एक अकेली छत्री मे : फोटोफीचर बुचार्ट गार्डन्स, कॅनडा

Submitted by rar on 3 October, 2016 - 12:12

कॅनडामधली व्हँकुव्हर ही माझी आवडती जागा. शांतता हवी असेल भटकायला तर मस्त निसर्ग. गर्दी, दुकानं, गजबज आणि मुख्य म्हणजे विविध वंशाची, विविध भाषा बोलणारी लोकं, खाद्यप्रकार एकूणच एथनिक डायव्हरसीटी अनुभवायची असेल तर मस्त व्हायब्रन्सी असलेली सीटी. व्हँकुव्हर पासून साधारण दीडतासाचा बोटीचा किंवा इथल्या भाषेत फेरीचा प्रवास करून गेलं की येतं व्हँकुव्हर आयलंड. हा प्रवास देखील एकदम भारी. आपल्या गाड्या ड्राईव्ह करत फेरीमधे चढवून पार्क करायच्या आणि मग फेरीच्या वरच्या मजल्यांवर किंवा बाहेर डेकवर बसून प्रवास. ह्या व्हॅकुव्हर आयलंड वरच्या व्हीक्टोरीया शहराजवळचं 'बुचार्ट गार्डन' ही अशीच एक भन्नाट जगा. पन्नास एकरांचा परीसर. खरं तर ह्या जागी पूर्वी होती एक चुन्याची खाण. १९०९ साली ही खाण कोरडी, ओसाड झाल्यानंतर त्याठिकाणी बोटॅनिकल गार्डन करायची कल्पना रॉबर्ट आणि जेनी बुचार्ट या दांपत्यानं मांडली. त्यांच्या व्हीजनमुळे आणि अनेक डीझायनर्सच्या मेहनतीमुळे आज एक जगभरात नावाजली गेलेली, ‘मस्ट व्हीजीट’ बोटॅनीकल गार्डन म्हणून नावारूपाला आलेली ही जागा. विविध ऋतुंमधे विविधरंगी रूपात नटणारी ही बाग. जगभरातल्या अनेक फुलांच्या जाती इथे आपल्याला त्यांच्या सौदर्यानं, विविधतेनं, कॅरॅक्टरीस्टीक्सनं अचंबित करतात. कितीहीवेळा गेलं तरी नव्यानं सामोरी येणारी अशी ही जागा.

नुकतीच बुचार्ट गार्डन पहायला गेले त्या दिवशी ढगाळ हवा आणि पावसाळी वातावरण होतं. मागच्या वेळी बुचार्ट गार्डनला गेले तेव्हा डोक्यावर तळपणारा सूर्य होता. ‘हर मौसमका अपना अलग अंदाज होता है’ या न्यायानं अनेक जागा वेगवेगळ्या हवामानात, वेगवेगळ्या ऋतूत पहायला, अनुभवायला मला आवडतात. त्यादिवशीची ढगाळ हवा, मधूनच पडणारा पाऊस, ओलावा, वारा, केसांवरुन पाणी झटकणं, पावसापासून कॅमेर्‍याचा बचाव करताना होणारी माझी आणि इतरांचीही तारांबळ ह्या सगळ्याचा एक वेगळाच माहोल, अनुभव होता. ह्या बुचार्ट गार्डनमधे जागोजागी लोकांना वापरायला छ्त्र्या ठेवल्या आहेत. पाऊस आला की इथलीच एक छ्त्री घ्यायची, उघडीप आली की छत्री बंद करून बागेत ठिकठिकाणी ठेवलेल्या बादल्यांमधे ठेवुन द्यायची. त्यादिवशी पावसाच्या सरी येत-जात असल्यानं बहुतेकांच्या हातात ह्या छ्त्र्या होत्या. डोक्यात, मनात सतत सिनेमा, नाटक असणार्‍या माझ्यासाठी ही पर्वणीच होती. आज आजूबाजूच्या लोकांच्या हातात एक प्रॉप होतं, छत्री.
लहानांपासून मोठ्यांपर्यंत विविध वयाची, वंशाची, वृत्तीची लोकं हे प्रॉप, हातातली छत्री नॅचरली कशी वागवतात, कधी वापरतात हे ऑबझर्व्ह करण्याची भारी संधी माझ्यासाठी होती. त्या दिवशी बागेतल्या झाडाफुलांइतकीच किंबहुना जास्तच मी आजूबाजुची माणसं आणि छत्र्या एंजॉय केल्या. स्ट्रीट फोटोग्राफीची हीच मजा असते. धो धो पावसात निम्म भिजत, स्वतःचा कॅमेरा सांभाळत आजूबाजूला छत्र्या घेऊन वावरणारी माणसं पाहणं, निरीक्षण करणं, टिपणं - टोटल धमाल अनुभव. आणि ह्या प्रत्येक सीनच्या बॅग्राऊंडला मनात 'एक अकेली छत्री मे जब आधे आधे भीग रहे थे' पासून ' रेन ड्रॉप्स आर फॉलींग ऑन माय हेड' अश्या विविध गाण्यांच्या रेकॉर्डस...

