१६ सप्टेंबर, १९९६पासून ...

Posted
3 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
3 वर्ष ago
Time to
read
1’

१६ सप्टेंबर, १९९६पासून गेली २० वर्षं तुमची आपुलकी, जिव्हाळा आणि विश्वास संपादन करण्याचं भाग्य आम्हाला मिळालं, याबद्दल ऋणी आहोत.

याच आपुलकीच्या आधारानं आणि जिव्हाळ्याच्या सोबतीनं एकविसाव्या वर्षात पदार्पण करतो आहोत.

भाषा मराठमोळी
हर अंतरी फुलावी,
घेऊन ध्यास आली
उदयास मायबोली !

FB-20years-sm.jpg

विषय: 
प्रकार: 

>>अभिनंदन, आभार आणि शुभेच्छा!! स्मित

'मायबोली'शिवाय जगण्याची आता कल्पनाही करता येत >> +१

सर्वप्रथम आई,
दुसरी गर्लफ्रेंड
तिसरी आपली मायबोली ..

आणखी काय बोलू Happy

मायबोली, मायबोली परिवार, अजय आणि समीर या सर्वांचे मनःपूर्वक अभिनंदन!

मायबोलीला आमच्या आयुष्यात फार जिव्हाळ्याचं स्थान आहे.

अशीच भरभराट होऊ देत.

परदेशातल ट्रान्झिशन मायबोली मुळे सोप झाल, आता मायबोली अविभाज्य भाग आहे नेट वावराचा ...सर्वाचे अभिनदन!
once a maaybolikar always maaybolikar!!

मराठी भाषेतुन , ज्यांनी कधीही लिखाण केले नव्हते , त्यांना लिखाणाची प्रेरणा देण्याचे काम, ज्यांनी लहानपणी केलेले पाठांतर आठवून आठवून ,स्वतःच्या तसेच इतरांच्या आठवणी जागविण्याचे काम केले , ते माध्यम म्हणजे मायबोली ! ! या मायबोलीने कधी कधी खदखदा हसविले , तर कधी कधी गंभीर विषयावर चर्चा घडवून आणली, कधी उत्तमोत्तम पदार्थ तयार करून खाण्याचे सुचविले तर आपल्याच भारत देशात आणि परदेशात सुद्धा भटकंती करुन " हे जीवन, हा निसर्ग , ही प्रुथ्वी , सर्व खुपच सुंदर आहे " याची प्रचिती आणून दिली.म्हणुनच एकविसाव्या वर्षात , पदार्पण करतांना , हार्दिक अभिनंदन ! !

मनापासून अभिनंदन सर्व टीमला......... देशाबाहेर राहताना इतक्यावेळा देशाचा, राज्याचा आणि भाषेचा 'फील' दिल्याबद्दल मनापासून धन्यवाद!!!!

Pages