तुझ्यात जीव रंगला - झी मराठीवरील नवी मालिका

Submitted by योकु on 19 September, 2016 - 10:26

तर, लोलिता गाशा गुंडाळतेय. नवी मालिका, नवी हिरवीण. नवा काथ्याकूट. नवी पिसं.
हो जाओ शुरू... Happy

Group content visibility: 
Public - accessible to all site users

बघीतले २ भाग. त्यातला पहिला पूर्ण पाहीला. धाकटी सून ( स्मिता शेवाळे बहुतेक) आधी आल्याने आणी माहेरची बक्कळ श्रीमंत असल्याने तिचा तोरा जास्त दाखवलाय. त्यातुन तिच्या माहेरुन एक फुकटी चमची पण आलीय. सासरे मंत्री होऊन मुंबईहून घरी आलेत, पण ववाळायला या सुनबाई लवकर पुढे येत नाहीत म्हणून गावातली शिक्षीका अंजलीला पुढे केले जाते ( राणामार्फत) आणी मग सावकाश घरच्या सुनबै उगवतात. त्यातुन त्यांना नाणे व अंजलीला सोन्याची चेन मिळाल्याने त्या भांगडा करतात. बाकी रटाळ आहे. मानापमान, जातीतले वैर, श्रीमंती असले पण असेल.

स्मिता शेवाळे नाही, धनश्री आहे ती बहुतेक (आडनाव विसरले, गंध फुलांचा गेला सांगून मधे होती), पहिला भाग बघायचं डेरींग केलं, आता नाही ब्वा. हिरॉईन बरी असावी बहुतेक (अक्षया देवधर).

अरे हो की अंजू, विसरलेच होते मी. दोघींमध्ये थोडे साम्य असल्याने नेमके हेच नाव आठवले. मला डोक्याला ताप देणार्‍या ( राखेचा सोडुन ) शिरीयली आवडत नाहीत. त्यामुळे ही पण नाय बघणार.

त्यातुन त्यांना नाणे व अंजलीला सोन्याची चेन मिळाल्याने त्या भांगडा करतात. Rofl

धनश्री आहे ती बहुतेक (आडनाव विसरले, गंध फुलांचा गेला सांगून मधे होती>>>> धनश्री काडगावकर असेल बहुतेक.

हिरवीणीची आई माझी मामेबहिण आहे. Happy

तो राणा लाजताना दाखवलाय ना डबा वगैरे घेऊन तशी मुलं असतातात खरच. माझा एक भाचा असा लाजरा. नवखं कुणी आले की घरातुन पसार व्हायचा.

कोणी बघत नाहीये का ही मालिका इकडे? मला फार आवडतेय सध्यातरी. राणा, पाठक बाईचा रोल करणारी हिरॉईन, तिचे आई बाबा, राणाचा मित्र, घरात स्वयंपाक करणाऱ्या मावशी, व्हिलन सून, तिची खुशामत करणारी तिची चमची- करवली, राणाचे मंत्री वडील, शाळेचे हेडसर, शाळेची मुलं ,पैलवान गुरु, त्यांचा करडा आवाज (आणि त्यांच्या कुस्तीच्या घोषणा) असे एकूण एक मस्त काम करणारे कलाकार आहेत.. सगळेच मालिकेत समरस झालेले व्यावसायिक कलाकार वाटतात, कोणीही - अगदी एकही कलाकार शिकाऊ वाटत नाही, हे ह्या मालिकेचे वैशिष्ट्य..

संवादही कसले खुसखुशीत आहेत.. परवाच्या भागात कॉम्प्युटर परत करायला जातांनाची ती घोषणा किती मजेशीर होती:

पंचक्रोशीतली पहिली शाळा
हेडसरांनी आणलाय कम्प्युटर काळा Biggrin

ही मालिका पाहतांना एखादा जुना मराठी सिनेमा पाहत असल्यासारखे वाटते. पार्श्वसंगीत आणि आवाजही मस्त आहे.

शीर्षकगीतही छान आहे. कोणाला त्याचे बोल नीट समजले आहेत का? माझं पहिल्या वाक्यालाच आडतंय.. प्लिज इकडे लिहा जमल्यास.. Happy

यु ट्यूब वर आहे याच शीर्षक गीत . .. गावाकडची घरं शेतं। वविहीर मस्त दाखवलिये.. राणा ला कधी कळणार वहिनीचे प्रताप कोण जाणे..

राणा ला कधी कळणार वहिनीचे प्रताप कोण जाणे.>> शिरेल संपताना. Wink

अजूनपर्यंत चांगली चाललीय सिरियल. हिराॅइन छान आहे.. अॅक्टींगपण मस्त करतेय. (थंडाक्काच्या अनुभवाच्या धसक्याने आधीच हिच कौतुक करायची हिंमत झाली नव्हती.)
राणा पण चांगलं काम करतोय.

पण मला तो साहेबराव खूप म्हणजे खूपच आवडतो. Happy कसला देखणा आहे.

यु ट्यूब वर आहे याच शीर्षक गीत . .. गावाकडची घरं शेतं। वविहीर मस्त दाखवलिये.. राणा ला कधी कळणार वहिनीचे प्रताप कोण जाणे..>>> मला आधी ह्या शीर्षक गीताच्या ओळी वाटल्या. Proud

पण मला तो साहेबराव खूप म्हणजे खूपच आवडतो. स्मित कसला देखणा आहे.>>> साहेबराव साठी माझ्यापण डोळ्यात बदाम, खरा हँडसम तोच Happy त्याचा उल्लेख कसा राहिला माझ्याकडून, कोण जाणे!

आणि एक राहिलं, ते सुगरणींचे खोपे.. खरे असतील का ते? मस्त दिसतात अगदी.
शिवाय ती विहीर पहिली, की सैराटची आठवण आल्याशिवाय राहत नाही..

छान आहे ही मालिका. कोल्हापुरी बोलीही बर्‍यापैकी बोलत आहेत सगळे.
राणा, पाठक बाईचा रोल करणारी हिरॉईन, तिचे आई बाबा, राणाचा मित्र, घरात स्वयंपाक करणाऱ्या मावशी, व्हिलन सून, तिची खुशामत करणारी तिची चमची- करवली, राणाचे मंत्री वडील, शाळेचे हेडसर, शाळेची मुलं ,पैलवान गुरु, त्यांचा करडा आवाज (आणि त्यांच्या कुस्तीच्या घोषणा) असे एकूण एक मस्त काम करणारे कलाकार आहेत>>> +१

शीर्षकगीतही छान आहे. कोणाला त्याचे बोल नीट समजले आहेत का? माझं पहिल्या वाक्यालाच आडतंय.. >>
मला पण आवडते टायटल सॉन्ग पूर्ण . झी मराठी ने award द्यायला हवे होते !
राणा आणि पाठक मॅडम काम छान करतात . सुनबाई फारच आगाऊ आहेत . फार ओव्हरअक्टिंग करते

झी मराठीच्या सगळयाच मालिका सुरुवातीला ५०-६० भाग छान असतात. त्यामुळे सध्यातरी हि मालिका बघते आहे. कादिप बघायची कधीच बंद केली. खुकखु आता बघवत नाही.

हार्दिक जोशी आणि अक्षया देवधर दोघेही काम मस्त करतात.

शीर्षकगीताचे बोल

https://www.youtube.com/watch?v=9m6-8L1o9LM

चालतंय की. >>> Lol . भारी एकदम.

तो हिरो असंच म्हणतोना. पहिला भाग बघितला होता.

Pages