१.

२.

३.

४.

५.

६.

७.

८.

९.

१०.

११.

१२.

१३.

१४.

१५.

१६.

१७.

१८.

१९.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

मस्त फोटोज आणि वर्णन .छ्त्र्यांच्या फोटोजबरोबर इतरही फोटोज टाक की.
एखाद्या खाणीचा एवढा सुंदर कायापालट करायचा म्हणजे भारीच की. मस्त दिसतेय जागा.

वॉव.. मस्तं आहे जागा..

चुन्या च्या खाणी चं फेस लिफ्ट अप्रतिम आयडिया आहे.. पारदर्शक छत्र्या.. थीम भारीच गोड..

रेअर प्लांट्स चे फोटो पण टाक..

मस्तय कंसेप्ट. आवडली. समोरच्याला कळुन ने देता असे फोटो काढता येणे अवघड असते. शेवटल्या फोटोत एका पावसात दोघांनी भिजायचं फिल आहे एकदम. त्या पारदर्शक छत्र्या बघुन मला जपानची आठवण झाली. Happy पार्क भारी दिसत आहे.

सगळ्यांच्या प्रतिसादाबद्दल धन्यवाद.
ह्या फोटोफीचरच्या निमित्तानं थोडं स्ट्रीट फोटोग्राफीबद्दल -
गेल्या एक दोन वर्षापासून माझं डोंगर, झाडं, किंवा एव्हन पोर्ट्रेट्स क्लीक करणं थोडं कमी झालंय. कारण आता मला माणसं, त्यांच्यातली ईंटरॅक्शन आणि मुख्य म्हणजे अ‍ॅशन जास्त अ‍ॅट्रॅक्ट करते.
बुचार्ट गार्डन मधे जाऊन पाना-फुलांचे फोटो मी याही आधी काढले आहेत, यावेळीही काढले. सगळेच ते फोटो काढतात. पण यावेळी ' छत्र्या आणि माणसं ' हा विषय माझ्यासाठी मुख्य आकर्षण होता. त्यामुळे विषयाचं हटकेपण तुम्हाला आवडलं हे समाधान आहे.

ह्या फोटोत आणि इतर 'वेल फ्रेम्ड, वेल प्लॅन्ड' फोटोत एक महत्वाचा फरक आहे ते म्हणजे 'अ‍ॅक्शन कॅपचर करणं'.
ह्यातल्या कोणत्याच माणसानं मला 'पोझ' दिली नव्हती, जेणेकरून मी माझा कॅमेरा अँगल, लाईट, एक्पोझर, मीटरींग इत्यादी अ‍ॅडजस्ट करू शकेन. डोंगराचे, झाडांचे, इमारतींचे फोटो काढताना १० जागा ट्राय करून बेस्ट लाईट, अँगल मिळवता येतो. इथे स्ट्रीट फोटोमधे अ‍ॅक्शन कॅपचर करताना तो मोमेंट पकडणं जास्त महत्वाचं. किंबहुना, हे सगळे फोटोज साध्या 'पॉइंट अ‍ॅन्ड शूट' कॅमेर्‍यावर काढले आहेत.

