तेथील जवानांसोबत झकास भेळपार्टी केली.

उद्या लेहला राम राम करून निघायचे होते..!!

लेह मध्ये आम्ही रहात होतो त्या सैनीकांचा निरोप घेताना जड जात होते. आम्ही जेथे राहिलो तेथील सिनीयर मंडळी लै लै भारी होती. एकदम जीव लावला होता सगळ्यांनी..
मेसमध्ये जेवायला एकत्र बसल्यानंतर वेगवेगळे विषय काढून दंगा करणारे, आम्ही वयाने कितीतरी लहान असूनही समवयस्कासारखे वागवून आमचाच ताण हलका करणारे आणि रात्री झोपताना गरम पाण्याचा थर्मास सोबत ठेवून कोणत्याही परिस्थितीत रात्री रूमच्या बाहेर पडायचे नाही अशी रोज सूचना देणारे सर्वजण आपाआपल्या कुटुंबियांपासून शेकडो मैलावर होते आणि कित्येक महिने पुन्हा घरी जाणार नव्हते.. परंतु तरीपण त्यांच्या एकंदर उत्साहात तसूभरही फरक जाणवत नव्हता.

अशा दिलदार माणसांचा उद्या आम्ही निरोप घेणार होतो. __/\__

(क्रमश:)

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users