आपण गेटटूगेदरला ठरवून फोटो काढले, तरी कोणाचे डोळे मिटलेले, कोणाचा हात अर्धवट चेहर्‍यासमोर असे फोटो येतात.
इथे तर समोरच्या माणसांना कळू न देता, डीस्टर्ब न करता, अ‍ॅक्शन कंप्लीट झालेल्या कॅपचर करणं, त्यातून मोशन दिसणं हे माझं ध्येय होतं, आणी चॅलेंजही. त्यामुळे मला माझ्यासाठीच हा प्रयोग खूप समाधानकारक रीझल्ट्स देणारा वाटला.

शिवाय माणसं पाहण्यात गंमत आहेच. उदा. फोटो १० आणि ११ मधल्या दोघी मुली जुळ्या बहिणी होत्या. पण त्यांची बॉडी लॅम्ग्वेज, कपडे कमालीचे 'सीता और गीता' टाईप्स भिन्न. १० नंबर मधल्या मुलीच्या अ‍ॅक्शन मधली नजाकत, आणि ११ नंबर मधल्या तिच्या बहिणीच्या हालचालीतला रफटफपणा टिपणं ह्यात सॉलीड मजा होती.

प्रत्येक माणूस एक स्टोरी. आणि माझा पिंड ' स्टोरी टेलर'चा असल्यानं हे असे प्रयोग मी करतीये, आणि त्यात धमाल आहे.

बागेचं नाव फनी आहे. फोटॉ दिसले नाहीत. ह्या लोकांचे फोटो पब्लिश करायला परवानगी आहे का?
पूर्वी इथे इश्यू झाला होता. थीम मस्तच. प्यार हुवा इकरार हुवा असे आहेत का कोणी? आणि आज रपट जाये वाले?

ह्या लोकांचे फोटो पब्लिश करायला परवानगी आहे का? पूर्वी इथे इश्यू झाला होता >> हो त्याचं काय झालं??

फोटो का दिसत नसावेत? दिसण्यासाठी काही टीप्स?

स्ट्रीट फोटोग्राफी हा प्रकारच मुळात वेगळा आहे नेहेमीच्या प्लॅन्ड फोटोग्राफीपेक्षा. त्यामुळे लोकांना तुमचा त्रास होत नाही ना, त्यांना त्यांच्या अ‍ॅक्टीव्हीटीज करताना तुम्ही कॉनशस करत नाही ना, बॉदर करत नाही ना किंवा इथे कॅमेरा वापरायला परवानगी नाही अश्या जागा असतील तिथे फोटो काढत नाही ना, ह्या सगळ्याचं भान असणं अतिशय आवश्यक आहे.
हे भान ठेवताना आणि आचरणात आणताना अनेक भारी सिट्युएशन्स, शॉट्स गमवावे लागतात. पण त्याची तयारी हवी.
इतकंच या विषयावर.
बाकी मायबोली प्रशासनाची (अ‍ॅज अ सीस्टीम) म्हणून काही स्पेसीफीक धोरणं असतील याबाबत, तर मला ती मान्य आहेत आणि मी ती पाळीनही. इन दॅट केस, मायबोली बाहेर 'स्ट्रीट फोटोग्राफी' पब्लीश करू देणारी सीस्टीम कदाचित शोधावी लागेल. पण दॅट्स टोटली फाईन.

जो नियम जिप्सीला लावला गेला होता तोच नियम सर्व फोटोंना लावायला हवा.

त्यावेळी मी देखिल माबो नियमांना पाठिंबा दिला होता. पण इथे हा नियम लागू केलेला दिसत नाहीये.